(मंचाचे निनर्णयान्वये, अनिल एन. कांबळे, अध्यक्ष,प्रभारी)
(पारीत दिनांक : 13 फेब्रूवारी 2009)
1. अर्जदाराने, सदरची तक्रार, गैरअर्जदाराचे विरुध्द 4/5/1998 ला दाखल केलेली आहे. सदर तक्रारीत आदेश 31/8/1999 ला पारीत करण्यात आले होते. अर्जदाराने सदर आदेशाचे विरुध्द, मा. राज्य आयोग यांचेकडे अपील दाखल करण्यात आले होते. सदर अपीलात, मा. राज्य आयोग, सर्कीट बेंच, नागपूर यांचा आदेश दिनांक 8/7/2008 नुसार तक्रार
... 2 ...
... 2 ...
पुन्हा चालविण्याकरीता पाठविण्यात आले. मा. राज्य आयोगाकडून आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाला नविन नोंदणी क्रमांक देऊन अर्जदार व गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. अर्जदार व गैरअर्जदार हजर होऊन आप-आपले म्हणणे सादर केले.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे.
2. अर्जदाराने, खरिप पिक कर्ज घेण्याकरीता गैरअर्जदाराकडे दि. 14/6/1993 ला सोने गाहाण ठेवले होते. अर्जदार गाहाण ठेवलेले सोने सोडविण्याकरीता 4/1/1994 ला गैरअर्जदार बँकेत गेला असता, व्यवस्थापकाने सांगीतले की, तुमचा जुना खरिप पिक कर्ज अगोदर भरा व नंतर गाहाण सोडवा असे सांगीतले असता अर्जदार म्हणला की, माझे खरिप पिक कर्ज, शासनाच्या ग्रामीण कृषी कर्ज माफी योजना 1990 नुसार माफ झाले आहे, त्याचा गाहाण सोडविण्याशी काहीही संबंध नाही, असे सांगूनही गैरअर्जदाराचा व्यवस्थापक ऐकाला तयार झाला नाही. याबाबत, अर्जदारानी वारंवार विचारणा केली, उलट बँकेने दूस-या बँकेत पञव्यवहार करुन अर्जदारास कर्ज देऊ नये असे कळविले म्हणून अर्जदार आपल्या शेतीमध्ये सुधारणा करु शकला नाही. गैरअर्जदाराकडे गहाण ठेवलेले सोना (आभूषण), गैरअर्जदाराने न दिल्यामुळे इतरञ गाहाण ठेऊ शकला नाही, आणि म्हणून सन 1994 पासून शेतीच्या उत्पादनाचे भंयकर नुकसान होऊन, त्याचा परिणाम कुंटूंबावर होऊन अर्जदार हवालदिल झाला. अर्जदारास शासनाच्या शेती सुधारणेचे सवलती पासून वंचीत व्हावे लागले. अर्जदाराजवळ सोना (आभूषण) असते तर कोठेही गाहाण ठेवून शेती सुधारणा करुन, शेतात इनवेल बोर, सब मर्शीबल पंप, पाईप, शेताला काटेरी कुंपन, सुधारीत बाग-बागायत करुन उत्पादन वाढविले असते. परंतु, गैरअर्जदाराच्या कृत्यामुळे अर्जदारास नुकसान झाले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराकडून 1,50,000/-, प्रवास खर्च रुपये 500/-, इतर प्रत्यक्ष खर्च रुपये 500/- आणि शारीरीक, मानसिक ञासाबाबत रुपये 15,000/- असे एकुण एकंदरीत नुकसानभरपाई म्हणून रुपये 1,66,000/- गैरअर्जदाराकडून वसुल करुन देण्यात यावे, अशी मागणी आपले तक्रारीत केलेली आहे.
... 3 ...
... 3 ...
3. अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्ठयर्थ निशाणी 2 नुसार गैरअर्जदाराने दिलेल्या पञाची प्रत दाखल केली आहे. अर्जदाराने, गैरअर्जदारास दिलेल्या नोटीसाची प्रत निशाणी 3 वर दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन, निशाणी 6 नुसार आपला लेखी बयाण दाखल केलेले आहे.
4. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाण विशेष कथनासहीत दाखल करुन अर्जदाराने दिनांक 14/6/1993 ला खरिप पिकाकरीता सोने गहान ठेवून कर्ज घेतले हे कबूल केले. गैरअर्जदाराचे कथन की, तो ते गहाण सोडविण्यास 4/1/1994 ला गेला असता, व्यवस्थापकानी त्याला तुम्ही तुमचे जुने खरिप कर्ज अगोदर भरा नंतर सोना सोडवा असे म्हणाले, हे म्हणणे ना कबूल केले आहे. अर्जदार कर्जाची रक्कम भरण्यास कधीही आला नाही. गैरअर्जदार बँकेने अर्जदारास वारंवार समजावून देऊन, अर्जदार कर्ज माफीस पाञ नसल्याने कर्ज माफी मिळू शकत नसल्याचे समजाविले. अर्जदार कर्जाच्या रकमेची फेड करुन आभुषण सोडविण्यास न आल्यामुळे, गैरअर्जदार बँकेने त्याला नोटीस देखील पाठविले होते. अर्जदारास वारंवार सुचना करुन देखील कर्जाच्या रकमेची परतफेड केली नाही आणि हेतुपुरस्परपणे कर्जाची परतफेड करणे टाळले. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराचा अर्ज बँकेचे थकीत कर्ज फेडण्याचे आदेशासहीत खारीज करण्यात यावा.
5. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणासोबत निशाणी 7 वर खाता क्र. GL/2/9 वर खाते उताराची झेरॉक्सप्रत दाखल केलेली आहे. अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्ठयर्थ निशाणी 10 नुसार शपथपञ दाखल केला आहे, आणि तक्रार मा. राज्य आयोगाकडून परत आल्यानंतर निशाणी 19 नुसार शपथपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणातील कथना पृष्ठयर्थ निशाणी 9 नुसार शपथपञ दाखल केला. तसेच, निशाणी 23 नुसार शपथपञ दाखल केली आहे. अर्जदाराच्या
... 4 ...
... 4 ...
वकीलानी निशाणी 26 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला व गैरअर्जदाराचे वकीलानी आपले तोंडी युक्तीवाद केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज आणि उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्द उपस्थित होतात.
मुद्दे : उत्तर
(1) गैरअर्जदाराने, अर्जदारास सेवा देण्यात ञृटी : नाही.
केली आहे काय ?
(2) अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे : नाही.
काय ?
(3) या तक्रारीचा अंतिम निकाला काय ? : अंतिम ओदशाप्रमाणे.
// कारण मिमांसा //
मुद्दा क्रमांक 1 व 2 :–
6. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून 14/6/93 ला खरिप पिकाकरीता सोने गाहाण ठेवून कर्ज घेतले होते, ही बाब गैरअर्जदाराने मान्य केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात पिक कर्जाकरीता गाहाण ठेवलेला सोना गैरअर्जदार बँकेने कायदेशिर बाबीचा अवलंब न करता लिलाव केला, या बाबतचा वाद आहे. अर्जदाराने आपले तक्रारीत असे म्हटले आहे की, 4/1/1994 ला गैरअर्जदाराकडे खरिप पिकाकरीता गाहाण ठेवलेला सोना सोडविण्याकरीता गेला असता, गैरअर्जदार बँकेच्या व्यवस्थापकाने आधी जुन्या कर्जाचा भरणा करा, त्यानंतर गाहाण सोडवा असे सांगितले, परंतु, ही बाब दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होत नाही. अर्जदारानेच आपले तक्रारीसोबत निशाणी 2 वर गैरअर्जदार बँकेने 26/12/1997 ला पञ देवून कळविले की, स्वर्णाभूषण गाहाण ठेवून रुपये 5,000/- कर्ज घेतले, त्याचा 30/9/1997 पर्यंत व्याजासह आकारणी केल्यानंतर रुपये 8,582/- थकीत झालेली आहे. तरी आपण पञ मिळाल्यापासून 15 दिवसात रक्कम
... 5 ...
... 5 ...
भरलेली नाही तर, जाहीर लिलाव करुन कर्ज वसुल केले जाईल. अर्जदारास या आशयाचा नोटीस देण्यात आला. गैरअर्जदार बँकेने त्यानंतर 26/8/99 ला पञ देऊन खरिप पिक कर्जाकरीता गाहाण ठेवलेला सोना, नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसात भरणा करावा, अन्यथा सोना (आभूषण) विकून खाते बंद केले जाईल व होणा-या नुकसानीस, बँक जबाबदार राहणार नाही. या आशयाचे पञ अर्जदारास देण्यात आले, त्या पञाची प्रत निशाणी 27 नुसार गैरअर्जदाराने दाखल केला आहे व तो पञ अर्जदारास 17/9/99 ला मिळाला असल्याबाबतची पोचपावती गैरअर्जदाराने दाखल केलेली आहे. तसेच, गैरअर्जदाराने नोंदणीकृत पोचपावतीसह पञाव्दारे 25/11/99 ला पञ देण्यात आले, त्यामध्ये 29/12/99 पर्यंत सुवर्ण ऋण खात्यात रक्कम जमा करावी, अन्यथा कोणताही नोटीस न देता विक्री करण्यात येईल, या आशयाचे पञ देण्यात आले. त्याबद्दलची पोचपावती झेरॉक्सप्रत गैरअर्जदाराने दाखल केलेली आहे. यावरुन, गैरअर्जदार यांनी लिलाव करण्याचे पूर्वी अर्जदारास पुरेपूर संधी देवून कर्ज रकमेची मागणी केली, त्यात बेकायदेशिरपणे कुठलीही कार्यवाही केली नाही, असे दाखल दसताऐवजावरुन दिसून येत असल्यामुळे सेवा देण्यात ञृटी केली असे म्हणता येत नाही.
7. अर्जदाराचे तक्रारी नुसार गैरअर्जदार बँकेत 4/1/1994 ला सुवर्ण तारण सोडविण्याकरीता किसन रामाजी खंडारकर, राह.वैरागड, तह. आरमोरी, जिल्हा – गडचिरोली यांचे सोबत बँकेत पैसे भरण्याकरीता गेला असता, बँक व्यवस्थापकाने सांगीतले की, प्रथम तुमचेवर असलेले पिक कर्ज भरा तरच तुमचे सोने परत करतो, या आशयाचे शपथपञ तक्रार क्र. 20/2008 मध्ये अर्जदाराने निशाणी 30 वरील दस्ताऐवजाचे यादीनुसार झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. सदर झेरॉक्स प्रतीवर दाखल केलेला शपथपञ आणि तो ही कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडून सत्यापनावर केला असलेला शपथपञ ‘‘पुरावा कायद्याचे’’ तरतुदी नुसार ठोस पुरावा म्हणून ग्राहय धरण्यास पाञ नाही. अर्जदारासोबत किसन रामाजी खंडारकर, गैरअर्जदार बँकेत गेला होता की नाही याची सत्यता पुढे येण्यासाठी कोर्टासमक्ष उलट तपासणी होऊन सखोल पुरावा घेणे आवश्यक असल्यामुळे
... 6 ...
... 6 ...
समरी पध्दतीने सदर तक्रार निकाली काढणे न्यायोचित होणार नाही, असे या न्यायमंचाचे मत आहे. या कारणावरुनही अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे.
8. अर्जदाराने, गैरअर्जदारास दिनांक 30/11/1998 ला पञ देवून ग्राहक तक्रार क्रमांक 25/1998 व 26/1998 चा आदेश होत नाही, तोपर्यंत कार्यवाही स्थगीत करावी, अशी विनंती आपले पञातून केली आहे, तो पञ तक्रार क्रमांक 20/2008 मध्ये निशाणी 11 वर दाखल आहे. सदर पञाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार बँकेने अॅड. डी.डी. संतोषवार यांचे मार्फत सुवर्ण ऋण कर्जाची मागणी केले असल्याचे गैरअर्जदाराने मान्य केले आहे. तसेच, गैरअर्जदाराने 25/11/98 सुवर्ण आभुषणाबाबत नोटीस दिला असल्याचे ही मान्य केले आहे. तसेच, गैरअर्जदार बँकेने वेळोवेळी नोटीस देवून सुवर्ण ऋण कर्जाची मागणी केली असल्यामुळे गैरअर्जदाराने आपली कायेदशिर जबाबदारी पार पाडून सुवर्ण लिलाव ग्राहक मंचातील तक्रार क्रमांक 25/98 आणि 26/98 चा आदेश दिनांक 31/8/98 च्या नंतरच केला असल्याचे, गैरअर्जदाराचे पञ दिनांक 25/11/99 वरुन स्पष्ट होतो. त्यामुळे, गैरअर्जदाराने कोणतेही बेकायदेशिर कृत्य करुन अर्जदारास सेवा देण्यात ञृटी केलेली नाही, असे या न्यायमंचाचे ठाम मत असल्यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही.
9. अर्जदाराची वकील अॅड. वासंती रिनके हिने अर्जदाराचे शपथपञात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, अर्जदार हा अडाणी, कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे आपले तक्रारीत योग्यप्रकारे नोंदी तक्रार दाखल करतेवेळी घेतलेल्या नाही. त्यामुळे, आपले शपथपञात नविन मुद्दा उपस्थित केला जो पूर्वीचा शपथपञ निशाणी 10 मध्ये नमुद नाही आणि तशी दुरुस्ती ही आपले मुळ तक्रारीत केलेली नाही. त्यामुळे अर्जदाराने आपले शपथपञात जे नविन मुद्दे घेतले ते ग्राह्य धरण्यास पाञ नाही. अर्जदाराने, आपले शपथपञात निशाणी 19 मधील पॅरा 4 मध्ये असा मुद्दा उपस्थित केला आहे की, गैरअर्जदार बँकेने पूर्वी सुचना न देता लिलाव केला आहे. हे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही, याबद्दल या पूर्वीच्या परिच्छेदात वर्णन
... 7 ...
... 7 ...
केले आहे. अर्जदाराने आपले शपथपञात निशाणी 19 मध्ये असा मुद्दा उपस्थित केला आहे की, कायद्याप्रमाणे कोर्टामध्ये केस चालु असतांना, कोर्टाची परवानगी घेतल्या शिवाय वादातील, संपतीचा लिलाव लावणे, नियमबाह्य आहे. हे अर्जदाराचे म्हणणे उपलब्ध रेकार्डवरुन ग्राह्य धरण्यास पाञ नाही. गैरअर्जदाराचे म्हणणे नुसार 25/98 व 26/98 चा आदेश होई पर्यंत कार्यवाही स्थगीत करावी अशी जी मागणी केली, त्यानुसार गैरअर्जदाराने या तक्रारीचा निकाल लागेपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे दाखल दस्ताऐवजावरुन व नोटीसावरुन सिध्द होतो.
10. अर्जदार हा शेतकरी व कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे त्याने सर्व बाबी तक्रारीमध्ये नमुद करणे आवश्यक वाटले नसावे, हे अर्जदाराच्या वकीलाचे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही. अर्जदार हा जाणकार असून तक्रार क्रमांक 20/2008 मध्ये निशाणी 11 वर दाखल केलेले पञ स्वहस्ताक्षरात असून, सुव्यवस्थीतपणे लिहिलेला आहे. त्यामुळे, तो अडाणी व त्याला कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे नमुद करणे आवश्यक वाटले नसावे, हे न्यायोचित नाही. अर्जदाराने आपले तक्रारीत केलेली मागणी मंजुर करण्यास पाञ नसल्यामुळे मानसिक, शारीरीक ञासापोटी खर्च मिळण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमयंच आले असल्यामुळे अर्जदारास मानसिक, शारीरीक ञास झाला हे सिध्द होत नाही.
11. गैरअर्जदाराचे वकीलानी आपले तोंडी युक्तीवादात मुदतीचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, गैरअर्जदाराच्या वकीलाचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही. अर्जदाराने सन 1998 पर्यंत पञ व्यवहार केलेला आहे, तसेच गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणात निशाणी 9 मध्ये उपस्थित केलेला नाही व आता तो मुद्दा शपथपञात उपस्थित करणे न्यायोचित नाही. त्यामुळे, सदर मुद्दा ग्राह्य धरण्यास पाञ नाही.
12. गैरअर्जदाराचे वकीलानी आपले तोंडी युक्तीवादात असा मुद्दा उपस्थित केला की, भारतीय करार कायदा (Law Contract) चे कलम 171 नुसार लिन असलेले कर्जाकरीता तारण ठेवलेली वस्तु दोन्ही पक्षात झालेल्या करारानुसार विल्हेवाट करण्याचा अधिकार आहे, असे सांगीतले.
... 8 ...
... 8 ...
गैरअर्जदाराचे वरील म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे. अर्जदाराने, खरिप कर्ज घेण्याकरीता सुवर्ण गाहाण ठेवले होते, त्या कर्जाची परतफेड न केल्यामुळेच कायदेशिर बाबीचा अवलंब करुन लिलाव करुन कर्जाची वसुली केली असल्यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 :–
13. मुद्दा क्रमांक 1 व 2 च्या विवेचनावरुन अर्जदाराच्या तक्रारीत खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :–13/02/2009.