जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/93. प्रकरण दाखल तारीख - 22/03/2010 प्रकरण निकाल तारीख –16/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री. सतीश सामते, - सदस्य. रोहीदास पि.लालसिंग पवार वय 40 वर्षे, धंदा निल रा. दाबदरी ता. हिमायतनगर, जि. नांदेड सध्या राहणार हदगांव ता.हदगांव जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. शाखा व्यवस्थापक, भारतीय जीवन बिमा निगर, शाखा भोकर, पेट्रोल पंपासमोर,भोकर, ता.भोकर जि. नांदेड गैरअर्जदार 2. विमा प्रतिनीधी, तूकाराम मारोती कंधारे रा. गंदेवार कॉलनी, भोकर ता.भोकर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सी.डी.इंगळे गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.अर्चनासिंघ शिंदे गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या ) गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग नांदेड मध्ये बस चालक या पदावर नौकरी करीत होता व त्यांचा बक्कल नंबर 19409 होता. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे पॉलिसी नंबर 982939079 व नंबर 982939080 काढलेला होत्या. या काढण्यासाठी गैरअर्जदार क्र.2 यांनी असे सांगितले तूम्ही बसचालक आहात यात तूम्हाला अपघातामध्ये थोडा जरी मार लागला तरी तूम्हाला संपूर्ण रक्कम मिळते व मूदत संपेपर्यत तूमचा विमा चालू राहतो. दि.11.2.2008 रोजी अर्जदार हा बस क्रंमाक एम.एच-20-6653 हदगांव लातूर ही बस घेऊन हदगांव वरुन 8.15 वाजता निघाला अर्धापूर बसस्टँड वर नोंद करुन नांदेड कडे रवाना झाला. नांदेड शहरालगत ग्यानमाता शाळेजवळ त्यांची बस घेऊन पोहचली असता समोरुन नांदेड कडून टिप्पर क्र.एम.एच.-26-एच-6691 यांनी अर्धापूरके जाणा-या बसला ओव्हरटेक करुन सरळ अर्जदाराच्या बसवर येऊन धडकला त्यामूळे अपघात होऊन त्यात अर्जदाराचे दोन्ही पाय कायमचे निकामी झाले. अर्जदारास शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तेथे उपचार केल्यानंतर त्यांला खाजगी रुग्णालय आधार हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. अर्जदाराला जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड व अधिक्षक वैद्यकीय मंडळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी चालक या पदाचे काम करण्यास वैद्यकीय दृष्टया अपाञ घोषीत केलेले असल्यामूळे विभाग नियंञक राज्य परिवहन नांदेड यांनी अर्जदारास वीभागीय अस्थापना आदेश क्र.388 सन 2009 अन्वये सेवेतून दि.22.7.2009 रोजी सेवामूक्त केले आहे. अर्जदारास 50 टक्केचे वर मार लागून सूध्दा गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्कम दिली नाही व गैरअर्जदारांनी दि.2.8.2009 रोजी एक अर्जदारास पञ पाठवून अपघाताची टक्केवारी 47 टक्के असल्यामूळै विमा रक्कम देता येत नाही असे कळविले. वास्तवीक अर्जदार हा दोन्ही पायांनी निकाली झालेला आहे त्यामूळे त्यांला विम्याची रक्कम व्याजासहीत मिळणे आवश्यक आहे. म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे व अशी मागणी केली आहे की, अर्जदारास दोन्ही पॉलिसीची रक्कम व्याजासहीत मिळावी तसेच मानसिक,आर्थिक व शारीरिक ञासासाठी रु.50,000/- मिळावेत असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांना दोन्ही पॉलिसी मान्य आहेत परंतु डॉ. सजंय कदम यांनी दिलेल्या दि.9.3.2009 रोजीच्या पञात अर्जदार यांला फ्रँक्चर झालेला आहे व डिसअबिलिटी (अपंगत्व) हे 47 टक्के इतके आहे असे म्हटलेले आहे. फ्रॅक्चरमूळे कोणत्याही व्यक्तीला अस्थायी अपंगत्व येऊ शकते पण स्थायी अपंगत्व येऊ शकत नाही म्हणूनच अर्जदाराची विमा रक्कमेची मागणी नाकारलेला आहे.तसेच पॉलिसी चे अटी व नियम क्र.10(4) नुसार अर्जदार हा पूर्णतः व नेहमीकरिता अपंग झालेला असेल तरच त्यांला पॉलिसीचा लाभ मिळू शकतो असे म्हटलेले आहे. त्यामूळे अर्जदार या अपघातामध्ये पूर्णतः अपंग झालेला नाही म्हणून त्यांचा विमा दावा फेटाळण्यात आलेला आहे. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. म्हणून अर्जदार यांचा अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपञे पाहता खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय होय. 2. अर्जदार यांनी मागणी केलेली रक्कम नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय नाही. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1ः- अर्जदार हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वीभाग नांदेड येथे नौकरी करीत होता. त्याचे बक्कल क्र.19409 असा असून तो हदगांव आगार अंतर्गत काम करीत होता. अर्जदार यांने गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांचेकडे विमा उतरवीलेला होता व तो गैरअर्जदार क्र.2 विमा प्रतिनीधी यांचे मार्फत उतरविलेला होता. त्यांचे पॉलिसी नंबर 982939029 व 982939080 अशी असून दोन्ही पॉलिसी मध्ये वैयक्तीकरित्या विमा उतरविलेला होता. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा उतरविला होता याबददल दोघामध्ये वाद नसल्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- दि.11.2.2008 रोजी अर्जदार हा बस क्रंमाक एम.एच-20-6653 हदगांव लातूर ही बस घेऊन हदगांव वरुन 8.15 वाजता नीघाला असता अर्धापूर बसस्टँड वर नोंद करुन नांदेड कडे रवाना झाला. नांदेड शहरालगत ग्यानमाता शाळेजवळ त्यांची बस घेऊन पोहचला असता समोरुन नांदेड कडून टिप्पर क्र. एम.एच.-26-एच-6691 यांनी अर्धापूरके जाणा-या बसला ओव्हरटेक करुन सरळ अर्जदाराच्या बसवर येऊन धडकला त्यामूळे अपघात होऊन त्यात अर्जदाराचे दोन्ही पाय कायमचे निकामी झाले. गैरअर्जदार यांनी दि.2.8.2009 रोजी अर्जदारांच्या नांवे एक पञ दिले व सदरच्या अपघाताची टक्केवारी ही 47 टक्के आहे त्यामूळे अर्जदारास सदरची विमा रक्कम देता येत नाही या प्रकारचे पञ दिले. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराचे दोन्ही पाय निकामी झालेले आहेत व डोक्यालाही मार लागलेलो होता म्हणून त्यांचे अपघाताची टक्केवारी ही 50 टक्के चे वर होते. ज्या दवाखान्यात तो इलाज करीत होता त्यांचेकडून ही त्यांनी 51 टक्के अपघाताची टक्केवारी आहे असे पञ दिलेले होते. दि.22.7.2009 रोजी अर्जदारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड यांचेकडून एक पञ मिळाले त्यामध्ये अर्जदार हा चालक पदाचे काम करण्यास वैद्यकीदृष्टया अपाञ घोषित केल्यामूळे त्यांला दि.22.7.2009 रोजीच्या मंध्यानानंतर सेवा मूक्त केल्याचे पञ दिले. अपघातानंतर अर्जदाराने त्यांने उतरविलेल्या पॉलिसीच्या अनुषगाने गैरअर्जदार याचेकडे विमा रक्क्म मिळण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार गैरअर्जदार हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणण्यानुसार अर्जदाराचे अपघाताची टक्केवारी ही 47 टक्के आहे ती 50 टक्के निश्चितच नाही तसेच त्यांनी दाखल केलेल्या पॉलिसीच्या अटी व नियमानुसारन अट क्र.10 (4) मध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे की, The disability above referred to must be disability which is a result of an accident and must be total and permanent and such that there is neither then nor at any time thereafter any work, occupation or profession that a life assured can ever sufficiently do or follow to on or obtain any wages, compensation or profit. Accidental injuries whch independently of all other causes, and within 180 days from the happening of such accident resulting the irrecoverable loss of the entire site or both eyes or in the amputation of both hands at or about the wrists or in the amputation of both feet and or about the ankles, or in the amputation of one hand and or above the wrists and one foot and above the ankle, shall also be deem to constitute such disability. म्हणून त्यांस विमा रककम मागण्याचा अधिकार नाही. त्या करीता अर्जदाराचा अर्ज रदद करुन गैरअर्जदार यांचे हक्कात मजूर करण्यात यावा असे म्हटले आहे. सदरचे पॉलिसीची नियम व अटीची कॉपी गैरअर्जदार यांनी दाखल केलेली आहे. तसेच नॅशनल कमीशन दिल्ली यांचे एक अथोरिटी दाखल केलेली असून त्यात II (2010) CPJ 30 (NC) National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi Life Insurance Corporation of India & another Vs. Khazan Singh Consumer Protection Act, 1986 -- Section 21 (b) – Insurance -- Permanent Disability -- Policy amount payable only in case of permanent disability – Disability suffered by complainant not permanent – Amount under policy not entitled—Lower Fora erred in allowing complaint – Orders set aside in revision. त्यामध्ये जर पूर्णतः डिसअबिलिटी असेल तर पॉलिसीची रक्कम देता येते अशा प्रकारचा नीर्णय मा. राष्ट्रीय आयोग यांनी दिलेला आहे. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदाराची अपघाताची टक्केवारी ही 50 टक्के च्या आंत असून तो पूर्ण अपंग झालेला आहे असे म्हणता येणार नाही. तो चालक पदासाठी अपाञ आहे असे घोषीत करण्यात आलेले होते त्या विरुध्द त्यांने लेबर कोर्टात जाऊन न्याय मागण्याची गरज होती. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वैद्यकीय मंडळ वीभाग यांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपञानुसार अर्जदार हा चालक पदासाठी काम करण्यास अपाञ असून तो कार्यालयीन इतर काम करण्यास पाञ आहे अशी माहीती प्रमाणपञात असल्याकारणाने अर्जदाराला लेबर कोर्टात जाऊन दाद मागण्याचा अधिकार होता. 50 टक्के डिसअबिलीटी नसल्यामूळे अर्जदारास विमा रक्कम देता येत नाही. पॉलिसीची मूदत संपल्यानंतर अर्जदारास जी रक्कम मिळणार होती ती आजही पॉलिसी संपल्यानंतर मिळणार असल्यामूळे व गैरअर्जदार यांचे अटी व नियम क्र.10 (4) मधील नियम समोर आल्यामूळे अर्जदाराचा अर्ज खारीज करावा या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. उभयपक्षांनी आपआपला खर्च सोसावा. 3. संबंधीताना नीर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |