Maharashtra

Bhandara

CC/18/62

HITENDRA TULSIRAM SATDEVE - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER, L.I.C., SAKOLI - Opp.Party(s)

MR.SUDHIR RAMAJI MESHRAM

21 Aug 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/62
( Date of Filing : 24 Sep 2018 )
 
1. HITENDRA TULSIRAM SATDEVE
R/O WARD KAJI NAGAR BHANDARA, TAH.DISTT. BHANDARA
BHANDARA
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER, L.I.C., SAKOLI
SAKOLI, BHANDARA
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR.SUDHIR RAMAJI MESHRAM , Advocate
For the Opp. Party: Adv. Sushma Singh, Advocate
Dated : 21 Aug 2019
Final Order / Judgement

                                                                    (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                            (पारीत दिनांक– 21 ऑगस्‍ट, 2019)   

 

01. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी विरुध्‍द त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यू संबधात देय विमा पॉलिसीची रक्‍कम नामनिर्देशित या नात्‍याने मिळण्‍या बाबत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

    तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सौ.नम्रता हितेंद्र सतदेवे हिने ती हयातीत असताना विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी कडून विमा पॉलिसी क्रं-979435396  एकूण रुपये-2,00,000/- एवढया रकमेची काढली होती आणि सदर पॉलिसीमध्‍ये तिचे पतीचे नाव (तक्रारकर्ता) नामनिर्देशित (Nominee) म्‍हणून दर्शविले होते.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याची पत्‍नी सौ.नम्रता हिची दिनांक-01.02.2018 पासून प्रकृती बिघडल्‍याने ती नौकरी वरुन वैद्दकीय रजेवर होती व डॉ. गवळी यांचेकडून औषधोपचार घेत होती. दरम्‍यान प्रकृती खाल्‍यावल्‍याने तिला जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय येथे भरती करण्‍यात आले व औषधोपचारा दरम्‍यान दिनांक-07.02.2018 रोजी ती ह्रदयविकाराच्‍या धक्‍क्‍याने मृत पावली. शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये सुध्‍दा तिचा ह्रदयविकाराच्‍या धक्‍क्‍याने  मृत्‍यू असा निषकर्ष काढलेला आहे. तिचे मृत्‍यू नंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा दाखल केला परंतु आज पर्यंत विमारक्‍कम व त्‍यावरील व्‍याज तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला रजिस्‍टर पोस्‍टाने दिनांक-11.06.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस मिळूनही विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने उत्‍तर दिले नाही व योग्‍य तो प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

(01)  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याची मृतक पत्‍नी व विमाधारक सौ.नम्रता हिचे मृत्‍यूपोटी विमा पॉलिसी क्रं-979435396 अन्‍वये एकूण विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- व त्‍यावर वार्षिक-10 टक्‍के दराने व्‍याज यासह तक्रारकर्त्‍याला  परत करावेत.

(02)   तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-25,000/- एवढी रक्‍कम विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(03)  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(04)   या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.   विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे लेखी उत्‍तर पान क्रं 34 ते 38 वर दाखल करण्‍यात आला. त्‍यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रपत्र भरुन न पाठविता व कोणतेही दस्‍तऐवज दाखल न करता सरळसरळ दिनांक-11.06.2018 रोजीची कायदेशीर नोटीस विरुध्‍दपक्ष कंपनीला पाठविली त्‍यामुळे आवश्‍यक कागदपत्रांच्‍या अभावी विमा दावा संबधीने योग्‍य तो निर्णय घेता येणार नाही. मृत्‍यू दावा हा पॉलिसी काढल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाच्‍या आतील असल्‍याने तो देय आहे किंवा नाही हे  आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता झाल्‍या नंतरच ठरविता येईल, ते दस्‍तऐवज खालील प्रमाणे आहेत-

 

Claim Form-A

Claimant’s Statement

Claim Form-B

Medical Attendant’s Certificate

Claim Form-B1

Treatment in Hospital (By Medical Attendant of Deceased in her last illness.

Claim Form-C

Certificate of identity & Burial.

Claim Form-E

Certificate of Employer

And all Hospital Treatment papers, Discharge Form, Original Policy Document.

    विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे परिच्‍छेद निहाय उत्‍तरे देताना नमुद केले की, शवविच्‍छेदन अहवाला प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा मृत्‍यू ह्रदयविकाराच्‍या धक्‍क्‍याने झाला होता असा निष्‍कर्ष काढण्‍यात आला होता परंतु ही बाब विरुध्‍दपक्ष कंपनीला कळविण्‍यात आली होती तसेच विमा दावा संबधी आवश्‍यक दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे सादर केली होती या बाबी विशेषत्‍वाने नाकबुल केल्‍यात. तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे सादर न केल्‍यामुळे त्‍याचे कायदेशीर नोटीसला उत्‍तर देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नसल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याचे नाव विमा पॉलिसी मध्‍ये नामनिर्देशित असल्‍याने त्‍याला विमा दावा दाखल करण्‍याचा अधिकार असल्‍याची बाब मान्‍य केली परंतु विमा पॉलिसी काढल्‍या पासून तीन वर्षाच्‍या आत विमाधारकाचा मृत्‍यू झालेला असल्‍याने विमा रक्‍कम देय आहे किंवा नाही? हे ठरविण्‍यासाठी दस्‍तऐवज आवश्‍यक आहेत परंतु त्‍याची पुर्तता तक्रारकर्त्‍याने केलेली नाही. आपले विशेष कथनात असे  नमुद केले की, तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सौ.नम्रता हिने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून दिनांक-23.04.2016 रोजी विमा पॉलिसी क्रं-979435396 काढली होती आणि तिचा मृत्‍यू पॉलिसी काढल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाचे आत म्‍हणजे दिनांक-07.02.2018 रोजी झालेला आहे. विमादाव्‍याचे निर्णयार्थ उपरोक्‍त नमुद आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता तक्रारकर्त्‍याने केलेली नसल्‍याने विमा दावा निश्‍चीत करता आलेला नाही. करीता ग्राहक मंचा तर्फे तक्रारकर्त्‍याला आवश्‍यक ते सर्व दसतऐवज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे दाखल करण्‍याचे निर्देशित करावे आणि तक्रार मूळातच चुकीची असल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.       

04.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 40 व 41 वर प्रतीउत्‍तर दाखल केले, त्‍यात असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्‍तरात नमुद केलेले सर्व दस्‍तऐवज विमा दावा प्रस्‍तावा सोबत त्‍याने दाखल केलेले आहेत. ईतकेच नव्‍हे तर तक्रारकर्त्‍याने दिनांक-12.06.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविल्‍या नंतर सदर नोटीसचे उत्‍तर विमा कंपनीने दिले नाही व क्‍लेम फॉर्म तसेच आवश्‍यक दस्‍तऐवजांची मागणी केलेली नाही आणि आता ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्‍या नंतर विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दाखल केला नाही असा खोटा बचाव विरुध्‍दपक्ष विमा कंपनी घेत असल्‍याचे नमुद केले.

05.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 08 वरील यादी नुसार अक्रं 01 ते 14 प्रमाणे दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने विमा हप्‍ता भरल्‍याच्‍या पावत्‍या एकूण 02, पॉलिसी स्‍टेटस रिपोर्ट, मृत विमाधारक सौ.नम्रता हिचे लग्‍न झाल्‍या नंतर बदलविलेले नाव, आधारकॉर्ड, अकस्‍मात मृत्‍यूसुचना, मरणान्‍वेषन प्रतिवृत्‍त, गुन्‍हयाच्‍या तपशिलाचा नमुना, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा विमा दावा फॉर्म, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला पाठविलेली कायदेशीर नोटीस, रजि. पोस्‍टाची पावती आणि पोच अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने  पान क्रं 40 व 41 वर प्रतीउत्‍तर दाखल केले. तसेच पान क्रं 43 ते 45 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. पान क्रं 57 व 58 वर अंतिम युक्‍तीवाद दाखल केला.

06.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे पान क्रं 34 ते 38 वर लेखी उत्‍तर दाखल केले. तसेच पान क्रं 47 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पान क्रं 49 वरील पुरसिस प्रमाणे विमा पॉलिसी काढल्‍याचे दिनांका पासून 03 वर्षाचे आत विमाधारकाचा मृत्‍यू झाल्‍यास विमा दावा निर्णयार्थ आवश्‍यक असलेल्‍या दस्‍तऐवजा संबधी नियम व अटीचा दस्‍तऐवज दाखल केला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे पान क्रं 55 व 56 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

07   तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री सुधीर मेश्राम तर विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील सौ.सुषमा सिंग यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

08.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तर व लेखी युक्‍तीवाद तसेच उभय पक्षां तर्फे दाखल
केलेल्‍या दस्‍ताऐवजांचे अवलोकन मंचाव्‍दारे करण्‍यात आले, त्‍यावरुन ग्राहक मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-

                                                                                          :: निष्‍कर्ष ::

09.   या प्रकरणा मधील संक्षीप्‍त विवाद असा आहे की, तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सौ.नम्रता हिने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून दिनांक-23.04.2016 रोजी विमा पॉलिसी क्रं-979435396 काढली होती आणि तिचा मृत्‍यू पॉलिसी काढल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाचे आत म्‍हणजे दिनांक-07.02.2018 रोजी झालेला आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने त्‍याची पत्‍नीचे मृत्‍यू संबधात विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक असलेल्‍या दस्‍तऐवजांसह दाखल न करता सरळ सरळ दिनांक-12.06.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली आणि त्‍यानंतर ही तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केली. विमाधारकाचा मृत्‍यू जर विमा पॉलिसी काढल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाचे आत झालेला असेल तर  त्‍या संबधात कोणकोणत्‍या दस्‍तऐवजांची पुर्तता करणे आवश्‍यक आहे या संबधी नियम व शर्तीचा दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे पान क्रं 50 ते 53 वर दाखल केला.

10.   याउलट तक्रारकर्त्‍याने पान क्रं 40 व 41 वर प्रतीउत्‍तर दाखल करुन असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्‍तरात नमुद केलेले सर्व दस्‍तऐवज विमा दावा प्रस्‍तावा सोबत त्‍याने दाखल केलेले आहेत. तक्रारकर्त्‍याने दिनांक-12.06.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविल्‍या नंतर सदर नोटीसचे उत्‍तर  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिले नाही व क्‍लेम फॉर्म तसेच आवश्‍यक दस्‍तऐवजांची मागणी केली नाही आणि आता ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्‍या नंतर विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दाखल केला नाही असा खोटा बचाव विरुध्‍दपक्ष विमा कंपनी घेत असल्‍याचे नमुद केले.

11.  तक्रारकर्त्‍याने पान क्रं 8 वरील दस्‍तऐवज यादी प्रमाणे मृतक विमाधारक हिचे आधारकॉर्ड, अकस्‍मात मृत्‍यू सुचना, मरणान्‍वेषन प्रतीवृत्‍त, गुन्‍हयाच्‍या तपशिलाचा नमुना, श‍वविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे मेडीकल अटेन्‍डन्‍ट सर्टीफीकेट आणि  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला पाठविलेली रजि. कायदेशीर नोटीस, रजि.पोस्‍टाची पावती व पोच अशा दसतऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

12.  मंचा तर्फे विमा पॉलिसी काढल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाचे आत विमाधारकाचा मृत्‍यू झाल्‍यास कोणकोणत्‍या दस्‍तऐवजांची पुर्तता करावयास पाहिजे या संबधी पान क्रं 50 ते 53 वर दाखल अटी व शर्ती दर्शविणारा दस्‍तऐवजाचे अवलोकन केले त्‍यानुसार-

4.1   Requirements in the case of a claim under a policy continuously in force for not less than 3 years:

                (a)       Documentary proof of age as per requirements described in the prospectus and in the age manual, if age is not admitted.

(b)      Certified extract from Death Register-In respect of NRI claims where the cause of death is natural, documents supplied               by the Embassy and any public office authorized to maintain records of birth and death in that particular country.

(c)     Claim Form A-“Claimant’s Statement to be completed by the claimant.

(d)       Evidence of Title to the deceased’s estate, if the policy is not nominated, assigned for issued under M.W.P.Act.

(e)     Original Policy or Duplicate Policy, if issued in lieu of the original along with the Deed’s of Assignment or Appointment              of Guardian, if any.

          Additional Requirements under a policy which has resulted into a claim within 3 years from the date of risk or from the date of revival/reinstatement on the basis of evidence of health are given under para 13.1

        For IRDA instructions regarding this please refer Section 1 of this chapter.

       For requirement in case of all Bima Nivesh policies refer Section 13.1.b of this Chapter.

      The First year claims from revival are not covered under the above concessions. Further in respect of high risk plans and term riders this concession is not available.

    Besides the requirement mentioned in Para 4 above, the following should also be called if the policy has resulted into a claim by the death of the life assured within 3 years from the date of risk or from the date of revival or reinstatement on the basis of evidence of health.

Claim Form-B

Medical Attendant’s Certificate

Claim Form-C

Certificate of identity & Burial or Cremation

Claim Form-E

Certificate of Employer

Claim Form-B1

Treatment in Hospital (By Medical Attendant of Deceased in her last illness)

Certified copies of the FIR, Post Mortem Report and Police Investigation Report, if death was due to accident or unnatural cause.

13.   उपरोक्‍त नमुद अटी व शर्तीच्‍या दस्‍तऐवजाचे मंचाव्‍दारे काळजीपूर्वक वाचन करण्‍यात आले. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने त्‍याची मृतक पत्‍नी आणि विमाधारक सौ.नम्रता हिचे संबधात संबधात आधारकॉर्डची प्रत, सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथील शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र आणि मेडीकल अटेन्‍डन्‍स सर्टीफीकेटची प्रत दाखल केली.

14.   तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सौ.नम्रता हिने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून दिनांक-23.04.2016 रोजी विमा पॉलिसी क्रं-979435396 काढली होती आणि तिचा मृत्‍यू पॉलिसी काढल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाचे आत म्‍हणजे दिनांक-07.02.2018 रोजी झालेला आहे ही बाब दाखल दस्‍तऐवजी पुराव्‍यां वरुन सिध्‍द होते आणि त्‍यामुळे विमाधारकाचा मृत्‍यू हा पॉलिसी काढल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाचे आत झालेला असल्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे परिच्‍छेद 4.1 प्रमाणे  आवश्‍यक असलेल्‍या दसतऐवजांपैकी तक्रारकर्त्‍याने क्‍लेम फॉर्म बी मेडीकल अटेन्‍डन्‍स सर्टीफीकेटची पुर्तता केली.  अनैसर्गिकरित्‍या मृत्‍यू झाल्‍यास( If death was due to accident or unnatural cause.) एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल आणि पोलीस दस्‍तऐवजांची आवश्‍यकता आहे परंतु विमाधारकाचा मृत्‍यू हा ह्रदयविकाराने झालेला असल्‍याने या दस्‍तऐवजाची आवश्‍यकता नसताना तक्रारकर्त्‍याने अकस्‍मात मृत्‍यू सुचना, मरणान्‍वेषन प्रतिवृत्‍त, गुन्‍हयाचा तपशिलाचा नमुना असे पोलीस दस्‍तऐवज तसेच शवविच्‍छेदन अहवाल आणि मृत्‍यू प्रमाणपत्र विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे दाखल केलेत. परंतु उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे-Claim Form-C- Certificate of identity & Burial or Cremation,  Claim Form-E- Certificate of Employer एवढयाच दस्‍तऐवजांची पुर्तता केली नसल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा मृत्‍यू झाल्‍याचे प्रमाणपत्र पान क्रं 24 वर दाखल आहे त्‍यामुळे क्‍लेम फॉर्म “C” जे दफन आणि दहन संबधातील आहे त्‍याची काही आवश्‍यकता नसल्‍याचे दिसून येते कारण मृत्‍यू प्रमाणपत्र हे त्‍या प्रमाणपत्राशी एक पूरक प्रमाणपत्र (Supporting Document) आहे कारण ज्‍या अर्थी विमाधारक हिचा मृत्‍यू होऊन तिचेवर अंतिम संस्‍कार करण्‍यात आलेत, त्‍याअर्थीच विमाधारक हिचा मृत्‍यू झाल्‍या बाबत मृत्‍यू प्रमाणपत्र शासनाचे वतीने संबधित यंत्रणे तर्फे जारी करण्‍यात आले. तसेच सर्टीफीकेट ऑफ एम्‍प्‍लायर हे प्रमाणपत्र मृत्‍यू दावा ठरविण्‍यास आवश्‍यक नसल्‍याचे मंचाचे मत आहे. सर्टिफीकेट ऑफ एम्‍प्‍लायरचे प्रमाणपत्र हे प्रस्‍तुत तक्रार गुणवत्‍तेवर निकाली (On Merit) काढण्‍यासाठी आवश्‍यक नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचा विमाधारकाचा मृत्‍यू सरकारी दवाखाना  जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे वैद्यकीय उपचारा दरम्‍यान झालेला आहे आणि  जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे शवविच्‍छेदन झालेले आहे त्‍यामुळे Claim Form-B-1 -Treatment in Hospital (By Medical Attendant of Deceased in her last illness) ची सुध्‍दा गरज भासत नाही कारण सरकारी रुग्‍णालयात शेवटचे वैद्यकीय उपचारा दरम्‍यान झालेला मृत्‍यू आणि सरकारी दवाखान्‍यातच शवविच्‍छेदन झालेले आहे. शासकीय रुग्‍णालयात झालेला शेवटचा वैद्यकीय उपचार व मृत्‍यू हा  संशयास्‍पद उपचार व मृत्‍यू आहे असे म्‍हणता येणार नाही कारण सरकारी यंत्रणा ही निःपक्षपाती यंत्रणा (Impartial) असल्‍याने त्‍यावर अविश्‍वास ठेवण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक मंचास दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या सहायक दस्‍तऐवजांचे आधारावरुन (Supporting Documents) योग्‍य तो निर्णय घेऊन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यू संबधात विमा दावा मंजूर करुन विमा रक्‍कम देता आली असती परंतु तसे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने केलेले नाही. तक्रारकर्तीचे पत्‍नीला विमा पॉलिसी काढल्‍याचे अगोदर पासून हदयविकाराचा आजार होता व ती विमा पॉलिसी काढल्‍याचे आधीपासून हदयविकारावर वैद्दकीय उपचार घेत होती असा कोणताही आक्षेप विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा नाही वा तशी स्थिती दर्शविणारे कोणतेही वैद्दकीय दस्‍तऐवज या  प्रकरणात  दाखल नाहीत.

15.     दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला जर तक्रारकर्त्‍याचे विमा दाव्‍या संदर्भात आक्षेप होता की, तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रस्‍ताव व आवश्‍यक दस्‍तऐवज दाखल केले नाहीत तर त्‍यांनी तक्रारकर्त्‍याने विमा दावा दाखल केल्‍या नंतर तसे लेखी पत्र द्दावयास हवे होते आणि त्‍याचे कडून दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घ्‍यावयास पाहिजे होती. परंतु तक्रारकर्त्‍याने रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली कायदेशीर नोटीस मिळूनही त्‍यास विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने उत्‍तर दिले नाही वा विमा दाव्‍या संबधी आवश्‍यक दस्‍तऐवजाची मागणी केलेली नाही आणि आता तक्रार ग्राहक मंचात दाखल झाल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दस्‍तऐवज पुरविले नाहीत असे कारण दर्शवून आपली जबाबदारी झटकण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची एकंदरीत कृती पाहता त्‍यांना तक्रारकर्त्‍याला विमा दावा द्दावयाचाच नव्‍हता असेच दिसून येते आणि ही त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला दिलेली दोषपूर्ण सेवा असल्‍याचे दिसून येते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. या शिवाय विमा कंपनीचे बिमा नियामक मंडळाचे तरतुदी अनुसार विमा कंपनीला विमा दाव्‍या संबधी जर अतिरिक्‍त दस्‍तऐवज पाहिजे असतील तर त्‍यांनी दावा मिळाल्‍याचे दिनांका पासून पंधरा दिवसाचे आत त्‍याची मागणी करावयास पाहिजे आणि विमा दावा तसेच विमा दाव्‍याशी संबधित सर्व दस्‍तऐवज प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत विमा दावा मंजूर अथवा नामंजूर या संबधी निर्णय घ्‍यावयाचा आहे. बिमा नियामक मंडळाच्‍या तरतुदी खालील प्रमाणे आहेत-

INSURANCE REGULATORY AND DEVELOPMENT

                        AUTHORITY

NOTITICATION, the 16th October 2002

Insurance Regulatory and Development Authority (Protection of Policyholders’ Interests) Regulations, 2002.

8. Claims procedure in respect of a life insurance policy

(1) A life insurance policy shall ­state the primary documents which are normally required to be submitted by a claimant in support of a claim.

(2) A life insurance company, upon receiving a claim, shall process the claim without delay. Any queries or requirement of additional documents, to the extent possible, shall be raised all at once and not in a piece-meal manner, within a period of 15 days of the receipt of the claim.

(3) A claim under a life policy shall be paid or be disputed giving all the relevant reasons, within 30 days from the date of receipt of all relevant papers and clarifications required. However, where the circumstances of a claim warrant an investigation in the opinion of the insurance company, it shall initiate and complete such investigation at the earliest. Where in the opinion of the insurance company the circumstances of a claim warrant an investigation, it shall initiate and complete such investigation at the earliest, in any case not later than 6 months from the time of lodging the claim.

(4) Subject to the provisions of section 47 of the Act, where a claim is ready for payment but the payment cannot be made due to any reasons of a proper identification of the payee, the life insurer shall hold the amount for the benefit of the payee and such an amount shall earn interest at the rate applicable to a savings bank account with a scheduled bank (effective from 30 days following the submission of all papers and information).

(5) Where there is a delay on the part of the insurer in processing a claim for a reason other than the one covered by sub-regulation (4), the life insurance company shall pay interest on the claim amount at a rate which is 2% above the bank rate prevalent at the beginning of the financial year in which the claim is reviewed by it.

       विमा नियामक मंडळाचे उपरोक्‍त नमुद तरतुदी प्रमाणे विमा कंपनीने विमा दावा हा जास्‍तीत जास्‍त 06 महिन्‍यात निकाली काढावा असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले असून विमा दावा निश्‍चीत करण्‍यासाठी जर विलंब झाला असेल तर त्‍या प्रकरणात विमा कंपनी ही संपूर्ण विमा रकमेवर बँकेच्‍या दरा नुसार 2% दर देण्‍यास जबाबदार राहिल असे नमुद केलेले आहे. उपरोक्‍त विमा नियामक मंडळाचे कायदेशीर तरतुदी नुसार विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या विमा दाव्‍या संबधी  विहित मुदतीत त्‍यावर काहीही कार्यवाही तसेच निर्णय घेतलेला नाही असे दिसून येते व ही त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला  दिलेली  दोषपूर्ण सेवा असल्‍याची बाब सिध्‍द होते.

16.    उपरोक्‍त नमुद घटनाक्रम, प्रकरणात दाखल पुरावे आणि वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हा त्‍याचे पत्‍नीचे मृत्‍यू नंतर विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- आणि त्‍यावर प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केल्‍याचा दिनांक-24.09.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.

17.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                                       :: आदेश ::

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम शाखा-साकोली, जिल्‍हा भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याची पत्‍नी विमाधारक सौ.नम्रता हितेंद्र सतदेवे हिचे विमा पॉलिसी क्रं-979435396 संबधात मृत्‍यू विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष ) द्यावेत आणि सदर विमा रकमेवर तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केल्‍याचा दिनांक-24.09.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज द्दावे.
  3. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) द्यावेत.
  4. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष  विमा कंपनीने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने सदर आदेशाचे अनुपालन न केल्‍यास अंति‍म आदेशातील मुद्या क्रं-(02) मध्‍ये नमुद विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- दिनांक-24.09.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍यास विरुध्‍दपक्ष विमा कंपनी जबाबदार राहिल.
  5. निकालपत्राच्‍या प्रमाणित उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.
  6. तक्रारकर्त्‍याला  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.