Maharashtra

Osmanabad

CC/14/187

Umesh Gulab Rathod - Complainant(s)

Versus

Branch Manager HDFC Bank Ltd. - Opp.Party(s)

R.S.Kasbe

02 May 2016

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/14/187
 
1. Umesh Gulab Rathod
R/o Deepak Nagar Tanda Tuljapur Ta. Tuljapur Dist.Osmanabad
Osmanabad
Maharashta
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager HDFC Bank Ltd.
Sun Plaza Shop no. 416/11, Licki Chowk Muraraji Peth Solapur4113007
Solapur
Maharashtra
2. manager Jai Malhar Motors
Saswad Road, bharat petrol pumps, Ta. purandar Dist.pune
pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ग्राहक तक्रार  क्र.  : 187/2014

                                                                                     दाखल तारीख    : 18/12/2014

                                          निकाल तारीख   : 02/05/2016

                                                                                    कालावधी: 01 वर्षे 04 महिने 14 दिवस                 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.   उमेश गुलाब राठोड,

     वय - 27 वर्षे, धंदा – व्‍यापार,

     रा.दिपकनगर तांडा, तुळजापूर,

     ता.तुळजापूर, जि. उस्‍मानाबाद.                   ....तक्रारदार

                          

                            वि  रु  ध्‍द

1.    शाखा व्‍यवस्‍थापक,

      एचडीएफसी बँक लि.

सन प्‍लाझा, शॉप क्र.8516/11,

लकी चौक, मुरारजी पेठ, सोलापूर-413007.

  

2)    व्‍यवस्‍थापक,

जय मल्‍हार मोटर्स,

जेरी सासवड रोड, भारत पेट्रोल पंपासमोर,

लवठाळेश्‍वर, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे.

 

3)    शाखा व्‍यवस्‍थापक,

एचडीएफसी बँक लि.

समता कॉलनी, उस्‍मानाबाद.                          ..विरुध्‍द  पक्षकार

 

कोरम :                  1)  मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                                    2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्‍या.

                  3)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍य.

 

                                   तक्रारदारांतर्फे विधीज्ञ   :  श्री.आर.ए.कसबे.

                    विरुध्‍द पक्षकारा क्र.1 व 3 तर्फे विधीज्ञ : श्री.व्हि.डी.कुलकर्णी.

                    विरुध्‍द पक्षकारा क्र.2 विरुध्‍द एकतर्फा आदेश पारित.

                        न्‍यायनिर्णय

मा. अध्‍यक्ष श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी यांचे व्‍दारा:

      तक्रारकर्ता (तक) याने विरुध्‍द पक्षकार (विप) क्र.2 कडून ट्रॅक्‍टर विकत घेतला व त्‍यासाठी विप क्र. 1 व 3 कडून वित्‍त सहाय्य घेतले, मात्र विप यांनी ट्रॅक्‍टरचे पासिंग करुन दिले नाही. उलट ट्रॅक्‍टर ओढून नेण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे म्‍हणून तक ने हि तक्रार दिलेली आहे.

 

     तक चे तक्रारीतील कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे आहे.

1)   तक हा दिपकनगर तांडा तुळजापूरचा व्‍यापारी आहे. विप क्र.2 जेजुरी जिल्‍हा पुणे येथील ट्रॅक्‍टर विक्रेता आहे. विप क्र.1 ही सोलापूर येथील बँक असून तिची उस्‍मानाबाद शाखा विप क्र.3 हिला तक ने नंतर पक्षकार म्हणून सामील केलेले आहे. तक ने विप क्र. 1 व 3 यांचेकडून वित्‍त सहाय्य घेऊन विप क्र.2 कडून पॉवर ट्रॅक 4445 हे ट्रॅक्‍टर विकत घेतले. कर्जाची परतफेड मासि‍क हप्‍त्‍यामध्‍ये करण्‍याची होती. ट्रॅक्‍टरचे पासिंग व इन्‍शुरंन्‍स विप यांनी करुन देण्‍याचे होते. विप यांनी गाडीची कागदपत्रे न दिल्‍यामुळे आर.टी.ओ. पासिंग होऊ शकलेले नाही. विप क्र.1 व 3 यांनी करारातील शर्तीचे पालन केलले नाही त्‍यामुळे तक ला त्रास झाला व आर्थीक नुकसानही झाले. विप यांनी खोटी आश्‍वासने देऊन तक ला कर्ज घेण्‍यास भाग पाडले व हप्‍ते भरुन घेऊन तक चे नुकसान केलेले आहे व फसवणूक केलेली आहे. दि.28/10/2014 रोजी विप यांनी तक चे घरुन ट्रॅक्‍टर ओढून नेण्‍याची धमकी दिली आहे. पासिंग अभावी तक ला ट्रॅक्‍टरचे काम करता येत नाही व उत्‍पन्‍नास मुकावे लागले आहे. त्‍यामुळे विप यांनी तक चे पासिंग करुन द्यावे नुकसान भरपाई रु.1,00,000/- द्यावी तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- द्यावे. म्हणून तक ने ही तक्रार दि.26/09/2014 रोजी दाखल केलेली आहे.

 

2)  तक्रारी सोबत तक यानी दि.05/07/2014 ची नोटीस, विप क्र.1 व 3 ची पावती दि.28/06/2013 ची रु.39,600/- ची, एच.डी.एफ.सी. इरगो कडील इंन्‍शूरंन्‍स पॉलिसी, आणखी दोन बिन तारखेच्‍या पावत्‍या, दि.07/05/2014 ची, विप ची नोटीस, दि.28/01/2013 ची, रु.1,30,000/- ची पावती. विप क्र.2 कडे रक्‍कम भरल्‍याची दि.25/06/2013 ची विप क्र. 2 ची पावती, रु.50,000/- भरल्‍याची, दि.05/02/2013 ची पावती विप क्र.2 कडे रु.100,000/- भरल्‍याची बिन तारखेची पावती, रु.1,30,000/- विप क्र.2 कडे भरल्‍याची, टॅक्‍स इन्‍व्‍हाईस विप क्र.2 चे इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

 

3)   विप क्र.2 नोटीस बजावूनही हजर न झाल्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍द तक्रार एकतर्फा चालली आहे.

4)    विप क्र. 1 व 3 यांनी दि.01/07/2015 रोजी आपले म्‍हणणे दाखल केलेले आहे. तक ने या विप कडून वित्‍त सहाय्य घेतले हे मान्‍य आहे. या विप ने तक ला आर.सी. बुक देण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही. विमा कव्‍हरची नोट हजर केल्‍यानंतर विप ने कर्ज रक्‍कम वितरीत केली. तक ने नियमीतपणे कर्ज फेडल्‍याचे कबूल केले होते मात्र नियमीतपणे कर्ज फेड केलेली नाही. कर्ज थकीत झाले म्‍हणून विप ने तक ला दि.07/05/2014 रोजी नोटीस पाठवलेली आहे. विप ने लवाद अधिकारी पुणे यांचेकडे प्रकरण दाखल केलेले आहे व त्‍यांनी या प्रकरणी तक विरुध्‍द आदेश दिलेला आहे. त्‍यातुन सुटका व्‍हावी म्‍हणून तक ने हि तक्रार दाखल केली ती रद्द व्‍हावी व या विप ला नुकसान भरपाई रु.25,000/- मिळावी अशी मागणी केलेली आहे.

 

5)    तक ची तक्रार त्‍याने दिलेली कागदपत्रे व विप चे म्‍हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्‍यांची उत्‍तरे आम्‍ही त्‍यांचे समोर खाली दिलेल्‍या कारणांसाठी लिहिली आहेत.

        मुद्दा                                       उत्‍तर

1)  तक हा विप चा ग्राहक आहे काय ?                            होय.

2)  विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ?                 विप क्र.2 पुरते होय. 

3)  तक अनुतोषास पात्र आहे काय ?                             होय.

4)  आदेश कोणता?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

                             कारणमिमांसा

मुद्दा क्र.1 :

6)    तक ने विप क्र.2 कडून ट्रॅक्‍टर विकत घेतले त्‍यासाठी विप क्र.1 व 3 कडून वित्‍त सहाय्य घेतले याबद्दल वाद नाही. विप क्र.1 व 3 ने म्‍हंटले आहे की तक ने ट्रॅक्‍टर हे व्‍यापारी कारणांसाठी घेतले मात्र त्‍याबद्दल खुलासा केलेला नाही. ट्रॅक्‍टर हे मुख्‍यत: शेती कामासाठी घेतलेले असते. जरी तक ने आपला धंदा व्‍यापार दिलेला असला तरीही व्‍यापारासाठी ट्रॅक्टरचा कसा वापर तक करणार होता याचा खुलासा विप ने करणे जरुर होते. तसेच तक स्‍वत:च्‍या उपजिवीकेसाठी ट्रॅक्‍टरचा वापर करु शकतो अशा परिस्थितीत तक हा विप चा ग्राहक होऊ शकतो म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारा‍र्थी देतो.

 

मुद्दा क्र. 2 व 3

7)   तक ने विप क्र. 1 व 3 कडून किती कर्ज घेतले याचा उल्‍लेख तक्रारीत दिलेला नाही. तक्रारीमध्‍ये ट्रॅक्टरची किंमती नमूद नाही. ट्रॅक्‍टर विकत घेतल्‍याची तारीख नमूद नाही. तक ने विप कडे रकमा भरल्‍याच्‍या पावत्‍या हजर केल्‍या आहेत. त्‍या जानेवारी 2013 पासून जुन 2013 पर्यंतच्‍या आहेत. म्‍हणजेच व्‍यवहार त्‍या दरम्‍यान झालेला आहे. टॅक्‍स इन्‍व्‍हाईसवर तारीख टाकण्‍यात आलेली नाही. टॅक्‍स इन्‍व्‍हाईसवर एकूण रक्‍कम रु.7,51,999/- दाखवलेली आहे. विप क्र.1 व 3 यांनी कराराची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्‍ये ट्रॅक्‍टरची किंमत रु.5,91,618/- व इन्‍शुरंन्‍स रु.9,838/- दाखवले. कर्जाची रक्‍कम रु.3,66,279/- दाखवलेली आहे. खाते उता-याप्रमाणे दि.28/03/2013 रोजी कर्जाचे वाटप करण्‍यात आले. त्‍या दिवशी येणे रु.3,44,936/- दाखवले आहे.

 

8)    विप क्र.2 ने सदर कामी कोणताही बचाव सादर केलेला नाही. जे टॅक्‍स इन्‍व्‍हाईस विप क्र.2 चे विप क्र. 1 व 3 कडे दिले ते रु.6,00,000/- चे आहे. तक ने हजर केल्‍याप्रमाणे इन्‍शुरंन्‍स रु.5,13,000/- किंमतीच्‍या ट्रॅक्‍टरचा काढला असून त्‍याची तारीख दि.24/03/2013 दिसून येते व प्रिमियम रु.6,525/- भरल्‍याचे दिसून येते. तक ने हजर केलेले टॅक्‍स इन्‍व्‍हाईस प्रमाणे ट्रॅक्‍टरची किंमत रु.7,15,999/- होती. अॅक्‍सेसरीज रु.22,500/- च्‍या होत्‍या आर.टी.ओ. टॅक्‍स व इन्‍शुरंन्‍स बद्दल रु.13,500/- दाखवलेले आहेत. अशी एकूण रक्‍कम रु.7,51,999/- दाखवली आहे. विप क्र. 1 व 3 कडील टॅक्‍स इन्‍व्‍हाईस प्रमाणे किंमत रु.6,05,000/- आहे.

9)   विप क्र.1 व 3 कडील अॅग्रीमेंटची तारीख 04/03/2013 अशी आहे. कर्ज 36 महिन्‍यात ति‍माही हप्‍त्‍यात फेडायचे होते. हप्‍ता रु.39,596/- होता. व्‍याजाचा दर द.सा.द.शे.17 होता. दि.31/05/2015 चे रु.229,205/- डेबीट बॅलन्‍स दाखवला आहे. तक ने तिन हप्‍ते कॅश मध्‍ये भरल्‍याचे पावत्‍याप्रमाणे व खाते उता-याप्रमाणे दिसते. त्‍यानंतर हप्‍ते भरल्‍याचे दिसत नाही. तक ने विप क्र.1 व 3 चे कर्ज न फेडल्यामुळे त्‍यांचे विरुध्‍द तक्रार करण्‍यास तक ला वाव नाही. कर्ज घेण्‍यास भाग पाडले हे तक चे म्‍हणणे हस्‍यास्‍पद आहे.

10)    विप क्र.2 विरुध्‍द ची तक्रार पाहता तक चे म्‍हणणे आहे की त्‍याने ट्रॅक्‍टर पासिंग करुन दिलेले नाही. टॅक्‍स इन्‍व्‍हाईस प्रमाणे इन्‍शुरंन्‍स आर.टी.ओ. टॅक्‍सपोटी विप क्र. 2 ने रक्‍कम घेतल्‍याचे दिसते. पावत्‍याप्रमाणे एकूण रु. 5,24,936/- + इन्‍शुरंन्‍स वगैरे बॅंक स्‍टेटमेंट प्रमाणे विप क्र.2 ला मिळालेले आहे. मात्र ट्रॅक्‍टर पासिंग झाले नाही हे उघड आहे. विप क्र. 2 ने या कामी कोणताही बचाव सादर केलेला नाही. ट्रॅक्‍टर पासिंगचे पैसे घेऊन विप क्र.2 ने ट्रॅक्‍टर पासिंग करुन दिलेले नाही व सेवेत त्रुटी केली. म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर विप क्र.2 चे विरुध्‍द होकाराथी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.

                            आदेश

तक ची तक्रार विप क्र. 1 व 3 विरुध्‍द रद्द करण्‍यात येते.

1)  तक ची तक्रार विप क्र.2 विरुध्‍द खालीलप्रमाणे मंजूर करण्‍यात येते.

2)  विप क्र.2 ने तक च्‍या ट्रॅक्‍टरचे रजिष्‍ट्रेशन एक महिन्‍याच्‍या आत करुन द्यावे.

3)  विप क्र.2 ने तक ला या तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्‍त) द्यावेत.

4)  उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष यांनी आदेश दिल्‍या तारखेपासुन तीस     दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,      सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न      केल्‍यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.

5)    उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

6)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराने परत न्‍यावेत.  

 

   (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

 

  (श्री.मुकुंद.बी.सस्‍ते)                              (श्रीमती विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                                    सदस्‍य 

                जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.

 

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.