जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/34. प्रकरण दाखल तारीख - 01/02/2010 प्रकरण निकाल तारीख –29/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. ग्यानू पि. दत्ता राऊत वय 60 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा. मडकी पो. सोनखेड ता. लोहा जि. नांदेड विरुध्द. 1. शाखा अधिकारी, कबाल इंन्शूरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. औरंगाबाद. 2. मा.तहसीलदार, तहसील कार्यालय लोहा ता.लोहा जि. नांदेड. 3. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा नगिना घाट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकिल - स्वतः गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अड.एस.ऐ.पाठक निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या) गैरअर्जदार नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार ग्यानू हा हा शेतकरी असून तो शेतीचे काम संपल्यानंतर मजूरी करुन उदरनिर्वाह चालवितो. दि.17.10.2007 रोजी मडकी गांवाच्या शिवारात सूमारे सकाळी 7.00 वालता बैल सोडत असताना सदर बैलाने धडक मारल्यामूळे अर्जदार यांचे मांडीवर गंभीर मार लागला व पाय फ्रॅक्चर झाला. मूक्का मार लागला म्हणून अर्जदार यांने ते सहन केला पण सदर ञास सहन होत नसल्याने दि.11.11.2007 रोजी दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी पायावर ऑपरेशन केले. अर्जदार यांस दिड महिना दवाखान्यात राहावे लागले. ऑपरेशन होऊन त्यांचा पाय दूरुस्त झाला नाही व त्यांस कायमचे अपंगत्व आले. अर्जदार हा शेती काम करण्यास असमर्थ आहे त्यामूळे त्यांचे कूटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस स्टेशन सोनखेड येथे दि.12.1.2007 रोजी तक्रार क्र.24/2007 नोंदविली. अर्जदार यांना मौजे मडकेवाडी ता. लोहा गट नंबर 163/2 मध्ये शेत जमिन आहे. सदरील 2 हेक्टर 76 आर जमिनीवर अर्जदार पीक घेतो. अर्जदाराने आवश्यक कागदपञासह गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा दाखल केला. तहसीलदार यांनी सदरचा अर्ज गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविला. महाराष्ट्र शासनाने शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.3 नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली..तसेच गैरअर्जदार क्र.1 मार्फत विमा उतरविला. म्हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्यांचे प्रपोजल तहसीलदार यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.3 यांना पाठविले असता, गैरअर्जदार यांनी आजपर्यत अर्जदारास कोणत्याही प्रकारची रक्कम दिली नाही. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्यांना अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम रु,50,000/- 18 टक्के व्याज तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळोवत म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे पोस्टाने पाठविले आहे. त्यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्कम मानधन म्हणून देखील स्विकारत नाहीत. त्यामूळे त्यांचे विरुध्द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा अपघात दि.11.11.2006 रोजी झाला व क्लेम त्यांचेकडे दि.11.04.2007 रोजी तहसिलदार यांचेकडून आला, तो त्यांनी नॅशनल इन्शूरन्स कंपनीकडे दि.25.6.2007 रोजी पाठविला. मध्यस्थ करणे व शेतक-यांच्या प्रस्तावाची छाननी करणे व योग्य त्या शिफारशीसह इन्शूरन्स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्यांचे काम आहे. त्यामूळे त्यांचे विरुध्दचा दावा खारीज करावा. गैरअर्जदार क्र.2 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा विमा प्रस्ताव कागदपञाची तपासणी करुन औरगाबाद महसूल वीभागात येणा-या सर्व शेतक-यासाठीच्या शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव कबाल इन्शूरन्स कंपनी औरंगाबाद यांचेकडे दि.7.4.2007 रोजी योग्य त्या कार्यवाहीस्तव पाठविण्यात आला. त्यामूळे त्यांचे सेवेत कोणत्याही प्रकारची ञूटी नसून त्यांचे विरुध्दचा दावा फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांची तक्रार ही खोटी व बोगस आहे. अर्जदाराचा दि.17.10.2007 रोजी सकाळी 7 वाजता बैलाने धडक दिल्यामूळे अपघात झाला हे त्यांना मान्य नाही. डॉक्टरांनी त्यांचे पायावर ऑपरेशन केले व त्यामध्ये त्यांचे पायाला अपंगत्व आले हे त्यांना मान्य नाही. डॉक्टराच्या उपचारा बाबत अर्जदार यांनी कोणतेही कागदपञ दाखल केलेले नाहीत. अर्जदार हा सर्व प्रकारचे काम करु शकतो तसेच त्यांचे रोजीरोटीवर त्यांचा काहीही परीणाम झालेला नाही. अर्जदार यांनी अपघातानंतर तिन महिने उशिराने पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने मागितलेला विमा दावा रक्कम त्यांना मान्य नाही. अर्जदार यांनी वेळेत प्रस्ताव दाखल करुन क्लेम मागितलेला नाही. अर्जदार यांनी कोणताही जी. आर दाखल केलेला नाही.अर्जदार यांनी वेळेत याबददल अर्ज सादर केलेला नाही. अर्जदार यांनी कालमर्यादेत कागदपञ दाखल केलेले नाहीत. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार ग्यानू यांचा दि.17.10.2007 रोजी मडकी गांवाच्या शिवारात सूमारे सकाळी 7.00 वालता बैल सोडत असताना सदर बैलाने धडक मारल्यामूळे अर्जदार यांचे मांडीवर गंभीर मार लागला व पाय फ्रॅक्चर झाला. मूक्का मार लागला म्हणून अर्जदार यांने ते सहन केला पण सदर ञास सहन होत नसल्याहने दि.11.11.2007 रोजी दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी पायावर ऑपरेशन केले. अर्जदार यांस दिड महिना दवाखान्यात राहावे लागले. ऑपरेशन होऊन त्यांचा पाय दूरुस्त झाला नाही व त्यांस कायमचे अपंगत्व आले. या बददलचा पूरावा तहसीलदाराचे प्रमाणपञ, तलाठयाचे प्रमाणपञ, एफ.आय.आर. गाव नमूना 7/12,डॉ. चिलकेवार यांचे दि.10.1.2007 चे प्रमाणपञ,शासकीय रुग्णालयाचे डिसचार्ज कार्ड इत्यादी दाखल आहे. एफ.आय. आर मध्ये बैलाने धडक देऊन अर्जदार यांचा उजवा पाय फ्रक्चर केला असे म्हटले आहे.डॉ. चिलकेवार यांचे प्रमाणपञामध्ये अर्जदारास अपंगत्व आले असे म्हटले आहे.तसेच शासकीय रुग्णालयाच डिसचार्ज कार्डमध्ये पायावर भर देऊन चालू नये असे म्हटले आहे. यांचा अर्थ अपघात झाला या बददल वाद नाही. अर्जदार ग्यानू यांचे 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्याबददल त्यांच्या नांवाचा 7/12 व गाव नमूना बारा दाखल आहे. याप्रमाणे गट नंबर 163/2 मध्ये ही जमिन मडकी ता. लोहा येथे शेती जमिन 2 हेक्टर 76 आर आहे हे दिसून येते. तलाठयाचे अपघाताबददलचे पञ दाखल केलेले आहे. यात अर्जदार हे शेतकरी असून ते शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत असल्यामूळे ते विमा रक्कम मिळण्यास पाञ आहेत असे म्हटले आहे. दि.17.10.2007 रोजीला अपघात झाला, तहसीलदार लोहा यांना लगेच क्लेम फॉर्म सहीत दावा दि.18.01.2007 रोजी दाखल केलेला आहे. 90 दिवसांचा अवधी क्लेम दाखल करण्यास होता. त्यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेता येणार नाही. कारण हा नियम जरी असला तरी बंधनकारक नाही. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्यांना शासनाच्या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्यानंतर ते दूःखात असतात. त्यामूळे जबाबदारीने क्लेम दाखल करणे शक्य नसते. म्हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्यास शासनाचे परिपञका प्रमाणे क्लेम वेळेत दाखल करणे आवश्यक असले तरी हे बंधनकारक नाही, त्यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्पष्ट म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी असा आक्षेप घेतला आहे की, अपघात हा दि.17.10.2007 रोजी झाला व पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दि.12.01.2008रोजी दाखल केलेली आहे म्हणजे घटनेनंतर तिन महिन्याने तक्रार दाखल केलेली आहे म्हणून अर्जदाराचा दावा खारीज करावा, पण यात अर्जदार हा शेतकरी आहे तसेच तो अडाणी आहे त्यामूळे अशा प्रकारचा उशिर हा ग्राहय धरणे उचीत ठरते. शेतक-याचा अपघात झाला हे स्पष्ट आहे त्यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्याची रक्कम दिली पाहिजे हे न्यायाच्या दृष्टीने उचित आहे. काहीही कारणे सांगून व उगीच कागदपञाची अवाजवी मागणी म्हणजे सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार यांना त्यांचे जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत विम्याची रक्कम रु.50,000/- दयावेत. 3. गैरअर्जदार क्र. 3 यांनी दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत. 4. गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द आदेश नाही. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक |