Maharashtra

Jalna

CC/51/2012

Lilabai Sabjerao Sasane - Complainant(s)

Versus

Br.Manager,Reliance General Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

R.V.Jadhav

23 Nov 2012

ORDER

 
CC NO. 51 Of 2012
 
1. Lilabai Sabjerao Sasane
R/O: samangao,Tq-Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Br.Manager,Reliance General Insurance Co.Ltd
570,Naygaon Cross Road,Next-2,Royal Industries Estate,Wadala West.Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya PRESIDING MEMBER
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:R.V.Jadhav, Advocate for the Complainant 1
 
अड.पी.एम.परिहार
......for the Opp. Party
ORDER

 

(घोषित दि. 23.11.2012 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्‍यक्ष)
अर्जदाराच्‍या पतीचे वाहन अपघातात निधन झाले. गैरअर्जदार यांनी विमा रक्‍कम न दिल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांचे पती सबजेराव रंगनाथ ससाणे यांचा दिनांक 26.05.2010 रोजी प्रवास करीत असताना जालना अंबड रस्‍त्‍यावर मृत्‍यू झाला. सदरील अपघाताची नोंद जालना पोलीस स्‍टेशन येथे घेण्‍यात आली असून, पोष्‍ट मार्टमचा वैद्यकीय अहवाल देखील त्‍यांना मिळाला आहे. अर्जदाराचे पती प्रवास करीत असलेल्‍या इंडिका कार क्रमांक एम.एच.14 ए.एच. 3628 या वाहनाची विमा पॉलीसी गैरअर्जदार यांच्‍याकडे काढण्‍यात आली होती व त्‍याचा कालावधी दिनांक 14.11.2009 ते 13.11.2010 असा होता. पतीच्‍या अपघाती मृत्‍यूनंतर अर्जदाराने दिनांक 30.03.2012 रोजी गैरअर्जदार यांच्‍याकडे योग्‍य त्‍या कागदपत्रासह क्‍लेम फॉर्म दाखल केला. अर्जदाराने मोटर अपघात न्‍यायिक प्राधिकरण जालना येथेही दावा दाखल केला आहे. अर्जदाराने विमा रक्‍कम नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांना पाठविलेली नोटीस, पोलीस पंचनामा, पोष्‍ट मार्टम रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
      गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबानुसार त्‍यांच्‍याकडे अर्जदाराने क्‍लेम फॉर्म दाखल केलेला नाही. त्‍यामुळे अर्जदाराने दाखल केलेली तक्रार प्री मॅच्‍युअर       (pre -mature)असून ती खारीज करण्‍याची विनंती मंचास केली आहे.
      अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे निरीक्षण केल्‍यावर असे दिसून येते की, अर्जदाराच्‍या पतीचे सबजेराव रंगनाथ ससाणे यांचे दिनांक 26.05.2010 रोजी वाहन अपघातात निधन झाले. या अपघाताची नोंद जालना येथील पोलीस स्‍टेशनमध्‍ये घेण्‍यात आलेली आहे. तसेच वैद्यकीय पोस्‍ट मार्टमचा अहवाल देखील अर्जदाराने मंचात दाखल केले आहे. अर्जदाराचे पती ज्‍या इंडिका वाहनातून प्रवास करीत होते त्‍याचा क्रमांक एम.एच.14 ए.एच. 3628 असा असून सदरील वाहन शरद किसनराव ककड यांच्‍या नावे आहे. अर्जदाराने अननेम्‍ड पॅसेंजर (Unnamed Passenger) या अंतर्गत विमा रकमेची मागणी केली आहे. अर्जदाराने विमा धारक शरद किसनराव ककड यांना प्रतिवादी करणे आवश्‍यक होते. कारण विमा पॉलीसी त्‍यांच्‍या नावावर आहे. त्‍यामुळे सदरील पॉलीसीची रक्‍कम मिळण्‍यासाठी क्‍लेम फॉर्म धारका मार्फत 30 दिवसात दाखल होणे आवश्‍यक होते. अर्जदाराने सदरील पॉलीसीचा क्‍लेम फॉर्म दिनांक 30.03.2012 रोजी दाखल केलेला असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू त्‍याबद्दल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्‍याच प्रमाणे सदरील प्रकरण मोटार अपघात न्‍यायालयात दाखल करण्‍यात आले असल्‍यामुळे या न्‍याय मंचात सदरील प्रकरण चालू शकत नाही.
 
आदेश
 
  1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
  3. संबंधितांना आदेश कळविण्‍यात यावा.         
 
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
PRESIDING MEMBER
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.