Maharashtra

Bhandara

CC/19/36

RAMAJI B.MEHAR - Complainant(s)

Versus

BRANCH MANAGER BHARTIYA JIWAN VIMA - Opp.Party(s)

ADV.P.K.S.MISHRA

31 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/36
( Date of Filing : 06 Feb 2019 )
 
1. RAMAJI B.MEHAR
PULE COLONY BOJAPUR TAH DIST BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BRANCH MANAGER BHARTIYA JIWAN VIMA
BHARATIYA JIWAN VIMA NIGAM BRANCH BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 31 Mar 2021
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.प्रभारी, अध्‍यक्ष )

                                                                           (पारीत दिनांक-31 मार्च, 2021)

   

01.  तक्रारकर्तीने  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी विरुध्‍द तिचे पतीला अपघातामुळे कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आल्‍याने देय विमा रक्‍कम  आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्तीचा पती श्री रामाजी बुध्‍दीराम मेहर हा दिनांक-28 फेब्रुवारी, 2015 रोजी सकाळी 08.00 वाजताचे दरम्‍यान नागपेर रोड वरुन नॅशनल हाय-वे  क्रं 6, भोजापूर वरुन स्‍वतःची मोटरसायकल क्रं-MH-35-E-9176 ने जात असताना त्‍यास ट्रक क्रं- MH-31-CB -9858 नी  धडक मारल्‍यामुळे अपघात होऊन तो गंभिररित्‍या जखमी झाला. सदर अपघाता मध्‍ये त्‍याच्‍या डोक्‍यावर, पायाला, छातीवर व ईतरत्र ब-याचश्‍या जखमा झाल्‍यात, त्‍याला त्‍याच अवस्‍थेत नाकाडे हॉस्‍पीटल भंडारा येथे भरती करण्‍यात आले व तेथून पुढे त्‍याला शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथे वैद्दकीय उपचारार्थ भरती करण्‍यात आले होते. तेथे काही दिवस भरती राहिल्‍या नंतर त्‍याचेवर पुन्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे वैद्दकीय उपचार करण्‍यात आलेत. त्‍याचे  80% पेक्षा जास्‍त शारिरीक नुकसान झाल्‍याने सध्‍या स्थितीत तो घरात कोणतेही काम न करता निकामी पडलेला आहे. सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथून त्‍यास  तात्‍पुरते शारिरीक अपंगत्‍व आल्‍याचे प्रमाणपत्र दिनांक-25.06.2015 रोजी देण्‍यात आले होते. काही कालावधी नंतर म्‍हणजे दिनांक-10.11.2017 रोजी तो संपूर्णरित्‍या कधीच बरा होऊ शकत नाही अशा आशयाचे 82% कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आल्‍याचे प्रमाणपत्र देण्‍यात आले. तक्रारकर्तीचा पती हा  सध्‍या आंथरुणावर खिळून पडलेला असून तो कोणतेही कामधंदा करण्‍यास असमर्थ आहे. त्‍याची संपूर्ण देखरेख पत्‍नी म्‍हणून तक्रारकर्ती व तिचे तीन मुले करीत आहेत, या सर्वांची  आर्थिक परिस्थिती अत्‍यंत हलाखीची आहे.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीने विमा एजंट श्री अरुण आर.कुर्जेकर यांचे सांगण्‍या वरुन विमा पॉलिसी काढली होती व त्‍यांनी अपघात होऊन 60 टक्‍केचे वर अपंगत्‍व आले तर विमित रकमेच्‍या दुप्‍पट रक्‍कम मिळेल असे सांगितले होते. विमा एजंटचे आश्‍वासनावर विश्‍वास ठेऊन तिचे पतीनी विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगमच्‍या दोन विमा पॉलिसी काढल्‍यात. त्‍यापैकी पहिली पॉलिसी न्‍यु एन्‍डावमेंट प्‍लॅन क्रं-979007385 असून सदर पॉलिसी दिनांक-26.12.2014 रोजी सुरु झाली असून तिचा  अर्धवार्षिक हप्‍ता रुपये-2758/- तो नियमित भरीत होता व आहे. त्‍यानंतर तिचे पतीने दुसरी विमा पॉलिसी न्‍यु जीवन आनंद त्‍याच तारखेला दिनांक-26.12.2014 रोजी काढली, सदर विमा पॉलिसीचा क्रं-979007386 असून तिचा अर्धवार्षिक हप्‍ता रुपये-3206/- होता. दोन्‍ही विमा पॉलिसीची रक्‍कम प्रत्‍येकी रुपये-1,00,000/- एवढी होती आणि सदर दोन्‍ही विमा पॉलिसींची परिपक्‍वता अनुक्रमे दिनांक-26.12.2034 आणि दिनांक-26.12.2035 अशी होती. दोन्‍ही विमा पॉलिसी सुरु असताना विम्‍याचे वैध कालावधीत तिचे पतीचा दिनांक-28.02.2015 रोजी अपघात झाला व त्‍यास 82% कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आले. तिचे पतीला पहिले तात्‍पुरते अंपगत्‍व प्रमाणपत्र दिनांक-25.06.2015 रोजी प्राप्‍त झाले होते व  ते प्रमाणपत्र विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात सादर केले असता विमा पॉलिसी प्रमाणे कायमस्‍वरुपी अंपगत्‍व प्रमाणपत्राची मागणी करण्‍यात आली आणि तो पर्यंत विम्‍याचे हप्‍ते भरण्‍यास सांगण्‍यात आले, त्‍याप्रमाणे तिने विम्‍याचे हप्‍ते भरणे सुरु ठेवले. तक्रारकर्तीचे पतीला कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आल्‍याचे प्रमाणपत्र दिनांक-10.11.2017 रोजीचे मिळाले, त्‍यानंतर तक्रारकर्तीने विमा रक्‍कम मिळण्‍या करीता विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात संपूर्ण कागदपत्रांसह भरुन दिनांक-18.01.2018 रोजी जमा केले होते, त्‍यावेळी सुध्‍दा विम्‍याचे हप्‍ते भरण्‍यास तिला सुचित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे तिला दिनांक-12.04.2018 रोजीचे पत्र पाठवून असे कळविण्‍यात आले की, दाखल दस्‍तऐवजा वरुन तिचे पतीस अपंगत्‍व 180 दिवसा नंतर आल्‍याने विमा दावा नामंजूर करण्‍यात येतो. अशाप्रकारे तिचा विमा दावा नामंजूर करुन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिली म्‍हणून तिने वकीलांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस दिनांक-29.10.2018 रोजीची कायदेशीर नोटीस पाठविली, सदर नोटीस प्राप्‍त होऊनही विम्‍याची रक्‍कम दिली नाही वा उत्‍तर दिले नाही. म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

  1. तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या दोन्‍ही विमा पॉलिसीची संपूर्ण रक्‍कम अपघात दिनांका पासून ते तक्रारी मध्‍ये निर्णय होई पर्यंत वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह अदा करण्‍याचे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला आदेशित करावे.
  2. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिलेल्‍या सेवेतील त्रृटीमुळे तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- तसेच  तक्रारीचा खर्च  रुपये-25,000/-तक्रारदारांना अदा करण्‍याचे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला आदेशित व्‍हावे. या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारदारांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष पान क्रं 57 ते 64 वर दाखल करण्‍यात आले. विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरा मध्‍ये तक्रारकर्तीचे पतीला दिनांक-28.02.2015 रोजी झालेला तथाकथीत अपघात, त्‍यामध्‍ये त्‍याला झालेली गंभिर दुखापत आणि त्‍याचेवर नाकाडे हॉस्‍पीटल, भंडारा व त्‍यानंतर शासकीय वैद्दकीय महाविद्दालय नागपूर आणि पुन्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे केलेले वैद्दकीय उपचार हे अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद केले. विमाधारकमास 80 टक्‍के पेक्षा जास्‍त शारिरीक नुकसान झाल्‍यामुळे तो घरी कोणतेही काम करण्‍यास असमर्थ ठरला असून निकामी पडलेला आहे या बद्दल वाद नसल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्तीचे पतीला जिल्‍हा सामन्‍य रुग्‍णालय भंडारा येथून तात्‍पुरते अंपगत्‍वाचे प्रमाणपत्र दिनांक-25.06.2015 रोजी प्राप्‍त झाले होते तो एक अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद केले. त्‍यानंतर दिनांक-10.11.2017 रोजीचे 82 टक्‍के कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचे प्रमाणपत्र देण्‍यात आले हा एक अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्तीचा पती हा कोणतेही काम करण्‍यास असमर्थ ठरलेला असून तो आंथरुणावर खिळून आहे ही बाब मान्‍य केली. तक्रारकर्तीचे पतीने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून दिनांक-26.12.2014 रोजी न्‍यु एन्‍डावमेंट प्‍लॅन क्रं-979007385 काढली होती व तिची अर्धवार्षिक किस्‍त रुपये-2758/- नियमित भरत आहे तसेच दुसरी विमा पॉलिसी जीवन आनंद दिनांक-26.12.2014 रोजी काढली असून तिचा क्रं-979007386  असा असून सदर पॉलिसीची अर्धवार्षिक किस्‍त रुपये-3206/- होती. तसेच दोन्‍ही विमा पॉलिसी प्रत्‍येकी रुपये एक लक्षाच्‍या असून दोन्‍ही विमा पॉलिसीची परिपक्‍वता अनुक्रमे दिनांक-26.12.2034 आणि दिनांक-26.12.2016 असे होते हा एक अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद केले.

     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा पॉलिसी मधील खालील नमुद अटी व शर्तीवर भिस्‍त ठेवली-

“If the life assured is involved in an accident at any time when this policy is in force for the full sum assured, and such injury shall within 180 days of its occurrence solely, directly and independently of all other causes result in (a) either permanent and total disability”

   विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे उपरोक्‍त नमुद अटी व शर्तीचा निर्वाळा देऊन पुढे असे नमुद करण्‍यात आले की, तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये दिनांक-18.01.2018 रोजी विमा दावा दाखल केला होता.तक्रारकर्तीचे पतीचा दिनांक-28.02.2015 रोजी अपघात झाला व त्‍यास कायमस्‍वरुपी अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र हे दिनांक-10.11.2017 रोजीचे मिळाले म्‍हणजेच सदर प्रमाणपत्र हे अपघाता नंतर 02 वर्ष 09 महिन्‍या नंतर मिळाले म्‍हणजेच अटी व शर्ती नुसार 180 दिवसाच्‍या आत न मिळाल्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार दिनांक-12.04.2018 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर करण्‍यात आला होता. तक्रारकर्तीचे प्रकरणा मध्‍ये कायमस्‍वरुपी अंपगत्‍वाचे प्रमाणपत्र हे 180 दिवसा नंतर दाखल केलेले आहे आणि त्‍या संबधी झालेला विलंब माफ करण्‍याचे अधिकार विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे झोनल ऑफीस मुंबई यांना असल्‍याने त्‍यांनी विमा दावा प्रकरण हे झोनल ऑफीस मुंबई यांचेकडे पाठविलेले आहे व त्‍यांचे कडून विलंब माफ होऊन मंजूरी मिळाल्‍यास ते जिल्‍हा ग्राहक आयोगास अवगत करण्‍यात येईल असे नमुद केले.

04  तक्रारकर्तीने पान क्रं13 वरील दस्‍तऐवज यादी नुसार एकूण 19 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला पाठविलेला नोटीस, रजि.पावती, पोच, तक्रारकर्तीचे पतीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, तिने केलेला विमा दावा अर्ज, विमा पॉलिसीच्‍या रकमा भरल्‍याच्‍या पावत्‍या, 82 टक्‍के कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आल्‍या बद्दल प्रमाणपत्र, सामान्‍य रुगणालयाचे डिसचॉर्ज कॉर्ड, सामान्‍य रुग्‍णालय यांचे शारिरीक हालचाल करण्‍यास असमर्थ असल्‍या बाबतचे प्रमाणपत्र अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्ती तर्फे लेखी युक्‍तीवाद दाखल करण्‍यात आला.

05.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तरा सोबत कोणतेही दस्‍तऐवज दाखल केले नाहीत. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

06.  प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे करण्‍यात आले, त्‍यावरुन सदर प्रकरणात न्‍यायनिवारणार्थ जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-

अ.क्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्तीला तिचे पतीचे दोन्‍ही विमा पॉलिसीपोटी आंशिक रक्‍कम विमा कंपनीने देऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

होय

02

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

कारणे व मिमांसा

मुद्दा क्रं 1 व क्रं 2

07.  तक्रारकर्तीचे पतीने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून दिनांक-26.12.2014 रोजी विमा पॉलिसी न्‍यु एन्‍डावमेंट प्‍लॅन क्रं-979007385 काढली होती व तिची अर्धवार्षिक किस्‍त रुपये-2758/- आहे तसेच दुसरी विमा पॉलिसी जीवन आनंद दिनांक-26.12.2014 रोजी काढली असून तिचा क्रं-979007386  असा असून सदर पॉलिसीची अर्धवार्षिक किस्‍त रुपये-3206/- होती. तसेच दोन्‍ही विमा पॉलिसी प्रत्‍येकी रुपये एक लक्षाच्‍या असून दोन्‍ही विमा पॉलिसीची परिपक्‍वता अनुक्रमे दिनांक-26.12.2034 आणि दिनांक-26.12.2036 होती  या बद्दल उभय पक्षां मध्‍ये विवाद नाही.

08.  तक्रारकर्तीचे पतीला दिनांक-28.02.2015 रोजी झालेला तथाकथीत अपघात, त्‍यामध्‍ये त्‍याला झालेली गंभिर दुखापत आणि त्‍याचेवर नाकाडे हॉस्‍पीटल, भंडारा व त्‍यानंतर शासकीय वैद्दकीय महाविद्दालय नागपूर आणि पुन्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे केलेले वैद्दकीय उपचार तसेच विमाधारकास 82 टक्‍के आलेले कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आणि त्‍यामुळे तो घरी कोणतेही काम करण्‍यास असमर्थ ठरला असून निकामी आंथरुणावर खिळून  पडलेला आहे या बाबी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला मान्‍य आहेत. तक्रारकर्तीचे पतीला प्रथम जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथून 88 टक्‍के अंपगत्‍वाचे प्रमाणपत्र दिनांक-25.06.2015 रोजी जारी करण्‍यात आले होते  परंतु सदर अपंगत्‍व तात्‍पुरते कि कायमस्‍वरुपी असा उल्‍लेख त्‍यामध्‍ये केल्‍याचे दिसून येत नाही. विमा पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे कायमस्‍वरुपी अंपगत्‍व प्रमाणपत्र हे विम्‍याची रक्‍कम देय होण्‍यासाठी आवश्‍यक असल्‍याने त्‍यानंतर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा यांनी  तक्रारकर्तीचे पतीचे नावाने दिनांक-10.11.2017 रोजीचे प्रमाणपत्र जारी केले होते आणि नुसार  82 टक्‍के कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचे नमुद करण्‍यात आले होते या बाबी सुध्‍दा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला मान्‍य आहेत.

     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या प्रमाणे अपघाता नंतर आलेले कायमस्‍वरुपी अंपगत्‍वा बद्दल विमा पॉलिसीमध्‍ये खालील अट आहे-

“If the life assured is involved in an accident at any time when this policy is in force for the full sum assured, and such injury shall within 180 days of its occurrence solely, directly and independently of all other causes result in (a) either permanent and total disability”

09.  तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये दिनांक-18.01.2018 रोजी विमा दावा दाखल केला होता. तिचे पतीचा दिनांक-28.02.2015 रोजी अपघात झाला व त्‍यास कायमस्‍वरुपी अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र हे दिनांक-10.11.2017 रोजीचे मिळाले म्‍हणजेच सदर प्रमाणपत्र हे अपघाता नंतर 02 वर्ष 09 महिन्‍या नंतर मिळाले म्‍हणजेच अटी व शर्ती नुसार 180 दिवसाच्‍या आत न मिळाल्‍यामुळे तिचा विमा दावा पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार प्रथम दिनांक-12.04.2018 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर करण्‍यात आला होता. कायमस्‍वरुपी अंपगत्‍वाचे प्रमाणपत्र हे 180 दिवसा नंतर दाखल केलेले असल्‍याने आणि त्‍यासंबधी झालेला विलंब माफ करण्‍याचे अधिकार विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे झोनल ऑफीस मुंबई यांना असल्‍याने त्‍यांनी त्‍यानंतर तक्रारकर्तीचे विमा दावा प्रकरण हे त्‍यांचे झोनल ऑफीस मुंबई यांचेकडे पाठविलेले आहे व त्‍यांचे कडून विलंब माफ होऊन मंजूरी मिळाल्‍यास ते जिल्‍हा ग्राहक आयोगास अवगत करतील असे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्‍तरात नमुद केले होते. परंतु दरम्‍यानचे काळात जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रार चालू असताना विरुदपक्ष विमा कंपनीचे झोनल ऑफीस कडून मंजूरी मिळाल्‍या नंतर दोन्‍ही विमा पॉलिसीचे लाभ तक्रारकर्तीला दिल्‍याचे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले लेखी युक्‍तीवादात नमुद केले.   

10.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-02.12.2020 रोजी पान क्रं 72 व 73 वर दाखल केलेल्‍या लेखी युक्‍तीवादा मध्‍ये असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे प्रकरणात विलंब माफ झाल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा पॉलिसी क्रं-979007385 ची देय रक्‍कम रुपये-68,178/- दिनांक-15.11.2019 रोजी अर्जदाराच्‍या खात्‍यात जमा केली तसेच विमा पॉलिसी क्रं-979007386 ची देय रक्‍कम रुपये-73,043/- दिनांक-10.12.2019 रोजी अर्जदाराच्‍या खात्‍यात जमा केली. तक्रारकर्तीने सुध्‍दा आपले लेखी युक्‍तीवादा मध्‍ये उपरोक्‍त नमुद रकमा उल्‍लेखित दिनांकास विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून प्राप्‍त झाल्‍याची बाब मंजूर केलेली आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी युक्‍तीवादात पुढे असेही नमुद करण्‍यात आले की, दोन्‍ही विमा पॉलिसीजचे पुढील देय हप्‍ते सुध्‍दा माफ करण्‍यात आलेले आहेत तसेच दोन्‍ही पॉलिसीमध्‍ये परिपक्‍वता दाव्‍याची रक्‍कम विमा पॉलिसी परिपक्‍व झाल्‍या नंतर अर्जदारास देण्‍यात येईल म्‍हणजेच विमाधारकास दोन वेळा पॉलिसी दाव्‍याची रक्‍कम देण्‍यात येईल. तसेच दोन्‍ही विमा पॉलिसी मध्‍ये दिनांक-20.01.2020 पासून 10 वर्षा पर्यंत दरमहा रुपये-833/- प्रमाणे रकमा अर्जदाराच्‍या खात्‍यात जमा केल्‍या जात आहेत. मासिक हप्‍त्‍याची रक्‍कम दोन्‍ही विमा पॉलिसी मध्‍ये नमुद अट व शर्त क्रं 3 (क) प्रमाणे देण्‍यात येत आहे. तक्रारकर्तीचे म्‍हणण्‍या प्रमाणे विमा पॉलिसीची दुप्‍पट रक्‍कम ही विमाधारकाचा जर अपघाती मृत्‍यू झाला असता तर देण्‍यात आली असती.

11.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी युक्‍तीवादा प्रमाणे तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघातामुळे आलेल्‍या अंपगत्‍वा बाबत दोन्‍ही विमा पॉलिसीजची संपूर्ण विम्‍याची रक्‍कम दिलेली आहे आणि दोन्‍ही विमा पॉलिसीचे मासिक हप्‍त्‍यांची रक्‍कम 10 वर्षा पर्यंत दरमहा रुपये-833/- प्रमाणे विमाधारकाचे खात्‍यात जमा केल्‍या जात आहे. या शिवाय दोन्‍ही विमा पॉलिसी परिपक्‍व झाल्‍या नंतर परिपक्‍व रक्‍कम सुध्‍दा विमाधारकास देण्‍यात येईल. तक्रारकर्तीला दोन्‍ही विमा पॉलिसीच्‍या रकमा नोव्‍हेंबर आणि डिसेंबर 2019 मध्‍ये देण्‍यात आलेल्‍या आहेत परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे शाखा व्‍यवस्‍थापकांनी तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक-12.04.2018 रोजीचे पत्रान्‍वये अपघाता नंतर 180 दिवस उशिरा नंतर कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याने त्‍यांचे वरिष्‍ठ कार्यालयाने विमा दावा नाकारल्‍याचे तिला कळविलेले होते. साहजिकच सदर पत्र प्राप्‍त झाल्‍या नंतर तिला धक्‍का बसणे स्‍वाभाविक आहे. विमाधारक तिचे पतीला  प्रथम जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथून 88 टक्‍के अंपगत्‍वाचे प्रमाणपत्र दिनांक-25.06.2015 रोजी जारी करण्‍यात आले होते परंतु सदर अपंगत्‍व तात्‍पुरते कि कायमस्‍वरुपी असा उल्‍लेख त्‍यामध्‍ये केल्‍याचे दिसून येत नाही. त्‍यानंतर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा यांनी दिनांक-10.11.2017 रोजीचे प्रमाणपत्र जारी केले होते आणि त्‍यानुसार तिचे पतीला 82 टक्‍के कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचे नमुद करण्‍यात आले होते परंतु या सर्व प्रकारा मध्‍ये तिची कोणतीही चुक दिसून येत नाही. दुसरी महत्‍वाची बाब विचारात घेणे आवश्‍यक आहे की, गंभिर अपघात झाल्‍या नंतर जर 180 दिवस/सहा महिने उशिरा कायमस्‍वरुपी अपंगत्‍व आल्‍याचे प्रमाणपत्र संबधित शासकीय जिल्‍हा रुग्‍णालयाकडून मिळाले याचा अर्थ असा होत नाही की, त्‍या अपघातामुळे त्‍या व्‍यक्‍तीस 180 दिवस/सहा महिने उशिर झाल्‍या नंतर कायमस्‍वरुपी अंपगत्‍व आलेले आहे परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे शाखा व्‍यवस्‍थापकांनी पहिलेच 180 दिवसाचे शर्तीचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. वस्‍तुतः विमाधारकाचे वैद्दकीय प्रमाणपत्र्, त्‍यास झालेली गंभिर दुखापत इत्‍यादी बाबी विचारात घेऊन तसेच संबधित विमाधारकाची प्रत्‍यक्ष भेट घेऊन व त्‍याची गंभिर परिस्थिती पाहून विमा दाव्‍यावर निर्णय देता आला असता परंतु तक्रारकर्तीने जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे झोनल कार्यालयातून तिचे विमा दावा प्रकरणास मंजूरी मिळाल्‍या नंतर नोव्‍हेंबर-2019 आणि डिसेंबर-2019 मध्‍ये विमा पॉलिसीच्‍या रकमा जमा करण्‍यात आल्‍यात. विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा चुकीचा अर्थ काढून एवढे दिवस तिचे विमा प्रकरण प्रलंबित ठेवले. भारतीय जीवन बिमा निगम ही शासनाची एक यंत्रणा आहे आणि तिचे व्‍दारे तळागाळातील विमाधारकांना गंभिर अपघातामुळे झालेल्‍या विम्‍याच्‍या रकमा वेळेवर मिळणे अभिप्रेत आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे शाखा व्‍यवस्‍थापकांनी तिचे पती विमाधारक यास गंभिर दुखापत आल्‍या बद्दल त्‍याची प्रतयक्ष भेट घेऊन वस्‍तुनिष्‍ठ खुलासेवार अहवाल वरिष्‍ठ कार्यालयास कळविणे आवश्‍यक होते परंतु तसे न करता प्रथमतः विमा दावा नाकारल्‍याचे पत्र तिला देण्‍यात आले व नंतर  झोनल ऑफीस मधून मंजूरी मिळाल्‍या नंतर उशिरा रकमा प्रदान केल्‍याने तिचे व्‍याजाचे सुध्‍दा नुकसान झाले तसेच या सर्व प्रकारात तक्रारकर्तीला शारिरीक मानसिक त्रास सहन करावा लागला व जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल करावी लागली. तक्रारकर्तीचे विमाधारक पती यांना झालेला गंभिर अपघात पाहता तक्रारकर्ती हीला व्‍याजाची रक्‍कम, शारिरीक व मानसिक त्रासाची रक्‍कम आणि तक्रार खर्चाची रक्‍कम असे मिळून एकूण रुपये-50,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

12.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                      :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा, तालुका जिल्‍हा भंडारा यांचे  विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष विमा  कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीचा पती विमाधारक याची विमा रक्‍कम उशिराने दिली असल्‍याने  झालेले व्‍याजाचे नुकसान तसेच झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च असे मिळून रक्‍कम रुपये-50,000/- (अक्षरी रुपये पन्‍नास हजार फक्‍त) तक्रारकर्तीला अदा करावेत.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्‍यास सदर नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-50,000/- मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करण्‍यास विरुदपक्ष विमा कंपनी जबाबदार राहिल.

(04) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध       करुन देण्‍यात याव्‍यात.

(05)  उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांना-त्‍यांना परत करण्‍यात याव्‍यात.              

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.