Maharashtra

Nagpur

CC/11/800

Parthsarthi Prakrutiranjan Sarkar - Complainant(s)

Versus

Branch Manager, Central Bank of India - Opp.Party(s)

Adv.P.S.Sahare

20 Jun 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/800
 
1. Parthsarthi Prakrutiranjan Sarkar
20, Surana Layout, Anant Nagar,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Central Bank of India
Oriental Building, Ground Floor, Kamptee Road,
Nagpur 440001
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

श्री. अमोघ कलोती, अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.

 

 

 

- आदेश -

 (पारित दिनांक 20/06/2013)

 

1.           वि.प. बँकेच्‍या सेवेतील कमतरतेबाबत नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी, तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे.

 

2.          तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे -

तक्रारकर्ता हा चार्टर्ड अकाऊंटंट असून, आर्थिक सल्‍लागार म्‍हणून व्‍यवसाय करतो. तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचे वि.प.बँकेमध्‍ये गेल्‍या 20 वर्षापासून 1195441387  क्रमांकाचे बचत खाते आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या विनंती अर्जानुसार दि.30.12.2010 रोजी सदर खाते तक्रारकर्ता व त्‍यांच्‍या पत्‍नीच्‍या नावाने संयुक्‍त खाते बनले व त्‍याची नोंद बँकेच्‍या खाते वहीत करण्‍यात आली. यानंतर तक्रारकर्त्‍याला सदर संयुक्‍त खात्‍याची 20 धनादेशाची पुस्तिका देण्‍यात आली.

 

दि.05.10.2011 रोजी तक्रारकर्त्‍याने ओम एंटरप्रायजेस ह्यांना सदर संयुक्‍त खात्‍यातून रु.17,500/- चा धनादेश क्र. 275602 दिला. परंतू, वटविण्‍याकरीता सादर केला असता, तो धनादेश तक्रारकर्त्‍याची सही जुळत नसल्‍याचे कारणावरुन न वटविता परत आला. तक्रारकर्त्‍याचा धनादेश अनादरीत झाल्‍यामुळे त्‍याचेकडून रु.250/- दंडापोटी आकारण्‍यात आले.

 

दि.31.12.2010 रोजी तक्रारकर्त्‍याने आपल्‍या वकिलांना दिलेला रु.1,500/- चा धनादेशदेखील तक्रारकर्त्‍याची सही जुळत नसल्‍याचे कारणाने परत आला. वि.प.ने धनादेश अनादरीत झाल्‍याबद्दल रु.250/- तक्रारकर्त्‍याचे खात्‍यातून वजा केले.

 

06.10.2011 रोजी तक्रारकर्त्‍याने नोमॅड हॉलीडेज ह्यांना दिलेला 2,980/- चा धनादेशसुध्‍दा त्‍याच कारणाने अनादरीत झाला व याबाबत देखील तक्रारकर्त्‍याचे खात्‍यातून रु.250/- वि.प.ने वजा केले. वि.प.च्‍या वागण्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रास झाला. तसेच त्‍याच्‍या प्रतिमेलादेखील तडा गेला. त्‍यामुळे व्‍यथीत होऊन तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.

 

2.          मंचाने जारी केलेल्‍या नोटीसची बजावणी झाल्‍यानंतर वि.प.ने प्रकरणात हजर होऊन लेखी उत्‍तर दाखल केले. तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचे वि.प.कडे सदर बचत खाते असल्‍याचे व तक्रारकर्त्‍याच्‍या अर्जानुसार सदर खाते संयुक्‍त झाल्‍याचे कथन वि.प.ने नाकारले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने दिलेल धनादेश त्‍याची सही जुळत नाही या कारणास्‍तव परत करण्‍यात आल्‍याची बाब व तक्रारकर्त्‍याकडून धनादेश अनादरीत झाल्‍याबाबत प्रत्‍येक वेळी दंड वसुल केल्‍याची बाबही वि.प.ने नाकारली नाही. धनादेश अनादरीत झाल्‍याबाबत आकारण्‍यात आलेला दंड नियमानुसार असल्‍याचे सांगून, वि.प.ने तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.

 

3.          तक्रारकर्ता आणि वि.प.ने लेखी युक्‍तीवाद अभिलेखावर दाखल केला. तसेच त्‍यांचे वकिलांचा तोंडी युक्‍तीवादही ऐकण्‍यात आला.


4.          प्रस्‍तुत प्रकरणात मंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले आहे.

 

मुद्दे                               निष्‍कर्ष

1) वि.प.च्‍या सेवेतील कमतरता सिध्‍द होते काय?      होय.

2) आदेश.                                     अंतिम आदेशाप्रमाणे.

 

-कारणमिमांसा-

5.          तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचे वि.प.कडे असलेले बचत खाते क्र. 1195441387 हे तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन दि.30.12.2010 रोजी संयुक्‍त खाते झाल्‍याबाबत कोणताही वाद नाही. तसेच सदर खाते संयुक्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला वि.प.तर्फे धनादेश पुस्तिका जारी करण्‍यात आल्‍याबाबत सुध्‍दा कोणताही वाद नाही.

 

6.          तक्रारकर्त्‍यांने दिलेला धनादेश त्‍याची सही जुळत नसल्‍याचे कारणावरुन वि.प.ने एकूण 3 वेळा अनादरीत केल्‍याबाबत आणि प्रत्‍येक वेळी धनादेश अनादरीत झाल्‍याबाबत रक्‍कम रु.250/- तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून वि.प.ने वजा केल्‍याबाबत कोणताही वाद नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या धनादेशावरील सह्या जुळत नसल्‍याचे कारणावरुन त्‍याने जारी केलेला धनादेश वि.प.ने अनादरीत केला आहे. सदर अनादरीत झालेल्‍या 3 धनादेशांची व बँक मेमोची प्रत तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याची वि.प.कडे उपलब्‍ध असलेली नमुना स्‍वाक्षरी धनादेशावरील स्‍वाक्षरीशी जुळत नसल्‍याने धनादेश अनादरीत केल्‍याचे वि.प.ने म्‍हटले आहे. परंतू, वि.प.ने त्‍यांचेकडे उपलब्‍ध असलेली तक्रारकर्त्‍याची नमुना स्‍वाक्षरीची प्रत मंचाचे अभिलेखावर दाखल केलेली नाही. उलटपक्षी, तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचे खाते संयुक्‍त झाल्‍याबाबत वि.प.ने जारी केलेल्‍या पासबुकची प्रत, तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 1 व 2 अन्‍वये अभिलेखावर दाखल केले आहे. यावरुन सदरचे खाते संयुक्‍त झाल्‍याचे दिसून येते.

 

7.          वि.प.ने तक्रारकर्त्‍याचे धनादेश अनादरीत करण्‍याबाबत लेखी जवाबात नमुद केलेले कारण याठिकाणी विचारात घेणे महत्‍वाचे आहे. वि.प.ने लेखी जवाबाबत असे म्‍हटले आहे की, चेक तपासणा-या कर्मचा-यास थोडीही शंका आली तर तो  errors on the side of caution  सावधानतेच्‍या बाजूने चूक करतो.

 

8.          तक्रारकर्त्‍याचा धनादेश वि.प.ने चुकीने अनादरीत केला असून, ही चूक संबंधित कर्मचा-यास शंका आल्‍याने झाल्‍याचे सदर कथनावरुन दिसून येते. वस्‍तुतः तक्रारकर्त्‍याच्‍या सहीबाबत शंका आल्‍यानंतर त्‍याबाबत शंका समाधान करुन घेणे वि.प.चे कर्तव्‍य होते. परंतू असे न करता वि.प.ने तक्रारकर्त्‍याचा धनादेश केवळ एकदा नव्‍हे तर, तब्‍बल 3 वेळा एकाच कारणावरुन अनादरीत केला. इतकेच नव्‍हे तर, त्‍याबाबत प्रत्‍येक वेळी रु.250/- त्‍याच्‍या खात्‍यातून वजा केला.

 

9.          प्राप्‍त परिस्थितीत वि.प.च्‍या सेवेतील कमतरता सिध्‍द होते असे मंचाचे मत आहे. सततचे धनादेश अनादरीत झाल्‍याने, तक्रारकर्त्‍याला शारिरीक, मानसिक त्रास व मनस्‍ताप होणे स्‍वाभाविक आहे. करिता आदेश पुढीलप्रमाणे.

 

-आदेश-

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)    वि.प.ला निर्देश देण्‍यात येतो की, तक्रारकर्त्‍याकडून कपात केलेली रक्‍कम एकूण रु.750/- तक्रारकर्त्‍याच्‍या सदर संयुक्‍त खात्‍यात जमा करावी.

3)    तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल रु.5,000/- व तक्रारीच्‍या       खर्चाबाबत रु.2,000/- वि.प.ने द्यावे.

4)    सदर आदेशाची पूर्तता वि.प.ने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे       आत करावी.

5)    आदेशाची प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.