2. तक्रारकर्त्याच्या दि.09.11.2010 च्या पत्राला विरुध्द पक्षाने दि.24.11.2010 रोजी उत्तर पाठविले व त्या उत्तरात त्यांनी तक्रारकर्त्याची रक्कम त्याच्या खात्यात जमा करण्यासाठी नकार दिला. विरुध्द पक्षांना तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातील रक्कम विरुध्द पक्षाच्या दुस-या ग्राहकाच्या खात्यात स्थानांतरीत झाल्याचे माहित असूनही त्यांनी सदरर्हू रक्कम त्या ग्राहकाकडून वसुल करण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला रु.37,000/- चे नुकसान सहन करावे लागले, या संबंधी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास वेळोवेळी पत्र व्यवहार करुन व ई-मेल व्दारे कळवुनही विरुध्द पक्षाने ज्यांच्या खात्यात रक्कम स्थानांतरीत झाली होती त्यांच्याकडून वसून करण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही. सदरर्हू रक्कम तक्रारकर्त्याचे खात्यात जमा करण्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.19.09.2011 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली. नोटीस मिळूनही विरुध्द पक्षाने कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याचे विरुध्द सदर तक्रार दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्षास मंचामार्फत नोटीस पाठविण्यांत आली ती नोटीस मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष हजर झाले व त्यांनी आपले लेखीउत्तर सादर केले व तक्रारकर्त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी एवढेच नव्हेतर तक्रारकर्ता त्यांचा खातेदार आहे हे सुध्दा नाकबुल केले आहे.
4. सतक्रारकर्ता व विरुध्द पक्षांचा वकीलांमार्फत केलेला युक्तिवाद, तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले, त्यावरुन मंचासमक्ष विचारार्थ खालिल मुद्दे उपस्थित होतात...
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय
ब) विरुध्द पक्षाने त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे काय ? होय
क) आदेश ? तक्रार अंशतः मंजूर.
- // कारणमिमांसा // -
5. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीत तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्षाकडे बचत खाते आहे हे त्याने दाखल केलेल्या पत्रव्यवहार व इतर कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने दाखल केलल्या दस्तावेज क्र.6 वरुन जे विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास पाठविलेले जे पत्र आहे त्यामध्ये स्पष्ट करण्यांत आले आहे की, तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्षाकडे बचत खाते होते व तक्रारकर्त्याचे हे बचत खाते पुणे येथे होते व त्यानंतर ते नागपूरला स्थानांतरीत करण्यांत आले यावरुन तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्षाकडे बचत खाते असून तो त्यांचा ग्राहक आहे हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र. 1 वर त्याने त्याला आलेला ई-मेल दाखल केला आहे व त्यावर विरुध्द पक्षाकडून तो आल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येते. सदरर्हू ई-मेल हा बनावट किंवा कृत्रिम असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला खोटा किंवा बनावट ई-मेलपासून सावध राहण्यासाठी कुठेही कळविले नाही. किंवा तक्रारकर्त्याने अश्या ई-मेलवर कोणतीही माहिती पाठवु नये असे कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही त्यामुळे तो ई-मेल बनावट किंवा खोटा होता हे ठरविणे प्रथम दर्शनी लक्षात येत नाही. तक्रारकर्त्याच्या विरुध्द पक्षाकडे असलेल्या बचत खात्यातून दि.30.10.2010 रोजी आलेल्या ई-मेल आयडी मध्ये तक्रारकर्त्याने माहिती भरुन पाठविली आणि त्यानंतर दि.04.11.2010 रोजी त्याला भ्रमणध्वनी वरून विरुध्द पक्षाच्या ग्राहक सेवेतून त्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करण्याकरता दुरध्वनी करण्यांत आलेला होता. तो दुरध्वनी क्रमांक विरुध्द पक्षाने नाकारलेला नाही. तक्रारकर्त्याने झालेल्या बेकायदेशिर रकमेच्या स्थानांतरणाबद्दल गिट्टीखदान पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली असून त्या तक्रारीची प्रत तक्रारीसोबत दाखल केलेली आहे, तसेच त्यासोबत विरुध्द पक्षास पाठविलेल्या नोटीसची प्रतही दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या दि.09.11.2010 च्या पत्राला विरुध्द पक्षाने दि.24.11.2010 रोजी उत्तर पाठविले व तक्रारकर्त्याच्या खात्यावरुन दुस-या खात्यात रक्कम स्थानांतरीत झाल्याचे मान्य केलेले आहे. परंतु सदरर्हू स्थानांतरण थांबविणे हे त्यांच्या हातात नव्हते असे म्हटले आहे, कारण सदर स्थानांतरण हे इंटरनेट व्दारे झालेले असून त्यावर बँकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे विरुध्द पक्षाने म्हटले आहे. परंतु तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत रकमेचे स्थानांतरण होत असतांना तक्रारकर्त्याला दुरध्वनीव्दारे सदरर्हू स्थानांतरण हे संशयास्पद असल्याची माहिती दिली होती व सदरर्हू रक्कम कोणाच्या खात्यात स्थानांतरीत झालेली आहे हे सुध्दा कळविण्याचे म्हटले आहे. यावरुन सदरर्हू रक्कम ज्यांच्या खात्यात चुकीने स्थानांतरीत किंवा बेकायदेशिररित्या स्थानांतरीत झालेली आहे ती तक्रारकर्त्याचे बचत खात्यात वळती करण्याचे काम विरुध्द पक्षांचे होते असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
6. तक्रारकर्त्याच्या बचत खात्यात असलेल्या रकमेची संपूर्ण जबाबदारी ही विरुध्द पक्षाकडे आहे व नेट बँकींगव्दारा होत असलेल्या व्यवहाराची पूर्ण खात्री झाल्याशिवाय किंवा त्यासंबंधी तक्रारकर्त्याची संमती घेतल्याशिवाय सदर व्यवहार विरुध्द पक्षाने त्यांना तो व्यवहार संशयास्पद दिसत असुनही सदरर्हू रक्कम स्थानांतरीत न करणे ही विरुध्द पक्षांचे सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.
7. विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरासोबत कोणतेही कागदपत्र तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढण्याकरता दाखल केलेले नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास पाठविलेल्या दि.24.011.2010 च्या पत्रामध्ये तक्रारकर्त्याला पाठविण्यांत आलेला ई-मेल हा खोटा व फसवा होता असे म्हटले आहे. परंतु त्यासंबंधी कोणतीही पूर्वसुचना किंवा नोटीस तक्रारकर्त्याला देण्यांत आलेली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यातून झालेल्या रकमेच्या स्थानांतरणाकरता विरुध्द पक्षाने निष्काजीपणा दाखविल्याचे लक्षात येते. म्हणून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचे आमच्या लक्षात येते, करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
2. विरुध्द पक्षाने तक्ररकर्त्याचे बचत खात्यातून स्थानांतरीत झालेली रक्कम रु.37,000/- दि.04.11.2010 पासुन 9% द.सा.द.शे. दराने सदर रक्कम त्याचे खात्यात जमा होईपर्यंत व्याजासह जमा करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5. तक्रारकर्त्यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.