Maharashtra

Osmanabad

CC/14/289

Sadhana Rajendra Bedmutha - Complainant(s)

Versus

Branch Manager Bhaichand hirachnad Raisony Multi state co.oop. cridit socity - Opp.Party(s)

D.P.Wadgaonkar

21 Jul 2015

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/14/289
 
1. Sadhana Rajendra Bedmutha
R/o Marwad Galli Osmanabad Tq. & Dist.osmanabad
OSMANABAD
MAHARAHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager Bhaichand hirachnad Raisony Multi state co.oop. cridit socity
Branch Osmanabad
Osmanabad
Maharashtra
2. Executive Director Bhaichand Hirachand Raisony Multi state co-oop. Cridit Socity Ltd.
Osmanabad
OSMANABAD
MAHARAHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ग्राहक तक्रार  क्र.   289/2014

                                                                                     दाखल तारीख    : 08/12/2014

                                                                                     निकाल तारीख   : 21/07/2015

                                                                                    कालावधी: 0 वर्षे 07 महिने 14 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.   साधना राजेंद्र बेदमुथा,

     वय – सज्ञान, धंदा – घरकाम,

     रा.मारवाडी गल्‍ली, ता. जि.उस्‍मानाबाद.  

     अर्जदार क्रं.1 यांच्‍या वतीने मुखत्‍यारपत्रधारक,

     राजेंद्रकुमार कस्‍तुरचंद बेदमुथा,

     वय-सज्ञान, धंदा- व्‍यापार,

     रा. मारवाडी गल्‍ली, उस्‍मानाबाद.

 

2.   शुभम राजेंद्र बेदमुथा,

     वय – अज्ञान, धंदा- शिक्षण,

     रा.वरीलप्रमाणे,

     अ.पा.क. राजेंद्रकुमार कस्‍तुरचंद बेदमुथा.                    ....तक्रारदार

                          

                            वि  रु  ध्‍द

1.    शाखा व्‍यवस्‍थापक,

      भाईचंद हिराचंद रायसोनी मल्‍टीस्‍टेट को-ऑपरेटिव्‍ह,

      क्रेडिट सोसायटी लि., शाखा, उस्‍मानाबाद.

 

2.    सरव्‍यवस्‍थापक / कार्यकारी संचालक,

      भाईचंद हिराचंद रायसोनी मल्‍टीस्‍टेट को- ऑपरेटिव्‍ह,

      क्रेडिट सोसायटी लि., मुख्‍य कार्यालय,

      पुनम चेंबर्स, बँक स्‍ट्रीट, नवीपेठ, जळगाव-435001.        ..विरुध्‍द  पक्षकार

 

कोरम :                      1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र. अध्‍यक्ष.

                  2)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍य.

 

                                              तक्रारदारांतर्फे विधीज्ञ   :  श्री. डी.पी.वडगांवकर.

                     विरुध्‍द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधिज्ञ : श्री.आर.एस.कोचेटा.

                        न्‍यायनिर्णय

 मा. प्र.अध्‍यक्षा, सौ. विद्युलता जे. दलभंजन यांचे व्‍दारा:   

अ)    अर्जदार क्र.1 व 2 हे उस्मानाबाद येथील रहिवाशी असून तक क्र.2 हे अज्ञान आहेत. तक क्र.1 यांनी आपले वडील व तक क्र.2 याचे पती राजेंद्रकूमार यांना तक क्र. 1 व 2 यांनी मुख्‍यातरपत्र दिले असून सदर ची तक्रार मुखत्‍यारपत्रधारक यांच्‍या मार्फत दाखल केली आहे. विरुध्‍द पक्षकार (विप) बँकेकडे विप क्र.1 कडे खाली दिलेल्या तक्‍याप्रमाणे मुदत ठेवली आहे. सदर मुदत ठेव रक्कम गरज पडल्‍यामुळे मुदतीनंतर मिळणेची विनंती केली असता विप ने ती देण्‍यास टाळाटाळ केल्‍याने विप ने ती रक्‍कम परत न देऊन सेवेत त्रूटी केली म्‍हणून भरपाई मिळण्‍यासाठी तक ने ही तक्रार दिलेली आहे.

     तक यांनी दिलेल्‍या तक्रारीतील तक्‍यानुसार अर्जदार क्र.1 यांनी विप क्र.1 यांच्‍याकडे खालीलप्रमाणे मुदत ठेवी ठेवलेल्‍या आहेत.

अ.क्र.

पावती क्र.

 रक्‍कम

ठेव ठेवल्‍याची दिनांक

ठेवीची मुदत संपणारी दिनांक

01

0988198

रु.16,950/-

19/07/2013

19/07/2014

02

0948199

रु.16950/-

19/07/2013

19/07/2014

 

तक यांनी दिलेल्‍या तक्‍यानुसार अर्जदार क्र.2 यांनी विप क्र.1 यांच्‍याकडे खालीलप्रमाणे मुदत ठेवी ठेवलेल्या आहेत.

अ.क्र.

पावती क्र.

 रक्‍कम

ठेव ठेवल्‍याची दिनांक

ठेवीची मुदत संपणारी दिनांक

01

0948033

रु.39,550/-

21/06/2014

21/06/2014

02

0948876

रु.5,831/-

25/10/2013

25/10/2014

03

0525092

रु.11,300/-

08/12/2013

08/12/2014

04

0525093

रु.11,300/-

08/12/2013

08/12/2014

         तक यास आपल्‍या वैयक्तिक गरजेपोटी पैशाची गरज असल्‍याने विप कडे मुदतपूर्व/मुदतीनंतरची सदर ठेव रक्‍कम परत मिळण्‍याबाबत विचारणा केली असता सदर रक्‍कम परत देण्‍यास पतसंस्‍था विप ने टाळाटाळ केली व म्‍हणून तक ने दि.14/10/2014 रोजी विप स नोटीस देऊन सदर रकमेची मागणी केली मात्र विप क्र.2 ने त्‍या सिवकारलया नाही व विप क्र. 1 ने स्विकारुन त्‍याकडे दुर्लक्ष केले. म्‍हणून तक ला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी प्रत्‍येकी रु.20,000/-, नोटीसचा खर्च रु.1,000/-, तक्रारीचा  खर्च रु.5,000/- तसेच ठेव रक्‍कम रु.1,01,881/- 12 टक्‍के व्‍याजासह विप कडून मिळावा अशी विनंती केली आहे.  

     तक्रारदाराने तक्रारीसोबत मुदत ठेवीची पावती, विप स दिलेला अर्ज, विहीर खोदण्‍याचा करारनामा, ई. कागदपत्रांच्‍या प्रती दाखल केली आहेत.

 

2)  सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्‍द पक्षकार क्र.1 यांना नोटीस बजावली तसेच अनेकदा संधी देऊनही आपले म्‍हणणे दाखल न केल्‍याने दि.11/03/2015 रोजी त्‍यांच्‍या विरुध्‍द नो से आदेश पारीत झाला.

 

2)  सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्‍द पक्षकार क्र.2 यांनी नोटीस बजावणीकरता पाठवली असता त्‍यांनी घेण्‍यास नकार दिला म्‍हणून अखेर शेवटी दि.03/01/2015 रोजी त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत झाला.

 

4)   तक्रारदाराची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तीवाद इत्‍यादींचा विचार करता आम्‍ही निष्‍कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्‍यांची उत्‍तरे त्‍यांच्‍यासमोर खाली दिलेल्‍या कारणांसाठी देतो.

मुद्ये                                  निष्‍कर्ष

1)  तक्रारदार विरुध्‍द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ?                   होय.

 

2)  विरुध्‍द पक्षकाराने अर्जदाराच्‍या सेवेत त्रुटी केली आहे का ?             होय.

 

3)  अर्जदार नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे काय ?                 होय.

 

4)  काय आदेश ?                                                                         शेवटी दिल्‍याप्रमाणे.

                         कारणमिमांसा 

मुद्या क्र.1 ते 3  

     तक्रारदाराची तक्रार ही त्‍यांनी विप यांच्‍या पतसंस्‍थेत ठेवलेली ठेव व त्‍यावरील व्‍याज ठेवीची मुदतपुर्व / मुदत संपूनही मिळाले नाही म्‍हणून दाखल केली आहे. सदरबाबत तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांच्‍या आधारे पडताळणी केली असता तक यांचे नावे असलेले विप यांच्‍या पतसंस्‍थेचे नाव आहे. सदर ठेव पावतींवरील नोंदी खालीलप्रमाणे आहेत. तथापि तक यांनी तक्रारीत दिलेल्‍या तक्‍यातील काही रकमा व तारखा चुक आहेत.

 

 

अ.क्र.

पावती क्र.

 रक्‍कम

देय रक्‍कम

ठेव ठेवल्‍याची दिनांक

ठेवीची मुदत संपणारी दिनांक

01

0988198

रु.16,950/-

रु.19,154/-

19/07/2013

19/07/2014

02

0948199

रु.16,950/-

रु.19,154/-

19/07/2013

19/07/2014

03

0948033

रु.35,000/-

रु.39,550/-

21/06/2013

21/06/2014

04

0948876

 रु.5,831/-

 रु.6,589/-

25/10/2013

25/10/2014

05

0525092

रु.11,300/-

रु.12,769/-

08/12/2013

08/12/2014

06

0525093

रु.11,300/-

रु.12,769/-

08/12/2013

08/12/2014

एकूण रक्‍कम रु.

रु.97,331/-

रु.1,09,985/-

 

 

  वरील सर्व रकमेवर व्‍याजदर 13 टक्‍के दर्शविलेला आहे. गुंतवलेली एकूण रक्‍कम रु.97,331/- असून मुदतपुर्ती नंतर एकूण देय रक्‍कम रु.1,09,985/- आहे. सदर पावत्‍यांवर विप पतसंस्‍थेचे नाव व क्‍लार्क, कॅशियर व मॅनेजर यांच्‍या सहया आहे. यावरुन सदर व्‍यवहार झाला आहे असे दिसते. सदरबाबत पडताळणी करीता विप यांना अनेकदा संधी देऊनही त्‍यांनी आपले म्‍हणणे / हरकत दाखल केलेली नाही म्‍हणून दि.05/05/2014 रोजी विप क्र.1 विरुध्‍द नो से आदेश  व विप क्र. 2 विरुध्‍द दि.03/01/2015 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला. म्‍हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्‍य आहे असे दिसते म्‍हणून आम्‍ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्‍य असले असते तर विप यांनी नोटीस मिळून / मंचात उपस्थित राहून देखील आपले म्‍हणणे दाखल न करण्‍याचे काय कारण असू शकते. म्‍हणजेच त्‍यांच्‍याकडे तक्रारदाराची तक्रार खोडण्‍या इतपत किंवा हरकत नोंदविण्‍या इतपत पुरावे नसल्‍याने त्‍यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्‍हणणे दिले नाही. म्‍हणजेच त्‍यांना तक्रारदाराची तक्रार मान्‍य आहे आणि तक्रारदार त्‍यांच्‍या ठेवींची रक्कम मिळविण्‍यास पात्र आहेत. म्‍हणुन आम्‍ही मुद्या क्र.1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश पारीत करतो.

                                आदेश

1)   तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

2)  विरुध्‍द पक्षकार क्र.1 व 2 यांनी संयुक्‍तपणे व स्‍वतंत्रपणे तक्रारदाराची एकूण मुदत ठेव 

पावती नुसार 13 टक्‍के व्‍याजासह मुदतपुर्ती नंतर होणारी एकूण रक्‍कम रु.1,09,985/(रुपये

एक लक्ष नऊ हजार नऊशे पंच्‍यांशी) आदेश दिल्‍या तारखेपासून 30 दिवसात द्यावेत.

 

विप क्र.1 व 2 यांनी संयुक्‍तपणे व स्‍वतंत्रपणे वरील रक्‍कम 30 दिवसात परत न केल्‍यास

होणा-या एकूण रकमेवर त्‍या नंतरच्‍या कालाधीकरीता द.सा.द.शे.09 टक्‍के व्‍याज दराने

संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द्यावी.

 

3)  विरुध्‍द पक्षकार क्र.1 व 2 यांनी संयुक्‍तपणे व स्‍वतंत्रपणे तक्रारदारास झालेल्‍या

मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्‍या खर्चापोटी रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्‍त) द्यावे.

 

4)  वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर

    सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची

    पुर्तता विप यांनी न केल्‍यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज द्यावा.

 

5)  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

   

    

  (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)                                  (सौ.विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                                      प्र.अध्‍यक्ष   

                जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.