Maharashtra

Kolhapur

CC/14/103

Vasant Ravan Jadhavawar - Complainant(s)

Versus

Branch Manager, Iffco Tokio General Insurance Co.Ltd., - Opp.Party(s)

R.N.Powar/V.N.Sarnaik

12 Sep 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/103
 
1. Vasant Ravan Jadhavawar
Plot No.23, Mahalaxmi Nivas, Om Park, Pachgaon
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Iffco Tokio General Insurance Co.Ltd.,
G.A.G.2, Jaju Market, Near Damini Hotel, Tarabai Park, Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
Adv.R.N.Powar/Adv.V.N.Sarnaik, Present
 
For the Opp. Party:
Adv.S.Y.Sakhare, Present
 
Dated : 12 Sep 2016
Final Order / Judgement

तक्रार दाखल ता.09/04/2014   

तक्रार निकाल ता.12/09/2016

न्‍यायनिर्णय

द्वारा:- - मा. अध्‍यक्षा –सौ. सविता पी.भोसले.

 

1.           तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.

 

2.          तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे:-

 

            तक्रारदार हे पांचगांव, कोल्‍हापूर येथे कायमस्‍वरुपी राहणेस आहेत.  त्‍यांचे मालकीची शेवरलेट बीट कार नं.एम.एच.-09-बी.एक्‍स.-4073 ही कार असून प्रस्तुत कारचा विमा वि.प.विमा कंपनीकडे उतरविला असून त्‍याचा पॉलीसी नं.81633162 असा आहे.  त्‍याचा विमा कालावधी दि.24.10.2012 ते दि.23.10.2013 असा होता. 

           

            दि.18.08.2013 रोजी तक्रारदाराचे प्रस्तुत कारला अपघात होऊन सदर अपघातात कारचे पुर्णपणे नुकसान झालेले आहे.  अपघातावेळी प्रस्तुत कारची इन्शुअर्ड व्‍हॅल्‍यु (IDV) रक्‍कम रु.4,18,720/- अशी होती.  अपघातात नमुद कारचे पुर्णपणे नुकसान झालेने तक्रारदाराचे वि.प.विमा कंपनीकडे विमा क्‍लेम मिळणेसाठी क्‍लेम योग्‍य त्‍या कागदपत्रांसह सादर केला.  परंतु प्रस्‍तुत विमा कपंनीने तक्रारदाराचा सदरचा विमा क्‍लेम प्रस्तुत कारमध्‍ये क्षमतेपेक्षा जास्‍त लोक बसण्‍याचे कारण देऊन सदर कारचा विमा क्लेम नाकारला आहे.  वास्‍तविक सदरचे तक्रारदाराचे कारमधून तक्रारदाराचे सहकारी व घरचे लोक प्रवास करत होते आणि अपघात हा रस्‍त्‍यावर उभा असणारा ट्रक नं.एम.एच.-09-सी.ए.-385 हा योग्य ती खबरदारी न घेता व सिग्‍नल न लावता रात्रीचे वेळी उभा केलेला होता.  सदर अपघात प्रस्‍तुत ट्रकचे ड्रायव्हरचे चुकीमुळे झालेला असून प्रस्तुत ट्रक ड्रायव्‍हर विरुध्‍द पोलीसांनी गुन्‍हा नोंद केलेला आहे.  त्‍यामुळे प्रस्तुतचा अपघात हा अपघातग्रस्‍त तक्रारदाराचे कारमुळे/कारमध्‍ये मर्यादेपेक्षा/क्षमतेपेक्षा एक व्‍यक्‍ती जास्‍त घेतली म्‍हणून झालेला नाही ही बाब स्‍पष्‍ट झाली आहे.  तरीही वि.प.विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्‍लेम देणेस नाकारलेले आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने दि.22.01.2014 रोजी नोटीस देऊन तक्रारदाराची कार ताबेत घेणेसाठी वि.प.ना कळविले असता, वि.प.यांनी कार ताब्यात घेतली नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुत कार (नुकसानग्रस्‍त) कार आहे. त्‍या परिस्थितीत रक्‍कम रु.50,000/- या किंमतीस विकली आहे. सबब, तक्रारदारांचा विमा क्‍लेम नाकारुन व अपघातग्रस्‍त कार ताब्‍यात न घेतलेने सदर कार आहे त्‍या स्थितीत तक्रारदार यांना विकावी लागली व त्‍यामुळे तक्रारदाराचे प्रचंड नुकसान झाले.  सबब, वि.प.ने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे वि.प.कडून विमा क्‍लेम मिळणेसाठी सदर तक्रार अर्ज या मे.मंचात दाखल केला आहे.

 

3.          तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करणेत यावा. तक्रारदारांना वि.प. यांचेकडून नुकसानभरपाईची रक्‍कम रु.3,68,720/- वसुल होऊन मिळावी. प्रस्तुत नुकसानभरपाई रकमेवर द.सा.द.शे.12टक्‍के प्रमाणे व्याज तक्रारदाराला वि.प.यांनी अदा करावे. मानसिक त्रासापोटी तक्रारदारांना वि.प.यांनी रक्‍कम रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- अदा करणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.

 

4.          तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, वि.प.ने विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र, स्मार्ट कार्ड, विमा पॉलीसी, तक्रारदाराने वि.प. यांना दिलेली नोटीस, एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा, तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, मे.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्यायनिवाडे, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केले आहेत.

 

5.          वि.प.यांनी प्रस्‍तुत कामी म्‍हणणे, सर्व्‍हेअर यांचा सर्व्‍हे.रिपोर्ट, वगैरे कागदपत्रे या कामी वि.प.ने दाखल केली आहेत.

 

6.          वि.प.यांनी त्‍यांचे म्‍हणणे/ कैफीयतीमध्‍ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.ने तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविले आहेत.

  • तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्‍यातील मजकुर मान्‍य व कबुल नाही.
  • वि.प.ने चुकीचे कारण देऊन विमा क्‍लेम नाकारला आहे हे मान्‍य व कबुल नाही, तर वि.प.कंपनीने तक्रारदाराला दि.06.01.2014 रोजी पाठविले पत्रामध्‍ये दिलेली कारणे ही योग्य व कायदेशीर आहेत.  तसेच मोटर व्हेईकल अॅक्‍टमधील तरतुदीस धरुन आहेत.
  • अपघाताचा एफ.आय.आर.वरुन व सर्व्‍हे. रिपोर्टवरुन अपघातग्रस्‍त कारमध्‍ये मर्यादेपेक्षा जास्त म्‍हणजे 5 माणसांची मर्यादा असताना एकूण 6 लोक सदर अपघातग्रस्त कारमध्‍ये बसुन प्रवास करत होते हे स्‍पष्‍ट झाले आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने विमा पॉलीसी अटी व शर्तीचा भंग केलेला असलेने तक्रारदार प्रस्‍तुत कारचा विमा क्‍लेम मिळणेस पात्र नाहीत.
  • रस्‍त्‍यामध्‍ये उभ्‍या असलेल्‍या ट्रक नं.एम.एच.-09-सी.ए.-0385 चा ट्रक ड्रायव्‍हरचे चुकीमुळे व निष्‍काळजीपणामुळे अपघात झाला आहे.  तसेच प्रस्तुत ट्रक ड्रायव्हर विरुध्‍द गुन्‍हा नोंद केला आहे हे चुकीचे असून ट्रक ड्रायव्‍हर व तक्रारदाराचे कारचे ड्रायव्‍हर या दोघांविरुध्‍द पोलीसांनी गुन्हा नोंद केलेला आहे.  कारला तक्रारदाराचे कारचे ड्रायव्‍हरने त्‍याचे ताबेतील कार अतिशय भरधाव वेगात, निष्‍काळजीपणे असलेने अपघात झाला आहे.
  • तक्रारदाराने त्‍याचे कारच्‍या विमा कंपनीविरुध्‍द क्‍लेम मागितला आहे.  वा‍स्तविक तक्रारदाराला ट्रकचे विमा कंपनीकडून क्‍लेम मागणेसाठी संधी असूनही तक्रारदाराने ट्रकचे विमा कंपनीकडून कोणताही क्‍लेम मागणी केलेला नाही.
  • वि.प.विमा कंपनीने तक्रारदाराचा क्‍लेम योग्य कारणासाठीच नाकारलेला आहे.  त्‍यामुळे वि.प.यांनी तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही.
  • प्रस्तुत तक्रार अर्ज हा या मे.मंचात चालणेस पात्र नाही. त्‍यामुळे तो खर्चासह फेटाळणेस पात्र आहे.  सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.
  • प्रस्तुत वि.प.विमा कंपनी तक्रारदाराला कोणतीही विमा रक्‍कम देणे लागत नाही. तसेच नुकसानभरपाई देणेस वि.प.कंपनी जबाबदार नाही. सबब, वरील सर्व मुद्दे विचारात घेऊन तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशी विनंती वि.प.यांनी त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये केलेली आहे.

 

 

7.          वर नमुद तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

 

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प.हे नात्‍याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ?

होय

2

वि.प.विमा कंपनीने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?

होय

3

तक्रारदार वि.प.विमा कंपनीकडून विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमुद आदेशाप्रमाणे

 

 

विवेचन:-

8.     मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे मालकीची शेरवोलेट बीट कार नं.एम.एच.-09-बी.एक्‍स.-4073 चा विमा वि.प.विमा कंपनीकडे उतरविला होता. त्‍याचा पॉलीसी नं.81633162 असा असून कालावधी दि.24.10.2012 ते दि.23.10.2013 असा होता. ही बाब वि.प.ने मान्य केली आहे.  सबब, तक्रारदार व वि.प.हे नात्‍याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे निर्वीवादपणे सिध्‍द झाले आहे.  त्‍याचप्रमाणे, सदर तक्रारदाराचे कारला दि.18.08.2016 रोजी रस्त्‍यावर उभ्‍या असलेल्‍या ट्रक क्र.एम.एच.-09-सी.ए.-0385 ला धडकून झाला अपघातात प्रस्‍तुत तक्रारदाराचे नमुद कारचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.  प्रस्तुत ट्रक ड्रायव्‍हरने रात्रीचे वेळी इंडिकेटर न लावता ट्रॅफीकला अडथळा होईल अशा प्रकारे ट्रक रस्त्‍यावर उभा केला होता.  सदरचा ट्रक कार ड्रायव्‍हरला दिसून आला नसलेने कार सदरच्‍या उभ्‍या असलेल्‍या ट्रकवर जाऊन धडकली व अपघात झाला आहे.  सदर ट्रक ड्रायव्‍हर व कार ड्रायव्‍हर या दोघांचे विरुध्‍द पोलीसांनी गुन्‍हा नोंद केलेला आहे ही बाब एफ.आय.आर.वरुन स्पष्‍ट होते व अपघात झालेचे सिध्‍द होत आहे. प्रस्तुत अपघातानंतर तक्रारदाराने त्‍याचे कारचे अपघातात झालेली नुकसानभरपाई विमा क्‍लेम मिळणेसाठी वि.प.विमा कंपनीने विमा क्‍लेम सादर केला. परंतु विमा कंपनीने प्रस्‍तुत तक्रारदाराचा विमा क्‍लेम सदर कारमध्‍ये मर्यादेपेक्षा म्‍हणजेच 5 प्रवासी बसणेची मर्यादा असताना 6 प्रवासी बसले होते. 1 व्यक्‍ती जादा बसली होती या कारणास्‍तव तक्रारदाराने विमा पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग केला म्‍हणून तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारला आहे.  वास्‍तविक अपघाताचे कारण हे एक व्यक्‍ती कारमध्‍ये जास्‍त असलेने अपघात झाला आहे असे नाही.  तर ट्रक निष्‍काळजीपणे रस्त्‍यावर पार्क केला होता.  इंडिकेटर लावलेले नव्‍हते. तसेच कार ड्रायव्‍हरने अतिशय भरधाव वेगाने निष्‍काळजीपणाने कार चालवली या दोन्हीं कारणामुळे अपघात झालेचे एफ.आय.आर.वरुन स्‍पष्‍ट होते.

 

9.            तक्रारदाराने कारमध्‍ये एक प्रवाशी जादा घेतला म्‍हणून अपघात झाला असे दाखल कागदपत्रांवरुन सिध्‍द होत नाही. तसेच तक्रारदाराने कारमध्‍ये मर्यादेपेक्षा एक प्रवासी जादा बसविला म्‍हणून जाणुनबुजुन हेतुपुरस्‍सरपणे विमा पॉलीसीचे अटी व शर्थींचा भंग केलेला नाही अगर Fundamental Branch  केलेला नाही असे असतानाही वि.प.ने तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारला आहे.  प्रस्तुत विमा क्‍लेम नाकारलेनंतर तक्रारदाराने वि.प.यांना रजि.पोस्टाने वि.प. यांना कार ताब्‍यात घेणेविषयी कळविले होते. प्रस्तुत नोटीस वि.प.यांना मिळूनही वि.प.यांनी तक्रारदाराची अपघातग्रस्त कार ताब्‍यात घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने आहे त्‍या स्थितीत सदर अपघातग्रस्‍त कार रक्‍कम रु.50,000/- ला विकली.  त्‍यामुळे सदर रक्‍कम रु.50,000/- वजा जाता (सदर कारचे IDV रकमेतून) रक्‍कम रु.3,68,720/- एवढयां रकमेचे तक्रारदाराचे नुकसान झालेचे स्‍पष्‍ट होते व प्रस्तुत रक्‍कम वि.प. कंपनी तक्रारदाराला देणेस जबाबदार आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  तक्रारदाराने प्रस्तुत वि.प.विमा कपंनीकडे पॅकेज पॉलीसी म्‍हणजे (Full Insurance) उतरविला असून प्रस्‍तुत अपघातग्रस्त वाहनाचे झालेले नुकसान कव्‍हर केलेले आहे.  त्‍यामुळे सदर कामी तक्रारदाराचे अपघातग्रस्‍त वाहनाचे अपघातात झालेली नुकसानीची रक्‍कम देणेची सर्वस्‍वी जबाबदारी ही वि.प.विमा कंपीनचीच आहे.

 

10.        प्रस्तुत कामी आम्‍हीं मे.वरिष्‍ठ न्यायालयांचे खालील नमुद न्‍यायनिवाडे व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

 

Vol. I 1997 ACC 123 (Supreme Court)

प्रस्‍तुत केसलॉजमध्‍ये अपघातग्रस्‍त वाहनास सहा व्यक्‍तीं बसण्‍याची क्षमता असताना 9 व्यक्‍ती बसल्‍या होत्‍या. त्‍यामुळे विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारलेला होता.  प्रस्तुत न्‍यायनिवाडयाच्या परिच्‍छेद नं.6 मध्‍ये मे.सुप्रीम कोर्टाने म्‍हटले आहे की, सदर वाहनास जादा लोक बसले, त्‍यामुळे अपघात झालेला नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचा विमा क्‍लेम देणे आवश्‍यक आहे.

 

VOL. II 2010 CPJ 315 (NC)

Head Note:- Consumer Protection Act, 1986-Sec.-2(1)(g), 14(1)(d), 21(b)-Insurance-Accident claim-Surveyor appointed-Branch of policy condition-op. settled claim on non-standard basis on ground that at the time of accident there were extra-passengers sitting in it-complaint filed-District fora allowed complaint-Appeal Dismissed-State Commission held numbers of persons not relevant to the course of accident-Hence revision- Allowing few more persons should not disentitle Complainant’s compensation under policy- Order of fora upheld.

 

   त्‍याचप्रमाणे जर अपघातामध्‍ये वाहनाचे पुर्णपणे नुकसान झाले असेल (Total Loss) त्‍यावेळी वि.प.विमा कंपनीने आय.डी.व्ही. रक्‍कम तक्रारदाराला दिली पाहिजे.  याकरीता आम्‍हीं Vol. II 2009 CPJ 193 (NC) चा आधार घेतला आहे. 

 

 प्रस्तुत कामी वि.प.यांनी सर्व्हे.रिपोर्ट दाखल केला आहे.  परंतु सर्व्हेअरचे शपथपत्र दाखल केलेले नाही.  त्‍याचप्रमाणे सर्व्हे.रिपोर्ट हा फक्‍त मार्गदर्शक म्‍हणून उपयोगी पडतो.  त्‍यावर पुर्णपणे विसंबुन राहणे बंधनकारक नाही.  प्रस्तुत कामी दाखल स्पॉट पंचनामेवरुन अपघातग्रस्‍त वाहन कारचा पुर्णपणे नुकसान झालेचे स्पष्‍ट होते. याबाबतीत आम्‍हीं मे.वरिष्‍ठ न्यायालयाचे पुढील न्यायनिवाडा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

 

2009 ACJ 1729 Supreme Court of India at New Delhi.

 

New India assurance Co.Ltd.                                   

Versus

Pradeep Kumar                                                                     

 

Head Note:- Insurance Act 1936, Sec.64-UM.(2)-Motor Insurance-claim for damage to truck –surveyor’s report-truck fell in to Khud and was damaged-owner of the truck filed claim duly supported by original vouchers, bills and receipts for the parts purchased and the labour charges paid for repairs-Insurance Company appointed surveyours who estimated damages at Rs.63,771/- which was not accepted by owner-owner filed complaint and District Forum directed Insurance company to pay Rs.1,58,409/- which was confirmed by State Commission and National Commission –that loss assessed by approved surveyors was binding-whether the report of approved surveyor is binding upon the Insurance Company and insured-Held-No., it may be basis or foundation for settlement of claim loss assessed by consumer for a affirmed.

 

 

        सबब, प्रस्तुत कामी, तक्रारदार हे वि.प.विमा कंपनीकडून विमा क्लेमची रक्‍कम म्‍हणजेच I.D.V. रक्‍कम रु.4,18,720/- (अक्षरी रक्कम रुपये चार लाख अठरा हजार सातशे वीस मात्र) मधून कार आहे त्‍या स्थितीत विकलेली किंमत रक्‍कम रु.50,000/- (अक्षरी रक्कम रुपये पन्‍नास हजार मात्र) वजा जाता उर्वरीत रक्कम रु.3,68,720/- (अक्षरी रक्‍कम रुपये तीन लाख अडुसष्‍ट हजार सातशे वीस मात्र) विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्‍के व्याजासह वि.प.विमा कंपनीने तक्रारदारांना अदा करणे न्यायोचित होणार आहे.  तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दहा हजार मात्र) व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) ही वि.प.कडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, प्रस्तुत कामी, आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

आदेश

 

1     तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

2     वि.प.यांनी तक्रारदार यांना अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.3,68,720/- (अक्षरी रक्‍कम रुपये तीन लाख अडुसष्‍ट हजार सातशे वीस मात्र) अदा करावेत. प्रस्तुत रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9टक्‍के व्याजाची रक्‍कम वि.प.यांनी तक्रारदाराला अदा करावी.

3     मानसिक त्रासापोटी वि.प.यांनी तक्रारदाराला रक्‍कम रु.10,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दहा हजार मात्र) अदा करावेत.

4     अर्जाचे खर्चापोटी वि.प.यांनी तक्रारदाराला रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.

5     वरील सर्व आदेशांची पूर्तता वि.प.यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

6     विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.

7     आदेशाच्‍या सत्‍यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात. 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.