जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/46. प्रकरण दाखल तारीख - 06/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 26/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. श्रीमती निलाबाई भ्र. पांडूरंग गायकवाड वय 40 वर्षे, धंदा शेती व घरकाम अर्जदार रा. कोलगांव (बु) ता. भोकर जि. नांदेड विरुध्द. 1. शाखा अधिकारी, कबाल इंन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्पलेक्स, टाऊन सेंटर, सिडको कॅनॉट, औरंगाबाद. 2. व्यवस्थापक नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मुंबई कार्या.डिव्हीजन नं.9 कर्मशियल यूनियन हाऊस, एक्सीलर थिएटरच्या बाजूस, 9, वॅलेस स्टिट, फोर्ट, मुंबई -400001. 3. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा नगिना घाट, नांदेड. 4. मा.तहसीलदार, तहसील कार्यालय धर्माबाद ता.धर्माबाद जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकिल - अड.एस.ऐ.पाठक गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या) गैरअर्जदार नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की,मयत पांडूरंग मारोती गायकवाड हा शेतकरी असून तो अर्जदार यांचा पती होता, मयत पांडूरंग हे त्यांची शेत जमिन गट नंबर 174 मध्ये 2 हेक्टर मौजे रिठा ता.भोकर जि. नांदेड येथे शेती करीत होते. सर्व व्यवस्थित चालू असताना अचानक दि.31.05.2007 रोजी रेल्वेने प्रवास करीत असताना रेल्वेमधून पडून मृत्यू झाला. अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन धर्माबाद जि. नांदेड येथे गू.रं.नं.17/2007 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदविला. घटने संदर्भात पोस्ट मार्टम रिपोर्ट तसेच इतर वैद्यकीय प्रमाणपञे अर्जदार हीने प्रस्तूत तक्रारकामी पुराव्याकामी दाखल केलेले आहेत. अर्जदाराने आवश्यक कागदपञासह गैरअर्जदार क्र.4 मार्फत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा दाखल केला. महाराष्ट्र शासनाने शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.2 नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली..तसेच गैरअर्जदार क्र.3 मार्फत विमा उतरविला. म्हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांचे प्रपोजल तहसीलदार धर्माबाद यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना पाठविले असता, गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी आजपर्यत अर्जदारास कोणत्याही प्रकारची रक्कम दिली नाही. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्यांना विम्याची रक्कम रु,1,00,000/- 12 टक्के व्याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळोवत म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 4 हे हजर झाले नाही व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला तसेच अर्जदार यांचे वकिलांनी एक अर्ज देऊन गैरअर्जदार क्र.1 व 4 विरुध्द स्टेप्स घेणे गरजेचे ठरत नाही असा अर्ज दिलेला आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे एकञितरित्या दाखल केलेले आहे. अर्जदार यांची तक्रार ही खोटी व बोगस आहे. मयत हे रेल्वे अपघातामध्ये मरण पावले याबददल कोणताही ठोस पूरावा दिलेला नाही. एफ.आय.आर ही स्पष्ट नाही. अर्जदार यांनी सदर घटना ही खोटी तयार केलेली आहे.अर्जदार यांनी वेळेत याबददल अर्ज सादर केलेला नाही. अर्जदार यांनी कालमर्यादत कागदपञ दाखल केलेले नाहीत. सरकारी जी. आर नुसार अर्जदार यांना कोणताही बेस तक्रार दाखल करण्यास नाही. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांचे पती मयत शेतकरी पांडूरंग गायकवाड यांचा दि.31.05.2007 रोजी रेल्वेने प्रवास करीत असताना रेल्वेमधून पडून मयत पांडूरंग यांचा मृत्यू अपघाती झाला. या बददलचा पूरावा म्हणून घटनास्थळाचा पंचनामा,इन्क्वेस्ट पंचनामा,जवाब, अकस्मात मृत्यू रिपोर्ट, रेल्वे तिकीट, तलाठयाचे प्रमाणपञ, एफ.आय.आर., मृत्यू प्रमाणपञ,वारसा प्रमाणपञ,गाव नमूना सहा क, क्लेम फॉर्म भाग -1, भाग-2,गाव नमूना -7,गाव नमूना आठ-अ,निवडणून ओळखपञ, मराठवाडा ग्रामीण बँक येथील अर्जदाराचे पासबूक, पी.एम.रिपोर्ट,मृत्यू नोंदणीची रजिस्टर इत्यादी दाखल आहे. यात इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये यातील अंड कोष खर्चटून रक्त नीघालेले दिसत आहे, गुदद्वार रक्ताने भरलेले दिसत आहे असे म्हटले आहे. पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये डॉक्टराच्या मते Cardiorespiratory failure due to intraabdmenal injury due to rupruture of stomack, rupruture of liver, associated with lacented both lung. As viscera is preserved for chemical analysis final opnion can be given after chemical analysis report. असे म्हटलेले आहे म्हणजे मृत्यू हा अपघातानेच झालेला आहे. त्यामूळे मृत्यू बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. घटनेच्या मरणोत्तर पंचनाम्या मध्ये मयताचे नांव पांडूरंग जळबाजी करंडेकर असे असून पोलिस स्टेशन भोकर येथे गून्हा नोंदविण्यात आलेला आहे. पी.एम. रिपोर्ट ही या सोबत जोडलेला आहे. मयत पांडूरंग यांचे 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्याबददल त्यांच्या नांवाचा 7/12 व गाव नमूना आठ- अ, दाखल आहे. याप्रमाणे गट नंबर 174 मध्ये ही जमिन कोळगांव (बु) ता. भोकर येथे आहे. यावरुन अर्जदार ही मयत पांडूरंग यांची पत्नी आहे. तलाठयाचे मृत्यू बददलचे पञ दाखल केलेले आहे. यात मयताचा मृत्यू हा अपघाताने झाला यांची नोंद आहे व त्यांस पत्नी निलाबाई ,मूलगी शोभा, सूनिता, मूलगा गोविंद हे मूले आहेत. मृत्यूनंतर दाव्यासाठी क्लेम फॉर्म नंबर 1 पूर्ण भरुन घेऊन तहसीलदार भोकर यांना दिल्याची नोंद आहे. दि.31.05.2007 रोजीला अपघात झाला, तहसीलदार भोकर यांना लगेच कळविण्यात आले म्हणजे विलंब झाला नाही, पण 90 दिवसांचा अवधी क्लेम दाखल करण्यास होता. त्यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेता येणार नाही. कारण हा नियम जरी असला तरी बंधनकारक नाही. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्यांना शासनाच्या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्यानंतर ते दूःखात असतात. त्यामूळे जबाबदारीने क्लेम दाखल करणे शक्य नसते. म्हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्यास शासनाचे परिपञका प्रमाणे क्लेम वेळेत दाखल करणे आवश्यक असले तरी हे बंधनकारक नाही, त्यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्पष्ट म्हटले आहे. शेतक-याचा मृत्यू अपघाती झाला हे स्पष्ट आहे त्यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्याची रक्कम दिली पाहिजे हे न्यायाच्या दृष्टीने उचित आहे. विम्याची रक्कम ही मयताच्या पत्नीस मिळाली पाहिजे. काहीही कारणे सांगून व उगीच कागदपञाची अवाजवी मागणी म्हणजे सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार यांना त्यांचे जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.31.05.2007 पासून 9 टक्के व्याजासह पूर्ण रक्कम वसूल होईलपर्यत व्याजासहीत दयावेत. 3. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- दयावेत. 4. गैरअर्जदार क्र.,1 व 4 विरुध्द आदेश नाही. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |