::: आदेश निशाणी क्र. 1 वर ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक :01.07.2011) अर्जदार क्र.1 व 2 ने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 सह 14 अन्वये दाखल केली आहे. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आला. गै.अ.स नोटीस तामील झाल्याचा अहवाल नि.6 वर प्राप्त झाला. परंतु, गै.अ. हजर झाला नाही. तक्रार न्यायमंचात न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार क्र.1 व 2 यांचे सहीने त्यांचे वकील यांनी हजर होऊन नि.7 नुसार पुरसीस दखल करुन, तक्रारीमध्ये अर्जदार व गै.अ. यांचेमध्ये कोर्टाच्या बाहेर आपसी समझौता झालेला आहे. त्यानुसार गै.अ. बँकेने रुपये 19,188/- चा धनादेश क्र.000219 दि.9.6.2011 प्रमाणे रक्कम दिली आहे. अर्जदार व गै.अ. यांचेत कोणताही वाद राहिला नाही, अशी पुरसीस दाखल केली. परंतु, नि.7 वरील पुरसीसचे अनुषंगाने अर्जदार क्र.1 व 2 चा पुकारा केला असता, अर्जदार क्र. 1 हजर झाले नाही. त्यामुळे, प्रकरण अर्जदाराचे हजेरी करीता दि.1.7.2011 रोजी ठेवण्यात आले. अर्जदार क्र.1 व 2 व त्याचे वकील यांनी नि.8 नुसार आज रोजी हजर होऊन, हजर असल्याची पुरसीस दाखल केली. न्यायमंचाने, अर्जदारास नि.7 चे पुरसीस मधील मजकुराबाबत विचारणा केले असता, बरोबर असल्याचे मान्य केले. तक्रार काढून टाकण्याची विनंती केली. सबब, तक्रार परत घेतल्याने, अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदारांनी तक्रार परत घेतल्यामुळे निकाली. (By way of withdrawal ) (2) अर्जदार व गै.अ. यांनी आप आपला खर्च सहन करावा. (3) अर्जदार व गैरअर्जदारास आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |