Maharashtra

Bhandara

CC/17/78

SanjayKumar Ramchand Chawande - Complainant(s)

Versus

Branch Manager, Bank of Baroda - Opp.Party(s)

MR. Kailash I. Ramteke

27 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/17/78
( Date of Filing : 14 Aug 2017 )
 
1. SanjayKumar Ramchand Chawande
Shastri Ward,Sing Colony,Warathi,Tah.Mohadi
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Bank of Baroda
Bhandara
Bhandara
Maharashtra
2. Branch Manager, Canara Bank. Branch Sunflag Company
Warthi Tah.Mohadi,
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR. Kailash I. Ramteke, Advocate
For the Opp. Party: MISS.S.M. NANDANWAR, Advocate
Dated : 27 Jan 2020
Final Order / Judgement

                 (पारीत व्‍दारा श्री. नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य)

                                                                               (पारीत दिनांक–27 जानेवारी, 2020)

01.    तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं-2 बॅंके विरुध्‍द दोषपूर्ण सेवे बाबत प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

    तक्रारकर्ता हा सनफ्लॅग कंपनी भंडारा येथे नौकरीत असून त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-2) कॅनरा बॅंक शाखा वरठी, जिल्‍हा भंडारा येथे खाते असून सदर खात्‍याचा क्रमांक-86031010000145 असा असून त्‍याने ए.टी.एम. ची सुविधा सदर बॅंके कडून घेतलेली आहे आणि त्‍याचा ए.टी.एम.कॉर्डचा क्रमांक-470938603010764 असा आहे.

   तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, तो दिनांक-28 मे, 2017 रोजी सांयकाळी-6.30 वाजताचे दरम्‍यान विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ बडोदा, शाखा-राजीवगांधी चौक येथील ए.टी.एम.केंद्रावर गेला आणि त्‍याने ए.टी.एम.मशीन मधून कॉर्डचे सहाय्याने पासवर्ड टाकून रुपये-10,000/- काढण्‍याचा व्‍यवहार केला, तो ए.टी.एम.मशीन मधून सदरची रक्‍कम निघण्‍याची वाट पाहत असताना अचानक ए.टी.एम.सेंटर मधील विज पुरवठा खंडीत झाल्‍याने त्‍याला ए.टी.एम.मशीन मधून सदरची रक्‍कम मिळाली नाही, काही वेळ वाट पाहिली असता अंदाजे 06 वाजून 33 मिनिटानी (या ठिकाणी ग्राहक मंचाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याने तक्रारीतील परिच्‍छेद क्रं-3) मध्‍ये चुकीने 3.33 वाजता असे नमुद केले परंतु तक्रारीतील ईतर मजकूरा वरुन सदर वेळ ही 06.33 वाजताची असल्‍याचे दिसून येते) खंडीत विज पुरवठा पूर्ववत सुरु झाला, त्‍यानंतरही त्‍याने वाट पाहिली असता सदर ए.टी.एम.मशीन मधून रक्‍कम रुपये-10,000/- निघाली नाही परंतु त्‍याचे भ्रमणध्‍वनीवर संदेश आला की, सदर ए.टी.एम.व्‍यवहाराची रक्‍कम रुपये-10,000/- त्‍याचे खात्‍यामधून कमी झालेली आहे, संदेशाचे वेळी तो सदर ए.टी.एम.केंद्रातच उपस्थित होता त्‍यामुळे त्‍याने ए.टी.एम.केंद्रावर उपस्थित कर्मचा-याला सदर संदेश दाखवून मशीन मधून रक्‍कम न मिळाल्‍याची बाब सांगितली असता त्‍या कर्मचा-याने बॅंकेत तक्रार करावी असा सल्‍ला त्‍याला दिला.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-2) कॅनरा बॅंकेच्‍या भंडारा येथील शाखेत दिनांक-30.05.2017 रोजी खंडीत विज पुरवठयामुळे त्‍याला ए.टी.एम.मशीन मधून रुपये-10,000/- मिळाले नसल्‍या बाबत आणि सदर रकमेची वजावट त्‍याचे खात्‍यातून झाल्‍या बाबत तक्रार दिली असता त्‍यांनी सात दिवसा नंतर त्‍याचे  खात्‍यामध्‍ये पूर्ववत सदर ए.टी.एम.व्‍यवहाराची रक्‍कम जमा होईल असे सांगितले. त्‍यानंतरही  तो पुन्‍हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंकेच्‍या शाखेत दिनांक-07.06.2017 रोजी गेला परंतु त्‍यांनी त्‍याला काहीही माहिती दिली नाही. त्‍यानंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंकेच्‍या शाखेस दिनांक-12.06.2017,19.06.2017 आणि 22.06.2017 अशा दिनांकांना भेटी देऊन रक्‍कम का जमा झाली नाही या बाबत विचारपूस केली असता शाखेतील अधिका-यांनी त्‍याची तक्रार वरिष्‍ठ कार्यालयास पाठविली असल्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, सदर ए.टी.एम.केंद्रावर सी.सी.टी.व्‍ही.कॅमेरा लागलेला असून संबधित ए.टी.एम. व्‍यवहाराचे चित्रीकरण त्‍याव्‍दारे होते तसेच दुसरे दिवशी ए.टी.एम.मशीन मध्‍ये रक्‍कम टाकते वेळी बॅंकेच्‍या संबधित अधिका-याकडून ए.टी.एम.मशीन मधील पूर्वीचे शिल्‍लक रकमेचा उतारा काढण्‍यात येतो आणि जर जास्‍तीची रक्‍कम आढळल्‍यास तशी नोंद ठेवल्‍या जाते परंतु त्‍याने तक्रारी केल्‍या नंतरही विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंके तर्फे कोणतीही चौकशी केल्‍या गेली नाही वा त्‍याचे अर्जाला उत्‍तर सुध्‍दा दिलेले नाही म्‍हणून त्‍याने वकीलांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 बॅंकांना रजिस्‍टर पोस्‍टाने दिनांक-11.07.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून त्‍याव्‍दारे त्‍याला सदर ए.टी.एम.व्‍यवहाराची न मिळालेली रक्‍कम परत करण्‍याची तसेच सी.सी.टी.व्‍ही.फुटेज सांभाळून ठेवण्‍याची विनंती केली. सदर कायदेशीर नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकांना मिळूनही त्‍यांनी त्‍याचे नोटीसला कोणतेही उत्‍तर दिले नाही. तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेत खाते असल्‍याने आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेच्‍या ए.टी.एम.केंद्रावरुन त्‍याने व्‍यवहार केल्‍याने तो वि.प.क्रं 1 व 2 बॅंकेचा ग्राहक असून त्‍याला दोषपूर्ण सेवा मिळालेली असल्‍याने त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकां विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

     तक्रारकर्त्‍यास दिनांक-28.05.2017 रोजी ए.टी.एम.केंद्रावरुन रक्‍कम मिळालेली नसल्‍याने सदर रक्‍कम रुपये-10,000/- त्‍याला परत करण्‍याचे आणि सदर रकमेवर दिनांक-28.05.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15% दराने व्‍याज देण्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकांना संयुक्तिकरित्‍या आदेशित व्‍हावे.  तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 बॅंकांना सदर ए.टी.एम.व्‍यवहारा संबधी संपूर्ण दस्‍तऐवज आणि सी.सी.टी.व्‍ही.फुटेज ग्राहक मंचात सादर करण्‍याचे आदेशित व्‍हावे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 बॅंकांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्‍याला झालेल्‍या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येकी रुपये-10,000/- प्रमाणे दोन्‍ही बॅंकानी त्‍याला देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंके कडून तक्रारीचा खर्च म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-5000/- प्रमाणे त्‍याला देण्‍याचे आदेशित व्‍हावे. याशिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ बडोदा, शाखा भंडारा तर्फे वरिष्‍ठ शाखा प्रबंधक यांनी पान क्रं -42 ते 45 वर लेखी उत्‍तर ग्राहक मंचात दाखल केले. त्‍यांनी उत्‍तराव्‍दारे तक्रारकर्त्‍याला दिनांक-28.05.2017 रोजी त्‍यांचे ए.टी.एम.केंद्रातून केलेल्‍या व्‍यवहाराची रक्‍कम रुपये-10,000/- मिळाली नसल्‍याची बाब नामंजूर करुन असे नमुद केले की, सदर ए.टी.एम.व्‍यवहाराव्‍दारे रक्‍कम निघाल्‍याची नोंद अभिलेखावरुन दिसून येते. जर खरोखरीच तक्रारकर्त्‍याला सदर ए.टी.एम.व्‍यवहाराची रक्‍कम मिळाली नसती तर त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंक, शाखा-वरठी, भंडारा येथे खाते असलेल्‍या त्‍याचे शाखेत त्‍वरीत त्‍याच दिवशी जाऊन तक्रार करुन तात्‍काळ शहानिशा करुन प्रकरणाचा निपटारा केला असता परंतु तसे काहीही या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने केलेले नसून प्रस्‍तुत खोटी तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे. मात्र विरुध्‍दपक्ष क्रं 1 च्‍या ए.टी.एम.केंद्रावर सी.सी.टी.व्‍ही.कॅमेरा लागलेला असून त्‍याव्‍दारे छायाचित्रीकरण होत असल्‍याची बाब मान्‍य केली. सदर व्‍यवहारा संबधी तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंकेत काय झाले याची त्‍यांना कल्‍पना नसल्‍याचे नमुद केले. परंतु त्‍यांनी सदर ए.टी.एम.व्‍यवहार पूर्ण झाल्‍याचे तक्रारकर्त्‍याला कळविले होते.

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखा भंडारा तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, त्‍यांचे ए.टी.एम.केंद्रावर झालेल्‍या व्‍यवहाराचे सी.सी.टी.व्‍ही.फुटेज हे व्‍यवहाराचे दिनांका पासून फक्‍त 45 दिवस पर्यंत ठेवण्‍यात येतात परंतु तक्रारकर्ता किंवा त्‍याचे खाते असलेली विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंके कडून विहित मुदतीत सी.सी.टी.व्‍ही.फुटेजची मागणी त्‍यांचे बॅंकेत करण्‍यात न आल्‍याने सदर सी.सी.टी.व्‍ही. फुटेज त्‍यांचे कडून उपलब्‍ध होऊ शकले नाहीत. परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे ए.टी.एम.केंद्राव्‍दारे केलेला रुपये-10,000/- रकमे संबधीचा व्‍यवहार यशस्‍वी झाल्‍याची नोंद त्‍यांचे बॅंकेच्‍या रेकॉर्डला असल्‍याने तक्रारकर्त्‍याने दुषीत हेतूने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली असून ती खारीज करण्‍यात यावी. आपल्‍या विशेष कथनात त्‍यांनी असे नमुद केले की, सदर ए.टी.एम.व्‍यवहार संपूर्ण यशस्‍वी होऊन सदर रक्‍कम ए.टी.एम.मशीन मधून निघाल्‍याची स्‍पष्‍ट नोंद त्‍यांचे बॅंकेच्‍या रेकॉर्ड वरुन दिसत आहे. सदर ए.टी.एम. व्‍यवहार जर अयशस्‍वी झाला असता तर त्‍यांचे बॅंकेच्‍या रेकॉर्ड मध्‍ये “Transaction Fail” असे दर्शविल्‍या गेले असते. तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेचा ग्राहक आहे. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खोटी असल्‍याने ती खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखा भंडारा व्‍दारे करण्‍यात आली.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं-2) कॅनरा बॅंक, शाखा-वरठी, जिल्‍हा भंडारा (तक्रारकर्त्‍याचे खाते असलेली बॅंक) यांनी पान क्रं-35 ते 38 वर लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे बॅंकेच्‍या शाखेत त्‍याचे ए.टी.एम.व्‍यवहारा संबधीची तक्रार दिनांक-30.05.2017 रोजी दिल्‍याची बाब मान्‍य केली परंतु सदर तक्रारअर्जातील मजकूर नामंजूर केला. विरुध्‍दपक्ष क्रं-1 बॅंक ऑफ बडोदा, शाखा भंडारा यांचे ए.टी.एम.केंद्र असून त्‍यामध्‍ये सी.सी.टी.व्‍ही.फुटेज असल्‍याची बाब माहिती अभावी नामंजूर केली. परंतु ही बाब मान्‍य केली की, संबधित ए.टी.एम.मशीन मध्‍ये जेंव्‍हा दुस-या दिवशी रक्‍कम टाकली जाते त्‍यावेळी संबधित अधिकारी यांचे मार्फतीने ए.टी.एम.मशीन मध्‍ये पूर्वी शिल्‍लक असलेल्‍या रकमेचा उतारा काढण्‍यात येऊन हिशोब करण्‍यात येतो आणि जर जास्‍तीची रक्‍कम आढळली तर तशा प्रकारची नोंद ठेवण्‍यात येते. तक्रारकर्त्‍याने वकीलांचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने दिनांक-11.07.2017 रोजी त्‍यांना कायदेशीर नोटीस दिल्‍याची बाब मान्‍य केली मात्र सदर नोटीस खोटी असल्‍याने तिला उत्‍तर दिले नसल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने ग्राहक मंचा समोर स्‍वच्‍छ हाताने तक्रार  केलेली नसून तक्रार खोटी असल्‍याने खारीज करण्‍यात यावी असे नमुद केले. आपल्‍या विशेष कथनात त्‍यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-1 बॅंकेच्‍या ए.टी.एम. केंद्रावरुन ए.टी.एम.कॉर्डव्‍दारे रुपये-10,000/- चा केलेला व्‍यवहार हा यशस्‍वी “Transaction Successful” झाल्‍याची नोंद वि.प.क्रं 1 बॅंकेच्‍या रेकॉर्डला असून ए.टी.एम.मशीन मशीन मधून रक्‍कम निघालेली आहे. जर दिनांक-28.05.2017 रोजी तक्रारकर्त्‍याला ए.टी.एम.मशीन मधून रक्‍कम  मिळाली नसती तर त्‍याने त्‍या बाबतची तक्रार त्‍याच दिवशी किंवा त्‍याचे दुसरे दिवशी विरुध्‍दपक्ष बॅंकेमध्‍ये केली असती परंतु तक्रारकर्त्‍याने तथाकथीत व्‍यवहाराचे दोन दिवसा नंतर दिनांक-30 मे, 2017 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-2 कॅनरा बॅंकेच्‍या शाखेत तक्रार दिली तसेच ज्‍या बॅंकेच्‍या ए.टी.एम.केंद्रावरुन व्‍यवहार केला त्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेच्‍या शाखेत तक्रार केली असल्‍याचे अभिलेखावरुन दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याची तक्रार प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी बॅंकींग लोकपाल यांचेकडे देखील तक्रार करण्‍यास त्‍याला सुचित केले होते. तक्रारकर्त्‍याची तक्रार प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी ए.टी.एम.केंद्र असलेल्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेकडून सदर ए.टी.एम. व्‍यवहारा बाबत माहिती मागितली असता सरदचा ए.टी.एम. व्‍यवहार यशस्‍वी होऊन रक्‍कम तक्रारकर्त्‍याला मिळाल्‍याचे त्‍यांनी कळविले. तक्रारकर्त्‍याच्‍या बॅंक खाते उता-याचे अवलोकन केले असता त्‍यावरुन सदरचा ए.टी.एम.व्‍यवहार यशस्‍वी झाल्‍याचे निष्‍पन्‍न होते. तक्रारकर्त्‍याने बॅंकींग लोकपाल यांचेकडे तक्रार न करता सरळसरळ ग्राहक मंचा समोर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याचा ए.टी.एम.व्‍यवहार यशस्‍वी झाल्‍या बाबत बॅंकेच्‍या रेकॉर्डला नोंद असूनही त्‍याने सदर खोटी तक्रार दाखल केलेली असल्‍याने ती खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंकेव्‍दारे करण्‍यात आली.

05.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 11 वरील दस्‍तऐवज यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने पान क्रं 12 वर त्‍याने त्‍याचे खाते असलेल्‍या विरुध्‍दपक्ष क्रं-2  कॅनरा बॅंक,सनफ्लग शाखा भंडारा रोड येथे दिनांक-28.05.2017 रोजीच्‍या ए.टी.एम.व्‍यवहारा संबधी केलेल्‍या तक्रारीची प्रत, पान क्रं 13 व 14 वर तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी दोन्‍ही विरुध्‍दपक्ष बॅंकांना रजिस्‍टर पोस्‍टाने दिनांक-11 जुलै, 2017 रोजीची पाठविलेली कायदेशीर नोटीस प्रत, पान क्रं 15 व 16 वर रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पावत्‍या तसेच पान क्रं 17 व 19 वर सदर कायदेशीर नोटीस अनुक्रमे दोन्‍ही विरुध्‍दपक्ष बॅंकाना प्राप्‍त झाल्‍या बद्दल रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पोच इत्‍यादी दस्‍तऐवजाचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने पान क्रं 56 ते 58 वर स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 66 व 67 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

06. विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ बडोदा, शाखा भंडारा तर्फे वरिष्‍ठ शाखा प्रबंधक यांनी पान क्रं -42 ते 45 वर लेखी उत्‍तर ग्राहक मंचात दाखल केले. तसेच पान क्रं 59 व 60 वर शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 64 व 65 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखेने पान क्रं 51 ते 55 वर त्‍यांचे ए.टी.एम.केंद्रावरुन व्‍यवहार झालेल्‍या खाते उता-याची प्रत दाखल केली.

07. विरुध्‍दपक्ष क्रं-2) कॅनरा बॅंक, शाखा-वरठी, जिल्‍हा भंडारा (तक्रारकर्त्‍याचे खाते असलेली बॅंक) यांनी पान क्रं-35 ते 38 वर लेखी उत्‍तर दाखल केले. तसेच पान क्रं 61 ते 63 वर शपथपत्र दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंके तर्फे पान क्रं 68 वर पुरसिसव्‍दारे त्‍यांचे लेखी उत्‍तर, दाखल दस्‍तऐवज आणि शपथपत्राला त्‍यांचा लेखी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा असे कळविले. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंकेनी पान क्रं 47 वरील दस्‍तऐवज यादी नुसार त्‍यांचे बॅंकेत तक्रारकर्त्‍याचे खाते असलेल्‍या उता-याची प्रत  पान क्रं 48 वर दाखल केली. तसेच तक्रारकर्त्‍याचा ए.टी.एम.व्‍यवहार यशस्‍वी झाल्‍या बाबतचा अहवाल पान क्रं 49 वर दाखल केला.

08.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, उभय बॅंकांची लेखी उत्‍तरे, उभय पक्षांनी दाखल केलेली शपथपत्रे तसेच उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवज व लेखी युक्‍तीवाद इत्‍यादीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेचे वकील श्री श्‍याम चव्‍हाण यांचा  मौखीक युक्‍तीवाद एैकला असता ग्राहक न्‍यायमंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

त.क. हा दोन्‍ही विरुध्‍दपक्ष बॅंकांचा ग्राहक होतो काय?

-होय-

02

विरुध्‍दपक्ष बॅंकांनी दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब तक्रारकर्त्‍याने पुराव्‍यानिशी सिध्‍द केली काय?

-होय-

03

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                                                                                             ::निष्‍कर्ष::

मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-

09.     प्रस्‍तुत तक्रारीतील दाखल दस्‍तऐवज आणि उभय पक्षांचे कथन यावरुन तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंकेत खाते असून त्‍याने त्‍या सोबत ए.टी.एम.सुविधा घेतल्‍याची बाब उभय पक्षांना मान्‍य आहे तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखेच्‍या ए.टी.एम.केंद्रावरुन दिनांक-28 मे, 2017 रोजी व्‍यवहार केल्‍याची बाब सुध्‍दा उभय पक्षांना मान्‍य असून दाखल दस्‍तऐवजावरुन सुध्‍दा ही बाब सिध्‍द होते. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने दोन्‍ही बॅंका कडून सेवा घेतलेली असल्‍याने तो दोन्‍ही बॅंकांचा ग्राहक होतो आणि त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

10.   सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्त्‍याने उपस्थित केलेला संक्षीप्‍त वादाचा मुद्दा असा आहे की, त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेच्‍या ए.टी.एम.केंद्रामधून दिनांक-28 मे, 2017 रोजीचे सायंकाळी त्‍याचे ए.टी.एम.कॉर्डव्‍दारे रुपये-10,000/- काढण्‍यासाठी व्‍यवहार केला आणि तो सदर ए.टी.एम.मशीन मधून रक्‍कम येण्‍याची वाट पाहत असताना अचानक विज पुरवठा खंडीत झाला आणि काही वेळा नंतर विज पुरवठा पूर्ववत सुरु झाला. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे विज पुरवठा पूर्ववत सुरु झाल्‍या नंतर तो ए.टी.एम.मशीन मधून रक्‍कम बाहेर येण्‍याची वाट पाहत असताना त्‍याचे भ्रमणध्‍वनीवर सदर व्‍यवहार पूर्ण होऊन त्‍याचे खात्‍यातून रुपये-10,000/- वजावट झाल्‍याचा संदेश आला, त्‍याने या बाबत ए.टी.एम.केंद्रावरील कर्मचा-याकडे चौकशी केली असता त्‍याने बॅंकेत तक्रार करण्‍यास  सुचित केले.

11.  दोन्‍ही विरुध्‍दपक्ष बॅंकानी घेतलेला संक्षीप्‍त बचाव असा आहे की, तक्रारकर्त्‍याने दिनांक-28.05.2017 रोजीचे सायंकाळी विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखेच्‍या ए.टी.एम.केंद्रावरुन ए.टी.एम.कॉर्डव्‍दारे रुपये-10,000/- रकमेचा व्‍यवहार यशस्‍वी “Transaction Successful” झाल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेच्‍या रेकॉर्ड मध्‍ये नोंद आहे. सदरचा ए.टी.एम.व्‍यवहार जर अयशस्‍वी झाला असता तर बॅंकेच्‍या रेकॉर्डला सदरचा व्‍यवहार अयशस्‍वी “Transaction Unsuccessful” अशी नोंद झाली असती.  त्‍यांनी पुढे असाही युक्‍तीवाद केला की, जर दिनांक-28.05.2017 रोजी तक्रारकर्त्‍याला ए.टी.एम.मशीन मधून रक्‍कम  मिळाली नव्‍हती तर त्‍याने त्‍या बाबतची तक्रार त्‍याच दिवशी किंवा त्‍याचे दुसरे दिवशी विरुध्‍दपक्ष बॅंकेमध्‍ये केली असती परंतु तक्रारकर्त्‍याने तथाकथीत व्‍यवहाराचे दोन दिवसा नंतर दिनांक-30 मे, 2017 रोजी त्‍याचे बचतखाते असलेल्‍या विरुध्‍दपक्ष क्रं-2 कॅनरा बॅंकेच्‍या शाखेत तक्रार दिली तसेच ज्‍या बॅंकेच्‍या ए.टी.एम.केंद्रावरुन व्‍यवहार केला त्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखेत तक्रार केलेली नाही. तक्रारकर्त्‍याची तक्रार प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी बॅंकींग लोकपाल यांचेकडे देखील तक्रार करण्‍यास त्‍याला सुचित केले होते. विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखा भंडारा यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, त्‍यांचे ए.टी.एम.केंद्रावर सी.सी.टी.व्‍ही.उपलब्‍ध असून त्‍याव्‍दारे ए.टी.एम.केंद्रातील व्‍यवहाराचे छायाचित्रण केल्‍या जाते परंतु ए.टी.एम.केंद्रावर झालेल्‍या व्‍यवहाराचे सी.सी.टी.व्‍ही.फुटेज हे व्‍यवहाराचे दिनांका पासून फक्‍त 45 दिवस पर्यंत ठेवण्‍यात येतात परंतु तक्रारकर्ता किंवा त्‍याचे खाते असलेली विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंके कडून विहित मुदतीत सी.सी.टी.व्‍ही.फुटेजची मागणी त्‍यांचे बॅंकेत करण्‍यात न आल्‍याने सदर सी.सी.टी.व्‍ही. फुटेज त्‍यांचे कडून उपलब्‍ध होऊ शकले नाहीत.

12.  सदर प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने सुध्‍दा दिनांक-28.05.2017 रोजीचे ए.टी.एम.व्‍यवहाराची तक्रार ही दोन दिवसा नंतर म्‍हणजे दिनांक-30 मे, 2017 रोजी त्‍याचे खाते असलेल्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 2 शाखा व्‍यवस्‍थापक, कॅनरा बॅंक, सनफ्लॅग शाखा, भंडारा रोड यांचेकडे केल्‍याचे पान क्रं 12 वरील दाखल अर्जावरुन दिसून येते परंतु तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा, शाखा वरठी, जिल्‍हा भंडारा यांचे ए.टी.एम.सेंटर वरुन रकमेचा व्‍यवहार केला असताना त्‍यांना सदर तक्रार अर्जाची प्रत देणे आवश्‍यक असताना त्‍यांना दिली नसल्‍याचे दिसून येते वा तसा कोणताही पुरावा तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला नाही व तशी तक्रार केल्‍याचे त्‍याचे म्‍हणणे सुध्‍दा नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बॅंकेच्‍या शाखेत दिनांक-30 मे, 2017 रोजी केलेल्‍या लेखी अर्जाचे  (पान क्रं 12 वर दाखल) अवलोकन केले असता त्‍याने संध्‍याकाळी 06.33 वाजता विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेच्‍या ए.टी.एम. मधून रुपये-10,000/- चा व्‍यवहार केला परंतु व्‍यवहार पूर्ण होण्‍याचे पूर्वीच विज पुरवठा खंडीत झाल्‍याने रक्‍कम प्राप्‍त झाली नाही, त्‍यानंतरही विज पुरवठा आल्‍या नंतर वाट पाहून रक्‍कम आली नसल्‍याचे तसेच ए.टी.एम.केंद्रावरील अटेन्‍डन्‍ट याला कल्‍पना दिल्‍याचे नमुद केले आहे परंतु सदर अर्जाव्‍दारे सी.सी.टी.व्‍ही.फुटेजची मागणी केल्‍याचे दिसून येत नाही. वस्‍तुत‍ः तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखेला त्‍यांचे ए.टी.एम.केंद्रावरील दिनांक-28 मे, 2017 रोजीचे व्‍यवहाराचे सी.सी.टी.व्‍ही.फुटेजची मागणी लगेच करणे आवश्‍यक होते परंतु तसे काहीही तक्रारकर्त्‍याने केल्‍याचे दिसून येत नाही. साधारण बॅंकींग व्‍यवहारात व्‍यवहारा पासून 45 दिवसा पर्यंत सी.सी.टी.व्‍ही. फुटेज सांभाळून ठेवण्‍यात येतात. तक्रारकर्त्‍याने दिनांक-11 जुलै, 2017 रोजीच्‍या वकीलाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने दोन्‍ही विरुध्‍दपक्ष बॅंकांना पाठविलेल्‍या नोटीसचे (पान क्रं 13 व 14 वर दाखल) अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये सुध्‍दा सी.सी.टी.व्‍ही.फुटेजची मागणी केल्‍याचे दिसून येत नाही.

13.    विरुध्‍दपक्ष क्रं-1 बॅंक ऑफ बडोदा शाखे तर्फे अभिलेखावर पान क्रं 51 ते 55 वर त्‍यांचे ए.टी.एम. केंद्रातील झालेल्‍या व्‍यवहाराचा खाते उतारा दाखल केला, त्‍याचे अवलोकन केले अस ता दिनांक-28 मे, 2017 रोजी सायंकाळी 18.30 वाजता तक्रारकर्त्‍याचे ए.टी.एम. कॉर्ड नंबर-47093986XXXX0764 व्‍दारे त्‍यांचे राजीव गांधी चौक, भंडारा ए.टी.एम.केंद्रावरुन विथड्राल झाल्‍याची नोंद असून किती रक्‍कम विथड्राल झाली त्‍या Amount……….समोर रिकामी जागा आहे आणि पुढे दिनांक-28 मे, 2017 रोजी सायंकाळी 19:07:31 POWER FAIL अशी नोंद दिसून येते. सदर ए.टी.एम.वरील खाते उता-या वरील अन्‍य व्‍यवहाराचे नोंदीचे निरिक्षण केले असता त्‍यामध्‍ये विथड्राल रक्‍कम नमुद केल्‍याचे दिसून येते. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याला ए.टी.एम.मशीन मधून त्‍याने केलेल्‍या व्‍यवहाराची रक्‍कम मिळालेली नाही.

14.  दुसरी महत्‍वाची बाब अशी दिसून येते की, विरुध्‍दपक्ष क्रं-2) कॅनरा बॅंक, शाखा-वरठी, जिल्‍हा भंडारा (तक्रारकर्त्‍याचे खाते असलेली बॅंक) यांनी पान क्रं-35 ते 38 वर लेखी उत्‍तरात ही बाब मान्‍य केली की, संबधित ए.टी.एम.मशीन मध्‍ये जेंव्‍हा दुस-या दिवशी रक्‍कम टाकली जाते त्‍यावेळी संबधित अधिकारी यांचे मार्फतीने ए.टी.एम.मशीन मध्‍ये पूर्वी शिल्‍लक असलेल्‍या रकमेचा उतारा काढण्‍यात येऊन हिशोब करण्‍यात येतो आणि जर जास्‍तीची रक्‍कम आढळली तर तशा प्रकारची नोंद ठेवण्‍यात येते. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ बडोदा शाखे तर्फे तक्रारकर्त्‍याने दिनांक-28 मे, 2017 रोजी त्‍यांचे ए.टी.एम.केंद्रावर केलेल्‍या ए.टी.एम.व्‍यवहारा नंतर जेंव्‍हा दुस-यांदा त्‍यांचे ए.टी.एम.मशीन मध्‍ये रोख रक्‍कम टाकल्‍या गेली त्‍यावेळी ए.टी.एम.मशीन मध्‍ये ए.टी.एम.मशीन मध्‍ये पूर्वी शिल्‍लक असलेल्‍या रकमेचा जो उतारा त्‍यांचे अधिका-यां कडून काढल्‍या जातो तो ए.टी.एम.मशीनचा उतारा प्रस्‍तुत प्रकरणात ग्राहक मंचा समोर पुराव्‍या दाखल  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेनी सादर केलेला नाही.

15.  सदर प्रकरणामध्‍ये ए.टी.एम.व्‍यवहाराची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करण्‍याची जबाबदारी ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा यांची दिसून येते. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 कॅनरा बॅंक, ज्‍या शाखेमध्‍ये तक्रारकर्त्‍याचे खाते आहे त्‍यांचाही निष्‍काळजीपणा दिसून येतो. तक्रारकर्त्‍याने ए.टी.एम.व्‍यवहाराची तक्रार जरी दोन दिवसा नंतर त्‍यांचेकडे केली असली तरी त्‍यांनी स्‍वतःहून विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखेला पत्र देऊन सी.सी.टी.व्‍ही.फुटेज सांभाळून ठेवण्‍यास लेखी सुचित करावयास हवे होते कारण तक्रारकर्ता हा त्‍यांचा ग्राहक आहे परंतु तसे त्‍यांनी या प्रकरणात काहीही केले नसल्‍याचे दिसून येत असल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी सुध्‍दा तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला जो काही शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला त्‍याची नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च दोन्‍ही विरुध्‍दपक्ष बॅंकांनी तक्रारकर्त्‍याला मंजूर करणे  उचित न्‍यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे आणि त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी आल्‍याने मुद्दा क्रं 3 नुसार तक्रारकर्त्‍याची तक्रार दोन्‍ही वि.प. बॅंके विरुध्‍द अंशतः मंजूर होण्‍यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

16.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन  ग्राहक मंच प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                                                           :: अंतिम आदेश ::

01) तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ बडोदा, शाखा राजीव गांधी चौक, भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) कॅनरा बॅंक, शाखा सनफ्लॅग कंपनी, वरठी, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

02) विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंक ऑफ बडोदा शाखा भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला ए.टी.एम.मशीन मधून न मिळालेली रक्‍कम रुपये-10,000/- परत करावी आणि सदर रकमेवर ए.टी.एम.व्‍यवहार दिनांक-28 मे, 2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला दयावे.

03) विरुध्‍दपक्ष क्रं-1) बॅंक ऑफ बडोदा, शाखा राजीव गांधी चौक, भंडारा आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) कॅनरा बॅंक, शाखा सनफ्लॅग कंपनी, वरठी, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा  यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येकी रुपये-1000/- (अक्षरी प्रत्‍येकी रुपये एक हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च प्रत्‍येकी रुपये-500/-(अक्षरी प्रत्‍येकी रुपये पाचशे फक्‍त) तक्रारकर्त्‍याला दयावेत.

04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बॅंकेनी सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

         05)    सर्व पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी.

         06)    तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.