Maharashtra

Beed

cc/11/175

Savita Naresh Taur - Complainant(s)

Versus

Br.Manager, United India Insurance ltd - Opp.Party(s)

08 Aug 2013

ORDER

 
Complaint Case No. cc/11/175
 
1. Savita Naresh Taur
Beed
...........Complainant(s)
Versus
1. Br.Manager, United India Insurance ltd
Nagapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकाल
दिनांक- 08/08/2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्य क्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्व ये, सामनेवाला यांच्यागकडून शेतकरी व्य6क्ती्गत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्क म देण्या स व सेवा पुरविण्या‍स कसूर केली याबाबत दाखल केली आहे. तक्रारदार यांची तक्रार थोडक्याात येणेप्रमाणे.

 


(2) त.क्र.175/2011

मयत नरेश उर्फ बंडू तौर हे तक्रारदार यांचे पती होते. मयत हे शेतकरी व्य वसाय करत होते. दि.12.08.2010 रोजी ते शेतात काम करत असताना विद्युत शॉक लागून अपघातात मयत झाले. सदरील बाब अंबाजोगाई पोलीस स्टे शन यांच्यीकडे खबर देण्याअत आली. पोलीसांनी घटनास्थ ळावर येऊन पंचानामा केला. तसेच मयत नरेश याचे शव शवविच्छेतदनासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे पाठविले.
मयत नरेश हे व्येवसायाने शेतकरी होते. त्यांोचे नावे गट नं. 89,92 व 93 मौजे कुंबेफळ तालुका अंबाजोगाई येथे नोंदवलेले आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्येक्तीकगत अपघात विमा योजनेअंतर्गत शेतक-यांची विमा योजना सामनेवाला 1 युनायटेड इंडिया इन्शुंरन्स कंपनीकडे विमा काढलेला आहे. शेतक-यांचा अपघाती मृत्यूव झाल्याेस त्याुच्या कुटूंबियांना रक्केम रु.1,00,000/- नुकसान भरपाई म्हाणून देण्यायची जबाबदारी सामनेवाला 1 इन्शुारन्सा कंपनी यांच्याचवर आहे. तक्रारदार हिने मागणी अर्ज व त्याेसोबत सर्व कागदपत्र जोडून कृषी अधिकारी यांच्याककडे दिले. कृषी अधिकारी यांनी सदरील अर्ज सामनेवाला 2 कबाल इन्शुीरन्सं ब्रोकींग सर्व्हिस कंपनीकडे पुढील कारवाईसाठी पाठविला. सामनेवाला 2 यांनी सदरील अर्ज सामनेवाला 1 यांच्यासकडे मंजूरीसाठी पाठविला. सामनेवाला 1 व 2 यांनी सर्व कागदपत्राची पुर्तता करुनही दावा मंजूर केला नाही. अशा प्रकारे सामनेवाला यांनी सेवा देण्यादस कसूर केली आहे व त्रुटी केली आहे. सबब अर्जदार यांनी सामनेवाला यांच्या कडून रक्कसम रु.1,00,000/- नुकसान भरपाई, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कयम रु.10,000/- व तक्रारीच्याा खर्चापोटी रु.5,000/- द्यावे अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला 1 मंचासमोर हजर झाले व त्यांीनी लेखी निवेदन दि.08.05.2012 रोजी दिले. सामनेवाला 1 यांचे कथन की, नरेश उर्फ बंडू यांचा मृत्यूे त्याेच्यान निष्काहळजीपणामुळे झाला आहे. त्यााने योग्यं ती काळजी घेतली नाही. सामनेवाला यांचे कथन की, त्यांानी तक्रारदार यांची मागणी नाकारलेली नाही. तसेच तक्रारदार यांनी प्रस्तावव मुदतीत पाठविला नाही, तसेच तक्रारदार यांनी पॉलीसीची प्रत दाखल केली नाही. त्याममुळे सामनेवाला 1 यांना पॉलीसीचा कालावधी कळाला नाही. तसेच सामनेवाला 1 हे चौकशी करु शकले नाही. सबब तक्रार नामंजूर करण्याीत यावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाला 2 यांनी लेखी निवेदन दिले की, ते इन्शुारन्स् अॅडव्हाायझर म्हनणून काम करतात. शेतक-यांकडून आलेले प्रस्तारव हे तपासून व सर्व कागदपत्राची पुर्तता झाली आहे किंवा काय ? हे पाहणे त्यांेच्यानकडे आहे. सर्व कागदपत्राची पुर्तता झालेली प्रकरणे ते इन्शुारन्से कंपनीकडे पुढील कारवाईसाठी पाठवितात. सामनेवाला 2 यांचे कथन
(3) त.क्र.175/2011

की, मयत नरेश उर्फ बंडू यांच्या वारसाकडून प्रस्ताकव प्राप्तन झाला होता, तो प्रस्तााव दि.11.10.2010 रोजी मिळाला होता. काही कागदपत्राची अपुर्तता होती, ती कागदपत्र मिळण्या साठी त्यां नी अर्जदाराला कळवले होते व कागदपत्राची पुर्तता झाल्यारनंतर इन्शुयरन्स कंपनीकडे तो प्रस्ताकव दि.21.12.2010 रोजी पाठविला.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी लेखी निवेदन दिले त्या चे अवलोकन केले. तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे यांचा युक्तीलवाद ऐकला. सामनेवाला 1 व 2 यांनी शपथपत्र दाखल केले नाही. न्याेयनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात, व त्यापचेसमोरच त्यााची उत्त रे दिलेली आहेत.
मुददे उत्तदर 1. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्यााकडे सर्व
कागदपत्राची पुर्तता करुन शेतकरी व्याक्तीागत
अपघात विमा योजनेअंतर्गत प्रस्तालव पाठविला
होता काय ? होय.
2. सामनेवाला 1 यांनी प्रस्ता व मिळूनही सेवा देण्या स
त्रुटी ठेवली आहे , ही बाब तक्रारदार सिध्दळ
करतात काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत नरेश उर्फ बडू दगडू तौर हे मौजे कुंबेफळ या गावचे राहणारे असून त्यांदचा शेती व्यरवसाय होता. तक्रारदार यांनी गाव नमुना नं.8 अ चा उतारा व 7/12 चे उतारे दाखल केले आहेत. मयत बंडू याच्याम नावे मौजे कुंबेफळ येथे शेतजमीन आहे. सबब मयत बंडू हा शेतकरी होता ही बाब सिध्द. होते.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्याे पोलीस पेपर वरुन असे निदर्शनास येते की, दि.12.08.2010 रोजी मयत बंडू हा त्यायचे शेतामध्येत औषध फवारणी करत होता त्याावेळेस त्या.ला इलेक्ट्रीपक शॉक लागला व तो मयत झाला. पोलीसांनी त्यारबाबत आकस्मिक मृत्यूवची नोंद घेतली व मृत्यूर बाबत चौकशी केली. मयत नरेश उर्फ बंडू याच्याक प्रेताचा पंचनामा केला व शव दवाखान्याीमध्येा शवविच्छेादनासाठी पाठविले.
(4) त.क्र.175/2011

त्या संबंधी कागदपत्र तक्रारदार यांनी हजर केले आहे. मयत बंडू याचा मृत्यूा इलेक्ट्री क शॉकमुळे झाला असे मृत्यू्चे कारण लिहीलेले आहे. सबब मयत बंडू हा शेतकरी होता व त्याुचा शेतात काम करत असताना इलेक्ट्रीजक शॉक लागून झाला ही बाब सिध्दह होते.
तक्रारदार यांनी शेतकरी व्य क्तीकगत अपघात विमा योजनेअंतर्गत प्रस्तादव व संपूर्ण कागदपत्र सामनेवाला यांच्यायकडे पाठविले होते किंवा काय ? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे कथन की, त्यां नी मयत बंडू याच्याह मृत्यूच संबंधी सर्व कागदपत्र पोलीस पेपर कृषी अधिका-यांमार्फत सामनेवाला 1 व 2 कडे पाठविला, परंतू सामनेवाला 1 व 2 यांनी अद्याप पावेतो क्लेलम मंजूर केला आहे किंवा नाही? याबाबत कळवले नाही. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सदरील बाब सिध्दह करण्यायसाठी तक्रारदार यांनी स्वनतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच सामनेवाला यांच्यााकडे दाखल केलेला क्लेाम फॉर्म, 8-अ चा उतारा, 7/12 चा उतारा, फेरफारची नक्कलल, शपथपत्र, मतदान ओळखपत्र, बँक पासबूक, मृत्यूे प्रमाणपत्र, आकस्मिक मृत्यूाची खबर, पोलीसांचा अहवाल, मरणोत्त्र पंचनामा, पोस्टूमार्टम रिपोर्ट, घटनास्थफळ पंचनामा, सामनेवाला 2 यांनी पाठविलेले पत्र दाखल केले आहे. सदरील संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्रासहीत प्रस्ता व सामनेवाला यांच्यारकडे पाठविला होता, तो प्रस्तााव सामनेवाला 2 यांना कृषी अधिका-यांमार्फत मिळाला. सामनेवाला 2 यांनी त्या् प्रस्ताावामध्येन काही त्रुटी होत्यार ही बाब तक्रारदार यांना कळवली. त्यायप्रमाणे तक्रारदार यांनी त्रुटीची पुर्तता करुन आवश्यनक ते कागदपत्र सामनेवाला 2 यांच्या कडे दिले. सामनेवाला 2 यांच्याृ लेखी कैफियतीवरुन ही बाब सिध्दत होते की, संपूर्ण कागदपत्र मिळाल्यााने त्यांानी तो प्रस्तािव सामनेवाला 1 यांच्यािकडे मंजूरीसाठी पाठविला. सामनेवाला 1 यांनी तो प्रस्तांव अद्याप पावेतो मंजूर केलेला नाही. तो प्रस्तााव मंजूर केल्याानंतर विहीत मुदतीत प्रस्तााव मंजूर करण्यााची जबाबदारी सामनेवाला 1 यांच्यारवर आहे. तो प्रस्ताुव का मंजूर केला नाही? याबाबत अद्याप पावेतो तक्रारदार यांना कळविण्या.त आले नाही. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्याा कागदपत्रावरुन असेही निदर्शनास येते की, त्यां नी कृषी अधिकारी यांच्या कडे वारंवार तगादा लावलेला आहे व कृषी अधिकारी यांनी सामनेवाला 1 व 2 यांना रक्कलम का मिळाली नाही याबाबत विचारणा केलेली आहे. संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता सामनेवाला 1 यांनी सेवा देण्याेस त्रुटी केली आहे ही बाब सिध्दा होते. सामनेवाला 1 यांच्याा लेखी निवेदनामध्‍ये मयत नरेश हा स्व तःच्या निष्कासळजीपणामुळे मयत झाला हे कथन केले

(5) त.क्र.175/2011

आहे. तसेच प्रकरण मुदतीत दाखल केले नाही असेही कथन केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला प्रस्ताचव पाहता तो मुदतीत दाखल केला आहे ही बाब सिध्द होते.
मयत हा स्वातःच्यार निष्कामळजीपणामुळे मयत झाला ही बाब सामनेवाला 1 सिध्दा करु शकला नाही. पोलीस पेपरवरुन, पंचनामा व इतर कागदपत्रावरुन असे दिसते की, मयत हा शेतात औषध फवारणी करत असताना इलेक्ट्री क शॉक लागून मयत झाला आहे. सबब तक्रारदार ही शेतकरी व्य क्तीनगत अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला 1 कडून विम्याकची रक्क म रु.1,00,000/- मिळण्या स पात्र आहे. ती देण्याणस सामनेवाला 1 यांनी कसूर केलेली आहे. तसेच तक्रारदार यांना प्रस्ता/व दाखल केल्याननंतर वेळोवेळी त्याीचा पाठपुरावा करावा लागला. सामनेवाला 1 यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्याीमुळे तक्रारदार यांना तक्रार दाखल करावी लागली, व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याकबददल तक्रारदार ही रु.3,000/- मिळण्यारस पात्र आहे. व तक्रारीचा खर्च रु.2500/- मिळण्याास पात्र आहे. सबब हा मंच मुददा क्र.1 व 2 चे उत्त र होकारार्थी देण्याकत येते.
सबब मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1. सामनेवाला 1 युनायटेड इंडिया इन्शु रन्स कंपनी यांनी, तक्रारदारास शेतकरी
व्यनक्तीिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कसम रु.1,00,000/- (अक्षरी
रु.एक लाख फक्ता) 30 दिवसात द्यावे. तसेच तक्रार दाखल तारखेपासून
संपूर्ण रक्कएम देईपर्यत द.सा.द.शे. 9 टक्केा प्रमाणे व्या ज द्यावे.
2. सामनेवाला 1 यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/-
(रुपये तिन हजार फक्तर) व तक्रारीच्याा खर्चापोटी रु.2500/- (रुपये अडीच
हजार फक्तु ) 30 दिवसात द्यावे.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांाचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्य क्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.

 

 

 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.