सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 36/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि. 06/07/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.27/07/2015
श्री महादेव रमण वेरणेकर
वय 34 वर्षे, व्यवसाय – शेती
रा.उभादांडा (कांबळीवाडी), ता.वेंगुर्ला,
जिल्हा - सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) शाखाधिकारी,
बिर्ला सनलाईफ इंश्युरंस, सावंतवाडी,
स्टेट बँक ऑफ इंडियाचे वर
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
2) बिर्ला सनलाईफ इंश्युरंस कंपनी लि.
रजिस्टर्ड ऑफिस, वन इंडिया बुल्स सेंटर,
टॉवर 1, 16 वा मजला, ज्युपिटर मिल कंपाऊंड,
841, सेनापती बापट मार्ग, एल्फिस्टन रोड,
मुंबई- 400 013 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष- गैरहजर
आदेश नि.1 वर
(दि. 27/07/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे विमा पॉलिसी उतरविलेली होती. परंतु तक्रारदार त्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे पुढील वार्षिक विमा हप्ता भरु शकत नसल्याने विरुध्द पक्षाकडे जमा असलेली रक्कम परत मिळणेसाठी सदरचे प्रकरण दाखल करण्यात आलेले आहे.
- सदरचे प्रकरण दि.10/07/2015 रोजी अॅडमिशन हिअरिंगसाठी ठेवणेत आले होते. त्याचदिवशी तक्रारदार यांनी पुरसीस दाखल करुन विरुध्द पक्ष यांचेकडे आवश्यक कागदपत्रे दाखल करणेसाठी 15 दिवसांचा अवधी मिळणेसाठी विनंती केली. त्यास अनुसरुन सदरचे प्रकरणे दि.30/07/2015 रोजी नियमीत स्वीकृतीसाठी ठेवण्यात आलेले होते.
- तथापि तक्रारदार यांनी आज दि.27/07/2015 रोजी प्रकरण बोर्डवर घेणेबाबत अर्ज दाखल केला तसेच विरुध्द पक्ष यांचेकडून विमा पॉलिसीमध्ये गुंतविलेली रक्कम मिळाली असून सदर प्रकरण निकाली काढणेबाबत विनंती केलेली आहे. सदरच्या पुरसीसला अनुलक्षून प्रकरण निकाली काढणेत येते.
आदेश
- तक्रारदाराने दिलेल्या पुरसीसला अनुलक्षून प्रकरण निकाली काढण्यात येते.
- खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 27/07/2015
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.