निकाल
पारित दिनांक 22.03.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांनी त्यांचा बजाज डिस्कव्हर क्र.23 AA 4548 गाडीची गैरअर्जदार यांचेकडे दि.28.02.11 ते 27.02.12 या कालावधीचा चोरी व अपघाताबाबतची विमा पॉलीसी रु.43,100/- एवढया रकमेची घेतली होती.
तक्रारदार दि.18.06.11 रोजी बँक ऑफ इंडीया, जालना रोड बीड येथे कामासाठी गेले असता सदर गाडी चोरीला गेली. तक्रारदारांनी या संदर्भातील तक्रार दि.18.06.11 रोजी
(2) त.क्र. 42/12
पोलीस स्टेशनमध्ये दिली. परंतू पोलीसांनी गाडीचा शोध घेतल्यानंतर गाडी सापडली नाही तरच फिर्याद लिहून घेवू व पुढील तपास करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी दि.22.06.11 रोजी पोलीस स्टेशनमध्ये जावून गाडी चोरी बददल फिर्याद नोंदवली. तक्रारदारांनी या संदर्भातील माहिती गैरअर्जदार विमा कंपनीला कळविण्यासाठी ज्या एजंटकडून पॉलीसी घेतली त्यांची भेट घेवून सांगितले. विमा एजंटने काही कागदपत्राची पुर्तता करावयास सांगितले. सदर कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर क्लेम फॉर्म भरता येईल असे सांगितले.
त्याप्रमाणे तक्रारदार एफ.आय.आर.ची रक्कम घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता दि.11.08.11 रोजी पोलीसांनी एफ.आय.आर.ची रक्कम दिली. पोलीसांनी एफ..आय.आर.ची नोंद करण्यास विलंब का केला? या बाबतची तक्रारदारांना कोणतीही माहिती नाही. तक्रारदारांना एफ.आय.आर. व फायनल समरी मंजूरी आदेश दि.19.10.11 रोजी प्राप्त झाल्यानंतर विमा एजंटकडे दिले. गैरअर्जदार यांचेकडे क्लेम फॉर्म यापूर्वीच दिलेला होता. तसेच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली परंतू गैरअर्जदार यांनी दि.23.12.11 रोजीच्या पत्रान्वये क्लेम नामंजूर केला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झाले असून लेखी म्हणणे दि.04.07.12 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांची गाडी चोरी झाल्याबाबतचा एफ.आय.आर. पोलीसांनी घटनेनंतर 54 दिवसाच्या विलंबाने दाखल केला. तसेच तक्रारदारांनी सदर घटनेची माहिती गैरअर्जदार यांना दि.20.08.11 रोजी म्हणजेच 63 दिवसाच्या विलंबाने दिली. विमा पॉलीसीच्या अटी व शर्ती नुसार सदर घटनेची लेखी माहिती घटनेनंतर तात्काळ देणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी विलंबाबात समाधानकारक खुलासा दिलेला नसल्यामुळे दि. 23.12.11 रोजीच्या पत्रान्वये गैरअर्जदार यांनी विमा प्रस्ताव योग्यरित्या नामंजूर केला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदारांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.लघाने आणि गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांच्या गाडीची विमा पॉलीसी गैरअर्जदार यांचेकडून घेतल्याची बाब तसेच गाडीच्या चोरीची घटना विमा कालावधीत घडल्याची बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. परंतू तक्रारदारांची गाडी दि.18.06.11 रोजी चोरी झाल्यानंतर दि.11.08.11 रोजी पोलीसांनी
(3) त.क्र.42/12
एफ.आय.आर.ची नोंद 54 दिवसाच्या विलंबानंतर केली. तसेच सदर घटनेची लेखी माहिती (Written intimation) 62 दिवसाच्या विलंबानंतर म्हणजेच 63 दिवसाच्या विलंबानंतर दिली.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता कंडीशन नं.1 नुसार विमाधारकाने घटनेची लेखी माहिती तात्काळ गैरअर्जदार विमा कंपनीला तसेच संबंधित पोलीस अॅथॉरिटीला देणे बंधनकारक आहे.
तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार तक्रारदारांनी सदर घटनेची म्हणजेच गाडी चोरीची माहिती पोलीसांना दि.11.08.11 रोजी मिळाल्याबाबत एफ.आय.आर.वर नमुद केल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर घटनेची माहिती पोलीसांना दि.11.08.11 रोजी मिळाल्याचे स्पष्ट होते.
तक्रारदारांनी दि.22.06.11 रोजी पोलीस निरीक्षक यांचेकडे माहिती दिल्याबाबतची प्रतीक्षा न्यायमंचात दाखल केली आहे. परंतू सदरचे रेकॉर्ड पोलीस डायरी बाबतचे आहे किंवा ? या बाबत खुलासा होत नाही. तसेच पोलीसांना सदर घटनेची माहिती दि.22.06.11 रोजी झाली असूनही एफ.आय.आर.मध्ये मात्र दि.11.08.11 नोंद केल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत ही तक्रारदारांनी घटनेनंतर 4 दिवसांनीच पोलीसांना माहिती दिल्याचे स्पष्ट होते. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीला दि.17.12.11 रोजीच्या पत्रान्वये विलंबाने कागदपत्रे दिल्याचे नमुद केले आहे.
तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार तक्रारदारांनी विमा पॉलीसीच्या अटी व शर्ती नुसार गाडी चोरीला गेल्यानंतर तात्काळ पोलीसांना व लेखी पत्राद्वारे गैरअर्जदार विमा कंपनीला देणे बंधनकारक असूनही माहिती विलंबाने दिली आहे. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीला क्लेमची रक्कम देण्यास जबाबदार धरता येत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
गैरअर्जदार यांनी राष्ट्रीय आयोगाच्या रिव्हीजन पिटीशन नं.3719/2011 निकाल तारीख 03.07.12 रोजीचा न्यायनिवाडा समर्थनार्थ दाखल केला आहे. सदर न्यायनिवाडयानुसार विमाधारकाने घटनेची माहिती देण्यास विलंब केल्यानंतर सदर वाहनाची रिकव्हरी सुलभरित्या होवू शकत नाही. अशा परिस्थितीत विमा कंपनीने प्रस्ताव नामंजूर करणे योग्य ठरते असे नमुद केले आहे.
तक्रारदारांनी गाडी चोरी झाल्याबाबतची माहिती पोलीसांना विलंबाने दिल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने योग्य कारणास्तव तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. अशा
(4) त.क्र.42/12
परिस्थितीत गैरअर्जदार यांची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधुरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.