Maharashtra

Kolhapur

CC/10/692

Ravindra Shankar Shinde - Complainant(s)

Versus

Branch Manager, Bajaj Allianz General Insurance, Co,Ltd., - Opp.Party(s)

B.K.Mungale

04 May 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/692
1. Ravindra Shankar ShindeVani Peth, Peth Vadgaon, Dist.Hatkangale, Dist.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Branch Manager, Bajaj Allianz General Insurance, Co,Ltd., D 3, and D 4,2 nd Floor, Royal Prestige, Saics Extension Shahupuri, Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :B.K.Mungale, Advocate for Complainant
A.A.Bhumkar, Advocate for Opp.Party

Dated : 04 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.04/05/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. तक्रारदाराने लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  
 
           सदरची तक्रार तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्‍यामुळे दाखल करणेत आला आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार यांचा पेठ वडगांव ता.हातकणंगले येथील सि.स.नंे.816 या मिळकतीमध्‍ये शिंदे होलसेल अॅन्‍ड रिटेल द्रोण पत्रावळी सेंअर व शिंदे सायकल अॅन्‍ड स्‍पेअर पार्ट या नावाने दुकान आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांचा सर्वसाधारणपणे गेली 51 वर्षापासून होलसेल आणि रिटेल द्रोण पत्रावळी विक्रीचा तसेच सायकल दुरुस्‍ती व स्‍पेअरपार्ट विक्रीचा व्‍यवसाय आहे. सदर मिळकतीमध्‍ये तक्रारदार यांचा आजअखेर अव्‍याहतपणे कब्‍जेवहीवाट सुरु आहे. यातील तक्रारदार यांची आर्थिक परिस्थिती अत्‍यंत हालाकीची असलेने त्‍यांनी दि रत्‍नाकर बँक लि. शाखा-पेठवडगांव यांचेकडून वर नमुद दुकानातील माल तारण देऊन व्‍यवसाय वाढीकरिता कॅश क्रेडीट रक्‍कम रुपये दोन लाख इतके कर्ज घेतले आहे. सदर बँकेने सामनेवाला यांचेकडे तारण मालाची सेक्युरिटी म्‍हणून स्‍टॅन्‍डर्ड फायरी अॅन्‍ड स्‍पेशल पेरील्‍स पॉलीसी उतरविलेली आहे. त्‍याचा पॉलीसी क्र.OG-10-2005-4001-00005302 असा आहे. सदर पॉलीसीचे प्रिमियमची रक्‍कम सदर बॅकेने तक्रारदार यांचेकरिता सामनेवालांकडे भरलेली आहे. सदर पॉलीसीची वैधता दि.23/11/2009 ते 22/11/2010 या कालावधीकरिता आहे. सदरप्रमाणे पॉलीसी उतरवून त्‍याबाबतची कागदपत्रे दिलेली आहेत. त्‍यामध्‍ये पॉलीसीच्‍या अटी, शर्ती व पॉलीसीप्रमाणे मिळणारे फायदे याचा तपशील दिलेला आहे.
 
           ब) तक्रारदार पुढे सांगतात, पॉलीसी कालावधीतच दि.07/03/2010 रोजी काही गुंड प्रवृत्‍तीच्‍या 17 लोकांनी इतर लोकांचे शिकवणेवरुन तक्रारदार यांचे वर नमुद दुकानामध्‍ये बेकायदेशिररित्‍या घुसुन इन्‍शुरन्‍स असलेल्‍या मालाची(बँकेस तारण असलेल्‍या मालाची) मोडतोड व नासधूस करुन सुमारे रु.3,32,523/- चे नुकसान केले. सदर घटनेची नोंद वडगांव पोलीस स्‍टेशनला झाली असून तक्रारदाराचे सदर दुकानातील नुकसान झालेल्‍या मालाचा पोलीस पंचनामा झालेला आहे. त्‍याचप्रमाणे वडगांव पोलीस स्‍टेशनने सदर गुन्‍हयाची दखल घेऊन मा.अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश कोल्‍हापूर यांचे कोर्टात रे.क्री.के.नं.102/10 अन्‍वये केस दाखल केली असून प्रलंबीत आहे. तक्रारदार यांनी दि.11/03/2010 रोजीपासून सामनेवालांकडे जाऊन वेळोवेळी नुकसानी मालाच्‍या विम्‍याची रक्‍कम मिळणेकरिता आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता केली. तरी देखील यातील सामनेवाला यांनी तक्रारदारांना दाद दिली नाही. दि.02/07/2010 रोजी सामनेवाला यांनी पॉलीसीमधील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केलेचे पत्र वर नमुद बँकेस पाठविले. सदर पत्रामध्‍ये सामनेवाला यांनी फक्‍त चोरीला गेलेल्‍या वस्‍तुचा उल्‍लेख केला असून चोरीला गेलेले सोने, टी.व्‍ही. व रोख रक्‍कम यांचा विमा उतरविलेला नसलेने क्‍लेम नाकारलेचे नमुद केले आहे. तसेच विमा उतरविलेल्‍या मालाचे काहीही नुकसान झाले नसलेने क्‍लेम नाकारले असलेचे चुकीचे कारण नमुद केले आहे. सामनेवाला हे केवळ ग्राहकांकडून विम्‍याचे हप्‍ते स्विकारत असून त्‍याची येणारी जबाबदारी स्विकारणेस टाळाटाळ करीत आहेत.
 
           क) तक्रारदार आपल्‍या तक्रारीत पुढे सांगतात, यातील तक्रारदार यांचे संपूर्ण कुटूंबाची उपजिवीका वर नमुद व्‍यवसायावर अवलंबून आहे. सदरचे दुकान हे मुख्‍य बाजारपेठेत असलेने तक्रारदार यांचा व्‍यवसाय अत्‍यंत तेजीत चाललेला असतो. सदर घटनेमुळे तक्रारदाराचे फार मोठे नुकसान झाले आहे. तक्रारदारास नुकसान झालेल्‍या मालाच्‍या ठिकाणी नवीन माल भरणे अत्‍यंत अडचणीचे झाले आहे. सामनेवाला यांचे बेकायदेशीर कृत्‍यामुळे तक्रारदार यांना त्‍यांचे व्‍यवसायामध्‍ये दररोज रु.300/- प्रमाणे नुकसानी सहन करावी लागत आहे. तक्रारदाराची बँकेने उतरविलेल्‍या पॉलीसीमध्‍ये     असणा-या अटी व शर्तीमधील कलम V अंतर्गत नमुद केलेप्रमाणे रॉयट(RIOT) या गुन्‍हयाअंतर्गत तक्रारदार यांना नुकसानी मालाचा क्‍लेम मिळणेचा सकायदेशीर हक्‍क व अधिकार आहे. तसेच विमा उतरविलेल्‍या मालाची नुकसानी करणा-या 17 लोकांचे विरुध्‍द भा.दं.सं. अधिनियमचे कलम 147 प्रमाणे गुन्‍हा नोंद झालेला आहे. तरी सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेने सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे तक्रारदारास भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदाराचे दुकानातील सायकल स्‍पेअर पार्टसच्‍या नुकसानीची रक्‍कम रु.1,49,957/-, व द्रोण पत्रावळी व इतर मालाची नुकसानीची रक्‍कम रु.1,82,566/- असे एकूण रक्‍कम रु.3,32,523/- तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/-, तक्रारदाराचे व्‍यवसायामध्‍ये दररोज रु.300/- प्रमाणे होणारी नुकसान भरपाईची रक्‍कम रु.73,500/- अशी एकूण रक्‍कम रु.4,27,023/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.        
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांनी दिलेली पॉलीसीची प्रत, वडगांव पोलीस स्‍टेशन यांनी घटनास्‍थळाचा केलेला पंचनामा, सामनेवाला यांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र, नुकसानी झालेल्‍या मालाचे फोटो, फोटोग्राफरची पावती, दै. पुढारी,            दै. सकाळ, दै.लोकमत या वृत्‍तपत्रात सदर घटनेबाबत प्रसिध्‍द झालेली बातमी इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत.
 
(4)        सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्‍य केले कथनाखेरीज परिच्‍छेद निहाय नाकारलेली आहे. तक्रारीतील कथने खोटी व चुकीची, खोडसाळपणाची आहेत. प्रस्‍तुत तक्रारीचे स्‍वरुप गुंतागुंतीचे असलेने प्रस्‍तुत तक्रार चालवणेचे अधिकार मे. मंचास येत नाही. कलम 2 मधील मजकूर अंशत: बरोबर आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडून पॉलीसी घेतली कथनाव्‍यतिरिक्‍त अन्‍य मजकूर अमान्‍य केला आहे. तक्रारदार स्‍वत: स्‍टॅन्‍डर्ड फायर अॅन्‍ड स्‍पेशल पेरील घेतलेचे मान्‍य केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्‍या एफ.आय.आर.वरुन 17 लोकांनी जाणीवपूर्वक तक्रारदाराचे ताब्‍यात असणारी इमारत ताब्‍यात घेण्‍याचे दृष्‍टीने तक्रारदाराचे नुकसान केलेले आहे. सदरची बाब ही क्रिमिनल कॉन्‍सपीरसी आहे. प्रस्‍तुत समुहाने ठरवून केलेली कृती आहे. याउलट रॉयटमध्‍ये समुहाच्‍या अचानक होणा-या प्रतिक्रियेतून त्रुटी घडते तसे इथे झालेले नाही. सबब प्रस्‍तुतची बाब सदर पॉलीसीच्‍या कक्षात समाविष्‍ट होत नाही. तसेच प्रस्‍तुत पॉलीसी ही विमासंरक्षक तक्रारदाराचे सायकल दुरुस्‍ती व्‍यवसायासाठी होती. पत्रावळीच्‍या व्‍यवसायासाठी नाही. आयआरडीए मान्‍यताप्राप्‍त ब्रुचेल सर्व्‍हेअरकडून घडलेल्‍या घटनेच्‍या जागेची पाहणी करुन सदर सर्व्‍हेअर यांचा अहवाल घेतलेला आहे. नमुद सर्व्‍हेअर यांनी पाहणीच्‍या वेळी तक्रारदाराचा व्‍यवसायाशी संबंधीत असणारा स्‍टॉक विमा उतरविलेल्‍या ठिकाणी जरी विखुरलेला असला तरी तो पुन्‍हा गोळा करुन ठेवलेला आहे. सबब कोणताही तोटा झालेला नाही. सदर अहवालामध्‍ये चार्जशिट, चौकशी, पंचनामा वरुनसुध्‍दा सदर सायकलचे पार्टस दुकानामध्‍ये होते तसेच पत्रावळी व प्‍लॅन्‍टस हे तक्रारदाराचे राहते घरी होते. पॉलीसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे दुकानामध्‍ये असलेला स्‍टॉकच इन्‍शुअर्ड केलेला होता. तक्रारदाराचे राहते घरामध्‍ये असणा-या स्‍टॉकचा इनशुरन्‍स नव्‍हता. यासंबंधीचे फोटोग्राफ, चौकशी व पंचनामावरुन वस्‍तुस्थिती निदर्शनास येते. तसेच प्रस्‍तुतचे स्‍पेअर पार्टस आर्यन व स्टिलचे असलेने त्‍याचे नुकसान झालेले नव्‍हते हे सर्व्‍हेअर यांनी पाहिलेले आहे. तक्रारदाराने मे. मंचाची दिशाभूल करुन प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सर्व्‍हेअर यांनी पूर्ण चौकशी अंती नो क्‍लेम म्‍हणून निष्‍कर्ष दिलेला आहे. सबब तक्रारदाराने प्रस्‍तुतची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदारास रु.25,000/- इतका दंड बसवावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)         सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणेाच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदाराने दाखल केलेला क्‍लेम फॉर्म, तक्रारदाराने दाखल केलेली पोलीसांचेकडील दि.07/03/2010 ची तक्रार, पोलीसांनी केलेल्‍या तपास टिप्‍प्‍णी- तक्रारदाराची तपास टिप्‍पणी, तानाजी घोरपडे, राहूल जाधव, सुकुमार आनंदा पाटोळे यांची तपास टिप्‍पणी, पंचनामा, तक्रारदाराने दाखल केलेल्‍या नुकसानीचा तपशील, मालाची बीले, सर्व्‍हे रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच शपथपत्र दाखल केलेले आहेत.
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, लेखी युक्‍तीवाद, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्‍या वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?  --- होय
2) काय आदेश ?                                          --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे स्‍टॅन्‍डर्ड फायर अॅन्‍ड स्‍पेशल पॅरेल्‍स पॉलीसी उतरविली होती. सदर पॉलीसीचा क्र.OG-10-2005-4001-00005302 असून प्रिव्‍हीएस पॉलीसी क्र.OG-09-2005-4001-00003966 आहे. प्रस्‍तुत पॉलीसीचा कालावधी दि.23/11/2009 ते 22/11/2010 चे मध्‍यरात्रीपर्यंत आहे. दि.24/11/2009 रोजी तक्रारदारास पॉलीसी दिलेली आहे. सदर पॉलीसीनुसार रु. 4,00,000/- विमा रक्‍कम निर्धारित केलेली आहे. त्‍यासाठी रु.1,279/- इतका करासहीत प्रिमियम भरलेला आहे. पॉलीसीचे Annexure I नुसार स्‍थळ हे मराठा गल्‍ली, मु.पो. पेठवडगांव, कोल्‍हापूर महाराष्‍ट्र कोल्‍हापूर आर.एस.416001. तसेच ऑक्‍युपेशनमध्‍ये-शॉप- आदर्स अशी नोंद आहे. रु.4,00,000/- इतके अॅडॉन कव्‍हर(Earthquake with Plinth and Foundation) विमा रक्‍कम असून त्‍यासाठी रु.40/- इतका प्रिमियम घेतलेला आहे. Annexure II नुसार Policy No., Location and Address ची नोंद आहे. तसेच Block Desc, Item Code, 1006 नोंद असून ON STOCK Item Details and Desription अशी नोंद दिसून येते. तसेच नमुद पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता पान क्र.1 वरील क्‍लॉज-5-ROIT, STRIKE,MALICIOUS DAMAGE बाबतची नुकसानी संरक्षीत केलेचे दिसून येते. तसेच सदर क्‍लॉज अंतर्गत ए.बी.सी.डी हे अपवाद आहेत.
 
           प्रस्‍तुत पॉलीसीबाबत वाद नाही. तक्रारदाराचे कथनानुसार त्‍याचे द्रोण पत्रावळी   विक्री व सायकल दुरुस्‍ती व स्‍पेअर पार्टस विक्रीचा व्‍यवसाय पेठवडगांव येथे सि. स.816 या मिळकतीमध्‍ये शिंदे होलसेलर व रिटेल द्रोण-पत्रावळी सेंटर व शिंदे सायकल अॅन्‍ड स्‍पेअर पार्टचे दुकान आहे. सदर दुकानातील माल तारण देऊन तक्रारदाराने रत्‍नाकर बँक लि.शाखा-पेठवडगांव यांचेकडून रक्‍कम रु.2,00,000/- इतके कॅश क्रेडीट कर्ज घेतले आहे व तारण मालाची सिक्‍युरिटी म्‍हणून स्‍टॅन्‍डर्ड फायर अॅन्‍ड स्‍पेशल पेरील पॉलीसी उतरविलेली होती ही वस्‍तुस्थिती सामनेवाला यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेली नाही. सामनेवाला यांनी पॉलीसी मान्‍य केलेली आहे. प्रस्‍तुत तक्रारदार व त्‍यांचे कुटूंबिय 1961 सालापासून सदाशिव नर्सिंग बुढे यांचे सि.स.नं.816 या घरात 48 वर्षापासून भाडेकरु म्‍हणून रहात होते व सदर घरामध्‍येच तक्रारदार वर नमुद व्‍यवसाय करतात. दि.07/03/2010 रोजी त्‍यांचे शेजारी असणारे सचिन तु‍रंबेकर यांचेत व तक्रारदारात भिंतीचे कारणावरुन कोर्टात दावा प्रलंबीत आहे. तक्रारदार रहात असलेले घर सदर तुरंबेकर विकत घेणार आहे. सदर दिवशी सकाळी 9.00वाजलेपासून तक्रारदार व त्‍यांचे कुटूंबिय कामात होते. 11.15 चे सुमारास 17 लोक व अन्‍य असे 20 ते 25 लोक घरात घुसून घर खाली करणेबाबत शिवीगाळ करुन तक्रारदाराचे आई व बहिणीला लाथाबुक्‍यांनी मारहाण केली तसेच दुकानात असणारे द्रोण पत्रावळया, प्‍लास्‍टीक पेले, सायकलचे टायरटयुब व घरातील प्रापंचीत साहित्‍य घरातून बाहेर रस्‍त्‍यावर फेकून दिलेले आहेत. अशा प्रकारचे साहित्‍याची मोडतोड करुन रुपये दोन लाखाची नुकसान केलेचे पेठवडगांव पोलीस स्‍टेशनला दिलेल्‍या गु.र.नं.40/2010 फिर्यादीवरुन दिसून येते. त्‍याबाबतचे वर्दी, तपास टिप्‍पण, पंचनामा, नुकसान झालेल्‍या मालाचा तपशील तसेच शिल्‍लक मालाचा तपशील, बीले, सर्व्‍हे रिपोर्ट, फोटोग्राफच्‍या सत्‍यप्रती इत्‍यादी कागदपत्रे सामनेवाला यांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली आहेत.
 
           प्रस्‍तुत जमावाने तक्रारदाराचे नमुद व्‍यवसायाचे व राहते ठिकाणी हल्‍ला केलेने भारतीय दंड विधान संहिता कलम 143, 147, 149,452, 427, 323, 504, 506 प्रमाणे गुन्‍हा नोंद आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवालांकडे भरुन दिलेल्‍या क्‍लेम फॉर्ममध्‍ये मॅलेसीस डॅमेज नुकसानीपोटी रक्‍कम मागणी केलेली आहे.
 
           तक्रारदाराने नमुद मिळकतीचे हल्‍ला झालेनंतरचे फोटोग्राफस प्रस्‍तुत प्रकरणी सुरज व्हिडीओज अॅन्‍ड फोटोग्राफी पेठवडगांव यांचे बिलासहीत दाखल केलेले आहे. वरील विस्‍तृत विवेचन व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराचे मालाचे मोठे प्रमाणात नुकसान झालेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने प्रस्‍तुत घटनेची माहिती सामनेवालांना दिलेनंतर सामनेवालांनी नेमलेले ब्रुचेल सर्व्‍हेअर यांनी प्रस्‍तुत ठिकाणाचा सर्व्‍हे करुन सविस्‍तर अहवाल दिलेला आहे. सदर अहवालामध्‍ये तक्रारदाराने रत्‍नाकर बँकेकडून त्‍यांचे स्‍टॉकवर कर्ज घेतलेचे नमुद केलेले आहे. तसेच तक्रारदाराचे ढोबळ उत्‍पन्‍न नमुद केलेले आहे. असेसमेंटमध्‍ये शिल्‍लक स्‍टॉकची नोंद केलेली आहे. यामध्‍ये बायसिकल मेटल पार्ट आणि टायर रु.23,220/- व पेपर प्‍लेट आणि पत्रावळीचे रु.58,747/- असे एकूण रु.81,967/- चा स्‍टॉक शिल्‍ल्‍क असलेचे नमुद केले आहे. तसेच नमुद मालापोटी अनुक्रमे रु.3,32,523/- व रु.1,82,566/- इतक्‍या नुकसानीचे तक्रारदाराने मागणी केलेली आहे. सदर नुकसानीपोटी सर्व्‍हेअर यांनी शुन्‍य रुपये नुकसानी निश्चित केलेली आहे. त्‍यांनी Remarks- The claimed loss is not authentic and is not covered by the scope of the Policy. This report is issued “Without Prejudice.” असे नमुद केले आहे. तसेच सोने, रोख रक्‍कम, दुरदर्शन संच इत्‍यादी वस्‍तु चोरीला गेलेचेही नमुद केले आहे. प्रस्‍तुतचा अहवाल दि.22/4/2010 रोजीचा आहे. प्रस्‍तुत अहवालामध्‍ये नमुद सर्व्‍हेअर यांनी प्रथम भेटीच्‍या वेळी तक्रारदाराकडून सायकलीचे पार्टस तसेच द्रोण पत्रावळया इत्‍यादीबाबत नुकसानी झालेल्‍या स्‍टॉकची माहिती मा‍गितलेचे नमुद केले आहे. मात्र प्रथम भेट कधी दिली याचा स्‍पष्‍टपणे उल्‍लेख केलेला नाही. मात्र सामनेवाला यांनी दाखल फोटोग्राफीच्‍या सत्‍यप्रतीमध्‍ये काही फोटो हे दि.11/03/2010(12.17), तसेच दि.17/03/2010 (14.57),(14.59) चे आहेत असे दिसून येते. प्रस्‍तुतची घटना ही दि.07/03/2010 रोजी घडलेली आहे. दि.22/04/2010 रोजी प्रस्‍तुत सर्व्‍हेअर यांनी अहवाल दिलेला आहे. तदनंतर दि.04/05/2010 रोजी नमुद सर्व्‍हेअर यांनी सामनेवाला यांना दिलेल्‍या पत्रामध्‍ये दि.29/04/2010 रोजी पुन्‍हा भेट दिलेचे नमुद केले आहे. तसेच रत्‍नाकर बँकेचे मॅनेजर श्री मगदूम यांनाही भेट दिलेचे नमुद केले आहे. सोन्‍याचे दागिने,दुरदर्शन संच तसेच रोकड प्रस्‍तुत पॉलीसी अंतर्गत येत नसलेचे नमुद केले आहे.  Paper and woven leaf plate and cycle parts as shown by the insured in the recovered items documents was more than the margin shown against the Sum Insured and the reported loss. We therefore pointed out that there was no claim/liability to the Insurers and so the claim was being close as ‘ No Claim’. असे नमुद केले आहे.
 
           वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे वर नमुद दोन्‍ही व्‍यवसायासंदर्भाचे मालाची पॉलीसी सामनेवालांकडे उतरविलेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच पोलीसांकडे नुकसानीची दिलेली माहिती ही अंदाजित आहे. सामनेवालाने दि.02/07/2010 रोजी तक्रारदाराचा क्‍लेम पत्राव्‍दारे नाकारलेला आहे. सदर पत्रामध्‍ये सामनेवाला यांनी सोन्‍याचे दागिने, दुरदर्शन संच व रोकड इत्‍यादीचा समावेश सदर स्‍टॉक अंतर्गत व पॉलीसी अंतर्गत येत नसलेचे नमुद केले आहे. तसेच तक्रारदाराचे झालेले नुकसान हे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे समाविष्‍ट होत नसलेने प्रस्‍तुतचा क्‍लेम नाकारलेला आहे. याचा विचार करता तक्रारदाराने क्‍लेम फॉर्ममध्‍ये सोन्‍याचे दागिने, दुरद र्शन संच व रोकड इत्‍यादी नुकसानीची मागणी केलेली नाही. सदर पॉलीसी नुसार रु.4,00,0000/- चा विमा रक्‍कम संरक्षीत केलेली होती. ज्‍यावेळी नुकसान झाले त्‍यावेळी सदर मालाचे बाजारी मुल्‍य रु.4,14,490/- इतके होते. त्‍यामध्‍ये रु.81,967/- इतका शिल्‍लक स्‍टॉक वजा जाता रु.3,32,523/- इतक्‍या नुकसानीच्‍या रक्‍कमेची मागणी केलेली आहे. त्‍यास अनुसरुन तक्रारदाराने नुकसान झालेल्‍या मालाचे वर्णनानुसार मालाची संख्‍या व दर याप्रमाणे यादी दिलेली आहे. सदर यादीनुसार रु.1,49,657/- सायकल स्‍पेअर पार्टसपोटी व रु.1,82,566/- द्रोण पत्रावळीचे नुकसानीपोटी अशी मिळून रु.3,32,523/- इतके नुकसान झालेली आहे.
 
           रत्‍नाकर बॅकेने तक्रारदारास स्‍टॉकवर रु.2,00,000/- इतके कॅश क्रेडीट कर्ज दिलेले आहे. याचाच अर्थ प्रस्‍तुत कॅश क्रेडीटपेक्षा जादा रक्‍कमेचा स्‍टॉक तक्रारदाराचे दुकानात होता ही वस्‍तुस्थिती नाकारता येणार नाही व त्‍याचे स्‍टॉक स्‍टेटमेंट बँकेकडे होते. नमुद सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे करताना याबाबीकडे दुर्लक्ष केलेचे स्‍पष्‍टपणे निदर्शनास येते. सर्व्‍हे करताना सर्वांगीण चौकशी केलेचे दिसून येत नाही तसेच त्‍या संदर्भातील कागदपत्रे दाखल केलेली नाहीत अथवा नमुद बँकेकडून पॉलीसी उतरवतेवेळी घेतलेले स्‍टॉक स्‍टेटमेंट व घटनेवेळचे स्‍टॉक स्‍टेटमेंट याची शहानिशा नमुद सर्व्‍हेअर यांनी केलेचे दिसून येत नाही. तसेच सर्व्‍हेअर यांनी नमुद घटनेदिवशी फोटो घेतलेचे दिसून येत नाही. सदर घटना घडलेनंतर 5 व 11 दिवसांनी म्‍हणजे दि.11 व 17 मार्च-2010 रोजी फोटो काढलेले आहेत. सदर घटनेनंतर तक्रारदाराचा उदरनिर्वाह सदर व्‍यवसायावर चालत असलेने तक्रारदाराने पै-पाव्‍हण्‍यांकडून हातउसणी रक्‍कम घेऊन दुकानामध्‍ये माल भरलेला आहे व त्‍या संदर्भातील बीले प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली आहेत व सदर बिले ही सामनेवालांकडून दाखल झालेली आहेत.
 
           नमुद सामनेवाला यांनी नमुद सर्व्‍हेअर यांचे अहवालावर आधारीत सायकल स्‍पेअर पार्टस हे आर्यन व स्टिलचे असलेने ते रिस्‍टोअर झाले असलेने ते नुकसानी झाले नसलेचे गृहीत धरले आहे. तसेच सर्व्‍हेअर यांनीसुध्‍दा इतकी मोठी मालाची नुकसानी होऊनही योग्‍य त्‍या कागदपत्रांचे आधाराशिवाय शुन्‍य इतकी नुकसानी निश्चित केलेली आहे. सदर सवर्हेअर यांनी निश्चित केलेल्‍या नुकसानीस कोणताही आधार नाही. त्‍या संदर्भातील कागदपत्रे व बँकेकडील स्‍टॉक स्‍टेटमेंट व अन्‍य अनुषंगीक कागदपत्रे नमुद सर्व्‍हेअर यांनी घेतली होती किंवा कसे यांबाबत कोणतीही स्‍पष्‍टता नाही. तसेच नमुद सर्व्‍हेअर यांचे शपथपत्र प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. याचा विचार करता सर्व्‍हेअर यांनी दिलेला अहवाला वस्‍तुस्थितीजन्‍य आहे असे निदर्शनास येत नाही. सबब सर्व्‍हेअर यांचा अहवाला हा विश्‍वासाहार्य पुरावा म्‍हणून गृहीत धरणे उचित होणार नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच हे मंच खालील पुर्वाधाराचा विचार करता सवर्हेअर यांचा अहवाला हा नुकसान निश्चितीसाठी एकमेव पुरावा म्‍हणून विचारात घेता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत येत आहे.
 
           तक्रारदाराने दिलेली नुकसानी झालेल्‍या तपशीलाची यादी नाकारणेस सबळ कारण दिसून येत नाही. तसेच नमुद पॉलीसीमध्‍ये क्‍लॉज-5-ROIT, STRIKE,MALICIOUS DAMAGE नुकसानीचा समावेश केलेला आहे व गु.र.नं.40/2010नुसार भा.द.वि.स.नुसार 147 नुसार रॉयटचा गुन्‍हा नोंद आहे. सदरची बाब पॉलीसीअंतर्गत कव्‍हर आहे. प्रस्‍तुत क्‍लॉज डी नुसार चोरी ही यास अपवाद आहे. मात्र प्रस्‍तुत प्रकरणी झालेली चोरी ही सोन्‍याचे दागिणे, दुरदर्शन संच रोकड बाबत झालेली असून तशी स्‍पष्‍ट नोंद पोलीस पेपरमध्‍ये आहे व त्‍याची मागणी तक्रारदाराने केलेली नाही. सबब सदर बाबींचा आधार घेऊन कोणतीही शहानिशा न करता आंधळेपणाने सदर कारणास्‍तव तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2:- तक्रारदाराने प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या नुकसानीचे यादीनुसार रु.1,49,657/- सायकल स्‍पेअर पार्टसपोटी व रु.1,82,566/- द्रोण पत्रावळीचे नुकसानीपोटी अशी मिळून रु.3,32,523/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्‍कमेवर सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.02/07/2010पासून द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सामनेवालांनी क्‍लेम नाकारुन केलेल्‍या सेवात्रुटी मुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                      आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास रक्‍कम रु.3,32,523/-(रु.तीन लाख बत्‍तीस हजार पाचशे तेवीस फक्‍त) मिळणेस पात्र आहेत. सदर रक्‍कमेवर दि.02/07/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज मिळणेस पात्र आहेत.
 
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) दयावेत.
 

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT