ग्राहक तक्रार क्र. 233/2014
दाखल तारीख : 05/11/2014
निकाल तारीख : 08/06/2015
कालावधी: 0 वर्षे 08 महिने 04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. तृप्ती रविकांत ढोकर,
वय-सज्ञान, धंदा – शिक्षण,
रा.मेन रोड, निंबाळकर गल्ली, जि.उस्मानाबाद.
2. रविकांत माणिकराव ढोकर,
वय- 60 वर्षे, धंदा – पेन्शनर,
रा. मेन रोड, निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
भाईचंद हिराचंद रायसोनी ऑफ सोसायटी,
उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्रभारी अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.यु.जी.इंगळे.
विरुध्द पक्षकारांतर्फे : श्री.आर.एस.कोचेटा.
न्यायनिर्णय
मा. सदस्य मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार उस्मानाबाद येथील रहिवाशी असुन अर्जदार क्र. 1 ही क्र. 2 ची नात्याने मुलगी आहे. त्यांचे विप यांच्या संस्थेत बचत खाते क्र.00671000174 या नंबरचे एकत्रित खाते आहे. विप यांची भाईचंद हिराचंद रायसोनी ऑफ सोसायटी, उस्मानाबाद ही नोंदणीकृत पतसंस्था आहे. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विप क्र.1 व 2 कडे मुदत ठेव खाली दिलेल्या तक्याप्रमाणे ठेवल्या आहेत.
अ.क्र. | रक्कम रुपये | मुदत ठेव ठेवल्याची ता. | मुदत संपण्याची ता | पावती क्रमांक | मुदती नंतरची रक्कम रुपये. |
1. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524954 | 19,210/- |
2. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524953 | 19,210/- |
3. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524955 | 19,210/- |
4. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524952 | 19,210/- |
5. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524956 | 19,210/- |
6. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524957 | 19,210/- |
7. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524960 | 19,210/- |
8. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524958 | 19,210/- |
9. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524959 | 19,210/- |
10. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524961 | 19,210/- |
11. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524962 | 19,210/- |
12. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524963 | 19,210/- |
13. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524964 | 19,210/- |
14. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524965 | 19,210/- |
15. | 17,000/- | 03/12/2013 | 03/12/2014 | 0524966 | 19,210/- |
सदर एकूण रक्कम रु.2,83,290/- दि.20/10/2014 रोजी शिल्लक आहे. अर्जदार यांचे घराचे दुरुस्तीकाम करुन घेण्याचे योजीले असुन सदर बांधकाम दुरुस्तीकरीता वरील ठेवी व बचत खात्याची रक्कम मुदतपुर्व मिळावी म्हणून विप कडे संपर्क साधला असता टोलवाटोलवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रारदार यांनी रक्कम काढणेसाठी स्लिप भरुन दिली असता सदर स्लीप स्विकारण्यास नकार दिला. मुदत ठेववरील सर्व रक्कम व्याजासह बचत खात्यावर वर्ग केली परंतु विप यांनी आज, उद्या देतो कर्जाची वसुली झाल्यावर देतो वगैरे सबबी सांगुन रक्कम दिली नाही अशा प्रकारे विप यांनी सेवा देतांना त्रुटी केली म्हणून तक यांनी सदर तक्रार दाखल करणे भाग पडले. विप यांनी अर्जदारास रु.2,82,290/- व्याजासह, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- तसेच रु.5,000/- विप कडून तक्रारीचा खर्च मिळणेची विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी पास बुक, मुदत ठेव पावती क्र.0524954, 0524953, 0524955, 0524956, 0524957, 0524958, 0524959, 0524960, 0524961, 0524962, 0524963, 0524964, 0524965, 0524966, इत्यादी कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या आहेत.
2) विरुध्द पक्षास मंचामार्फेत नोटीस व वारंवार संधी मिळून देखील त्यांनी मा. मंचासमोर हजेरी न लावल्याने त्यांच्या विरुध्द दि.06/04/2015 रोजी नो से आदेश पारीत झाला.
3) तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले. तोंडि युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात आमच्या विचारार्थ खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्या क्र.1 ते 3 :
तक्रारदाराची तक्रार ही त्यांनी विप यांच्या पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी व त्यावरील व्याज ठेवीची मुदत संपुनही मिळाले नाही म्हणून दाखल केली आहे. सदरबाबत तक्रारदार यांच्या दाखल कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली असता त्यांचे नावे असलेले विप यांच्या पतसंस्थेचे मुदत ठेव पावती/प्रमाणपत्र एकत्रितपणे रु.2,83,290/- बचत खाते क्र. 00671000174 आहे. सदर प्रमाणपत्रांवर विप पतसंस्थेचे नाव असून व्यवस्थापक, अकौटंटची व क्लार्कची सही आहे. मुदत 365, दिवसांची असून संपण्याची तारीख दि.03/12/2014 आहे. यावरुन सदर व्यवहार झाला आहे असे दिसते. सदरबाबत पडताळणी करीता विप यांनी म्हणणे / हरकत दाखल केलेले नाही. म्हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्य आहे असे दिसते म्हणून आम्ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्य असले असते तर विप यांनी नोटीस मिळूनही मंचात उपस्थित राहून आपले म्हणणे दाखल न करण्याचे काय कारण असू शकते. म्हणजेच त्यांच्याकडे तक्रारदाराची तक्रार खोडण्या इतपत किंवा हरकत नोंदविण्या इतपत पुरावे नसल्याने त्यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्हणणे दिले नाही. त्यामुळे उपलब्ध कागदपत्राच्या आधारे तक्रारदार त्यांच्या ठेवींची रक्कम मिळविण्यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. म्हणुन मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
1) विरुध्द पक्षकार यांनी संयुक्तपणे / स्वतंत्रपणे तक्रारदाराची एकूण दि.03/12/2014
पर्यंतची व्याजासह मुदत ठेव रक्कम रु.2,88,150/- (रुपये दोन लाख अठयाऐंशी
हजार एकशे पंन्नास फक्त) दि.03/12/2014 रोजी पासून द.सा.द.शे.9 व्याज
दराने किंवा पतसंस्था बचत खात्यास देत असलेले व्याजदर यापैकी जे जास्त असेल
त्या दराने आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात द्यावेत.
विप यांनी संयुक्तपणे व स्वतंत्रपणे वरील रक्कम 30 दिवसात परत न
केल्यास त्या नंतर वरील रक्कमेवर द.सा.द.शे.09 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम
अदा होईपर्यंत द्यावी.
2) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशुल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्रभारी अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.