Maharashtra

Kolhapur

CC/11/513

Sunil Laxman Hundekari - Complainant(s)

Versus

Br.Manager,Shriram Transport Finance Co.Ltd. - Opp.Party(s)

M.L.Jain

24 Jan 2012

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/513
1. Sunil Laxman HundekariGadmudshingi,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Br.Manager,Shriram Transport Finance Co.Ltd.1st Floor,Shirke Plaza,Jaystambha,Ratnagiri2. Sp.Recovery Clerk,Shri.Tushar ParkarRatnagiri3. Br.Officer,Shriram Transport Finance Co.LtdDevendra Bhavan,Station road,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
A.M.Nimbalkar, Advocate for Opp.Party A.M.Nimbalkar, Advocate for Opp.Party A.M.Nimbalkar, Advocate for Opp.Party

Dated : 24 Jan 2012
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.24/01/2012) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख,अध्‍यक्ष)
 
(1)        तक्रारदार तसेच त्‍यांचे वकील यांना पुकारले असता गैरहजर आहेत. सामनेवाला कंपनीचे वकील श्री ए.एम.निंबाळकर यांचा युक्‍तीवाद ऐकूण घेतलेला आहे. तक्रारदाराच्‍या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदाराने सामनेवाला वित्तिय कंपनीकडून दि.03/01/2008 रोजीरक्‍कम रु.2,00,000/- चे कर्ज घेऊन ट्रक क्र.MH-04-P-9798 घेतलेला आहे. सदर कर्जाचे परत फेडीचा वाद प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. सामनेवाला कंपनीच्‍या वकीलांनी युक्‍तीवादाच्‍या वेळेस तक्रारदार यांनी तक्रारीमध्‍ये नमुद केलेला वादाबाबत कोल्‍हापूर ये‍थील दिवाणी कोर्टात दिवाणी कब्‍जा 407/2010 दाखल केलेला आहे. त्‍याच्‍या प्रती प्रस्‍तुत कामी दाखल आहेत. तक्रारदाराचे तक्रारीचे अवलोकन केले असता तसेच दिवाणी दाव्‍याच्‍या दाखल प्रतींचे अवलोकन केले असता सदर दिवाणी दाव्‍यात नमुद केलेल्‍या वादाचे स्‍वरुप व प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या वादाचे स्‍वरुप हे एकच असलेचे दिसून येते. सदरच्‍या वादाबाबत दिवाणी न्‍यायालयात दि.20/10/2010 रोजी दावा दाखल केलेचे दिसून येते. प्रस्‍तुतची तक्रार ही या मंचामध्‍ये दि.11/10/2011 रोजी दाखल केलेचे दिसून येते. दिवाणी न्‍यायालयात प्रस्‍तुतचा वाद दाखल केलेला आहे. तसेच सदर वादाबाबत प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 3 मधील तरतुदींचा विचार केला असता तक्रारदार यांनी प्रस्‍तुतचा वाद दिवाणी न्‍यायालयात दाखल केलेला असलेने पुन्‍हा त्‍याचा वादाबाबत प्रस्‍तुतची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच हे मंच तक्रारीचे गुणदोषावर कोणतेही भाष्‍य करीत नाही. सबब आदेश.
 
                           आदेश
1. प्रस्‍तुतची तक्रार काढून टाकणेत येते.
 
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
 
3. प्रस्‍तुतचा निकाल ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.         
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT