Maharashtra

Washim

CC/101/2015

Badrilal Ramcharan Jaiswal - Complainant(s)

Versus

Branch Manager, Bajaj Allianz Life Insurance Company Ltd. Akola - Opp.Party(s)

Adv. R.J. Thakre

26 Sep 2017

ORDER

Judgment
Final Order
 
Complaint Case No. CC/101/2015
 
1. Badrilal Ramcharan Jaiswal
At. Poharadevi Tq- Manora
Washim
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Branch Manager, Bajaj Allianz Life Insurance Company Ltd. Akola
At. Murtijapur Road, Near Of Radhakrushan Tokij Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale PRESIDENT
 HON'BLE MR. Shri.Kailas Wankhede MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 26 Sep 2017
Final Order / Judgement

                           :::     आ  दे  श   :::

              (  पारित दिनांक  :   26/09/2017  )

माननिय अध्‍यक्षा, सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार  : -

1.      तक्रारकर्त्‍याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम  12 अन्‍वये, विरुध्‍द पक्षाने द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला, म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्‍द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्‍तर व तक्रारकर्ते यांचा लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, मंचाने खालील निर्णय  पारित केला.  

     उभय पक्षात हा वाद नाही की, तक्रारकर्त्‍याने त्‍याची मयत पत्‍नी नामे सौ. प्रमिला बद्रीलाल जयस्‍वाल यांच्‍या नावाने विरुध्‍द पक्षाकडून लाईफ इंन्‍शुरन्‍स पॉलिसी रुपये 3,00,000/- रकमेची काढली होती व त्‍यात तक्रारकर्ते नॉमिनी दर्शविले आहे, म्‍हणून अशा परिस्थितीत तक्रारकर्ते विरुध्‍द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्‍कर्षाप्रत मंच आले आहे.

     उभय पक्षात वाद नसलेल्‍या बाबी अशा आहेत की, सदर पॉलिसी ही 22 वर्षाची होती व दिनांक 03/02/2037 रोजी परिपक्‍व होणार होती. पॉलिसीनुसार दिनांक 04/08/2026 ला शेवटचा प्रिमीयम, रक्‍कम रुपये 7,800/- अर्धवार्षिक नुसार भरावयाचे होते. सदर पॉलिसीनुसार जर विमाधारक हिचा मृत्‍यू नैसर्गीक झाल्‍यास, तिच्‍या नॉमिनीला रुपये 3,00,000/- रक्‍कम मिळणार होती व जर विमाधारकाचा मृत्‍यू झाला नसता तर दिनांक 03/02/2037 रोजी रुपये 2,40,000/- व या पॉलिसीचे ईतर लाभ मिळण्‍यास विमाधारक पात्र राहणार होती. दिनांक 19/03/2015 रोजी विमाधारकाचा मृत्‍यू झाला होता, त्‍याबद्दलची सुचना तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्षाला देवुन विमा क्‍लेम विरुध्‍द पक्षाकडे दाखल केलाअसता, दिनांक 23/10/2015 रोजी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ते यांना पत्र देवून त्‍यांचा क्‍लेम खालील कारण देवून नाकारला जसे की, . . .

   We would like to inform you that the company had covered the risk for the above said policy on the basis of the facts mentioned in the proposal form. However, on receiving the death claim intimation for the above said policy, the various investigations done, the various medical records received reveal certain facts, which were known to the deceased life assured and were not disclosed to us. Hence the death claim under above mentioned policy has been declined for the following reason/s.

   Hospitalization/Treatment during 23-Oct-14 to 24-Oct-14 as diagnosed case of Pyrexia with acute gastritis with Dehydration and Poliomyditis since childhood was pre-proposal. This fact was suppressed in proposal form dated 29-Jan-15 resulting into fraud ( active concealment of a fact by the insured having knowledge or belief of the fact ).

  Had these facts been disclosed the company would not have covered the risk for the above said policy under the same term and conditions.

  Hence, the claim has been repudiated due to non-disclosure of material facts.

 

3.    तक्रारकर्ते यांचे असे म्‍हणणे आहे की, सदर पॉलिसी काढतेवेळी   विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास कोणताही प्रपोजल फॉर्म दिला नव्‍हता. शिवाय विरुध्‍द पक्षाचे दावा नाकारण्‍याचे कारण संयुक्‍तीक नाही. विमाधारकाने विरुध्‍द पक्षाने विचारलेल्‍या माहितीबाबत खरा खुलासा प्रपोजल फॉर्ममध्‍ये दिला होता, त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाची ही सेवा न्‍युनता ठरते.

4.    विरुध्‍द पक्षाने रेकॉर्डवर प्रपोजल फॉर्म, पॉलिसी बॉन्‍ड, BLUE SPY INC ठाणे यांचा अहवाल इ. दस्‍त दाखल केले.

      विरुध्‍द पक्षाचे असे कथन आहे की, मयत विमाधारकाने विरुध्‍द पक्षाची सदरहू पॉलिसी ही दिनांक 04/02/2015 रोजी काढली व त्‍यासाठी आधी दिनांक 29/01/2015 रोजी पॉलिसी काढण्‍याकरिता प्रपोजल फॉर्म भरुन दिला होता. सदर प्रपोजल फॉर्ममधील डिक्‍लरेशन ऑफ गुड हेल्‍थ या क्‍लॉजमधील प्रश्‍न क्र. 1 ते 13 हे पॉलिसीधारकास यापुर्वी कोणता आजार होता का ? याबाबत माहिती देण्‍याचे होते, त्‍यात खरी माहिती भरावयाची असते. मृतक विमाधारकाने या क्‍लॉजमधील माहितीचे ऊत्‍तर नकारार्थी दिलेले आहे. विमाधारकाचा मृत्‍यू दिनांक 19/03/2015 रोजी झाला म्‍हणजे पॉलिसी काढल्यानंतर एका वर्षाच्‍या आत मृत्‍यू झाल्‍याने, विरुध्‍द पक्षाने नियमानुसार BLUE SPY INC ठाणे या एजन्‍सीमार्फत पूर्ण चौकशी केली होती.  त्‍यांच्‍या अहवालानुसार असे कळाले की, मृतक पॉलिसीधारकाला लहानपणापासून Poliomyditis हा आजार होता, ऑक्‍टोंबर 2014 मध्‍ये मृतक ही लाईफ केअर हॉस्‍पीटल, नागपूर येथे तिला Pyrexia with acute gastritis with Dehydration या आजाराच्‍या निदानासाठी भरती होती. डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या दवाखान्‍यात भरती राहून उपचार करण्‍यास सांगितले परंतु मृतकाच्‍या नातेवाईकांनी दवाखान्‍यात भरती राहून उपचार घेण्‍यास नकार दिला व मृतकाला दवाखान्‍यातून घरी आणले.  विरुध्‍द पक्षाकडून पॉलिसी घेतांना अत्‍यंत महत्‍वाच्‍या गोष्‍टीचा खुलासा जाणुन-बुजून विमाधारकाने केला नाही. विमा कराराअंतर्गत ही फसवणूक ठरते म्‍हणून तक्रारकर्ते यांचा विमा दावा नाकारण्‍यात विरुध्‍द पक्षाची सेवा न्‍युनता नाही.

5.     अशाप्रकारे उभय पक्षांचे कथन आहे. यावर मंचाचेअसे मत आहे की, तक्रारकर्त्‍याने मृतक विमाधारकाच्‍या उपचाराबाबत कोणतेही दस्‍त रेकॉर्डवर दाखल केले नाही व विरुध्‍द पक्षाने BLUE SPY INC ठाणे यांच्‍यातर्फे  तक्रारकर्त्‍याच्‍या डेथ क्‍लेमची चौकशी करुन, त्‍यांनी जो अहवाल व दस्‍त रेकॉर्डवर दाखल केले, त्‍याबद्दल तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्‍तरात असे कथन आहे की, ते विरुध्‍द पक्षाने बनावटी प्राप्‍त करुन घेतले आहे. परंतु सदर अहवालात मयत विमाधारकाने जिथे उपचार घेतला ते लाईफ केअर हॉस्‍पीटल ( युनीट ऑफ तन्‍ना हॉस्‍पीटल प्रा. लि. ) यांनी जारी केलेले डिस्‍चार्ज ऑन रिक्‍वेस्‍ट हे दस्‍त आहे. त्‍यातील नमूद संपूर्ण मयत विमाधारकाच्‍या हिस्‍ट्रीवरुन, विरुध्‍द पक्षाच्‍या कथनात मंचाला सत्‍यता आढळते, त्‍यास बनावट कागदपत्रे म्‍हणून दूर्लक्षीत करता येणार नाही. विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या संपूर्ण कागदपत्रांवरुन, तक्रारकर्ते हे स्‍वच्‍छ हाताने मंचासमोर आले नाही, असा बोध होतो.  म्‍हणून विरुध्‍द पक्षाची सेवा न्‍यूनता सिध्‍द न झाल्‍यामुळे, तक्रारकर्ते यांची तक्रार मंजूर करता येणार नाही.  

     सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.  

                 अंतिम आदेश

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
  2. न्‍यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश पारित करण्‍यात येत नाही. 
  3. उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्‍क पुरवाव्या.

 

               ( श्री. कैलास वानखडे )     ( सौ. एस.एम. उंटवाले )  

                        सदस्‍य.                       अध्‍यक्षा

        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, वाशिम,(महाराष्‍ट्र).

         svGiri

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Shri.Kailas Wankhede]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.