निकाल
दिनांक- 03.12.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार वृंदावणी अंबादास शेंडगे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत सेवा देण्यास नकार देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू मोटार अपघातामध्ये झाला. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 विमा कंपनीकडे शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व दस्त दाव्या सोबत पाठविले. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्लेम कोणत्याही संयूक्तीक कारणाशिवाय नाकारला आहे. सबब, या मंचाचे मत की, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटीठेवली आहे. तक्रारदार हया शेतकरी जनता वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करावी लागली व त्याकामी खर्च करावा लागला. त्याबददल झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड