जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 33/2015 तक्रार नोंदणी दि. :-6/11/2015
तक्रार निकाली दि. :- 30/08/2016
निकाल कालावधी :-7 म. 24 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्री.रमनी अनिल मिस्त्री,
वय 32 वर्षे, धंदा-गाडी चालक मालक,
रा.बहादूरपूर, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) शाखाधिकारी,
बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा घोट, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली.
(2) कर्ज वसुली अधिकारी,
बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा घोट, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.रत्नघोष ठाकरे
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील :- अधि.श्री संजय देशमुख
गैरअर्जदार क्र.2 तर्फे :- अनुपस्थित
गणपूर्ती :- (1) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, अध्यक्ष (प्र.)
(2) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.झवेरी, अध्यक्ष (प्रभारी))
(पारीत दिनांक : 30 ऑगष्ट 2016)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्ता हा सुशिक्षित बेरोजगार असून, पुढील भविष्याकरीता गैरअर्जदार क्र.1 शी संपर्क करुन टाटा मॅजिक (चार चाकी वाहन) खरेदी करण्याकरीता कर्ज मिळण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी गेरअर्जदार क्र.1 यांनी, काही डाऊन पेमेंट केल्यानंतर कर्ज मिळेल असे सांगितले. त्यानुसार अर्जदाराने जयका मोटर्स लिमिटेड, चंद्रपूर यांचेकडून दिनांक 8.3.2010 ला कोटेशन घेतले त्यामध्ये टाटा मॅजिक या चारचाकी वाहनाची एकूण किंमत विम्यासह रुपये 3,31,787/- होती. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 च्या सांगण्यावरुन रुपये 10,000/- जयका मोटर्स लिमिटेड, चंद्रपूर येथे भरुन गाडी बुकींग केली व दिनांक 19.4.2010 ला रुपये 10,000/- अधिक रुपये 69,000/- व दिनांक 22.5.2010 ला रुपये 15,000/- व दिनांक 24.5.2010 ला रुपये 15,000/- असे एकूण रुपये 1,19,000/- गैरअर्जदार क्र.1 कडे भरुन डाऊन पेमेंटची प्रक्रिया पुर्ण केली. दिनांक 24.5.2010 ला भरलेलया रुपये 15,000/- ची पावती तत्कालीन शाखाधिकारी यांनी अर्जदारास दिली नाही. बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी यांनी रुपये 19,000/- डाऊन पेमेंट केल्याशिवाय उर्वरीत रकमेचा डिमांड ड्राफट मिळणार नाही असे सांगितले व डाऊन पेमेंट नंतर डिमांड ड्राफट दिला. त्यामुळे, अर्जदारानेसुध्दा आपण पुर्ण रक्कम भरली असे समजले. अर्जदाराने डाऊन पेमेंट रुपये 1,19,000/- केल्याने गाडीची एकूण किंमत रुपये 3,31,787/- मधून डाऊन पेमेंट वजा केल्यास रुपये 2,12,787/- एवढी रक्कम कर्ज म्हणून पाहिजे होती व अर्जदाराने सदर रकमेचे कर्ज घेवून टाटा मॅजिक चारचाकी वाहन नोंदणी क्र.एमएच-33/699, चेसीस क्र.एमएटी 445121 एव्हीडी 30518 खरेदी केले व सदर वाहन आजतागायत अर्जदाराचे मालकी व कब्जात असून सदर गाडीपासून येणा-या उत्पन्नातून अर्जदार नियमितपणे किस्ती भरत आहे. अर्जदारोन तत्कालीन शाखाधिकारी यांनी अर्जदारास कर्ज रकमेवरील व्याज पकडून रुपये 3,00,000/- भरावे लागतील व त्याकरीता रुपये 5,000/- प्रमाणे 60 महिन्यात कर्जफेड केल्यानंतर ना देय प्रमाणपत्र मिळेल असे सांगितले. अर्जदाराने नियमितपणे किस्त भरलेलया असून शेवटची किस्त दिनांक 25.9.2015 ला भरुन एकूण 3,00,600/- चा भरणा केला. अर्जदाराची सदर बँकेमध्ये रुपये 20,000/- ची मुदतठेव होती, ती सुध्दा गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराच्या कर्ज खात्यात वळती केली. त्यामुळे, अर्जदाराच्या कर्ज खात्यात रुपये 3,20,600/- चा भरणा झाला. अर्जदाराने ना देय प्रमाणपत्राची मागणी केली असता गैरअर्जदाराने एक पत्र देवून कर्जाची रक्कम रुपये 2,50,000/- व बाकी रक्कम रुपये 1,18,718/- (न लावलेल्या व्याजासह रक्कम रुपये 1,57,549/-) असे नमुद होते. अर्जदाराने नियमितपणे कर्जफेड केली असतांना व अर्जदाराने कधीही रुपये 2,50,000/- चे कर्ज घेतलेले नसतांना गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराची फसवणूक केली. अर्जदाराने दिनांक 15.9.2015 पर्यंत रुपये 3,20,600/- चा भरणा केला असतांना गैरअर्जदार क्र.1 चे प्रतिनिधी अर्जदाराचे घरी येऊन गाडी उचलून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत व गाडी उचलून नेण्याची धमकी देत आहे, गैरअर्जदार क्र.1 ची सदर कृती ही सेवेतील न्युनता आहे. त्यामुळे, अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली असून, गैरअर्जदार क्र.1 कर्ज रक्कम रुपये 2,12,787/- वर द.सा.द.शे. 11.62 टक्के प्रमाणे व्याज आकारुन अर्जदाराने भरणा केलेली जास्तीची रक्कम रुपये 20,600/- परत मिळण्यात यावी, गैरअर्जदाराने अर्जदारास नादेय प्रमाणपत्र व कर्ज मुक्ती प्रमाणपत्र देण्याचे निर्देश व्हावे, गैरअर्जदार क्र.1 व2 वा त्यांचे प्रतिनिधी यांनी अर्जदाराचे वाहन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु नये असा प्रतिबंधात्मक आदेश व्हावा, अर्जदाराची फिक्स डिपॉझिाटची रक्कम रुपये 20,000/- अर्जदाराचे संमतीशिवाय वळती केली असल्याने ती पुर्ववत फिक्स डिपॉझिाट म्हणून ठेवण्यात यावी व शारिरिक व मानसिक ञासापोटी रुपये 2,00,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 50,000/- व अर्जदाराने पंप दुरुस्तीसाठी अदा केलेली रक्कम रुपय 20,000/- गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.5 नुसार 58 अस्सल व झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.13 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 हे नोटीस प्राप्त होऊनही हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने स्वतः रुपये 10,000/- जयका मोटर्स लिमि.चंद्रपूर येथे भरुन गाडीची बुकींग केली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 19.4.2010 ला रुपये 10,000/- व रुपये 69,000/- असे एकूण रुपये 79,000/- व दिनांक 22.5.2010 ला रुपये 15,000/- अर्जदाराचे बचत खात्यात जमा केले. अर्जदाराने टाटा मॅजिक गाडी खरेदी करण्याकरीता गैरअर्जदाराकडे गाडीचे जयका मोटर्स, चंद्रपूर यांचे कोटेशन/दरपत्रक रुपये 3,31,787/- चे दाखल केले, या रकमेपैकी अर्जदाराने रुपये 10,000/- भरले असल्याने रुपये 3,21,787/- चा डिमांड ड्राफट अर्जदाराचे स्वाधीन केला. गैरअर्जदाराने अर्जदाराचे विनंतीवरुन रुपये 2,50,000/- चे कर्ज दिनांक 1.6.2010 ला मंजूर केले. अर्जदाराचे बचत खात्यात दिनांक 22.5.2010 रोजी रुपये 93,915/- बाकी होते. गैरअर्जदार बँकेने दिनांक 1.6.2010 रोजी कर्ज रक्कम रुपये 2,50,000/- व बचत खात्यातील एकूण जमा रक्कम 3,43,915/- पैकी रुपये 3,21,787/- चा डिमांड ड्राफट जयका मोटर्स, चंद्रपूर यांचे नावे काढला. सदर रक्कम काढल्यानंतर अर्जदाराचे खात्यात रुपये 22,128/- बाकी होते व अर्जदाराने दिनांक 9.6.2010 ला रुपये 20,000/- बचत खात्यातून काढून फिक्स डिपॉझिट केले. गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेले कर्ज रुपये 2,50,000/- दिनांक 1.6.2010 ला मंजूर केले. कर्जाची परतफेड रुपये 5,450/- दरमहा प्रमाणे करावयाची होती व सदर कर्जावर द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याजाची आकारणी करण्यात येणार होती. कर्जाचे हप्त वेळेवर भरणा न केल्यास थकीत रकमेवर 2 टक्के दंड आकरणी करण्यात येणार होती. सदर बाबींची कल्पना अर्जदारास देण्यात आलेली होती व अर्जदाराची त्यास संमती असल्यामुळे, त्याबाबतच्या दस्तऐवजावर सही केलेली आहे. अर्जदाराचे मुदतठेव प्रमाणपत्राची रक्कम रुपये 20,000/- व्याजासह रुपये 22,968/- ही रक्कम अर्जदाराचे खाते अनियमित झाल्यामुळे दिनांक 21.12.2002 ला कर्जखात्यात वळते करण्यात आले.
गैरअर्जदार क्र.1 ने पुढे विशेष कथनामध्ये असे नमुद केले की, गैरअर्जदार क्र.1 बँक ही राष्ट्रीयकृत बँक असून बँकेचा व्यवहार कोअर बँकींग सोल्युशन या संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात येते. या प्रणालीनुसार कर्जदाराने आपले कर्ज खात्यात रक्कम जमा केल्यानंतर किती रक्कम व्याजामध्ये वळती करावी व किती रक्कम मुद्दल मध्ये वळती करावी हे कोअर बँकींग सोल्युशन नुसार ठरविलेली आहे. त्यामुळे व्याजाच्या दरात व दंड आकारण्याचे बाबतीत आवश्यक ती सुविधा संगणकीय प्रणालीव्दारे होते, त्यात ढवळाढवळ करणे शक्य नाही. अर्जदाराला कर्जाची रक्कम दरमहा रुपये 5,450/- प्रमाणे परतफेड करावयाची होती परंतु, त्याप्रमाणे अर्जदाराने परतफेड केली नाही. अर्जदाराने सर्वप्रथम दिनांक 26.6.2010 ला रुपये 5,000/- कर्ज खात्यात जमा केले व त्यानंतर अर्जदाराने ज्या ज्या तारखेला जी जी रक्कम त्याचे कर्ज खात्यात जमा केली त्याचे दिनांक 15.9.2015 पर्यंत विवरण गैरअर्जदार दाखल करीत आहे व दिनांक 15.9.2015 ला अर्जदाराकडे रुपये 95,114.08/- कर्ज शिल्लक आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खोटी व बनावटी असल्यामुळे खर्चासह खारीज करण्यात यावी,अशी मागणी केली आहे.
4. गैरअर्जदार क्र.2 ला नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी मंचासमोर हजर न झाल्यामुळे व लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे, त्यांचेविरुध्द दिनांक 8.2.2016 रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
5. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : नाही
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.2 चा ग्राहक आहे काय ः नाही
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराचे गैरअर्जदार कं.1 च्या बँकेत खाते असून व अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 च्या बँकेतून कर्ज घेतले असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे, हे सिध्द होते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. गैरअर्जदार क्र.1 व्दारे दाखल नि.क्र.25 वरील दस्तऐवजावरुन सिध्द होते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून कर्ज रुपये 2,50,000/- 60 हप्त्यात (महिन्यात) परतफेड करण्याचे करार केले होते. त्यानुसार गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराचे बचत खात्यात एकूण जमा रक्कम रुपये 93,915/- व कर्ज रक्कम रुपये 2,50,000/- एकूण रुपये 3,43,915/- पैकी रुपये 3,21,787/- चा डी.डी. अर्जदाराने काढून जयका मोटर्स च्या नावाने काढून गाडी घेतली. उर्वरीत रकमेमधून दिनांक 9.6.2010 ला रुपये 20,000/- ची मुदतठेव केलेली आहे, हे गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दस्तऐवज नि.क्र.14 नुसार सिध्द होते. अर्जदाराचे हे म्हणणे की, गैरअर्जदार क्र.1 चे तत्कालीन शाखाधिकारी यांनी अर्जदाराकडून घेतलेले रुपये 15,000/- ची पावती दिली नाही, गृहीत धरण्यासारखे नाही. कारण अर्जदाराने याबाबत कोणतीही लेखी तक्रार गैरअर्जदाराकडे केलेली नाही किंवा पोलीस तक्रार सुध्दा नाही.
8. गैरअर्जदार क्र.1 ने दाखल नि.क्र.14 नुसार दस्तऐवज क्र.2 वरुन असे सिध्द होते की, अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल कर्ज खात्याच्या पावत्या व गैरअर्जदाराचे खाते विवरण बरोबर असून अर्जदाराकडील खाते विवरणानुसार कर्जाची थकीत रक्कम दिनांक 15.9.2015 ला रुपये 95,114.08/- बाकी आहे व अर्जदाराने सदर खाते विवरण नाकारले नाही तसेच खाते विवरणमध्ये बाकी असलेली रक्कम भरण्याचे कोणतेही पुरावा सादर केले नसल्यामुळे अर्जदाराकडे गैरअर्जदार क्र.1 चे कर्ज थकीत आहे, हे सिध्द होते. अर्जदाराने कर्जाची रक्कम पुर्ण भरण्याचे कोणतेही विवरण दस्तऐवज दाखल केले नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदारास कोणतीही त्रृटीपुर्ण सेवा किंवा अनुचित व्यापार पध्दत अवलंबिलेली आहे, असे सिध्द होत नाही, म्हणून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
(3)
गडचिरोली.
दिनांक – 30.8.2016.
( रोझा फु.खोब्रागडे ) (सादिक मो.झवेरी)
सदस्य अध्यक्ष (प्र.)