जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –186/2010 तक्रार दाखल तारीख –04/01/2011
1. शांताबाई भ्र. नंदलाल पारीख
वय 50 वर्ष धंदा घरकाम
रा. शनी मंदीर गल्ली बीड
2. रुख्मीनबाई भ्र.रामनारायण व्यास
वय 70 वर्षे धंदा पुजारी
रा.शनी मंदीर गल्ली बीड ...तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी,
प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक लि.
शाखा नगर रोड, तहसील कार्यालयसमोर बीड ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड. सी.एन.वीर
सामनेवाले तर्फे :- अँड.डी.एम. डबडे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार क्र. 1 व 2 हे बीड येथील रहिवासी असून त्यांनी सामनेवाला यांचेकडे दामदुप्पट योजनेअंतर्गत रक्कम रु.5,000/- यांचे दि.02.03.2000 रोजी मुदत ठेव पावती केलेली होती. ज्यांचा पावती नंबर 5142, खाते नंबर 220 अन्वये त्यांची मुदत संमाप्तीची तारीख 03.09.2004 अशी होती. त्यांचा व्याज दर द.सा.द.शे. 16 टक्के या व्याज दराने सदर मूदत प्रमाणपत्र सामनेवाला यांनी तक्रारदारास अदा केले होते. तक्रारदार यांनी मुदत संपल्यानंतर पावती मूदत वाढीसाठी अर्ज दिला नाही व तशी मागणीही केली नाही. अर्जदार दि.06.09.2010 रोजी बँकेत गेले असता दामदुप्पट मूदत संपलेली दिनांक 16.07.2007 पासुन ते 17.07.2010 पर्यतचे सहा वर्षाचे 16 टक्के दराने सदर मुदत ठेव पावती पूर्नगठीत करुन दयावी अशी विनंती केली असता त्यांनी त्यांस असमर्थमा दाखवल्यामुळे तक्रारदाराने दि.03.09.2004 ते 03.09.2010 या सहा वर्षाच्या कालावधीचे रु.10,063/- त्यावर सहा वर्षाचे 16 टक्केने व्याज रु.9660/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व खर्चापोटी रु.5,000/- मागणी केली आहे. तक्रारदाराने आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ मूदत ठेव पावतीची सत्यप्रत दाखल केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दि.30.03.2011 रोजी दाखल केले असून, तक्रारदारांनी दामदुप्पट योजनेअंतर्गत ठेवलेली मुदत ठेव पावती ही मान्य असून, तक्रारदाराने मुदतीअंतीनंतर निष्काळजीपणे मुदत पावती पूर्नगठीत केली नाही त्यामुळे बँकेने तक्रारदारास देऊ केल्याचे सेवेत कोणतीही त्रूटी केली नाही व तक्रारदाराची जमा असणारी मुदत ठेव पावती व त्यावर बचत खात्याचे मुदतपूर्तीनंतरचे व्याज दर द.सा.द.शे. रु.3.50 देण्यास सामनेवाले तयार आहेत असे आपल्या युक्तीवादात म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी सामनेवाला यांनी केली आहे.
सामनेवाला व तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्रे व तोंडी यूक्तीवाद यांचे बारकाईने अभ्यास केला असता बँकेने तक्रारदाराच्या मुदत ठेव पावतीस प्रचलित मुदत ठेवीच्या व्याज दरानुसार व्याज देणे योग्य व न्यायाचे आहे असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार क्र.1 व 2 यांची मुदत ठेव
पावती रु.10,063/- यावर दि.03.09.2004 पासून ते 03.09.2010 पर्यतचे मुदत
ठेव पूर्नगठीत करुन दि.03.09.2004 रोजी प्रचलित उपरोक्त दिनांकाचे व्याज
दरपत्रकाप्रमाणे नुसार व्याजाची आकारणी करुन तक्रारदारास निकाल प्राप्ती पासून
30 दिवसांचे आंत अदा करावेत.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र.2 चे पालन मुदतीत न
केल्यास पुर्ण रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के या दराने दि.03.09.2004 पासून
तक्रारदाराच्या पदरीपडेपर्यत व्याज देण्यास जबाबदार राहतील.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास निकाल प्राप्तपासून 30
दिवसांचे आंत मानसिकत्रासापोटी रु.3,000/- व खर्चापोटी रु.2,000/- दयावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20(3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड