जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/134. प्रकरण दाखल तारीख - 12/06/2009 प्रकरण निकाल तारीख – 11/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य श्यामसुंदर पि. पांडूरंग कबीर वय, 35 वर्षे, धंदा व्यापार रा. सावरगांव (पीर) ता.मुखेड जि. नांदेड अर्जदार विरुध्द. शाखाधिकारी, टि.एम.एल.फायनान्स सर्व्हीस लि. गैरअर्जदार शाखा नांदेड बाफना टि. पाईट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. ए.एन.मुखेडकर गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.गणेश शिंदे. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार फायनान्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हे मौजे सावरगांव (पीर) ता. मुखेड येथील रहीवासी असून अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये दि.22.2.2007 रोजी करार क्र.5000067617 हा लीखीत स्वरुपात झाला. या कराराप्रमाणे अर्जदारास मॉडेल डि.एल.एस. इंडिका जिचा गाडी नंबर एम.एच.26-एस-0315 साठी वित्त पूरवठा केला. रु.8600/- चे 35 महिन्याचे हप्ते ठरवून देण्यात आले. ज्याची सरासरी रक्कम रु.3,01,000/- होते. सदरील रक्कम दि.22.2.2007 रोजी आणि नियम स्वरुपाचे हप्ते दि.21.3.2007 पर्यत दर महिन्याच्या 21 तारखेस देण्याचे ठरले होते. कराराप्रमाणे अर्जदाराने श्री साई अर्बन कोऑप बँक शाखा मुखेड यांचे रु.8600/- प्रमाणे 20 धनादेश दिले. ज्यांचा नंबर 038787 ते 038800 असे एकूण चौदा व 6026 ते 6031 असे सहा असे एकूण 20 धनादेश दिले. चेक क्र.038788 ते 038796 हे नऊ चेक अर्जदाराच्या बॅकेतून वटवून गैरअर्जदाराच्या डयूज बँक मुंबई या बॅंकेत पाठविले. नऊ चेक वटवून रक्कम डि.डि. द्वारे पाठविलेली गैरअर्जदारास माहीत असूनसूध्दा त्यांनी अर्जदाराची गाडी दि.25.10.2008 रोजी जबरदस्तीने ओढून नेली. मूददाहून अर्जदारास ञास देण्याचे उददेशाने गैरअर्जदाराने अर्जदारास ञूटीची सेवा दिली. ती गाडी गैरअर्जदारांनी दि..22.11.2008 पर्यत लातून येथे लावली त्यामूळे अर्जदाराचे 29 दिवसाचे आर्थिक नूकसान झाले. प्रति दिवस रु.2000/- प्रमाणे रु.58,000/- व शो रुमला गाडी ठेवल्यामूळे गाडीचे नूकसान रु.12000/- झाले. गाडी असताना अर्जदाराला खाजगी वाहन वापरावे लागले त्याबददल रु.1000/- खर्च आला. शोरुम मधील 20दिवसांचे पार्कीग चार्जेस रु.2500/- तसेच अर्जदारास रु.17500/- मानसिक ञासापोटी व इतर खर्च झाला. म्हणून असे एकूण रु.1,00,000/-अर्जदारास गैरअर्जदाराकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (डी) नुसार ग्राहक नाही त्यामूळे तक्रार फेटाळण्यात यावी. गैरअर्जदार यांना मान्य आहे की, त्यांचेमध्ये करार झाला होता. अर्जदाराने गैरअर्जदारास धनादेश क्र.596920हा दि.1.3.2008 चा धनादेश न वटता परत आलेला आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने बँकेच्या मेमोची प्रत दाखल केलेली आहे. सदर मेमोमध्ये खात्यावर रक्कम अपूरी असल्यामूळे धनादेश वटला नाही असे नमूद केलेले आहे. धनादेश न वटल्यामूळे त्यांच्याकडे कर्ज हप्त्याची थकबाकी होती त्यामूळे अर्जदार हा कंपनीचा थकबाकीदार झालेला होता. गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत अर्जदारास नोटीस पाठवून अर्जदाराकडे नोटीसीच्या तारखेपर्यत थकबाकी रक्कम रु.53,744/-फेडण्याबददल रजिस्ट्रर पोस्टाने नोटीस पाठवीलेली आहे.दि.25.10.2008पर्यत अर्जदाराकडे रु.79,862/- बाकी आहेत. वेळोवेळी सूचना देऊन अर्जदार यांनी रक्कम भरली नाही म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणात अर्जदाराच्या संपूर्ण कर्जाचे विवरण दाखल केलेले आहे. अर्जदाराची गाडी ही त्यांना नोटीस देऊन ताब्यात घेतलेली आहे. त्यामूळे त्यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी. करारानुसार अर्जदार थकबाकीदार राहीला तर कंपनीस गाडी ताब्यात घेण्याचे पूर्ण अधिकार राहतील असे नमूद आहे. त्यामूळे सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करुन अर्जदाराचे वाहन ताब्यात घेतलेले आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. अर्जदाराचे रु.58,000/- नूकसान कूठल्या स्वरुपात झालेले आहे या बददल माहीती नाही. अर्जदाराची कर्ज भरण्याची कूवत असूनसूध्दा त्यांनी कर्ज बूडवीण्याचे उददेशाने रक्कम भरलेली नाही. तसेच कर्जाचे थकीत हप्ते भरण्याचे टाळता यावे म्हणून सदरची तक्रार दाखल केलेली आहे. दि.25.10.2008 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन जप्त केले आणि दि.21.11.2008 रोजी अर्जदाराने रु.72000/- भरल्यानंतर अर्जदाराचे वाहन दि.22.11.2008 रोजी त्यांचे ताब्यात देण्यात आले. त्यामूळे गैरअर्जदाराने सेवेत कूठेही कमतरता केलेली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार रु.10000/- खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून वित्त पूरवठा घेतलेला आहे. त्याबाबत त्यांनी करार, करंट लेजर, तसेच रक्कम भरल्याच्या पावत्या अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी जवाबामध्ये कर्ज दिल्याचे मान्य केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मते आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून इंडिका कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलेले आहे. सदर कर्ज हप्त्याची थकबाकी झाल्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना थकबाकीची रक्कम फेडणे बाबत कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे. परंतु नोटीस मिळूनही अर्जदार यांनी थकबाकीची रक्कम भरली नसल्याने गैरअर्जदारांनी अर्जदार यांचे वाहन ताब्यात घेतलेले आहे. अर्जदार यांच्या अर्जातील कथनानुसार गैरअर्जदार यांनी दि.25.10.2008 रोजी अर्जदार यांचे वाहन ओढून नेलेले आहे. अर्जदार यांनी दि.21.11.2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.72,000/- एवढी रक्कम भरलेली आहे. त्याबाबतची गैरअर्जदार यांनी दिलेली पावती अर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी दिलेला धनादेश क्रमांक 596920 दि.11.03.2008 चा साई अर्बन बँक शाखा मुखेड हा गैरअर्जदार यांना दिलेला धनादेश न वटता परत आलेला आहे. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे डिफॉलटर झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे वाहन थकबाकीदार झाल्यामूळे ताब्यात घेतलेले होते. अर्जदार यांनी थकबाकीसाठी दिलेला धनादेश वटलेला नाही या कारणामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. 2007 (2) सी.पी.जे. पान नंबर 325 राष्ट्रीय आयोग RPG ITOCHO FINANCE L.T.D. & ORS. VS. RAMESH CHAND & OTHRS. Hire purchase agreement—Vehicle purchased on finance—failure to pay instalements vehicle repossessed—complaint allowed by Fora below—Revision—Complainant committed default in payment of instalments—O.P. authorized to repossess vehicle as per clause 11 (a) (i) of Hire—purchase Agreement—Revision petition allowed—Hence review—NO error apparent on face of record (Revision Petition dismissed) या निकालपञानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे वाहन ताब्यात घेतलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलेले आहे. सदर कर्जाचे परतफेडीपोटी दिलेला धनादेश वटलेला नाही. गैरअर्जदार यांनी थकबाकी भरणे बाबत नोटीस देऊनही अर्जदार यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही त्यामूळे अर्जदार यांचे वाहन गैरअर्जदार यांनी ताब्यात घेतलेले आहे. अर्जदार यांनी रक्कम रु.72000/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे भरणा केल्यानंतर अर्जदार यांचे वाहन अर्जदार यांना परत ताब्यात दिलेले आहे ही बाब अर्जदार यांनाही मान्य आहे. असे असताना सूध्दा अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द सदरच्या मे. न्याय मंचात विनाकारण तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार यांना नाहक खर्चात पाडलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार हे अर्जदार यांचे कडून कॉम्पेसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदाराचा अर्ज, शपथपञ कागदपञ व त्यांचे तर्फे झालेला यूक्तीवाद, तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपञ व त्यांचे तर्फे झालेला यूक्तीवाद व वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ व वरील सर्व विवेचनाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना कॉम्पेसेटरी कॉस्ट रक्कम रु.1000/- निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |