(द्वारा श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
1. तक्रारदार यांच्या मालकीची सदनिका क्र. E8 – G4 व तक्रारदार व त्यांच्या आई श्रीमती इंदु मुखर्जी यांच्या जॉईंट मालकीची सदनिका क्र. E8 – G3 सामनेवाले सोसायटीच्या इमारतीमध्ये आहे.
2. तक्रारदार यांच्या मालकीचे वाहन सँन्ट्रो कार करीता E8 – G4 मध्ये व त्यांचे आईचे कार करीता E8 – G3 मध्ये पार्कींगची जागा स्पेस सामनेवाले यांनी दिल्या असुन तक्रारदार सदर प्रत्येकी पार्कींग करीता रु. 60/- प्रमाणे प्रतिमहा चार्जेस सामनेवाले यांचेकडे नियमितपणे भरणा करतात.
3. तक्रारदारांच्या आईचे निधन ता. 12/01/2011 रोजी झाल्यानंतर तक्रारदार यांनी मारूती कार विक्री केली. सदरची बाब सामनेवाले यांना कळवली असुनही तक्रारदार यांच्या आईच्या नावे मेन्टेनन्स बिलामध्ये सदर मारुती कारच्या पार्किंगची आकारणी करणे सामनेवाले यांनी चालुच ठेवले.
4. तक्रारदार यांच्या पत्नी अनिता मुखर्जी यांची Honda Civic Car तक्रारदार यांच्या आईच्या (मारुती कारच्या) वाहन पार्किंग जागेत ठेवण्यात सुखात केली. तथापी सामनेवाले यांना तक्रारदार यांच्या संमतीशिवाय सदर पार्किंगची जागा श्री दळवी यांना अॅलाट केली असुन दळवी त्यांची मारुती वॅगनार गाडी तेथे लावतात. अशा परिस्थितीत तक्रारदार पत्नीच्या गाडी ठेवण्यास पार्किंगची जागा उपलब्ध राहीली नाही.
5. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे याबाबत विचारणा केली तथापी सामनेवाले यांनी मे 2011 पासून अद्याप पर्यंत सदनिका क्र. E8 – G3 करीता पार्किंगच्या शुल्काची आकारणी मेन्टेनन्स बिलामध्ये केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे या संदर्भात तोंडी विनंती केली तसेच ता. 31/02/2011 रोजी कायदेशिर नोटिस पाठवली तथापी सामनेवाले यांनी नोटिसी प्रमाणे कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
6. सामनेवाले यांचे म्हण्ण्यानुसार तक्रारदार हे सामनेवाले सोसायटी विरुध्द नेहमी तक्रार करातात. तक्रारदार सोसायटीचे मेन्टेनन्स चार्जेस नियमितपणे भरणा करत नाहीत. तक्रारदारांना व त्यांचे आई इंदु मुखर्जी यांना अनुक्रमे ता. 08/03/2007 व ता. 01/06/2007 रोजीच्या अर्जाअन्वये सामनेवाले सोसायटीने दोन कार पार्किंग बाबतचे संमतीपत्र दिले आहे. त्याप्रमाणे तक्रारदार व त्यांचे आईच्या कारचे पार्किंग सदर दोन्ही पार्किंग मध्ये केले जात होते.
7. तक्रारदारांनी त्यांच्या आईच्या निधनाबाबत व त्यांचे आईची कार विक्री केल्याची माहीती सोसायटीला दिली नाही. तक्रारदार त्यांचे पत्नीच्या कारचे पार्किंग सामनेवाले सोसायटीचे संमती विना इतरत्र सोसायटीच्या जागेत करत असल्याने सामनेवाले सोसायटीने तक्रारदार यांच्या पत्नीच्या कार पाकिैंग करीता रु. 60/- प्रमाणे प्रति महिना कार पार्किंग शुल्काची आकारणी केली आहे.
8. सामनेवाले सोसायटीला तक्रारदार यांच्या आईच्या नावावर असलेली कार विक्री केल्याची माहीती मिळाल्यानंतर त्यांनी मे 2011 ते मार्च 2012 चे पार्किंग चार्जेसची क्रेडीट रक्कम रु. 576/- चे तक्रारदार यांना देण्यात आले. तक्रारदार यांनी सदर कार पार्किंगमध्ये सामनेवाले सोसायटी यांचे कडुन तक्रारदार यांच्या पत्नीची होंडा सिव्हीक कार पार्किंग करण्याची परवानगी घेतली नाही. सबब तक्रारदार त्यांच्या पत्नीच्या कारचे पार्किंग अनाधिकृतरित्या करत होते.
9. तक्रारदारांनी त्यांच्या आईच्या नावावर असलेली कार विक्री केल्यानंतर सदर पार्किंग जुन 2011 पासून रिकामी असल्याने सोसायटीचे सदस्य श्री दळवी यांना ऑक्टोबर 2011 मध्ये देण्यात आली. तक्रारदार यांनी त्यांची सदनिका अन्य व्यक्तीस विक्री केल्यामुळे तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रार चालविण्याचा अधिकार नाही.
10. तक्रारदारांनी ता. 01/12/2011 रोजी दुस-या कार पार्किंगसाठी (तक्रारदारांच्या पत्नीच्या कार करीता) सामनेवाले सोयाटीकडे लेखी अर्ज केला नाही. अथवा तोडी विंनतीही केली नाही. तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घेडले नाही सबब तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी.
11. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र तसेच सामनेवाले यांची लेखी कैफियत, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद यांचे सखोल वाचन करण्यात आले. तक्रारदार हे लेखी व तोंडी युक्तिवादासाठी सातत्याने गैरहजर असल्यामुळे प्रकरण तक्रारदार यांच्या लेखी व तोडी युक्तिवादाशिवाय पुढे चालविण्याबाबत मंचाने आदेश पारित केला. सामनेवाले यांचे वकीलांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तक्रार अंतीम आदेशासाठी ठेवण्याची विनंती केली. सबब तक्रारीतील उपलब्ध कागदपत्रांच्याआधारे मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढत आहे.
12. कारण मिमांसा
अ. तक्रारदारांची सामनेवाले सोसायटीच्या इमातरीतीत स्वतंत्र मालकीची सदनिका क्र. E8 – G04 असुन तक्रारदार व त्यांची आई श्रीमती इंदु मुकर्जी यांच्या संयुक्त मालकीची सदनिका क्र. E8 – G03 आहे. ततक्रारदार यांनी ता. 08/03/2007 रोजी सामनेवाले यांचेकडे दोन चाकी व चार चाकी वाहनासाठी पार्किंगची मागणी केली व तक्रारदार यांच्या आईने ता. 01/06/2007 रोजी त्यांचे दोन चाकी व चार चाकी वाहनासाठी पार्किंगची मागणी केली. त्याप्रमाणे सामनेवाले सोसायटीने तक्रारदारांना व त्यांचे आईला त्यांचे कार पार्किंग साठी जागा अलॉट केल्याचे दिसुन येते. तक्रारदार यांना सोसायटीने सदर पार्किंग दिल्याबाबतचे पत्राची प्रत मंचात दाखल आहे.
ब. तक्रारदारांच्या आईचा ता. 12/01/2011 रोजी मत्यु झाला असुन मृत्यु प्रमाणपत्राची प्रत मंचात दाखल आहे. तसेच तक्रारदारांना E8 – G03 सदनिकेचे त्यांचे आईच्या नावाचे मेन्टेनन्सचे बील ता. 01/01/2012 रोजी सामनेवाले सोसायटीने दिल्याबाबतची प्रत मंचात दाखल आहे. सदर बीलामध्ये सामनेवाले यांनी रक्कम रु. 60/- पार्किंग चार्जेसची आकारणी केली आहे. तसेच तक्रारदारांना E8 – G04 सदनिकेचे त्यांचे नावाचे ता. 01/01/2012 रोजी सामनेवाले सोसयाटीने दिल्याबाबतची प्रत मंचात दाखल आहे. सदर बीलामध्ये सामनेवाले यांनी रक्कम रु. 120 पार्किंग चार्जेसची आकारणी केली आहे. .
क. सामनेवाले सोयायटीच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व त्यांचे आईचे चार चाकी करीता दोन पार्किंगच्या जागा सामनेवाले यांनी अलॉट केल्या होत्या.तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीकरीता तिसरी कार घेतली तथापी सदर कार करीता पार्किंग मिळण्याबाबत सामनेवाले सोसायटीकडे अर्ज न करता अनाधिकृतपणे इतरत्र पार्किंग करत असल्यामुळे सामनेवाले यांनी तिस-या कारच्या पार्किंग शुल्काची आकरणी करण्यास सुरवात केली.
ड. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्या आईच्या मत्युची व त्यांची कार विक्री केल्याची माहीती तक्रारदार यांची ता. 03/12/2011 रोजीची कायदेशिर नोटिस प्रात झाल्यानंतर सामनेवाले यांना ज्ञात झाली व त्याप्रमाणे मे. 2011 ते मार्च 2012 या कालावधीची स्विकारलेली अतिरिक्त पार्किंगच्या शुल्काची रक्कम सोसायटीने तक्रारदार यांना क्रेडीट केली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या कार पार्किंगसाठी सोसायटीच्या संमतीशिवाय त्यांचे आईचे कार पार्किंगचा वापर केला तक्रारदार यांनी सदनिकसा क्र. E8 – G04 भाडेतत्वावार दिल्यानंतर जुन 2011 पासून पार्किंगची जागा मोकळीच होती. तक्रारदार यांनी सदनिका क्र. E8 – G04 ता. 07/06/2011 पासून श्री. संजय प्रधान यांना भाडेतत्वावर दिल्याबाबतचे Leave and Licence कराराची प्रतीक्षा मंचात दाखल आहे. तक्रारदार यांनी त्यांचा राहण्याचा पत्ता सामनेवाले सोसायटीकडे दिलेला नाही. तक्रारदार यांना सोसायटीने या संदर्भात ता. 01/11/2011 रोजी पत्र पाठवले. तसेच मेन्टेनन्सची बिले पाठवली तथापी तक्रारदार मेन्टेनन्स बीलाचा भरणा करत नाहीत.
- E8 – G04 ही भाडेत्तवावर दिल्यानंतर तक्रारदार यांच्या आईच्या पार्किंग जागेत पत्नीची कार पार्किंग करणे सोडुन दिल्यामुळे जुन 2011 पासून सदर कार पार्किंगची जागा रिकामी असल्यामुळे सामनेवाले सोसायटीने श्री दळवी यांना सदर पार्किंग दिले आहे. यावरुन सामनेवाले यांची सदरची कृती सेवेतील त्रृटी असल्याचे स्पष्ट होत नाही.
ईं. तक्रारदार यांचेवर सोसायटीच्या बॉयलॉज मधील तरतुदीचे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या मृत्युची तसेच वाहनाची विक्री केल्याची बाब सामनवाले सोसायटीला कळवणे बंधनकारक होते.तसेच तक्रारदार यांच्या पत्नीच्या कार पार्किंग करीता सामनेवाले यांचेकडे कायदेशिररित्या मागणी करणे आवश्यक होते.तथापी तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या मृत्युनंतर E8 – G03 सदनिकेच्या पार्किंगची जागा त्यांच्या पत्नीच्या कार करीत अनाधिकृतपणे सोसायटीच्या संमतीशिवाय वापर करुन नियमबाह्य वर्तन केल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारदार यांनी त्यांची सदनिका सोसायटीच्या परवानगी शिवाय भोडेतत्वावर दिली असुन तक्रारदार सामनेवाले सोसयटीच्या मेन्टेनन्सचा भरणा नियमितपणे करत नाहीत असे सामनेवाले यांचे सोसायटीचे म्हणणे आहे. तक्रारदार यांनी सोसायटीकडे सदनिका भाडेतत्वावर देण्यासाठी परवानगीचा अर्ज दाखल केल्याबाबतचा पुरावा मंचासमोर नाही. तसेच तक्रारदारांनी नियमितपणे मेन्टेनन्सची रक्कम सामनेवाले यांचेकडे जमा करत असल्याबाबतचा पुराव मंचात दाखल केला नाही. सबब सामनेवाले यांचे म्हणणे ग्राह्य धरणे उचित आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारीतील दाखल पुराव्यानुसार सामनेवाले यांची सेवेतील त्रृटी स्पष्ट होत नाही असे मंचाचे मत आहे.
उ. तक्रारदारांनी सामनेवाले सोसायटीतील त्यांच्या मालकीच्या सदनिका क्र. E8 – G3 ची विक्री सह दुय्यम निबंधक ठाणे यांच्या पावती 8924 ता. 12/07/2016 अन्वये केली असुन तक्रारदार यांनी ता. 19/07/2016 रोजी श्री संकर्षन ए केंधे व सौ. अनधा एस केंधे यांच्या नावाने सदनिका हस्तांतरीत करण्याबाबत “Transfer Letter” दिले आहे.
तसेच तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीची सदनिका क्र. E8 – G04 जी विक्री दुस्यम निबंधक ठाणे यांच्या पावतह क्र. 9444 ता. 22/07/2016 अन्वये केली असुन तक्रारदार यांनी ता. 27/07/2016 रोजी श्री. रुपेश शांताराम सकपाळ व सौ. अश्विनी रुपेश सकपाळ यांच्या नावाने सदनिका हस्तांतरीत करण्याबाबत “Transfer letter” दिले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार व सामनवाले सोसायटी यांचे मधील ग्राहके नाते संपुष्टात आले आहे.
-
आ दे श
1. तक्रार क्र. 28/2011 नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने ठरविण्यात याव्यात.
4. तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.