Maharashtra

Bhandara

CC/15/38

Shri Satish Vyankatrao Borkar - Complainant(s)

Versus

Branch Manager, L.I.C. - Opp.Party(s)

Adv. M.M.Ganvir

29 Jan 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/15/38
( Date of Filing : 06 Jul 2015 )
 
1. Shri Satish Vyankatrao Borkar
R/o. Pragati Colony, Plot No. 39, Tah. Sakoli, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, L.I.C.
Branch Office- Kalidas Bhawan, N.H. No. 6, Sakoli, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
2. Shri Pravinkumar Kishor Bhandarkar, Agent
R/o. Sakoli, Dist. Bhandara, Agent No. 084197D
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv. M.M.Ganvir, Advocate
For the Opp. Party: Adv. Sushma Singh, Advocate
Dated : 29 Jan 2019
Final Order / Judgement

     (पारीत व्‍दारा श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर, मा.सदस्‍या)

                                                    (पारीत दिनांक– 29 जानेवारी, 2019)   

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय  खालील प्रमाणे-

      तक्रारकर्त्‍याने त्‍याची अज्ञान मुलगी कु.शौर्या सतीष बोरकर, वय-7 वर्ष हिचेसाठी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांचे मार्फत विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनी कडून “जिवनतरंग” नावाची विमा पॉलिसी क्रं-977953500 दिनांक-28/01/2012 रोजी काढली होती, सदर विमा पॉलिसीचा हप्‍ता हा त्रैमासिक रुपये-6,384/- असून विमा रक्‍कम रुपये-5,00,000/- होती व पॉलीसीकरीता वैद्यकीय तपासणीची आवश्‍यकता असल्‍याने तक्रारकर्त्‍याची वैद्यकीय तपासणी सुध्‍दा केली होती.

   तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्‍याला असे सांगितले की, पॉलीसीची जोखीम आरंभ ज्‍या दिवशी पॉलीसी  आपल्‍या घरी किंवा आपल्‍याला मिळेल त्‍या दिवसापासून सुरु होईल. तसेच कु. शौर्या च्‍या संदर्भात जोखीम आरंभ तिथी दिनांक 28/01/2016 अशी असेल, परंतु तक्रारकर्ता ह्यांचेकरीता जोखीम आरंभ स्थिती पॉलीसीच्‍या आरंभ दिनांकापासून असेल व कुठलाही अपघात झाला किंवा पॉलीसीचा हप्‍ता वैद्यकीय शास्‍त्राप्रमाणे अल्‍प वयीनाचे पालक भरण्‍यास असमर्थ ठरले व त्‍याप्रमाणे पुरावे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांना दिल्‍यास सदरची पॉलीसी परिपक्‍वता होईपर्यंत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चालवेल.  तक्रारकर्ता आपल्‍या अल्‍पवयीन मुलीचा हप्‍ता नियमित भरत होतो.  दिनांक 19/05/2012 रोजी तक्रारकर्त्‍याचा अपघात झाला व त्‍या अपघातामध्‍ये तक्रारकर्त्‍याला कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले. तक्रारकर्त्‍याला कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आले असल्‍याने तो कोणत्‍याही प्रकारचे उत्‍पन्‍न मिळवू शकत नाही, त्‍यामुळे त्‍याच्‍या मुलीची प्रिमीयम भरु शकत नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीकडे सदर पॉलीसी पी. डब्‍ल्‍यु. बी.(पिमीयम व्‍हेवर बेनिफीट) मिळण्‍याकरीता पाठविले होते. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी ती पॉलीसी पी. डब्‍ल्‍यु. बी. अधिका-याकडून फेटाळण्‍यात येते असे दर्शवून कोणतेही कायदेशीर कारण न दर्शविता तक्रारकर्त्‍याला नियमित किस्‍तीचा भरणा करण्‍यास सांगितले, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने आपले वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली त्‍या नोटीस च्‍या उत्‍तरात विरुध्‍द पक्ष 1 यांनी कबुल केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या स्‍वतःच्‍या दोन विमा पॉलीसी कायम स्‍वरुपी अपंगत्‍वामुळे मंजूर करण्‍यात आल्‍या, परंतु कु. शौर्या चे नावे असलेली पॉलीसी मंजूर करण्‍यात येऊ शकत नाही असे दर्शवून सदर पॉलीसीचा लाभ हा मृत्‍यु उपरांत देण्‍यात येतो व कायम स्‍वरुपी अपंगत्‍वाला नाही असे कळविले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्‍याची पी. डब्‍ल्‍यु. बी. करीता पाठविलेली पॉलीसी परत करुन हप्‍ते भरण्‍यास सांगितले. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी सदर पॉलीसी पी. डब्‍ल्‍यु. बी. करुन न देऊन तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विरुध्‍दपक्षां विरुध्‍द पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

  1. विरुध्‍दपक्ष क्रं-1) व 2) यांनी तक्रारकर्त्‍याने आपल्‍या मुलीच्‍या नावे काढलेली पॉलीसी क्रमांक 977953500 चे पी. डब्‍ल्‍यु. बी. मंजूर करावे व  विम्‍याचा हप्‍ता रक्‍कम रुपये-6,384/- विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी संयुक्‍त भरण्‍याचा आदेश व्‍हावा.
  2.  तक्रारकर्त्‍याची मुलगी कु. शौर्या सतीष बोरकर हिला 20 वर्षानंतर पॉलीसीचा दिनांक 28/10/2031 ला पॉलीसीप्रमाणे हितलाभ रुपये 5,00,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.
  3. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 10,000/- विरुध्‍दपक्षांकडून मिळावी आणि योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने देण्‍यात यावी.

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-1) भारतीय जीवन बिमा निगम तर्फे मंचासमक्ष लेखी उत्‍तर दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने दिनांक-28/01/2012 पासून पॉलीसीची सुरवात होवून कु. शौर्या हिच्‍या जिवनावर जोखीम दिनांक 28/01/2016 म्‍हणजे तिच्‍या वयाची 7 वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर जोखीम स्विकारणारी विमा पॉलीसी क्रं-977953500 “जिवनतरंग” टेबल क्रं. 178 व प्रिमीयम भरण्‍याचा अवधी 20 वर्षे असलेली विरुध्‍द पक्ष 2 यांचेमॉर्फत विरुध्‍द पक्ष 1 विमा कंपनीकडून घेतली होती हे मान्‍य आहे. त्‍यात तिमाही प्रिमीयम रुपये-6,384/- असल्‍याचे मान्‍य आहे. तक्रारकर्त्‍याची विमा पॉलीसी घेतेवेळी वैद्यकीय तपासणी केली होती हे मान्‍य आहे.  सदर पॉलीसीतील जोखीम आरंभ ज्‍या दिवशी पॉलीसी अर्जदाराच्‍या घरी मिळेल त्‍या दिवसापासून होईल असे विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍यास सांगितले होते हे विधान चूकीचे असल्‍यामुळे मान्‍य नाही. पॉलीसीमधील प्रावधाने, अटी व शर्तीनुसारच पॉलीसी करार असून त्‍यानुसारच करार दोन्‍ही पक्षांवर बंधनकारक असतो असे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने लेखी उत्‍तरात नमुद केले आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने पुढे असे कथन करतो की, तक्रारकर्त्‍याने पॉलीसीत फक्‍त सुरवातीचा एकच तिमाही हप्‍ता दिनांक 28/01/2012 ला भरलेला आहे.  तक्रारकर्त्‍याचा दिनांक 19/05/2012 रोजी अपघात झाला व अपंगत्‍व आले असल्‍याचा दस्‍तऐवज तक्रारीसोबत दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची पॉलीसीतील भरण्‍याची प्रिमीयम माफ करण्‍याची विनंती पॉलीसीतील करार, शर्ती व अटीनां अनुसरुन नसल्‍यामुळे नाकारण्‍यात येऊन पॉलीसीतील पुढील प्रिमीयम भरणे सुरु ठेवावे असे सांगण्‍यात आले आहे.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या स्‍वतःचे जोखीम असलेल्‍या दोन पॉलीसी मधील करार, अटी व शर्तीनुसार कायम अपंगत्‍वामुळे भविष्‍यातील प्रिमीयम भरणे माफ केले असल्‍याचे कळविले आहे.  परंतु ह्या पॉलीसीमधील कु. शौर्या हिच्‍या जिवनावर जोखीम स्विकारणारी असून त्‍यातील करारानुसार तक्रारकर्त्‍याच्‍या (Proposer) चा दुदैवी मृत्‍यु झाल्‍यावरच पुढील प्रिमीयम माफीची तरतुद असून तक्रारकर्त्‍याचे कायम स्‍वरुपी अपंगत्‍वामुळे पुढील प्रिमीयम भरण्‍यापासून सुटीची तरतुद नाही. अशी सूट विमा जोखीम ज्‍या व्‍यक्तिच्‍या जीवनावर म्‍हणजे कु. शौर्या हिच्‍या अपंगत्‍वामुळे मिळेल असा पॉलीसी करार आहे. पॉलीसीतील अट क्रमांक 10 व 10(ए) चे प्रावधान व पॉलीसीतील क्‍लॉज 20 ए नुसार जो पॉलीसीचा भाग आहे,  “The payment premium falling due after death of proposer and before the vesting date shall waiver” यातील प्रावधानानुसार या पॉलीसीतील पुढील प्रिमीयम भरण्‍याची सूट देता येत नाही.

      विरुध्‍द पक्ष 1 यांनी आपले लेखी उत्‍तराचे विशेष कथनात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याने “जिवनतरंग” पॉलीसी क्रं-977953500 त्‍याची अज्ञान मुलगी कु. शौर्या 4 वर्षे वयाची असतांना तिच्‍या जिवनावर जोखीम असणारी घेतली आहे. पॉलीसी सुरु दिनांक 28/01/2012 असून कु. शौर्या हिच्‍या जीवनाची जोखीम सुरु होणारी तारीख 28/01/2016 आहे. तिमाही प्रिमीयम 6,384/- दिनांक 28/01/2012 पासून 20 वर्षे म्‍हणजे दिनांक 28/01/2031 पर्यंत भरावयाचे होते पॉलीसीची मुळ रक्‍कम रुपये 5,00,000/- लाख आहे. पॉलीसीतील प्रिमीयम भरण्‍याच्‍या अवधीत पूर्ण प्रिमीयम भरले असल्‍यास किंवा  पॉलीसी धारकाचा (Life Assured)  मृत्‍यु झाल्‍यास पॉलीसीची मुळ रक्‍कम 5 लाख मृत्‍यु पर्यंतच्‍या बोनससह पॉलीसी धारकाच्‍या वारसदारास देय आहे. सदर पॉलीसी तक्रारकर्त्‍याच्‍या अल्‍पवयीन मुलीच्‍या जीवनावर जोखीम स्किारणारी असल्‍यामुळे पॉलीसीसोबत पॉलीसीचा भाग असलेले (1) Endorsement Special Minority clause, From No. 3130 (a), व (2) Clause No. A (Money Back Children’s Assurance – Waiver of Premium सह पॉलीसी देण्‍यात आली आहे. तसेच पॉलीसी मधील क्‍लॉज 20 ए नुसार प्रस्‍तावकाचा म्‍हणजेच तक्रारकर्त्‍याचा मृत्‍यु विमित व्‍यक्तिच्‍या जीवनावर जोखीम सुरु होण्‍यापूर्वी (Vesting of policy) होण्‍यापूर्वी झाला असल्‍यास पॉलीसीतील पुढील प्रिमीयम भरणे माफ करण्‍यात येईल अशी तरतुद आहे.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. करीता तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं-2) प्रविणकुमार भांडारकर, एलआयसी एजंट यांना मंचातर्फे रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्‍याने त्‍याचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात पारीत करण्‍यात आला.

05.   तक्रारकर्त्‍याने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं-11 नुसार एकूण-04 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये  विमा पॉलिसीची प्रत, तक्रारकर्त्‍याने पाठविलेली कायदेशीर नोटीस, विरुध्‍दपक्षाचे नोटीसला दिलेले उत्‍तर एल.आय.सी. चे पत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ठ क्रं-55 ते 57 वर शपथपत्र दाखल केले असून पृष्‍ठ क्रमांक 58 ते 60 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.

  06.   विरुध्‍दपक्ष क्रं-1)  विमा कंपनी तर्फे पृष्‍ट क्रं 31 वर जोडलेल्‍या यादी नुसार विमा प्रस्‍तावाची प्रत, फार्म नं. 300, पॉलीसी मधील फार्म नं.3130(ए) आणि क्‍लॉज 20 ए सह, कु. शौर्या चे जन्‍म प्रमाणपत्र अशा दसतऐवजाच्‍या प्रतींचा समावेश आहे.

07.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्तिवाद, विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे लेखी उत्‍तर, उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले. तसेच तक्रारकर्त्‍याचे वकील आणि विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे वकील यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे-      

                                 :: निष्‍कर्ष ::

08    तक्रारकर्त्‍याने त्‍याची अज्ञान मुलगी कु.शौर्या सतीष बोरकर, वय-7 वर्ष हिचेसाठी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांचेमार्फत विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीकडून “जिवनतरंग” नावाची विमा पॉलिसी क्रं-977953500 दिनांक-28/01/2012 रोजी काढली होती. सदर विमा पॉलिसीचा त्रैमासिक हप्‍ता रुपये-6,384/- असून विमा रक्‍कम रुपये-5,00,000/- व प्रिमीयम भरण्‍याचा अवधी 20 वर्षे होती.  सदर पॉलीसीमध्‍ये तक्रारकर्ता हा Proposer होता.  तक्रारकर्त्‍याचा वेगळा फॉर्म भरला होता व त्‍याची वैद्यकीय तपासणी सुध्‍दा केली होती. या बाबी उभय पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नाहीत. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने स्‍वतःची जिवनाची जोखीम असलेल्‍या पॉलीसी क्रंमाक 970835434  व 975093654 या पॉलीसीचे भविष्‍यातील प्रिमीयम तक्रारकर्त्‍याच्‍या अंपगत्‍वामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने माफ केले आहे हे देखील वादातीत नाही.

09.  तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार पॉलीसी घेतेवेळी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्‍याला असे सांगितले होते की, सदर पॉलीसीची जोखीम ज्‍या दिवशी पॉलीसी मिळेल त्‍या दिवसापासून सुरु होईल तसेच कु. शौर्याच्‍या संदर्भात जोखीम आरंभ दिनांक 28/01/2016 अशी असेल, परंतु तक्रारकर्त्‍याकरीता जोखीम आरंभ स्थित पॉलीसीच्‍या आरंभ तारखेपासून असेल तसेच आरंभ तारखेनुसार कुठलाही अपघात झाला किंवा पॉलीसी किस्‍त वैद्यकीय शास्‍त्राप्रमाणे अल्‍पवयीन पाल्‍याचे पालक भरण्‍यास असमर्थ ठरेल व तसे पुरावे सादर केल्‍यास विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कंपनी मॅच्‍युरिटीपर्यंत पॉलीसी चालवेल. याउलट विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चे म्‍हणण्‍यानुसार प्रस्‍तुत पॉलीसीचे करारानुसार तक्रारकर्त्‍याचा Proposer चा दुर्देवी मृत्‍यु झाल्‍यावरच पुढील प्रिमीयम माफीची तरतुद असून तक्रारकर्त्‍याला कायमस्‍वरुपी अपंगत्‍वामुळे पुढील प्रिमीयम भरण्‍यापासून सुटीची तरतुद नाही. अशी सुट विमा जोखीम विमित व्‍यक्‍तीच्‍या अपंगत्‍वामुळे मिळेल असा पॉलीसीचा करार आहे. विमा  पॉलीसीतील अट क्रं.10 व 10 (ए) चे प्रावधान व पॉलीसीतील Clause 20 A  नुसार (The payment of premium falling due after death of proposer and before the vesting date shall be waiver) असे नमुद आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला शौर्या हिच्‍या जिवनाच्‍या जोखीमेवर काढलेल्‍या पॉलीसीबाबत प्रिमीयम भरण्‍यापासून सुटीचा लाभ पॉलीसीतील वरील अटी व शर्तीनुसार देता येणार नाही असे तक्रारकर्त्‍यास कळवून पॉलीसीचे पुढील हप्‍ते भरण्‍यास सांगितले असे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने म्‍हटले आहे.

10.   सदर प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्रं 2 हे हजर झाले नाही. त्‍यामुळे त्‍याचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍यात आले.

विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीचे अधिकृत अभिकर्ता आहेत. त्‍यामुळे योग्‍य पुराव्‍याअभावी तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी पॉलीसी काढताना दिलेली माहिती सांगितली होती हे तक्रारकर्त्‍याचे कथन अबाधीत राहते. असे जरी असले तरी पॉलीसीचे लाभ हे पॉलीसीतील अटी व शर्तीच्‍या करारावर अवलंबुन असतात, त्‍यामुळे सदर प्रकरणांत पॉलीसीच्‍या अटी व शर्ती बघणे आवश्‍यक आहे. मंचाद्वारे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचे सुक्ष्‍म अवलोकन करण्‍यात आले, त्‍यामध्‍ये अट क्रं.10 आणि 10 (ए) ही दुर्घटना हितलाभाबाबत असून त्‍यामध्‍ये पॉलीसीत ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या जिवनावर जोखीम स्विकारण्‍यात आली आहे त्‍या व्‍यक्‍तीच्‍या अपघाताबाबत सदरची अट लागू होते.

11.   विरुध्‍द पक्ष क्रं 1 ने तक्रारकर्त्‍याची मुलगी कु. शौर्या हिचेकरीता काढलेल्‍या पॉलीसीचा Proposer फॉर्म ची छायाकिंत प्रत अभिलेखावर पृष्‍ठ क्रमांक 32 वर दाखल केली आहे. त्‍याचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये सदर फॉर्म च्‍या क्‍लॉज नंबर 15 (ख) मध्‍ये विमा जोखीम आरंभ होण्‍यापूर्वी मृत्‍यु झाल्‍यास प्रिमीयम परित्‍याग लाभ घेऊ इच्छिता का ? याबाबतचे उत्‍तर होय असे नमुद केले आहे. त्‍यानुसार जोखीम आरंभ होण्‍यापूर्वी जर विमा प्रस्‍तावक म्‍हणजेच तक्रारकर्त्‍याचा मृत्‍यु झाला असता प्रिमीयम माफ होण्‍याचे प्रावधान आहे. तक्रारकर्त्‍याने सदरची पॉलीसी ही शौर्या हिच्‍या जिवीतावर जोखीमेकरीता काढलेली आहे. त्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्त्‍याकडून फॉर्म क्रंमाक 360 देखील भरुन घेतल्‍याचे पृष्‍ठ क्रं. 38 वर दाखल छायाकिंत प्रतीवरुन दिसून येते. सदर फॉर्मचे अवलोकन केले असता सदर फॉर्म हा स्‍वःजिवन विमा प्रस्‍ताव करीता भरुन दिलेला असून त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याची संपूर्ण माहिती नोंदविण्‍यात आलेली आहे तसेच सदर अर्जामध्‍ये दुर्घटना हितलाभ अट क्रं.10 आणि 10 (ए) प्रिमीयम माफीचा लाभ घेण्‍याबाबत होय असे नमूद करण्‍यात आलेले आहे. विरुध्‍द पक्षाने वरील दोन्‍ही फॉर्म हे शौर्या हिची पॉलीसी काढण्‍याकरीता तक्रारकर्त्‍याकडून भरुन घेतलेले आहे. कु. शौर्या ही अज्ञान असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर फॉर्म भरुन दिले होते. विम्‍याचे हप्‍ते विमीत व्‍यक्‍ती शौर्याच्‍या वतीने तक्रारकर्ता भरणार होता. त्‍यामुळे सदर अर्जात नमुद केलेले दुर्घटना हितलाभ व गंभीर आजाराबाबत प्रिमीयम माफ करण्‍याची माहिती विमीत व्‍यक्‍ती म्‍हणजेच शौर्या हिचेकरीता भरलेली होती. पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनुसार विमीत व्‍यक्‍ती हा अज्ञान असल्‍यामुळे प्रिमीयम भरण्‍याची जबाबदारी ही प्रस्‍तावकाची होती. त्‍यामुळे जोखीम आरंभापूर्वीच प्रस्‍तावकाचा मृत्‍यु झाल्‍यास प्रिमीयम माफीची तरतुद आहे, परंतु दुर्घटना हितलाभ व गंभीर आजाराबाबतची प्रिमीयम माफीची तरतुद ही शौर्या हिच्‍याकरीता लागू होते असे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीवरुन दिसून येते. सदर पॉलीसीतील अटी व शर्ती ह्या तक्रारकर्त्‍याने विमा प्रस्‍ताव फॉर्म भरत असताना त्‍याला मान्‍य असून कबुल केल्‍याचे दिसून येते. त्‍याचप्रमाणे पॉलीसी दस्‍तावेज मिळाल्‍यानंतर त्‍यातील तरतुदीनुसार “cooling off” अवधी 15 दिवसाचे दरम्‍यान पॉलीसी संबंधी अटीचे योग्‍य वाचन करुन त्‍यासंबंधी जर समाधानी नसल्‍यास विमा पॉलीसी परत करण्‍याचा अधिकार तक्रारकर्त्‍याला होता. परंतु तक्रारकर्त्‍याने तसे केल्‍याचे दिसून येत नाही. त्‍यामुळे सदर पॉलीसीतील अटी तक्रारकर्त्‍याला बंधनकारक आहेत.

12.   वास्‍तविक पाहता तक्रारकर्ता म्‍हणजेच पॉलीसीचा प्रस्‍तावक हा विम्‍याचे प्रिमीयम भरणार होता व त्‍यामुळे त्‍याची आर्थिक व शारीरीक अर्हता बघूनच विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने शौर्या हिचे नावावर पॉलीसी दिली होती. असे असतांना केवळ प्रस्‍तावकाचा म्‍हणजेच तक्रारकर्त्‍याचा जोखीम आरंभापूर्वी मृत्‍यु झाल्‍यास प्रिमीयम माफीची तरतुद नसुन प्रस्‍तावकास कोणत्‍याही दुर्घटनेने कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यास देखील प्रिमीयम माफीची तरतुद असणे आवश्‍यक होते. कारण विम्‍याचे हप्‍ते भरण्‍याची जबाबदारी प्रस्‍तावकावर असताना, कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यास विमीत व्‍यक्‍ती किंवा प्रस्‍तावक दोघेही हप्‍ते भरण्‍यास असमर्थ असतात. अश्‍यापरिस्थितीत ग्राहकाचा पॉलीसी घेण्‍यामागील उद्देशास अर्थ उरणार नाही.

13.   मात्र तक्रारकर्त्‍याने शौर्याकरीता काढलेल्‍या पॉलीसीतील अटी व शर्ती मध्‍ये प्रस्‍तावकास कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यास व तो प्रिमीयम भरण्‍यास असमर्थ ठरल्‍यास प्रिमीयम माफीची कुठलीही तरतुद दिलेली नाही. सदरचा विमा करार तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यात झाला असून, त्‍यातील अटी व शर्ती उभय पक्षास बंधनकारक आहे.

याबाबत मंच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे खालील न्‍यायनिवाड्यावर आपली भिस्‍त ठेवीत आहे.

मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या United India Insurance Co. Ltd.  V/s Harchand Rai Chandan lal (2004) 8 SCC 644  या न्‍यायनिवाड्यात विमा पॉलीसी करारातील अटी संबंधीत पक्षांना बंधनकारक असतात व त्‍यामध्‍ये कोर्टाला किंवा मंचाला हस्‍तक्षेप करण्‍याचे अधिकार नसल्‍याचे स्‍पष्‍ट निरीक्षण नोंदविले आहे.

त्‍याचप्रमणे मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने Suraj Mal Ram Niwas Oil Mills Private Limited V/s United India Insurance Co. Ltd.  And Anr. (2010) 10 SCC 567 या न्‍यायनिवाड्यात असे ग्राह्य धरले आहे की,

            “Thus it needs title emphasis that in construing the terms of a contract of insurance, the words used therein must be given paramount importance, and it is not open for the court to add, delete or substitute any words. It is also well settled that since upon issuance of an insurance policy, the insurer undertakes to indemnify the loss suffered by the insured on account of risks covered by the policy, its terms have to be strictly construed to determine the extent of liability of the insurer. Therefore, the Endeavour of the court should always be to interpret the words in which the contract is expressed by the parties.”

     सदर निवाड्यावर भिस्‍त ठेवीत प्रस्‍तुत प्रकरणांत विरुध्‍द पक्षाच्‍या विमा पॉलीसीतील अटी संबंधी हस्‍तक्षेप करणे अथवा अन्‍य आदेश देणे मंचाच्‍या अधिकारात नसल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1  विमा कंपनीने पॉलीसीतील अटी व शर्तीला अनुसरुन तक्रारकर्त्‍याचा किंवा प्रस्‍तावकास कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍यास PWB ( Permanent Waiver Benefit)   प्रिमीयम हितलाभ नाकारले आहे, म्‍हणून विरुध्‍द पक्षाची सेवेतील त्रुटी सिध्‍द होत नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.                  

14.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                ::आदेश::

(01)  तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(02) खर्चाबद्दल कोणताही हुकूम नाही.

(03) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.

(04)   . तक्रारकर्त्‍याला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.