जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 196/2012 तक्रार दाखल तारीख – 08/11/2012
तक्रार निकाल तारीख– 20/02/2013
जुगलकिशोर पि.बाबुलाल बाहेती
वय 51 वर्षे धंदा शेती व व्यापार
रा.राधिका एम्पोरियम,मेन रोड,गेवराई
ता.गेवराई जि.बीड ... अर्जदार
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक,
भारत संचार निगम लि.
ऑफिस गेवराई ता.गेवराई जि.बीड. गैरअर्जदार
2. शाखा व्यवस्थापक,
कोरोमंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
प्लॉट नं.6 मेट्रो रेल्वे पिलरजवळ, नं.81, पुसा रोड,
नवी दिल्ली-110 005.
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड.आर.बी.धांडे,
गैरअर्जदारा तर्फे - कोणीही हजर नाही.
---------------------------------------------------------------------------------------
नि.1 वरील आदेश
दिनांक- 20.02.2013
(द्वारा- श्रीमती निलिमा संत, अध्यक्ष )
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
सदरची तक्रार अर्जदाराने शाखा व्यवस्थापक भारत संचार निगम लि. यांचे विरुध्द दाखल केली आहे. तक्रारी अंतर्गत अर्जदाराने विमा रककम रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) व्याजासह दयावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार हे मयताचे वडील आहेत.
तक्रारदाराने यापूर्वी यांच मंचात 164/2009 दाखल केली होती व मंचाने ती अपूर्ण कागदपत्रे व मयताचा विवाह झाला असल्यामुळे त्यांची पत्नी वारसदार ठरते. परंतु तिला तसेच त्यांचा मुलगा व मुलगी यांना वारसदार केले नाही या कारणाने नामंजूर केली होती. .
सदरच्या तक्रारीत देखील मयताची पत्नी,मुलगा व मुलगी यांना अर्जदार केलेले नाही. मयताच्या पत्नीने दुसरे लग्न केले आहे असे अर्जदाराचे शपथपत्र दाखल केले आहे. परंतु तसा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे ही तक्रार खारीज करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार प्राथमिक अवस्थेत फेटाळण्यात येत आहे.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड