(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फु. खोब्रागडे, सदस्य)
(पारीत दिनांक : 23 जुलै 2014)
1. अर्जदार यांनी, सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली. तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे.
2. अर्जदार हिचे पती नोकरीत असतांना त्यांनी लहान मुलगा श्रेयश संतोष ठाकूर याचे नावे भारतीय जीवन विमा निगम शाखा गडचिरोली येथे दि.1.4.2007 ला प्रति महिना रुपये 609/- प्रमाणे रुपये 1,00,000/- ची जीवन तरंग सह दुप्पट लाभाची पॉलिसी क्र.973486562 काढली. अर्जदाराचे पतीचे पगारातून त्यांच्या कार्यालयाव्दारे नियमीत कपात करुन गैरअर्जदारांच्या कार्यालयाकडे पाठविल्या जात होती. उपरोक्त पॉलिसीच्या रकमेचा भरणा डिसेंबर 2009 पर्यंत करण्यात आला होता. अर्जदार बाईचे पती मृतक संतोष भुरुजी ठाकूर यांचा दि.22.12.2009 रोजी अपघाती निधन झाले असून अर्जदार तथा तिची लहान मुले मृतक संतोष भुरुजी ठाकूर कायदेशिर वारसदार आहे. अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.1 चे कार्यालयात जावून तिच्या पतीने काढलेल्या जीवन तरंग पॉलिसी क्र.973486562 बाबत चौकशी करुन वारसान प्रमाणपञ दाखल करुन विमा रक्कम मिळणेकरीता गैरअर्जदार यांचेकडे अर्ज दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 ने विमा कार्यालयातून अर्जदाराला दि.22.3.2010 ला पञ पाठवीले. त्यानुसार अर्जदार हिने गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार पॉलिसीची किस्त भरणा करुन गैरअर्जदार यांच्या प्रत्येक अटीच व शर्तीचे पालन करण्यास तयार होती. परंतु, गैरअर्जदाराने कोणताही पञव्यवहार केलेला नाही व उपरोक्त पॉलिसीची रक्कम अदा केली नाही. पॉलिसीची रक्कम देण्यास होत असलेल्या विलंबामुळे अर्जदारास आर्थिक, मानसिक व शारिरीक ञास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पॉलिसीचा दावा रुपये 2,00,000/- गैरअर्जदार क्र.1 कडून जीवन तरंग पॉलिसी क्र.973486562 रुपये 1,00,000/- चे दुप्पट मृत्यु विम्याची रक्कम रुपये 2,00,000/- वसूल करुन मिळण्याचा आदेश पारीत करावा. तसेच मानसिक, शारिरीक ञासापोटी व झालेल्या आर्थिक नुकसानापोटी रुपये 20,000/- चा आदेश पारीत करावा, अशी प्रार्थना केली.
3. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 11 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराचे सदर तक्रारीवर प्राथमिक सुनावणी ऐकण्यात आली. मंचाच्या मताप्रमाणे प्राथमिक सुनावणी ऐकण्यात आल्यानंतर खालील प्रमाणे मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक : नाही.
आहे काय ?
2) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
4. अर्जदाराचे पती यांनी त्यांचा लहान मुलगा श्रेयश संतोष ठाकूर याचे नावाने गैरअर्जदाराकडून दि.1.4.2007 रोजी रुपये 1,00,000/- ची जीवन तरंग सह दुप्पट लाभाची पॉलिसी काढलेली होती. अर्जदाराचे पतीचा दि.22.12.2009 ला अपघातामध्ये निधन झाले. सदर पॉलिसी अर्जदाराचे मुलाचे नावाने असल्याने व अर्जदाराचा मुलगा आताही जिवंत आहे. अर्जदाराने दाखल केलेला नि.क्र.4 वर दाखल दस्त क्र.4 ची पडताळणी करतांना असे दिसते की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून सदर पॉलिसीचा प्रिमियम माफ करावे या संदर्भात अर्ज केला होता व तो अर्ज गैरअर्जदाराने नाकारलेला आहे. तसेच अर्जदाराचे पतीचे नावाने सदर पॉलिसी नव्हती व अर्जदाराचे मुलगा जिवंत असल्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक नाही. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
5. मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन व मंचाचे मताप्रमाणे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराची मुळ तक्रार व दस्ताऐवजांचे प्रती ठेवून, अन्य प्रती व दस्ताऐवज अर्जदारास परत करण्यात यावे.
(3) अर्जदारास आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/7/2014.