::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/03/2015 )
आदरणीय सदस्य, मा.श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार: -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ती ही अनसिंग, ता.जि. वाशिम येथील रहिवासी आहे. तक्रारकर्तीचे पती जावेद खान अजमल खान यांनी विरुध्द पक्षाकडून वर्ष 2007 मध्ये पॉलिसी घेतलेली होती, त्याचे विवरण खालीलप्रमाणे . . .
अ. पॉलिसी क्र. 823240968
ब पॉलीसी धारकाचे नांव - जावेद खान अजमल खान
क. पॉलिसीचा टेबल व टर्म – 188-20
ड. पॉलिसीची रक्कम – रुपये 1,00,000/- (दुहेरी अपघात लाभ )
इ. पॉलिसीची नॉमिनी (वारसदार) - मोहम्मदीया कौसरबी जावेद खान
तक्रारकर्तीचे पती जावेद खान अजमल खान यांची अनसिंग येथे दिनांक 2/01/2010 रोजी हत्या झाल्याने त्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्यांची हत्या करणा-या व्यक्तिंवर गुन्हा दाखल होऊन, वाशिम येथील सत्र न्यायालयात खटला क्र. 32/2010 सुरु होता. विमा घेणारा यांचा अपघाती किंवा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास पॉलिसी रक्कमेच्या दुप्पट रक्कम वारसास मिळणार होती. त्याप्रमाणे तक्रारकर्तीस एकूण 2,00,000/- रुपये मिळावयास पाहिजे. परंतु विरुध्द पक्ष यांनी केवळ 1,00,000/- रुपये तक्रारकर्तीस दिले. उपरोक्त सत्र खटला क्र. 32/2010 चा निकाल दिनांक 23/04/2012 रोजी लागला. त्यानंतर तक्रारकर्तीने दिनांक 15/06/2012 रोजी वकिलामार्फत रजिष्टर नोटीस पाठवून उर्वरीत पॉलीसी रक्कम 1,00,000/- ची मागणी केली. परंतु नोटीस मिळूनही विरुध्द पक्षाने उत्तर दिले नाही किंवा रक्कम दिलेली नाही. तक्रारकर्तीला एकूण तीन अपत्ये आहेत. अशास्थितीत तिला सदर रक्कमेची अत्यंत आवश्यकता आहे. विरुध्द पक्षाने सेवेमध्ये न्युनता दर्शवून, अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे.
म्हणून तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल करुन, वि. मंचास विनंती केली
की, तक्रार मंजूर करण्यांत यावी व विरुध्द पक्ष यांच्याकडून तक्रारकर्तीला पॉलिसीची उर्वरीत रक्कम रुपये 1,00,000/- व त्या रक्कमेवर दिनांक 02/01/2010 पासुन रक्कम वसुल होईपर्यंत द.सा.द.शे. 12 % प्रमाणे व्याज, तसेच तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देण्याचा आदेश व्हावा, अन्य न्याय व योग्य असा आदेश तक्रारकर्तीच्या हितामध्ये व्हावा.
तक्रारकर्तीने सदर तक्रार शपथेवर दाखल केलेली असून त्या सोबत निशाणी- 4 प्रमाणे एकुण 12 दस्तऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जवाब :- सदर तक्रारीची नोटिस मंचातर्फे प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी लेखी जबाब दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली व पुढे नमूद केले त्याचा थोडक्यात आशय असा, . . . .
वास्तविक तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू हा एकतर त्याने जास्त मद्य सेवन केल्यामुळे किंवा विषारी द्रव्य घेतल्यामुळे झालेला आहे. त्याप्रमाणे दिनांक 02/01/2010 रोजी मयताचे सख्खे काका नसरुल्लाखॉ पठाण यांनी पोलीस स्टेशन, अनसिंग यांचेकडे रिपोर्ट दाखल केला होता व त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमुद केले होते की, मयत जावेदखान हा नरेश खंडागळे व ड्रायव्हर जामू यांचेसोबत मुंबई येथून रात्री 8 वाजता घरी परत आल्यावर थोडयाच वेळात त्याचे पोटामध्ये कसे-बसे होउ लागले व रात्री दोन ते तिन वाजताचे दरम्यान त्याला उलटया होउन तोंडाला फेस येत होता. त्यानंतर नसरुल्ला व इतर घरातील लोकांनी मयत जावेदखान यांना श्री हॉस्पीटल, अनसिंग येथे इलाजाकरिता नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यावरुन, मयत जावेदखान यांचे सेवनामध्ये विष गेल्याची शंका मनात येते, करिता रिपोर्ट दाखल. त्यानंतर दोनच दिवसांनी मयत जावेदखान यांचे वडिल अजमलखान यांनी पो.स्टे. अनसिंग येथे आरोपी युसुफखॉं समशेरखॉं, मुनाफखॉं समशेरखॉं व तोहफीकखॉं युसुफखॉं यांचेविरुध्द दि. 04/01/2010 रोजी कैफीयत दाखल केली. खटला न्यायप्रविष्ट झाल्यानंतर वि. न्यायाधिश यांनी सदरहू आरोपींना निर्दोष मुक्त केले. असे असतांना सुध्दा तक्रारकर्तीने तिच्या पतीचे अपघाती निधन झाले असे नमुद करुन, या विरुध्द पक्षाकडून विमा पॉलिसी संदर्भात दुहेरी आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे व सदरहू खोटी केस दाखल केली आहे. तेंव्हा तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज खर्चासहीत खारिज करण्यांत यावा
विरुध्द पक्षाने लेखी जबाबासोबत सत्र न्यायालय वाशिम यांनी खटला क्र. 32/2010 मध्ये दिलेल्या निकालाची प्रत दाखल केलेली आहे.
3) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारकर्तीचा लेखी युक्तिवाद, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व तक्रारकर्तीने दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन मंचाने केले तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद एैकल्यानंतर खालील निष्कर्ष कारणे देवुन नमुद केला.
तक्रारकर्तीचे पती जावेदखान अजमल खान यांचा मृत्यू दिनांक 2/01/2010 रोजी झाला हे विरुध्द पक्षास मान्य आहे. तक्रारकर्तीचे पती नामे जावेदखान अजमल खान यांनी विरुध्द पक्षाच्या वाशिम शाखेतून खालील प्रमाणे पॉलिसी वर्ष 2007 मध्ये घेतलेली होती.
अ. पॉलिसी क्र. 823240968
ब. पॉलीसी धारकाचे नांव - जावेद खान अजमल खान
क. पॉलिसीचा टेबल व टर्म – 188-20
ड. पॉलिसीची रक्कम – रुपये 1,00,000/- (दुहेरी अपघात लाभ )
इ. पॉलिसीची नॉमिनी (वारसदार) - मोहम्मदीया कौसरबी जावेद खान
म्हणून मयत जावेद खान अजमल खान यांची तक्रारकर्ती ही पत्नी असल्यामुळे विरुध्द पक्षाची ग्राहक होते.
तक्रारकर्तीने युक्तिवाद केला की, तक्रारकर्ती यांच्या पतीचा अनैसर्गीक मृत्यू झाला. मात्र विरुध्द पक्षाने विमा दावा मंजूर करुन केवळ रक्कम रुपये 1,00,000/- तक्रारकर्तीस दिली, परंतु दुहेरी अपघात लाभाची रक्कम फौजदारी प्रकरण क्र. 32/2010 चा निकाल लागल्यानंतर देण्याचे कबूल केले. परंतु निकाल होऊनही, विरुध्द पक्षाने दुहेरी अपघात लाभाची रक्कम तक्रारकर्तीस दिली नाही. तक्रारकर्तीने दिनांक 15/06/2012 रोजी वकिलामार्फत रजिष्टर्ड पोष्टाने नोटीस पाठवून उर्वरीत रक्कमेची मागणी केली. सदरहू नोटीस दिनांक 18/06/2012 रोजी मिळूनसुध्दा विरुध्द पक्षाने नोटीसला ऊत्तरही दिले नाही व रक्कमही दिली नाही. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, तिचे पती जावेद खान अजमल खान यांचा अनैसर्गीक मृत्यू झाल्यामुळे तक्रारकर्ती ही दुहेरी अपघात लाभाची रक्कम रुपये 2,00,000/- मिळण्यास पात्र असूनसुध्दा विरुध्द पक्षाने फक्त रुपये 1,00,000/- तक्रारकर्तीस दिले. तक्रारकर्तीने युक्तिवाद केला की, तिला एकूण तीन लहान अपत्ये आहेत व तिचे पती हे कुटूंबामध्ये एकमेव कमावते पुरुष होते व त्यांच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ती ही निराधार झाली. अशी परिस्थिती असतांना सुध्दा विरुध्द पक्षाने सेवेमध्ये न्युनता दर्शवून, अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन मानसिक व आर्थिक त्रास दिला. म्हणून तक्रारकर्तीस उर्वरीत रक्कम रुपये 1,00,000/- सव्याज तसेच मानसिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च विरुध्द पक्षाकडून देण्याचा आदेश व्हावा.
विरुध्द पक्षाने युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू हा एकतर त्याने जास्त मद्य सेवन केल्यामुळे किंवा विषारी द्रव्य घेतल्यामुळे झालेला आहे. त्याप्रमाणे दिनांक 02/01/2010 रोजी मयताचे सख्खे काका नसरुल्लाखॉ पठाण यांनी पोलीस स्टेशन, अनसिंग यांचेकडे रिपोर्ट दाखल केला होता व त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमुद केले होते की, मयत जावेदखान हा नरेश खंडागळे व ड्रायव्हर जामू यांचेसोबत मुंबई येथून रात्री 8 वाजता घरी परत आल्यावर थोडयाच वेळात त्याचे पोटामध्ये कसे-बसे होउ लागले व रात्री दोन ते तिन वाजताचे दरम्यान त्याला उलटया होउन तोंडाला फेस येत होता. त्यानंतर नसरुल्ला व इतर घरातील लोकांनी मयत जावेदखान यांना श्री हॉस्पीटल, अनसिंग येथे इलाजाकरिता नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यावरुन, मयत जावेदखान यांचे सेवनामध्ये विष गेल्याची शंका मनात येते, करिता रिपोर्ट दाखल. त्यानंतर दोनच दिवसांनी मयत जावेदखान यांचे वडिल अजमलखान यांनी पो.स्टे. अनसिंग येथे आरोपी युसुफखॉं समशेरखॉं, मुनाफखॉं समशेरखॉं व तोहफीकखॉं युसुफखॉं यांचेविरुध्द दि. 04/01/2010 रोजी कैफीयत दाखल केली. खटला न्यायप्रविष्ट झाल्यानंतर वि. न्यायाधिश यांनी सदरहू आरोपींना निर्दोष मुक्त केले. असे असतांना सुध्दा तक्रारकर्तीने तिच्या पतीचे अपघाती निधन झाले असे नमुद करुन, या विरुध्द पक्षाकडून विमा पॉलिसी संदर्भात दुहेरी आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे व सदरहू खोटी केस दाखल केली आहे. तेंव्हा तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज खर्चासहीत खारिज करण्यांत यावा.
उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन, असे दिसून येते की, उभय पक्षांमध्ये विमा पॉलिसी संदर्भात कुठलाही वाद नसून फक्त तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू नैसर्गीकरित्या झाला किंवा अनैसर्गीकरित्या झाला याबाबत आहे. विरुध्द पक्षाला मयत जावेदखान अजमलखान यांच्या मृत्यूबाबत केवळ शंका आहे. विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या वि. सत्र न्यायालय, वाशिम यांनी फौजदारी प्रकरण क्र. 32/2010 च्या निकालामध्ये असे नमुद केले आहे की, मयत जावेदखान अजमलखान याच्या व्हिसेरामध्ये अल्कोहोल आढळले आहे तसेच सदरहू प्रकरणातील आरोपींनी मयताला झालेल्या जखमा काठयांव्दारे केल्या आहेत किंवा नाही, याबाबत संशय निर्माण होतो, तसेच प्रकरणामधील साक्षपुराव्यांनी सरकार पक्षाला योग्य ती मदत न केल्यामुळे व सरकार पक्षाने दाखल केलेल्या पुराव्यावरुन असाही अर्थबोध होतो की, कदाचित मयत जावेदखान अजमलखान याचा मृत्यू अतिरीक्त मद्यप्राशन केल्यामुळे झालेला असू शकतो, त्यामुळे सदर प्रकरणातील आरोपींना संशयाचा फायदा देवून सोडून देण्यात आले. सदर प्रकरणातील डॉ. सचिन कड यांनी त्यांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये असे ही नमुद केले आहे की, मयत जावेदखान अजमलखान याच्या शरीरावर दिसून आलेल्या बाहय दुखापतीमध्ये गुडघ्याला, छातीला मार बसलेला होता तसेच बरगडीची हाडे मोडलेली होती. या सर्व बाबींवरुन असे स्पष्ट होते की, मयत जावेदखान अजमलखान याचा मृत्यू हा अनैसर्गीक नव्हता. याबाबत कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही. तक्रारकर्तीने तिच्या युक्तिवादाच्या पृष्ठयर्थ मा. सर्वोच्च न्यायालयाचे खालील न्यायनिवाडे दाखल केलेत.
- [ 2000 ( I ) B.C.J. 19 (SC) ]
SUPREME COURT
M/s India Photographic Co. Ltd. –Vs.- H.D.Shourie
Civil Appeal No. 5310 of 1990 Decided on 3rd August 1999
- Consumer Protection Act, 1986 – Section 1 – Object of the Act is to protect consumers interest – Rational approach and not technical approach required.
The reference to the consumer movement and the international obligations for protection of the rights of the consumer, provision has been made herein with the object of interpreting the relevant law in a-rational manner and for achieving the objective set forth in the Act. Rational approach and not a technical approach if the mandate of law.
- IV (2011) CPJ 4 (SC)
SUPREME COURT OF INDIA
LIC Of INDIA & ANR. –Vs.- HIRA LAL
Petition for Special Leave to Appeal (Civil)No. 28693 of 2009 ( From the Judgement and Order dated 17.4.2009 in R.P. No. 3625/2007 of The National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi) - Decided on 23.8.2011
- Consumer Protection Act, 1986 – Section 23 –Insurance – Accident – Permanent blindness – Claim repudiated – Forum dismissed complaint – State Commission allowe appeal and held that blindness suffered by complainant was neither designed by him nor was in any manner attributed to any act on his own part as to show that it was not due to any unforeseen or unexpected cause to exonerate the Insurance Company – National Commission held that respondent suffered blindness due to accident and he was entitled to Insurance amount – Order of Commissions below upheld.
- Interpretation of Statutes – When two interpretations are possible one beneficial to consumer has to be followed.
वरील दोन्ही न्यायनिवाडयांच्या मार्गदर्शक तत्वांचे अवलोकन केले असता, तसेच अपघाताबाबतच्या परिभाषेबाबत लिहीलेले विवेचनावरुन असे दिसून येते की, पॉलिसीमध्ये अपघात या शब्दाचा गैरअर्थ काढून विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा अपघात विम्याचा दावा, अपघाती हितलाभ न देता मंजूर केला आहे. वरील दोन्ही न्यायनिवाडे तक्रारकर्तीच्या दाव्यास तंतोतंत लागू होतात व पुरक ठरतात. या सर्व परीस्थितीजन्य व कागदोपत्री पुराव्यावरुन, असे दिसून येते की, जावेदखान अजमलखान याचा मृत्यू हा अनैसर्गीक नव्हता असे विरुध्द पक्ष सिध्द करु शकला नाही, असे मंचाचे मत आहे.
मयत जावेदखान अजमलखान यांनी काढलेल्या पॉलिसीची नॉमिनी ही त्यांची पत्नी मोहम्मदीया कौसरबी जावेद खान ही आहे. या पॉलिसीच्या अपघाती विम्याच्या निकषानुसार विमाकृत रक्कमेच्या समतुल्य रक्कम ही अपघाती हितलाभ म्हणून तक्रारकर्ती मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षाने वरीलप्रमाणे नियमानुसार देय असलेली रक्कम तक्रारकर्तीस न दिल्यामुळे, तिला मंचात तक्रार दाखल करावी लागली, परिणामत: तक्रारकर्तीस मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ती / वारसदार विरुध्द पक्षाकडून अपघात विमा पॉलिसी अंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- सव्याज मिळण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
- तक्रारअर्ज विरुध्द पक्ष -विमा कंपनी विरुध्द अंशतः मान्य करण्यांत येतो.
- विरुध्द पक्ष - विमा कंपनीने तक्रारकर्तीस पॉलिसी क्र. 823240968 या पॉलिसीची रक्कम रुपये 1,00,000/- ( अक्षरी - रुपये एक लाख फक्त ) पॉलिसीच्या अपघाती विम्याच्या निकषानुसार विमाकृत रक्कमेच्या समतुल्य रक्कम ही अपघाती हितलाभ म्हणून तक्रारकर्तीस दरसाल, दरशेकडा 6 टक्के व्याजदराने प्रकरण दाखल दिनांक 27/09/2012 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासहीत द्यावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) तसेच न्यायिक खर्च रुपये 2,000/- ( रुपये दोन हजार फक्त ) द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी सदर आदेशाची पुर्तता, आदेश प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसांत करावी.
- तक्रारकर्तीच्या इतर मागण्या अमान्य करण्यांत येतात.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
svgiri जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).