Maharashtra

Bhandara

CC/18/41

SAYATRABAI GOCHI PARTEKI - Complainant(s)

Versus

Branch Manager, Bank Of India .BHANDARA - Opp.Party(s)

MR.P.N. SANGIDWAR

20 Jul 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/41
( Date of Filing : 23 Jul 2018 )
 
1. SAYATRABAI GOCHI PARTEKI
R/O MURDOLI TA.DEORI. DISTT.GONDIA
Gondia
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Bank Of India .BHANDARA
BRANCH.BHANDARA
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR.P.N. SANGIDWAR , Advocate
For the Opp. Party:
Dated : 20 Jul 2019
Final Order / Judgement

                                                                     (पारीत व्‍दारा श्री. भास्‍कर बी. योगी, मा. अध्‍यक्ष)

                                                                               (पारीत दिनांक– 20 जुलै, 2019)   

 

01. तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द तिचे दोन्‍ही मुदतीठेवीची रक्‍कम परत मिळण्‍या बाबत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्ती ही सध्‍या विवाहित असून ती अज्ञानी असताना तिचे विवाहापूर्वीच वडील श्री गोची परतेकी याचा अपघाती मृत्‍यू झाला होता, त्‍या संबधात तक्रारकर्तीचे काका श्री पंडी जीवन परतेकी यांनी मोटर वाहन अपघात प्राधिकरण भंडारा येथे न्‍यायीक प्रकरण दाखल केले होते. सदर अपघात प्रकरणा मध्‍ये मोटर वाहन अपघात दावा प्राधिकरण भंडारा यांचे आदेशान्‍वये तक्रारकर्तीला व तिचे काकाला मृतक श्री गोची परतेकी याचे अपघाती मृत्‍यू संबधात पैसे मिळाले होते. सदर नुकसान भरपाईची रक्‍कम तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष बँके मध्‍ये  मुदतीठेवी मध्‍ये गुंतवणूक केली होती.

     तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिला मिळालेल्‍या नुकसान भरपाईच्‍या रकमे बाबत तिने विरुध्‍दपक्ष बँक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथे दिनांक-24.04.1996 ला स्‍वतःचे नावाचे बचत खाते उघडले होते, सदर  खात्‍याचा क्रमांक-015108 असा आहे. सदर खात्‍यामध्‍ये तिने दिनांक-25.04.1996 रोजी मुदतठेव क्रं-183 अन्‍वये रुपये-30,000/- आणि मुदतठेव क्रं-186 अन्‍वये रुपये-3000/-अशा रकमा गुंतवणूक केल्‍या होत्‍या त्‍यामुळे तक्रारकर्ती ही  विरुध्‍दपक्ष बँकेची ग्राहक आहे.

   तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, दरम्‍यानचे काळात सदर मुदतठेवीची रक्‍कम बँकेतच जमा असल्‍याने व तिला पैशाची गरज नसल्‍याने तिने मुदतठेवी संबधी विरुध्‍दपक्ष बँके मध्‍ये जाऊन चौकशी केली नाही परंतु दिनांक-25.04.2016 रोजी विरुध्‍दपक्ष बँकेनी तिचे काका श्री पंडी जीवन परतेकी याचे नावाने एक पत्र पाठवून त्‍याव्‍दारे त्‍याचे बँक खाते हे निष्‍क्रीय असल्‍याचे नमुद करुन ते पुन्‍हा सुरु करण्‍यासाठी आधारकॉर्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड व दोन फोटो अशा दस्‍तऐवजाची मागणी केली होती, त्‍यानुसार तक्रारकर्तीचे काकाने व तक्रारकर्तीने सदर मागणीची पुर्तता विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या शाखेमध्‍ये भेट देऊन केली आणि मुदतठेव रकमेची विचारणा केली असता रेकॉर्ड पाहून ठेवतो, नंतर या असे उत्‍तर विरुध्‍दपक्ष बँके तर्फे मिळाले. परंतु त्‍या नंतर सुध्‍दा तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष बँके मध्‍ये वेळोवेळी भेटी देऊन मुदतठेवीची रक्‍कम मिळण्‍यास विनंती केली असता टाळाटाळ करण्‍यात आली.

     तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, दिनांक-25.04.1996 रोजी मुदतठेव क्रं-183 अन्‍वये रुपये-30,000/- गुंतवणूक केलेल्‍या मुदतठेवीचा कालावधी हा एकूण 06 वर्षा करीता असल्‍याने सदर मुदतठेव ही  दिनांक-25.04.2002 रोजी  परिपक्‍व झाली होती. तर मुदतठेव क्रं-186 अन्‍वये रुपये-3000/-गुंतवणूक केलेल्‍या मुदतठेवीचा कालावधी हा एकूण 03 वर्षा करीता  असल्‍याने सदर मुदतठेव दिनांक-25.04.1999 रोजी परिपक्‍व झाली होती. तक्रारकर्तीला मुदतठेवींची परिपक्‍वता तिथी उलटून गेल्‍या नंतर सदर मुदतठेवीची रक्‍कम पुर्नगुंतवणूक करावी लागते याची कल्‍पना नव्‍हती. विरुध्‍दपक्ष बँकेनीच परिपक्‍वता तिथी उलटून गेल्‍या नंतर मुदतठेवीचा कालावधी वाढवावा किंवा कसे? अशी माहिती तक्रारकर्तीला देणे क्रमप्राप्‍त होते. दरम्‍यानचे काळात तक्रारकर्तीला मुदतठेवीचे रकमेची आवश्‍यकता नसल्‍याने तिने विरुध्‍दपक्ष बँके मध्‍ये जाऊन रक्‍कम काढण्‍याचा प्रयत्‍न केला नव्‍हता परंतु दिनांक-13.12.2016 रोजी तक्रारकर्तीला मुदतठेवीच्‍या रकमेची गरज भासल्‍याने तिने त्‍या दिवशी व नंतर वेळोवेळी विरुध्‍दपक्ष बँकेत जाऊन सदर मुदतठेवीच्‍या रकमेची मागणी केली परंतु विरुध्‍दपक्ष बँके तर्फे सदर मुदतठेवीची रक्‍कम देण्‍यास प्रत्‍येक वेळी टाळाटाळ करण्‍यात आली. शेवटी विरुध्‍दपक्ष बँके कडून दिनांक-03.05.2017 रोजी सदर मुदतठेवीचे कागदपत्रे दिसत नसल्‍याचे कारण सांगून रक्‍कम देण्‍यास नकार दिला, म्‍हणून शेवटी तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

(01)  विरुध्‍दपक्ष बँकेला आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीला मुदतठेव क्रं-183 अन्‍वये रुपये-30,000/- तसेच मुदतठेव क्रं-186 अन्‍वये रुपये-3000/-गुंतवणूक केलेल्‍या मुदतठेवींच्‍या रकमा आणि या रकमांवर दिनांक-25.04.1996 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-13 टक्‍के दराने व्‍याज यासह तक्रारकर्तीला परत करावेत.

(02)   तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-50,000/- एवढी रक्‍कम विरुध्‍दपक्ष बँकेनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(03)   विरुध्‍दपक्ष बँकेनी तक्रारकर्तीला तक्रारीचा खर्च देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(04)   या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्तीचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.   विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या नावाने उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविण्‍यात आली. सदर ग्राहक मंचाची रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस विरुध्‍दपक्ष बँकेला मिळाल्‍या बाबत मूळ रजिस्‍टर पोच पान क्रं 21 वर दाखल असून सदर नोटीस बँकेला मिळाल्‍या बाबत त्‍यावर विरुध्‍दपक्ष बँकेचा शिक्‍का व सही आहे. परंतु ग्राहक मंचाची रजि.नोटीस मिळूनही विरुध्‍दपक्ष बँके तर्फे कोणीही ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा कोणतेही लेखी निवेदन ग्राहक मंचा समोर दाखल केलेले नाही महणून विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द  तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश प्रकरणात  दिनांक-04.01.2019 रोजी पारीत करण्‍यात आला.

04.   तक्रारकर्तीने पान क्रं 13 वरील यादी नुसार अक्रं 01 ते 03 प्रमाणे दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने दोन्‍ही मुदतठेवीच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती तसेच त.क.च्‍या विवाहा नंतरच्‍या नावाचे आधारकॉर्डाची प्रत अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्तीने पान क्रं 23 ते 27 वर स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 28 ते 32 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

05   तक्रारकर्ती तर्फे वकील श्री पी.एन.संगीडवार यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. विरुध्‍दपक्ष बँके तर्फे कोणीही मौखीक युक्‍तीवादाचे वेळी उपस्थित नव्‍हते. विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द प्रकरणात यापूर्वीच एकतर्फी आदेश पारीत झालेला आहे.

06.   तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व तिने दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजांचे अवलोकन मंचाव्‍दारे करण्‍यात आले, त्‍यावरुन ग्राहक मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-

                                                                         :: निष्‍कर्ष ::

07.   तक्रारकर्तीने पान क्रं 14 व 15 वर दोन मुदतठेवीच्‍या पावत्‍यांच्‍या  प्रत पुराव्‍यार्थ दाखल केल्‍यात त्‍यावरुन असे दिसून येते की-

       पान क्रं 14 वरील दाखल मुदतठेवीचे प्रतीवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ती कु.सायत्राबाई गोची परतेकी (अज्ञान असताना) तिचे  नावाने विरुध्‍दपक्ष बँक ऑफ इंडीया येथे मुदतठेव पावती क्रं-183 अन्‍वये रुपये-30,000/- एवढी रककम दिनांक-25.04.1996 ला गुंतवणूक केली होती आणि सदर मुदतठेवीवर परिपक्‍वता तिथी 25.04.2002 (एकूण सहा वर्ष) असे नमुद केलेले असून व्‍याजाचा दर प्रतीवर्ष 13 टक्‍के नमुद आहे. सहा वर्षा नंतर सदर मुदतठेवीवर परिपक्‍वता मुल्‍य रुपये-64,650/- असे नमुद केलेले आहे.

      पान क्रं 15 वरील दाखल मुदतठेवीचे प्रतीवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ती कु.सायत्राबाई गोची परतेकी (अज्ञान असताना) तिचे नावाने विरुध्‍दपक्ष बँक ऑफ इंडीया येथे मुदतठेव पावती क्रं-186 अन्‍वये रुपये-3000/- एवढी रककम दिनांक-25.04.1996 ला गुंतवणूक केली होती आणि सदर मुदतठेवीवर परिपक्‍वता तिथी 25.04.1999 (एकूण तीन वर्ष) असे नमुद केलेले असून व्‍याजाचा दर प्रतीवर्ष 13 टक्‍के नमुद आहे. तीन वर्षा नंतर सदर मुदतठेवीवर परिपक्‍वता मुल्‍य रुपये-4404/- असे नमुद केलेले आहे.

08.   तक्रारकर्तीने पान क्रं 16 वर तिचे नावाची आधारकॉर्डची प्रत दाखल केली त्‍यामध्‍ये विवाहा नंतर तिचे नाव शीतल धनराज मरसकोल्‍हे असे नमुद आहे.

09.   तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे तिने परिच्‍छेद क्रं 07 मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे विरुध्‍दपक्ष बँके मध्‍ये मुदतठेवीच्‍या रकमा गुंतवणूक केल्‍या होत्‍या.

10.    तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे तिला रकमेची आवश्‍यकता नसल्‍याने पुढे तिने दोन्‍ही मुदतठेवीच्‍या  परिपक्‍वता तिथी उलटून गेल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष बँकेत जाऊन मुदतठेवीची चौकशी केली नाही आणि त्‍या रकमा तशाच बँकेत पडून होत्‍या. नंतर तिने दिनांक-13.12.2016 रोजी मुदतठेवीच्‍या रकमेची विरुध्‍दपक्ष बँकेत जाऊन मागणी केली परंतु रेकॉर्ड पहावा लागेल नंतर या अशी कारणे विरुध्‍दपक्ष बँकेव्‍दारे देण्‍यात आलीत व दिनांक-13.05.2017 रोजी रेकॉर्ड दिसत नसल्‍याचे कारण पुढे करुन मुदतठेवीची रक्‍कम देण्‍यास विरुध्‍दपक्ष बँके कडून देण्‍यास नकार देण्‍यात आला. परंतु या आरोपाचे संदर्भात तक्रारकर्तीने   दिनांक-13.12.2016 रोजी विरुध्‍दपक्ष बँकेत जाऊन मुदतठेव रकमेची मागणी केल्‍या बाबत कोणताही लेखी पुरावा (विरुध्‍दपक्ष बँकेला रकमेची मागणी करणारे पत्र इत्‍यादी ) दाखल केलेला नाही.

11.   तक्रारकर्तीचे प्रामुख्‍याने असे म्‍हणणे आहे की, ति‍ला बँकींग व्‍यवहार  समजत नसल्‍याने व सदरचा बॅकींग व्‍यवहार ती अज्ञान असताना झालेला होता आणि आता ती सज्ञान झालेली असून तिचा विवाह सुध्‍दा झालेला आहे. वर नमुद दोन्‍ही मुदतठेवीचा कालावधी संपल्‍या नंतर तिने विरुध्‍दपक्ष बँकेत जाऊन दोन्‍ही मुदतठेवीच्‍या रकमांची पुर्नगुंतवणूक केली नाही परंतु विरुध्‍दपक्ष बँकेनी तिला तिचे दोन्‍ही मुदतठेव रकमे बाबत लेखी अवगत करणे आवश्‍यक होते परंतु विरुध्‍दपक्ष बँकेनी तसे लेखी कळविले नाही त्‍यामुळे ती दोन्‍ही मुदतठेव पावती मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे दोन्‍ही मुदतठेव जमा रकमांवर प्रत्‍येक वर्षी वार्षिक 13 टक्‍के दराने व्‍याजासह मिळण्‍यास हक्‍कदार आहे. ईतकेच नव्‍हे तर विरुध्‍दपक्ष बँके तर्फे दोन्‍ही मुदतठेवीच्‍या पावत्‍या दिसत नसल्‍याने दिनांक-13.05.2017 रोजी दोन्‍ही मुदतठेवीची रक्‍कम देण्‍याचे नाकारण्‍यात आले असा तिचा आरोप आहे.

12.   विरुध्‍दपक्ष बँकेला ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस मिळाल्‍या बाबत रजि. पोच अभिलेखावरील पान क्रं 21 दाखल आहे. परंतु विरुध्‍दपक्ष बँके तर्फे कोणीही ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाही तसेच कोणतेही लेखी निवेदन ग्राहक मंचा समोर दाखल केलेले नाही वा तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. याउलट तक्रारकर्तीने पुराव्‍या दाखल स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. तक्रारकर्तीने केलेली तक्रार, तिने दाखल केलेले दस्‍तऐवज व तिचे शपथेवरील पुराव्‍याचे आधारावर ही तक्रार गुणवत्‍तेवर (On Merit) निकाली काढण्‍यात येत आहे.

13.    तक्रारकर्ती कु.सायत्राबाई गोची परतेकी ही अज्ञान असताना तिने  विरुध्‍दपक्ष बँक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथे तिचे  नावाने मुदतठेव पावती क्रं-183 अन्‍वये रुपये-30,000/- एवढी रककम दिनांक-25.04.1996 ला गुंतवणूक केली होती आणि सदर मुदतठेवीवर परिपक्‍वता तिथी 25.04.2002 (Maturity date)  (एकूण सहा वर्ष) अशी नमुद असून व्‍याजाचा दर प्रतीवर्ष 13 टक्‍के नमुद आहे. सहा वर्षा नंतर सदर मुदतठेवीवर परिपक्‍वता मुल्‍य रुपये-64,650/-(Maturity Value) नमुद केलेले आहे. त्‍याच बरोबर ती  अज्ञान असताना तिचे नावाने विरुध्‍दपक्ष बँक ऑफ इंडीया येथे मुदतठेव पावती क्रं-186 अन्‍वये रुपये-3000/-एवढी रककम दिनांक-25.04.1996 ला गुंतवणूक केली होती आणि सदर मुदतठेवीवर परिपक्‍वता तिथी 25.04.1999 (Maturity date)  (एकूण तीन वर्ष) असे नमुद असून व्‍याजाचा दर प्रतीवर्ष 13 टक्‍के नमुद आहे. तीन वर्षा नंतर सदर मुदतठेवीवर परिपक्‍वता मुल्‍य(Maturity Value) रुपये-4404/- असे नमुद केलेले आहे, या बाबी अभिलेखावरील अनुक्रमे पान क्रं 14 व 15 वर दाखल असलेल्‍या मुदतठेवीच्‍या पावत्‍यांच्‍या झेरॉक्‍स प्रतीवरुन दिसून येतात.

14.  तक्रारकर्तीचे असेही म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष बँके तर्फे दोन्‍ही मुदतठेव पावत्‍या दिसत नसल्‍याने दिनांक-13.05.2017 रोजी दोन्‍ही मुदतठेवीची रक्‍कम देण्‍याचे नाकारण्‍यात आले या संबधात विरुध्‍दपक्ष बँकेचे कोणतेही लेखी निवेदन दाखल झालेले नसल्‍याने योग्‍य तो खुलासा ग्राहक मंचा समोर आलेला नाही.

15.   मंचाचे मते, मुदतठेवीचा कालावधी संपल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष बँकेनी मुदतठेवी बाबत त्‍या मुदतठेवीची रक्‍कम पुढील कालावधी करीता पुर्नगुंतवणूक करावयाची किंवा कसे? या बाबत तक्रारकर्तीला लेखी कळवावयास पाहिजे. आता बँकींग व्‍यवहारात मुदतठेव संपल्‍या नंतर संबधित ग्राहकाचे भ्रमणध्‍वनीवर वा ईमेल वर सुचना देण्‍याची संगणीकीय व्‍यवस्‍था बँकेकडून करण्‍यात आलेली आहे परंतु तक्रारकर्ती ही एक ग्रामीण भागात राहणारी अर्धशिक्षीत स्‍त्री आहे व तिचे जवळ अद्दायावत भ्रमणध्‍वनी असण्‍याची वा तिचे जवळ ईमेल आयडी असण्‍याची शक्‍यता फारच कमी आहे. त्‍यामुळे या प्रकरणा मध्‍ये तक्रारकर्तीला तिचे मुदतठेवीचा कालावधी उलटून गेल्‍या नंतर मुदतठेवी संबधाने पुढे काय करावयाचे या संबधात  लेखी कळविण्‍याची जबाबदारी ही  विरुध्‍दपक्ष बँकेची होती. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे ति‍ला आज पर्यंत तसे काहीही विरुध्‍दपक्ष बँके तर्फे लेखी कळविलेले नाही, ईतकेच नव्‍हे तर परिपक्‍वता कालावधी उलटून गेल्‍या नंतर व मागणी केल्‍या नंतरही विरुध्‍दपक्ष बँकेनी रेकॉर्ड दिसत नसल्‍याचे कारण सांगून मुदतठेवीची रक्‍कम देण्‍यास नकार दिला. विरुध्‍दपक्ष बँकेला ग्राहक मंचाची रजिस्‍टर नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांचे तर्फे कोणीही ग्राहक मंचा समोर उपस्थित झाले नाही वा त्‍यांनी तक्रारकर्तीने तिचे तक्रारीतून  विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. तक्रारकर्तीला विरुध्‍दपक्ष बँके कडून दिनांक-03.05.2017 रोजी दोन्‍ही मुदतठेवीच्‍या मूळ पावत्‍या दिसत नसल्‍याने रक्‍कम देण्‍यास नकार देण्‍यात आला होता असा आरोप तक्रारकर्तीने तक्रारीतून विरुध्‍दपक्ष बँके विरुध्‍द केलेला आहे परंतु विरुध्‍दपक्ष बँके कडून सदर आरोप खोडून काढण्‍यात आलेला नाही. तक्रारकर्तीची तक्रार तसेच शपथेवरील पुरावा यावरुन तक्रारकर्तीने मागणी करुनही दोन्‍ही मुदतठेवीचीं रक्‍कम विरुध्‍दपक्ष बँकेनी न दिल्‍याने दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते.

16.    उपरोक्‍त नमुद घटनाक्रम, प्रकरणात दाखल पुरावे आणि वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष बँके कडून मुदतठेव पावती क्रं 183 अन्‍वये गुंतवणूक रक्‍कम रुपये-30,000/- वर दिनांक-25.04.1996 ते दिनांक-25.04.2002 (Maturity date) या कालावधी करीता परिपक्‍व मुल्‍य (Maturity Value)  म्‍हणून रुपये-64,650/- आणि या रकमेवर पुढील कालावधी करीता म्‍हणजे दिनांक-26.04.2002 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-13 टक्‍के दराने (मुदत ठेवीवरील नमुद व्‍याज दराने)  व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. त्‍याच बरोबर तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष बँके कडून मुदतठेव पावती क्रं 186 अन्‍वये गुंतवणूक रक्‍कम रुपये-3000/- वर दिनांक-25.04.1996 ते दिनांक-25.04.1999 (Maturity date) या कालावधी करीता परिपक्‍व मुल्‍य (Maturity Value)  म्‍हणून रुपये-4404/- आणि या रकमेवर दिनांक-26.04.1999 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-13 टक्‍के दराने(मुदत ठेवीवरील नमुद व्‍याज दराने)  व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. तसेच विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-10,000/-आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल  असे मंचाचे मत आहे.

17.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                                    :: आदेश ::

  1. तक्रारकर्ती विवाहापूर्वीचे नाव कु.सायत्राबाई गोची परतेकी (विवाहा नंतरचे नाव शीतल धनराज मरसकोल्‍हे) हिची तक्रार विरुध्‍दपक्ष बँक ऑफ इंडीया शाखा भंडारा तर्फे तिचे शाखा व्‍यवस्‍थापक यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष बँकेला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीस मुदतठेव पावती क्रं 183 नुसार गुंतवणूक रक्‍कम रुपये-30,000/- वर दिनांक-25.04.2002 रोजी (Maturity date) दर्शविलेल्‍या परिपक्‍व मुल्‍य (Maturity Value)  नुसार रुपये-64,650/- (अक्षरी रुपये चौसष्‍ठ हजार सहाशे पन्‍नास फक्‍त) एवढी रक्‍कम द्यावी आणि सदर रकमेवर पुढील कालावधी करीता म्‍हणजे दिनांक-26.04.2002 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो मुदतठेवीवर नमुद केल्‍या नुसार द.सा.द.शे.-13 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्तीला द्यावेत.
  3. विरुध्‍दपक्ष बँकेला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीस मुदतठेव पावती क्रं 186 नुसार गुंतवणूक रक्‍कम रुपये-3000/- वर दिनांक-25.04.1999 रोजी (Maturity date) दर्शविलेले परिपक्‍व मुल्‍य (Maturity Value)  रुपये-4404/- (अक्षरी रुपये चार हजार चारशे चार फक्‍त) एवढी रक्‍कम द्यावी आणि सदर रकमेवर  पुढील कालावधी करीता म्‍हणजे दिनांक-26.04.1999 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो मुदतठेवीवर नमुद केल्‍या नुसार द.सा.द.शे.-13 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्तीला द्यावेत.
  4. विरुध्‍दपक्ष बँकेनी तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) द्यावेत.
  5. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष  बँकेनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
  6. निकालपत्राच्‍या प्रमाणित उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.
  7. तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.