Maharashtra

Gadchiroli

CC/10/36

Smt. Nita Prabhakar Jambolkar, Age-38yr., Occu.-Housewife - Complainant(s)

Versus

Branch Manager, LIC of India Office Gadchiroli and 1 other - Opp.Party(s)

Adv. S.A. Khond

29 Jun 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/36
 
1. Smt. Nita Prabhakar Jambolkar, Age-38yr., Occu.-Housewife
R/O Shri. Manoharrao Sankulwar's House, Near New Bus Stop, Gondpipri, Tah. Gandpipri
Chandrapur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, LIC of India Office Gadchiroli and 1 other
Life Insurance Corporation of India Office Gadchiroli, Tah. Gadchiroli
Gadchiroli
Maharastra
2. Zonal Manager,LIC of India, Mumbai
Life Insurance corporation Of India, West Zonal Office, "Yogkshem" Jivan Vima Marg, Mumbai-400021
Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 HONORABLE Smt. M. J. Bhilkar Member
 
PRESENT:
 
ORDER

  (मंचाचे निर्णयान्‍वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्‍यक्ष(प्रभारी))

       (पारीत दिनांक : 29 जुन 2011)

                                      

1.           अर्जदार तक्रारकर्ती ही स्‍वर्गीय प्रभाकर जंबोजवार याची विधवा असून ती व  मुले कायदेशीर वारसदार आहे.  प्रभाकर जंबोजवार हे पंचायत समिती, एटापल्‍ली, जि.

                              ... 2 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

गडचिरोली अंतर्गत प्राथमिक शिक्षक या पदावर दि.9.4.08 पर्यंत कार्यरत होते त्‍यांनी आपले सेवा काळात गै.अ.क्र. 1 व 2 कडून सन 1992 पासून 24.3.08 पर्यंत एकूण 11 जिवन विमा पॉलिसी काढल्‍या.  मृतक यांने काढलेल्‍या विमा पॉलिसीत तक्रारकर्ती नॉमीनी नमूद केले होते. 

 

2.          उत्‍तरवादी क्र.2 कडून पॉलिसीचे नियमन होत असून त्‍याच्‍या अधिपत्‍याखाली उत्‍तरवादी क्र.1 विमा व्‍यवसाय करतो.  मृतक प्रभाकर जंबोजवार यांनी आपले हयातीत विमा हप्‍त्‍याची रक्‍कम पगारातून वळती करुन दर महिन्‍याला उत्‍तरवादी क्र.1 कडे प्राप्‍त होत होती.  मृतकाने शेवट पर्यंत बिना अडथळा, बिना खंडीत दर महिन्‍याला भरणा केलेला आहे.  पॉलिसी क्र.973649790 या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम त्‍याने स्‍वतः भरणा केलेली आहे.

 

3.          प्रभाकर जंबोजवार शिक्षक या स्‍थायी पदावर कार्यरत असतांना दि.9.4.08 रोजी अचानक नैसर्गीक मृत्‍यु झाला.  त्‍यांनी एकंदर 11 विमा पॉलिसी पैकी 10 विमा पॉलिसीची रक्‍कम पगारातून वळती करुन गै.अ.क्र.1 कडे जमा केल्‍याबाबत गटशिक्षण अधिकारी पचायंत समिती, एटापल्‍ली यांनी दि.9.6.10 ला दिले आहे.  तक्रारकर्त्‍यानी पतीचे मृत्‍युनंतर पॉलिसीचे निर्मीत सम अॅश्‍युअर लाभ मिळण्‍याकरीता उत्‍तरवादी क्र.1 व 2 कडे अर्ज केला. उत्‍तरवादी क्र.1 व 2 यांनी 11 विमा पॉलिसी पैकी, 4 विमा पॉलिसीची रक्‍कम दि.21.12.09 च्‍या पञान्‍वये चुकीचा अयोग्‍य गैरकायदेशीर अन्‍यायकारक निष्‍कर्ष काढून फेटाळला व सेवा देण्‍यात न्‍युनता केली.  उत्‍तरवादी यांनी विमीत व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युनंतर वारसदार कुंटुंबास मिळणारे सम अॅश्‍युअर व संपूर्ण लाभ यापासून खालील तालिकेत दिल्‍याप्रमाणे विमा पॉलिसीच्‍या लाभापासून वंचीत ठेवले.

 

अनुक्रमे क्र.(8) पॉलिसी क्र.973408095 सम अॅश्‍युअर्ड रुपये 1,00,000/-

         (9) पॉलिसी क्र.973473225 सम अॅश्‍युअर्ड रुपये 1,00,000/-

         (10) पॉलिसी क्र.973479273 सम अॅश्‍युअर्ड रुपये  80,000/-

         (11) पॉलिसी क्र.973649790 सम अॅश्‍युअर्ड रुपये 2,00,000/-

                                          ----------------------------

                  एकूण सम अॅश्‍युअर्ड रुपये           4,80,000/-

 

 

4.          उत्‍तरवादी क्र.1 व 2 ने तक्रारकर्तीला विमा लाभ सेवा सुविधा नाकारुन तक्रारतील पॉलिसीचा अनुक्रमांक 1 ते 7 च्‍या विमा पॉलिसीची संपूर्ण रक्‍कम व संपूर्ण लाभ तक्रारकर्तीला मिळाले. परंतु, उर्वरीत 8 ते 11 चा मोबदला नाकारले ही तफावत भेदभावपूर्ण व्‍यवहार उत्‍तरवादी क्र.1 व 2 यांनी करुन, न्‍युनतापूर्ण सेवा, ञुटी असून, अवलंबलेली अनुचीत व्‍यापार पध्‍दत आहे.  उत्‍तरवादी क्र.1 व 2 याने 21.12.09 च्‍या पञात तिस-या

                              ... 3 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

पॅरामध्‍ये दिलेले कारण खोटे व निरर्थक आहे.  मृतकाचा मृत्‍यु मद्याच्‍या अती सेवनानी झाला असता तर यापूर्वीच मयत झाला असता. 

 

5.          गै.अ.क्र.1 व 2 यांनी तालीकेतील अनुक्रमांक 8, 9, 10, 11 मधील विमा दावा नाकारल्‍यामुळे तक्रारकर्तीने वकीलामार्फत दि.17.6.10 नोटीस पाठवून मागणी केली.  परंतु, मृतकाच्‍या विमा पॉलिसीची रक्‍कम नाकारुन दिली नाही, त्‍यामुळे सदर तक्रार दाखल करुन 4 विमा पॉलिसीची एकूण सम अॅश्‍युअरड रुपये 4,80,000/- दि.9.4.08 पासून म्‍हणजे मृत्‍यु दिनांकापासून 18 % द.सा.द.शे. व्‍याजासह मिळण्‍याची विनंती करुन, मानसिक शारीरीक ञासापोटी रुपये 50,000/- व केसचा खर्च 30,000/- गै.अ.उत्‍तरवादी क्र.1 व 2 कडून वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीक रित्‍या देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी प्रार्थना केली आहे.

 

6.          अर्जदार तक्रारकर्तीने तक्रारीसोबत नि.4 च्‍या यादीनुसार एकूण 22 दस्‍ताऐवज दाखल केले.  तक्रार नोंदणी करुन गै.अ.स नोटीस काढण्‍यात आले.  गै.अ. हजर होऊन नि.12 नुसार लेखी उत्‍तर सादर केले. 

 

7.          गै.अ.क्र.1 व 2 ने नि.12 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात अर्जदाराचे पती श्री प्रभाकर जंबोजवार यांनी परिच्‍छेद क्र.1 मध्‍ये नमूद 11 पॉलिसी गै.अ.क्र.1 कडून विमा राशी रुपये 11,55,000/- च्‍या वेळोवेळी म्‍हणजेच सन 1992 ते 24.3.08 पर्यंत घेतल्‍या होत्‍या.  त्‍या पॉलिसी गै.अ.क्र.2 कडून घेतल्‍या नव्‍हत्‍या गै.अ.क्र.2 च्‍या कार्यालयातून पॉलिसी काढल्‍या जात नाही.  त्‍यामुळे, कोणताही प्रत्‍यक्ष संबंध येत नाही.  गै.अ.क्र.2 चे नांव विनाकारण जोडले आहे, ते काढून टाकण्‍यात यावे.  पॉलिसीत अर्जदार नॉमीनी असल्‍याचे म्‍हणणे आहे. श्री प्रभाकर जंबोजवार, पंचायत समिती एटापल्‍ली, जि.गडचिरोली येथील प्राथमिक शाळेत शिक्षक होते याबद्दल वाद नाही. तसेच त्‍याचा मृत्‍यु 9.4.08 ला झाला असून मृत्‍युचे कारण अति व दीर्घकाळ सततच्‍या मद्य सेवनाच्‍या व्‍यसनामुळे उद्भवलेल्‍या विविध आजाराने मृत्‍यु झाला.  या तक्रारीतील वादातील 4 पॉलिसी पैकी पॉलिसी क्र.973479273, 973408095, व 973470225 या तीन पॉलिसीचे माहे ऑगस्‍ट 2007 मध्‍ये मृतक पॉलिसी धारक गैरहजर असल्‍यामुळे त्‍याचे पगारातून ऑगस्‍ट 2008 चे प्रिमियम कापल्‍या गेले नाही. त्‍यानंतर प्रिमियम प्रभाकर जंबोजवार व त्‍याचे नियोक्‍त्‍याने कधीही भरले नाही.  या 3 पॉलिसीचे प्रिमियम अजुनपर्यंत मृत्‍युपूर्वी भरले नसल्‍यामुळे सदर पॉलिसी बंद समजण्‍यात येतील पॉलिसी क्र. 973649790 या एका पॉलिसीत विमा धारकाने मृत्‍यु पर्यंत प्रिमीयम भरल्‍या गेले आहे, ही बाब गै.अ.स मान्‍य नाही.

 

8.          मृतक विमा धारकाच्‍या 11 पॉलिसी पैकी 7 विमा पॉलिसीच्‍या विमा पॉ‍लिसी रुपये 6,75,000/- संपूर्ण लाभासह तक्रारकर्तीस दिले आहे.  हे तक्रारकर्तीने मान्‍य केले

                              ... 4 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

आहे.  या पॉलिसी 3 वर्षापेक्षा जास्‍त पूर्वीच्‍या असल्‍यामुळे प्रस्‍तावाच्‍या आधारे जाहीर केलेल्‍या डिक्‍लेरेशन प्रमाणे सखोल चौकशी न करता पॉलिसीचे दावे दिलेले आहे.  परंतु, अनुक्रमांक 8 ते 11 या पॉलिसी धारकाच्‍या मृत्‍युपूर्वी 3 वर्षाचे आतील असल्‍यामुळे व पॉलिसी धारकाचा मृत्‍यु पॉलिसी घेण्‍याचे 3 वर्षापेक्षा कमी अवधीतच झाला असल्‍यामुळे सखोल चौकशी केली, त्‍यात असे आढळून आले की, मृतक पॉलिसी धारक मद्य सेवनाचे सतत व अति जास्‍त व्‍यसन मागील 20 वर्षापासून होते त्‍यामुळे त्‍याचा यकृत वर विपरीत परिणाम  होऊन ते खराब झाले. त्‍याचा विपरीत परिणाम पाणथळीवर, हृदय व शरीरातील इतर अवयवावर होऊन Alcoholic Hepatitis, Jundice, pancreatitis, Cirrhosis with ascitis with CTCS, Encyphalopathy, Coagalopathy, Alcoholic, Cardiomyopathy, Pulmonary edema and congestive cardiac failure  शेवटी पॉलिसी धारकाचा मृत्‍यु झाला. विमा कायदा 1938 च्‍या कलम 45 प्रमाणे देय होत नव्‍हता.  त्‍यामुळे, 11 पैकी 7 पॉलिसीचे दावे दिलेत व उर्वरीत 4 पॉलिसीचे दावे दिले नाही ही बाब तक्रार किंवा वाद करण्‍याचे नाही किंवा ती गै.अ.च्‍या सेवेतील ञुटी सुध्‍दा ठरत नाही.  

 

9.          विमा प्रस्‍तावात विमा धारकाने चुकीच्‍या व दिशाभुल करणारी माहिती मद्य सेवनाच्‍या आधीन असल्‍याची माहिती त्‍यास माहित असून सुध्‍दा खोटी माहिती देवून विमा पॉलिसी घेतली.  पॉलिसी धारकाने हेतुपुरस्‍पर दिलेली खोटी माहिती व डिक्‍लेरेशन प्रमाणे गै.अ. पॉलिसीचे दावे देण्‍यास बाध्‍य नाही. विमा करार मुळापासूनच रद्द होवून पॉलिसीची दावे देण्‍यास बाध्‍य ठरत नाही.  पॉलिसीचा करार अतिविश्‍वासाचा करार आहे.  विमा धारकाने त्‍याचे उल्‍लंघन केले असेल तर पॉलिसी करार मुळातच रद्दबातल होऊन गैरकायदेशीर होतो.

10.         पॉलिसी क्र.973649790 करीता प्रस्‍ताव दि.14.3.08 पूर्वी 15 दिवसापासून पॉलिसी धारकास कावीळ झाला होता व त्‍यासाठी तो वैद्यकीय उपचार करीत होता हे त्‍याला चांगले ठाऊक असून सुध्‍दा त्‍याने ही माहिती प्रस्‍तावात देतांना गै.अ.कडून लपवून ठेवली व चुकीच्‍या माहितीच्‍या आधारे पॉलिसी मिळविल्‍या.  पॉलिसी धारकाने अनुचीत प्रकार अवलंबून संपूर्ण माहिती न देता, ती मुद्दाम गै.अ. पासून लपवून ठेवली.  अर्जदार या दाव्‍यातील 4 पॉलिसीची रक्‍कम मिळण्‍यास पाञ नसल्‍यामुळे एकूण रक्‍कम रुपये 4,80,000/- व त्‍यावर केलेली व्‍याजाची मागणी, तसेच मानसिक ञासाबद्दल रुपये 50,000/-, खर्चाची रक्‍कम 30,000/- याबद्दल कुठलाही आधार न दिल्‍यामुळे व मागणी अनुचीत असल्‍यामुळे गै.अ.स मान्‍य नाही.  तक्रारकर्ती वादातील 4 पॉलिसीची रक्‍कम मिळण्‍यास पाञ नाही.  सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

 

11.          गै.अ. यांनी आपले लेखी उत्‍तरासोबत नि.13 च्‍या यादीनुसार एकूण 14 दस्‍ताऐवज दाखल केले आहे.  अर्जदाराने नि.15 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला.  गै.अ.यांनी लेखी बयानाच्‍या कथना पृष्‍ठयर्थ नि.18 नुसार रिजाईन्‍डर शपथपञ दाखल केले.

                              ... 5 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, शपथपञ आणि उभय पक्षाच्‍या वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

मुद्दा                                 :     उत्‍तर

 

(1)   गै.अ.यांनी 4 विमा पॉलिसीचे दावे अयोग्‍य कारणाने :  होय.

नाकारुन सेवा देण्‍यात न्‍युनता केली आहे काय ?

(2)   अर्जदार मृतक प्रभाकर जंबोजवार याचे वादग्रस्‍त     :  होय.           

पॉलिसीचा क्‍लेम मिळण्‍यास पाञ आहे काय ?

(3)   या तक्रारीचा अंतिम निकाल काय ?                          :   अंतिम आदेशाप्रमाणे.

 

//  कारण मिमांसा  //

 

मुद्दा क्र. 1 व 2 :-

 

12.         अर्जदाराचे पती मृतक प्रभाकर नारायण जंबोजवार यांनी 11 विमा पॉलिसी गै.अ.क्र.1 कडून काढल्‍या होत्‍या, त्‍यापैकी 7 पॉलिसीचा क्‍लेम अर्जदारास देण्‍यात आला, त्‍यापैकी 4 विमा पॉलिसीचा क्‍लेम ह्या वादग्रस्‍त असल्‍यामुळे देण्‍यात आला नाही, ही बाब गै.अ. यांना मान्‍य आहे. विमा पॉलिसी क्र.973408095 विमा राशी रुपये 1,00,000/- प्रस्‍ताव दि.26.7.05, पॉलिसी क्र.973479273 विमा राशी रुपये 80,000/- विमा प्रस्‍ताव दि.14.10.06, पॉलिसी क्र.973473225 विमा राशी रुपये 1,00,000/- विमा प्रस्‍ताव दि.20.3.06 आणि पॉलिसी क्र.973649790 विमा राशी रुपये 2,00,000/- प्रस्‍ताव दि.15.3.08  या 4 वादग्रस्‍त पॉलिसी गै.अ.यांनी विमा धारकाने विमा प्रस्‍तावाचे वेळी चुकीची व खोटी माहिती दिल्‍याचे कारणावरुन नाकारल्‍या आहेत.  विमा धारक विमा प्रस्‍ताव सादर करतेवेळी मागील 20 वर्षापासून सतत व अति जास्‍त मद्य सेवन करीत होते, त्‍यामुळे त्‍याचे लिव्‍हरवर विपरीत परिणाम होऊन त्‍याचे हृदयावर परिणाम होऊन अल्‍कोलीक, हिपाटाईटस, जी.टी.सी.एस., पॅनक्रियाटीस, सिरोसीस वीथ अॅटसीस जीटीसीएस, एन्‍साफालोथी, पलमनरी एडीमा आणि कंजेस्‍टीव कार्डीयाक फेल्‍युअर होऊन मृत्‍यु झाला हे स्‍पष्‍ट झाले आहे.  याबाबत, गै.अ.यांनी आपले लेखी उत्‍तरासोबत नि.13 च्‍या यादीनुसार ब-12 वर दस्‍त दाखल केला.  गै.अ.यांनी केअर हॉस्‍पीटल नागपूर यांनी दिलेल्‍या डिसचार्ज समरी वरुन विमा धारक 20 वर्षापासून मद्याचे सेवन करीत असल्‍यामुळे त्‍याचा परिणाम होऊन मरण पावला असे कथन केले आहे.  परंतु, गै.अ.यांनी केलेले कथन पुराव्‍या अभावी ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  गै.अ. यांनी केअर हॉस्‍पीटल यांचे डॉक्‍टरचे शपथपञ दाखल केलेले नाही.  तसेच विमा धारक प्रभाकर जंबोजवार यांचा मृत्‍यु वर उल्‍लेखीत आजारानेच झाला हे पोस्‍ट मार्टमच्‍या अहवालाशिवाय म्‍हणता येत नाही.  त्‍यामुळे, गै.अ.यांनी विमा

                              ... 6 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

धारक 20 वर्षापासून मद्याच्‍या सेवनामुळे त्‍याचे शरीरातील अवयवावर परिणाम होऊन मृत्‍यु झाला, हे मृत्‍युचे कारण (Nexuos) बिना पोस्‍टमार्टम शिवाय ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही,  त्‍यामुळे विमा धारक अति मद्य सेवनाने मृत्‍यु झाला हे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही, परंतु गै.अ.यांनी या कारणावरुन विमा दावा नाकारुन सेवा देण्‍यात न्‍युनता केली.

13.         गै.अ.यांनी ब-10 वर डॉक्‍टर व्‍ही.ए.झाडे, याचे निदान प्रमाणपञ दाखल केले, त्‍यात 30.3.08 ला ग्रामीण हॉस्‍पीटल एटापल्‍ली येथे पोटाच्‍या ञासाकरीता व श्‍वास घेण्‍याच्‍या ञासाकरीता दाखल केले. सदर पञातील 5 बी व सी मधील माहिती ही अज्ञात व्‍यक्‍तीने दिल्‍याचे दिलेले आहे.  सदर प्रमाणपञ कोणत्‍या तारखेत देण्‍यात आले हे सुध्‍दा नमूद नाही व संबंधीत डॉक्‍टरांचा शपथपञ नाही, त्‍यामुळे ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  यावरुन, गै.अ.यांनी विमा दावा हा चुकीच्‍या कारणाने नाकारला हेच दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होतो. 

 

14.         विमा धारक हा 20 वर्षापासून अति मद्याचे सेवन करीता होता हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी गै.अ.ची आहे.  विमा धारक अति मद्य सेवन करीत होता त्‍यामुळे मृत्‍युचे कारण घडले हे गै.अ. सिध्‍द करु शकला नाही.  गै.अ.यांनी दिलेले कारण संयुक्‍तीक नाही.  विमा धारक 15-20 दिवसापासून कावीळने ञस्‍त होता, त्‍यामुळे ही सिरोसीस ऑफ लिवर होऊ शकतो, तो अति मद्य सेवनामुळेच होतो असे म्‍हणता येत नाही.  गै.अ.यांनी केअर हॉस्‍पीटल नागपूर यांचे डिसचार्ज कार्डची झेरॉक्‍स दाखल केली, त्‍याचे हिस्‍टरीमध्‍ये (History) सजेस्‍टीव्‍ह ऑफ जाईंडीस करीता भरती केल्‍याचे म्‍हटले आहे.  15 दिवसापासून पिवळ लघवी व डोळे पिवळे असल्‍याचे नमूद केले आहे.  अशास्थितीत, अति मद्य सेवनाने मृतकाचा मृत्‍यु झाला ही बाब सिध्‍द होत नाही.  मा. महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी एलआयसी ऑफ इंडिया –विरुध्‍द- शांतीदेवी ठाकूर या प्रकरणातील पॅरा 6 मध्‍ये आपले मत दिले आहे.  त्‍यात दिलेले मत या प्रकरणाला तंतोतंत लागू पडतो.  त्‍यातील महत्‍वाचा भाग खालील प्रमाणे. 

 

Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(g)—Life Insurance – Repudiation of claim – Suppression of material facts – Contention, insured suppressed his habit of excessive consumption of alcohol – Onus probandi rests heavily on party alleging fraud – Burden to prove suppression not discharged by company – complainant entitled to get policy amount with interest.

 

                                    LIC of India –V.- Shantidevi Thakur

                                                IV (2005) CPJ 191

 

            अर्जदाराचे वकीलांनी वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केले. त्‍यात दिलेले मत या प्रकरणांना लागू पडतात, ते येणे प्रमाणे.

 

 

                              ... 7 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

(1)        II (2007) CPJ 341  Jagdeep Kumar –V.- Life Insurance Corporation of India, (Rajasthan State Consumer D.R. Commission, Jaipur)

(2)        I (2009) CPJ 479 LICI –V.-Shanti Rajbhar (West Bengal State Consumer D.R. Commission, Kolkata) 

(3)        I (2008) CPJ 85 Mamta Manu –V.-LICI & other, (Union Territory Consumer D.R. Commission, Chandigarh)

(4)        III(2009) CPJ 337 Manju Devi –Vs.- LICI & other, (Rajasthan State Consumer D.R. Commission, Jaipur)

(5)        II(2008) CPJ 219 LIC Unit No.2 & Anr –Vs.- Rahul Sehgal, Punjab State Consumer D.R.Commission, Chandigarh)

(6)        II(2005) CPJ 78(NC), LICI –Vs.- Joginder Kaur & other, (National Consumer D.R. Commission, New Delhi)

(7)        III(2005) CPJ 544, LICI –Vs.- Dayawati, (Uttaranchal State Consumer D.R. Commission, Dehardun)

(8)        I(2010) CPJ 77, LICI –Vs.- Bina Joshi, (Uttaranchal State Consumer D.R. Commission, Dehardun)

(9)        II(2008) CPJ 59, National Insurance Co.Ltd.-Vs.- Swaraj Jain (Smt.), Rajasthan State Consumer D.R. Commission, Jaipur

(10)      I(2005) CPJ 41 (NC), LICI –Vs.- Dr. P.S. Aggrawal (Revision Petition), National Consumer D.R. Commission, New Delhi.

(11)      IV(2004) CPJ 677, LICI –Vs.- Bhola Choudhary, Delhi State Consumer D.R. Commission, New Delhi.

(12)      II(2002) CPJ 455, Block Development Officer –Vs.- Smt.Rajlaxmi Satapathy & other, Orissa State Consumer D.R. Commission, Cattack

(13)      I (1994) CPJ 5 (NC), Union of India –Vs.- Rajeswari & other, National Consumer D.R. Commission , New Delhi

(14)      II(2008) CPJ 137 Madhu Jain (Mrs.)-Vs.- National Insurance Co. Ltd. , Delhi State Consumer D.R. Commission, New Delhi

(15)      IV (2003) CPJ 655, Ramdehi Bai –Vs.- Branch Manager, Bhartiya Jivan Bima Nigam, Madhya Pradesh State Consumer D.R. Commission, Bhopal

(16)      IV(2010) CPJ 189, LIC of India –Vs.- Smt.Pankaj Pandey, Chattisgarh State Consumer D.R. Commission, Raipur.

 

 

15.         गै.अ.चे वकीलांनी मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी पी.जे.चाको व इतर –वि.- चेअरमन एलआयसी., ए आय आर 2008 एस सी 424 या प्रकरणाचा हवाला दिला.  सदर प्रकरणात दिलेली बाब या प्रकरणाला लागू पडत नाही.  विमा प्रस्‍तावात दिलेली माहिती ही परम विश्‍वास ठेऊन करार करण्‍यात येतो.  परंतु, विमा प्रस्‍तावात दिलेली माहिती ही खोटी व चुकीची आहे असे विमा धारकास माहित असून जर दिली नाही तरच म्‍हणता येईल.  जाणून-बुजून हेतुपुरस्‍परपणे माहित असून सुध्‍दा विमा कराराच्‍या कॉलम 11 मध्‍ये माहीती दिली नाही, तरच महत्‍वाची माहिती (Suppression of Material fact) लपविली असे म्‍हणता येईल.  गै.अ.चे वकीलांनी मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या प्रकणाचा हवाला दिला. सदर प्रकरणात विमा धारकाचा भाऊच विमा एजंट होता व त्‍याला विमा धारकाची माहिती असूनही विमा करारात नमूद केली नाही ही बाब प्रस्‍तूत प्रकरणात लागू पडत नाही.  विमा धारक यांने विमा पॉलिसी ही एजंट सचीन बी.खांडेकर यांचे मार्फत काढलेल्‍या असून

 

                              ... 8 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

प्रस्‍तावात दिलेली माहिती ही त्‍याला खोटी सांगितली असे म्‍हणता येत नाही.  त्‍यामुळे, गै.अ.चे वकीलानी दिलेले न्‍यायनिवाडे या प्रकरणाला लागू पडत नाही. 

 

16.                   गै.अ. यांनी लेखी उत्‍तरात असा मुद्दा उपस्थित केला की, पॉलिसी क्र.973649790 प्रस्‍ताव दि.15.3.08 चे 15 दिवसापूर्वी विमा धारक कावीळ (Jaundice) आजाराने आजारग्रस्‍त होता, तरी त्‍यानी प्रस्‍तावात माहिती दिली नाही व ही महत्‍वाची माहिती लपवून ठेवली.  गै.अ.यांनी दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजाचे अवलोकन केले असता, विमा धारक प्रभाकर जंबोजवार हे वैद्यकीय रजेवर दि.30.3.08 पासून मृत्‍यु दि.9.4.08 पर्यंत रजेवर होते असे दाखल दस्‍त ब-13 नियोक्‍ता पञावरुन दिसून येतो. विमा धारकाने विमा प्रस्‍तावात 15.3.08 ला सादर केला आणि त्‍याला कावीळ 15 ते 20 दिवसापूर्वी झाल्‍याचे केअर हॉस्‍पीटल, नागपूर यानी आपले डिसचार्ज कार्डमध्‍ये ब-12 मध्‍ये नमूद केले आहे.  म्‍हणजेच 15.3.08 चे वेळी विमा धारकास कावीळ आजार होता व त्‍यावेळी त्‍यानी रक्त तपासणी केली याचेवरुन आजाराची माहिती होती तरी त्‍यांनी 15.3.08 चे प्रस्‍तावात दिली नाही, असे सिध्‍द होत नाही.  विमाधारकास कावीळ हा आजार होता व त्‍यावेळी त्‍याचे डोळे आणि लघवी पिवळी होती, तसेच नियमित तापाचा आजारी होता व हे सर्व अति मद्य प्राशनाने झाले, असे गै.अ. सिध्‍द करु शकला नाही, त्‍यामुळे पॉलिसी क्र.973649790 च्‍या प्रस्‍तावात चुकीची माहिती दिली असे म्‍हणता येत नाही.  एकंदरीत, गै.अ.यांनी दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन चुकीच्‍या कारणाने विमा क्‍लेम नाकारला, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

17.         गै.अ.यांनी असा मुद्दा उपस्थित केला की, वादग्रस्‍त 4 विमा पॉलिसी पैकी 3 विमा पॉलिसीच्‍या प्रिमीयमचा ऑगस्‍ट 2007 मध्‍ये भरणा केला नाही, त्‍यामुळे त्‍या पॉलिसी बंद समजण्‍यात येईल.  गै.अ.यांनी हा उपस्थित केलेला मुद्दा संयुक्‍तीक नाही. ऑगस्‍ट 2007 मध्‍ये विमा धारक हा वैद्यकीय रजेवर होता व त्‍याचा पगार काढण्‍यात आला नाही, त्‍यामुळे पॉलिसीच्‍या प्रिमियमची रक्‍कम कपात करण्‍यात आले नाही, असे पञ गटशिक्षण अधिकारी एटापल्‍ली यांनी गै.अ.क्र.1 ला दि.17.12.08 ला दिला.  सदर पञाचे अवलोकन केले असता, मृतकाच्‍या वैद्यकीय रजा तो मरण पावल्‍यानंतर म्‍हणजेच 23.6.08 ला मंजूर करण्‍यात आलेल्‍या आहेत, असे नमूद करुन विमा धारक 9.4.08 ला मृत्‍यु पावल्‍यामुळे ऑगस्‍ट 2007 च्‍या पुरवणी देयकात कपात करण्‍यात आली नाही.  हीच बाब, गै.अ.यांनी दिलेल्‍या 9.6.10 च्‍या स्‍टेटस रिपोर्टमध्‍ये कुठलीही प्रिमीयम थकबाकी दाखविलेली नाही.  गै.अ.यांनी ऑगस्‍ट 2007 च्‍या नंतर सदर तिनही विमा पॉलिसीच्‍या मासीक हप्‍त्‍याचे किस्‍त स्विकारलेल्‍या आहे.  गै.अ.क्र. 1 यांनी ऑगस्‍ट 2007 ची हप्‍ता थकीत आहे या बद्दल विमा धारकास सुचना केली नाही, तसेच ऑगस्‍ट 2007 च्‍या नियोक्‍ता यास प्रिमियमची रक्‍कम कपात करुन पाठवावी याबद्दलही, विमा धारकाचा मृत्‍यु होईपर्यंत पञ व्‍यवहार केला नाही आणि जेंव्‍हा विमा धारकाचा मृत्‍यु झाल्‍यानंतर पञ

 

                              ... 9 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

व्‍यवहार करुन गट शिक्षण अधिकारी एटापल्‍ली यांचेकडून माहिती मागविली व ती त्‍यानी विमा धारकाच्‍या मृत्‍युनंतर सादर केली.  गै.अ. यांनी विमा धारकाचे हयातीत (जीवंतपणी) ऑगस्‍ट 2007 च्‍या विमा प्रिमियमची मागणी केली नाही आणि आता क्‍लेम देण्‍याचे वेळी मुद्दा उपस्थित केला आहे हे संयुक्‍तीक व ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  गै.अ. यांनी स्‍टेटस रिपोर्ट दिेलेला असून त्‍याच्‍यात कोणतीही थकबाकी दाखविली नाही.  ऑगस्‍ट 2007 च्‍या नंतर कपात झालेल्‍या प्रिमियमची रक्‍कम नियमितपणे समायोजीत करुन पॉलिसी स्‍टेटस दिला आहे असाच निष्‍कर्ष निघतो.  

 

18.         गै.अ.यांनी असाही मुद्दा उपस्थित केला आहे की, अर्जदाराने मुलांना पक्ष केले नाही, जेंव्‍हा की ते मृतकाचे वारसदार आहेत.  गै.अ.चे हे म्‍हणणे संयुक्‍तीक नाही गै.अ.यांनी आपले लेखी उत्‍तरात, अर्जदार ही नॉमीनी आहे हे मान्‍य केले आहे, यामुळे विमा धारकाच्‍या पॉलि‍सीची रक्‍कम नॉमीनी मिळण्‍यास पाञ आहे.  त्‍यामुळे, इतर मुलांना पक्ष न केल्‍याच्‍या कारणावरुन तक्रार खारीज होण्‍यास पाञ नाही.  अर्जदार ही मृतकाची वारसदार विधवा पत्‍नी आहे, त्‍यामुळे वादग्रस्‍त 4 विमा पॉलिसीची रक्‍कम सर्व लाभासह मिळण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

19.         गै.अ.च्‍या वकीलांनी युक्‍तीवादात असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदार यांनी झोनल ऑफीसकडे क्‍लेम केला नाही व अनावश्‍यकपणे पक्ष केले आहे.  अर्जदाराचे वकीलांनी याबाबत असे सांगितले की, गै.अ.क्र. 1 हा गै.अ.क्र.2 च्‍या अधिकारात काम करतो व त्‍यांनी रेप्‍युटेशन लेटरमध्‍ये झोनल ऑफीसचा उल्‍लेख केला आहे. त्‍यामुळे त्‍याने झोनल ऑफीसला पक्ष केले आहे.  अर्जदाराचे हे म्‍हणणे संयुक्‍तीक नाही.  गै.अ.यांनी 21.12.09 च्‍या क्‍लेम रेप्‍युटेशन केल्‍याच्‍या पञात उल्‍लेख करुन, याबाबत दाद मागावयाची असल्‍यास झोनल ऑफीस कडे मागावे असे म्‍हटले आहे. तर पक्ष करण्‍यास कळविले नाही.  त्‍यामुळे, गै.अ.क्र. 2 ला  पक्ष करणे संयुक्‍तीक नाही.  गै.अ.क्र.2 हा, गै.अ.क्र.1 चा वरीष्‍ठ अधिकारी आहे या एकमेव कारणावरुन पक्ष करणे उचीत नाही.  वास्‍तविक, विभागीय व्‍यवस्‍थापक यांनी रिप्‍युटेशन लेटर दिलेले आहेत.  त्‍यामुळे, गै.अ.क्र.1 च्‍या विरुध्‍द तक्रार ही मंजूर करण्‍यास पाञ असून गै.अ.क्र.2 चे विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.         

 

20.         गै.अ.यांनी मृतक प्रभाकर जंबोजवार यांच्‍या 11 विमा पॉलिसी पैकी 7 विमा पॉलिसीचा क्‍लेम दिले आहे हे मान्‍य केले आहे आणि 4 विमा पॉलिसीचे क्‍लेम नाकारले ही बाब सुध्‍दा मान्‍य केली आहे.  गै.अ.यांनी विमा अधिनियम 1938 च्‍या कलम 45 नुसार 3 वर्षापूर्वीचे आतील क्‍लेम असल्‍याचे मान्‍य केले आहे.  वास्‍तविक, वादग्रस्‍त विमा पॉलिसी क्र. 973408095 याचा प्रस्‍ताव हा 26.7.05 ला सादर केला असून मृत्‍युचे दोन वर्षापूर्वीचा आहे, तसेच पॉलिसी क्र.973479273 आणि 973473225 चे प्रस्‍ताव हे सन 2006 मधील असून विमा धारकाचा मृत्‍यु दि.9.4.08 मध्‍ये झालेला आहे, त्‍यामुळे विमा अधिनियमाच्‍या

                              ... 10 ...                (ग्रा.त.क्र.36/2010)

 

कलम 45 नुसार दोन वर्षाचे नंतर महत्‍वाची माहिती लपविल्‍या मुद्दा उपस्थित करता येत नाही.  गै.अ.यांनी असा ही बेकायदेशीर मुददा  उपस्थित केला आहे की, विमा धारकाने विमा प्रस्‍तावात इतर पॉलिसीचे क्रमांक प्रस्‍तावात नमूद केले नाही.  विमा प्रस्‍ताव हे खांडेकर एजंट व्‍दारे करण्‍यात आले असून विमा धारकाने किती पॉलिसी काढल्‍या हे माहिती असून सर्व विमा पॉलिसी या गै.अ.क्र.1 कडून काढण्‍यात आल्‍या आहेत, त्‍यामुळे, पॉलिसीचे क्रमांक प्रस्‍तावात नमूद केले नाही, ही बाब संगणकीय स्‍टेटस रिपोर्टवरुन ग्राह्य धरण्‍यासारखी नाही. 

 

21.         एकंदरीत, गै.अ. यांनी अयोग्‍य कारणाने, चुकीचा निष्‍कर्ष काढून विमा पॉलिसीचे दावे नाकारले जेव्‍हा की, त्‍याच विमा धारकाच्‍या 7 पॉलिसीचे दावे मंजूर करुन 6,50,000/- चे क्‍लेम दिल्‍याचे मान्‍य केले.  परंतु, अयोग्‍यपणे त्‍याच विमा धारकाच्‍या 4 विमा पॉलिसीचे दावे नाकारुन सेवा देण्‍यात न्‍युनता केली.  तसेच, अयोग्‍य कारणाने विमा दावा नाकारल्‍यामुळे अर्जदारास मानसिक, शारीरीक ञास सहन करावा लागला व आर्थिक लाभापासून वंचीत राहावे लागले असल्‍याने, गै.अ.क्र.1 नुकसान भरपाई देण्‍यास पाञ आहे, ही बाब दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होतो.  अर्जदार वादग्रस्‍त 4 ही विमा पॉलिसीची विमा राशी (Sum Assured) सर्व लाभासह मिळण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍यामुळे, मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्र.3 :-

 

22.         वरील मुद्दा  क्र. 1 व 2 चे विवचनेवरुन तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

                       

                  //  अंतिम आंदेश  //

(1)   गैरअर्जदार क्र.1 ने, मृतक प्रभाकर जंबोजवार याची वादग्रस्‍त विमा पॉलिसी क्र.973408095 विमा राशी रुपये 1,00,000/-, पॉलिसी क्र.973479273 विमा राशी रुपये 80,000/-, पॉलिसी क्र.973473225 विमा राशी रुपये 1,00,000/- आणि पॉलिसी क्र.973649790 विमा राशी रुपये 2,00,000/- या सर्व पॉलिसीची रक्‍कम सर्व लाभासह नॉमीनी/अर्जदारास आदेशाचे दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावे.

(2)   गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपे 5000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावे.

(3)   गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्‍द तक्रार खारीज.

                              ... 11 ...                 (ग्रा.त.क्र.36/2010)

 

(4)   गैरअर्जदार क्र.1 नी, विहित मुदतीत वरील मुद्दा 1 चे पालन न केल्‍यास देय असलेली रक्‍कम विहीत मुदतीनंतर द.सा.द.शे. 9 % व्‍याज, रक्‍कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंत देय राहील.

(5)   अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

     

गडचिरोली.

दिनांक :- 29/6/2011.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member
 
[HONORABLE Smt. M. J. Bhilkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.