Maharashtra

Jalna

CC/42/2013

Sharin Bi Feroj Desmukh - Complainant(s)

Versus

Br.Menger,United India Insurence Co.Ltd. - Opp.Party(s)

R.V.Jadhav

17 Feb 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/42/2013
 
1. Sharin Bi Feroj Desmukh
R/o Ghonci Bojrog Tq,Gansavangi
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Br.Menger,United India Insurence Co.Ltd.
Gandhi chamen,old Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Adv.Sandeep Deshpande
 
ORDER

(घोषित दि. 17.02.2014 द्वारा श्रीमती माधुरी विश्‍वरुपे, सदस्‍या)

 

      तक्रारदारांचे पती फेरोज पाशा देशमुख हे शेतकरी असून दिनांक 17.04.2009 रोजी झालेल्‍या अपघातात मृत्‍यू पावले. सदर घटनेची माहिती परभणी पोलीस स्‍टेशन यांना मिळाल्‍या नंतर संबंधित पोलीस अधिका-यांनी चौकशी करुन एफ.आय.आर ची नोंद केली घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा केला. मयताचे प्रेत शासकीय रुग्‍णालय परभणी येथे पोस्‍ट मार्टमसाठी पाठवले. तक्रारदारांनी सदर प्रकरणात पोलीस पेपर्स तसेच वैद्यकीय कागदपत्रे दाखल केली आहेत. अपघातग्रस्‍त वाहनाची म्‍हणजेच जीप क्रमांक एम.एच. 22/4494 या वाहनाची विमा पॉलीसी गैरअर्जदार विमा कंपनीकडे वाहनातील (9+1=10) एकुण 10 प्रवाश्‍यांकरीता प्रत्‍येकी रुपये 1,00,000/- ची घेतली होती.

      तक्रारदारांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे वकीला मार्फत दिनांक 10.12.2012 रोजी वैयक्‍तीक अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव रजिस्‍टर पोस्‍टाने पाठवला. परंतु गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 20.09.2013 रोजी विलंबाच्‍या कारणास्‍तव तसेच विमा प्रस्‍ताव सदर योजने अंतर्गत येत नसल्‍याचे कारणास्‍तव नाकारला.

      गैरअर्जदार विमा कंपनीने चुकीच्‍या कारणास्‍तव तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नाकारला आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.

      गैरअर्जदार विमा कंपनीच्‍या लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यू दिनांक 17.04.2009 रोजी झालेला असुन तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार सन 2013 मध्‍ये दाखल केली आहे. त्‍याच प्रमाणे अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या मालकाने वाहनाचे पॉलीसीमध्‍ये (un known passenger) प्रवाश्‍यां करिता प्रिमियम भरणा केला नाही.  त्‍यामुळे प्रवाश्‍यांकरीताची रिस्‍क (Risk) विमा पॉलीसी अंतर्गत येत नाही, वाहन मालकाने सदर वाहनाचा फक्‍त (third Party) करिता प्रिमियम भरणा केला आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव योग्‍य कारणास्‍तव नामंजूर केला आहे.

तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्‍ही.जाधव व गैरअर्जदार यांचे तर्फे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला. त्‍यावरुन खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात.

  1. तक्रारदारांचे पती श्री.फेरोज पाशा देशमुख यांचा दिनांक 17.04.2009 रोजी जीप क्रमांक एम.एच.22/4494 मध्‍ये पाथरी-परभणी रोडवर जात असताना अपघाती मृत्‍यू झाल्‍याचे तक्रारीतील दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते.
  2. तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन म्‍हणजेच अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या विमा पॉलीसीचे अवलोकन केले असता (un known Passenger) प्रवाश्‍या करिता वाहन मालकाने प्रिमियम भरणा केलेला नाही. वाहन मालकाने अपघातग्रस्‍त वाहना करिता घेतलेल्‍या विमा पॉलीसीमध्‍ये प्रवाश्‍यांची (un known passenger) रिस्‍क कव्‍हर केलेली नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने योग्‍य कारणास्‍तव तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नामंजूर केल्‍याचे दिसून येते.
  3. तसेच तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू पाथरी-परभणी रोडवर झालेल्‍या अपघातात झाला असून सदर वाहनाची विमा पॉलीसी परभणी येथे घेतल्‍याचे दिसून येते. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदी नुसार सदरची तक्रार न्‍याय मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्‍यामुळे तांत्रिक द्ष्‍टया सदरची तक्रार चालविण्‍याचा न्‍याय मंचाला अधिकार नाही असे न्‍याय मंचाचे मत आहे.

      मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.  

 

आदेश

 

  1. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
  2. खर्चा बाबत आदेश नाहीत. 
  3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3)  प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच अर्जदाराला परत करावेत.   
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.