Maharashtra

Sangli

CC/08/1086

Shri.Udaysingh Pandharinath Patil - Complainant(s)

Versus

Br.Manager, United India Insurance Co.Ltd., - Opp.Party(s)

S.V.Mali

07 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1086
 
1. Shri.Udaysingh Pandharinath Patil
Western Motors, Nr.Ashtha Naka, Islampur, Tal.Walva, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Br.Manager, United India Insurance Co.Ltd.,
Br.Islampur, Opp.Walva Bazar, Islampur, Tal.Walva, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                              नि. २२
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्‍या सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १०८६/२००८
-----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख: -  २३/०९/२००८
तक्रार दाखल तारीखः -      ०१/१०/२००८
निकाल तारीखः      - ०७/०३/२०१२
------------------------------------------
 
श्री उदयसिंह पंढरीनाथ पाटील,
वय वर्षे सज्ञान, धंदा व्‍यापार
रा.वेस्‍टर्न मोटर्स, आष्‍टा नाक्‍यानजीक,
इस्‍लामपूर, ता.वाळवा जि.सांगली                             ..... तक्रारदार
विरुध्‍द
शाखाधिकारी
युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
शाखा इस्‍लामपूर, वाळवा बझार समोर,
इस्‍लामपूर, ता.वाळवा जि. सांगली                    ..... जाबदार
 
 
तक्रारदार तर्फे  ड.एस.व्‍ही.माळी
जाबदार तर्फे  ड.के.ए.मुरचिटे
 
                                                
नि का ल प त्र
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे.
      तक्रारदारांच्‍या वेस्‍टर्न मोटर्स या वर्कशॉपला आग लागून त्‍यातील विमाकृत स्‍पेअर पार्टस जळून खाक झाले. परंतु मागणी करुनही जाबदार विमा कंपनीने त्‍यांना नुकसान भरपाई न दिल्‍याने त्‍यांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत खालीलप्रमाणे -  
१.     तक्रारदार यांचे इस्‍लामपूर येथे वेस्‍टर्न मोटर्सया नावाचे मोटर सायकल स्‍पेअर पार्टस विक्रीचे व दुरुस्‍तीचे सर्व्हिस वर्कशॉप आहे. तक्रारदारांनी वर्कशॉपमधील सर्व विक्री साहित्‍याचा शॉपकीपर्स इन्‍शुरन्‍स पॉलिसी घेवून विमा उतरविला होता. या विम्‍याचा कालावधी दि.२९/१/२००७ ते २८/१/२००८ असा होता. या वर्कशॉपला दि.३०/१०/२००७ रोजी शॉर्टसर्किटमुळे आग लागली व त्‍यामध्‍ये वर्कशॉपमधील रक्‍कम रु.४५,५५०/- चे स्‍पेअर पार्टस जळून खाक झाले. तक्रारदारांनी याबाबतची माहिती जाबदार कंपनीला कळविली. त्‍यानुसार विमा कंपनीमार्फत सर्व्‍हेअरने झालेल्‍या नुकसानीचा सर्व्‍हे देखील केला. जाबदार कंपनीने मागितल्‍याप्रमाणे आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारांनी केली. मात्र विमा कंपनीकडून तक्रारदारांना अद्यापी झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळाली नाही व अशा रितीने विमा कंपनीने तक्रारदारांना दूषित सेवा दिली अशी तक्रारदारांची जाबदार विमा कंपनीविरुध्‍द तक्रार आहे आणि म्‍हणून तक्रारदारांनी त्‍यांचे जे रक्‍कम रु.४५,५५०/- चे नुकसान झाले आहे त्‍याची भरपाई मिळावी तसेच त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व प्रवासखर्चापोटी म्‍हणून एकूण रक्‍कम रु.५,०००/- व तक्रारअर्जाच्‍या खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.३,०००/- मिळावेत अशी मागणी करुन सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारअर्जाचे पुष्‍ठयर्थ तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.५ अन्‍वये एकूण ५ कागद दाखल केले आहेत. 
     
२.    मंचाच्‍या नोटीशीची बजावणी जाबदार विमा कंपनी यांचेवर झाल्‍यावर त्‍यांनी हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदारांनी त्‍यांचेकडे शॉपकीपर्स इन्‍शुरन्‍स पॉलिसीअंतर्गत अ वर्ग बांधीव इमारतीमध्‍ये असलेल्‍या मालाचा विमा त्‍यांचेकडे उतरविला होता ही बाब तसेच विम्‍याचा कालावधी मान्‍य केलेला आहे. परंतु या जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात हा विमा हा केवळ बांधीव इमारतीमध्‍ये ठेवण्‍यात आलेल्‍या स्‍पेअर पार्टसपुरताच मर्यादित असून या व्‍यतिरिक्‍त इतरत्र ठेवण्‍यात आलेल्‍या कोणत्‍याही स्‍पेअर पार्टची जबाबदारी या विमा पॉलिसी अंतर्गत जाबदारांवर येत नाही असे नमूद केले आहे. सदरहू जाबदार पुढे असेही नमूद करतात की, दि.३०/१०/२००६ रोजी विमा कंपनीमार्फत सर्व्‍हेअर यांनी घटना घडलेल्‍या जागेचा सर्व्‍हे केला. या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये ज्‍या इमारतीमधील स्‍पेअर पार्टचा विमा उतरविण्‍यात आला होता त्‍या इमारतीच्‍या मागील भागात काही अंतरावर मोकळी जागा सोडल्‍यानंतर जी कच्‍ची बांधण्‍यात आलेली शेड होती, तेथे शॉर्ट सर्किटने आग लागून या शेड मधील माल जळाला. तसेच या शेडमध्‍ये जळालेला माल हा गाडयांची दुरुस्‍ती करुन उरलेला खराब माल होता. जाबदार पुढे असेही नमूद करतात की, तक्रारदारांनी या शेड मधील कोणत्‍याही वस्‍तूंचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला नव्‍हता. आणि म्‍हणून तक्रारदारांची नुकसान भरपाईची रक्‍कम विमा कंपनी देवू शकत नाही. आणि या कारणामुळे तक्रारदारांचा विमाक्‍लेम नाकारुन जाबदारांनी तक्रारदारांना कोणत्‍याही प्रकारची दूषित सेवा दिलेली नाही. जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांनी ज्‍या वस्‍तूंची नुकसान भरपाई मागितलेली आहे, त्‍या वस्‍तूंच्‍या किंमतीबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा प्रस्‍तत प्रकरणी दाखल केलेला नाही असेही नमूद केलेले आहे. आणि या सगळयांचा विचार करता तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे. जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टप्रमाणे जरी नुकसान भरपाईची रक्‍कम ठरविणेत आली असली तरी देखील सदरहू नुकसान हे वर्ग बांधीव इमारतीमधील विमाकृत स्‍पेअर पार्टसचे नसून अन्‍य शेडमध्‍ये ठेवलेल्‍या नादुरुस्‍त पार्टसचे असल्‍या कारणाने ते विमा कंपनी देवू लागत नाही असे नमूद केले आहे. मात्र जर विमा कंपनी तक्रारदारांच्‍या नुकसानीस जबाबदार ठरते असे मंचाचे मत होत असेल तर विमा कंपनीवर सर्व्‍हेअर रिपोर्टनुसार केवळ रक्‍कम रु.३,४५०/- इतक्‍या रकमेचीच जबाबदारी येते असे नमूद केले आहे.   म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठय‍र्थ त्‍यांनी नि.११ अन्‍वये २ कागदपत्रे व सन्‍मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा न्‍यायनिवाडा दाखल करुन, प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे.
 
      ३.    प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारअर्ज, जाबदार विमा कंपनीचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रे व जाबदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद यांचे अवलोकन करता मंचापुढे खालील मुद्दे (Points for consideration) विचारार्थ उपस्थित होतात.
 
            मंचाचे मुद्दे व त्‍यांची उत्‍तरे खालीलप्रमाणे
 
      मुद्दे                                             उत्‍तरे
 
१. जाबदार विमा कंपनीने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविली
    ही बाब सिध्‍द होते का ?                                                              नाही
 
२. कोणता आदेश ?                                      अंतिम आदेशाप्रमाणे.
 
 
विवेचन
मुद्दा क्र.१
 
      तक्रारदारांचे मोटरसायकल स्‍पेअर पार्टस विक्रीचे व दुरुस्‍तीचे सर्व्हिस वर्कशॉप आहे. तक्रारदारांनी वर्कशॉपमधील सर्व साहित्‍याचा शॉपकीपर्स इन्‍शुरन्‍स पॉलिसी घेवून जाबदार विमा कंपनीकडे विमा उतरविला होता. तक्रारदारांच्‍या कथनानुसार विमा पॉलिसीच्‍या कालावधीमध्‍येच त्‍यांच्‍या या वर्कशॉपला आग लागली व त्‍यामध्‍ये वर्कशॉपमधील रक्‍कम रु.४५,५५०/- चे स्‍पेअर पार्टस जळून खाक झाले. सर्व्‍हेअर मार्फत घटनास्‍थळाचा सर्व्‍हे देखील करण्‍यात आला. तक्रारदारांनी आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे जमा केली तरी देखील विमा कंपनीने अद्यापी तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्‍कम अदा केलेली नाही आणि अशा रितीने त्‍यांनी तक्रारदारांना दूषित सेवा पुरविली अशी तक्रारदारांची जाबदारांविरुध्‍द मुख्‍य तक्रार आहे. 
तक्रारदारांच्‍या या तक्रारीच्‍या अनुषंगे जाबदारांच्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन करता, प्रस्‍तुत प्रकरणी जाबदारांनी तक्रारदारांना दूषित सेवा पुरविली अथवा कसे याबाबत निश्चित निष्‍कर्षावर येण्‍याकरिता, प्रथम ज्‍या मालाच्‍या नुकसान भरपाईची मागणी तक्रारदारांनी केली आहे नेमक्‍या त्‍याच मालाचा विमा उतरविण्‍यात आला होता किंवा कसे हे पाहणे अत्‍यंत आवश्‍यक आहे असे मंचास वाटते. त्‍यानुसार मंचाचे विवेचन खालीलप्रमाणे
 
      तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्‍ये जाबदार विमा कंपनीकडे वर्कशॉपमधील सर्व साहित्‍याचा विमा उतरविला होता असे कथन केले आहे. मात्र तक्रारअर्जाचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी विमा पॉलिसीचा क्रमांक काय होता याचा कुठेही उल्‍लेख केलेला नाही. तसेच त्‍यांनी त्‍यांच्‍या तक्रारअर्जाचे पुष्‍ठयर्थ विमा पॉलिसीची प्रत देखील प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली नाही. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारअर्जामध्‍ये त्‍यांचे रक्‍कम रु.४५,५५०/- चे स्‍पेअर पार्टस आगीत जळून खाक झाल्‍याचे नमूद केले आहे व त्‍यांच्‍या या म्‍हणण्‍याचे पुष्‍ठयर्थ नि.५/१ अन्‍वये विमा कंपनीला पाठविलेले पत्र दाखल केले आहे. या पत्रामध्‍ये त्‍यांनी जे स्‍पेअर पार्टस जळून खाक झाले त्‍यांची व त्‍यांच्‍या किंमतीची यादी दाखल केलेली आहे. मात्र इथे एक बाब मंचाच्‍या निदर्शनास येते ती म्‍हणजे सदरहू स्‍पेअर पार्टच्‍या तक्रारदार नमूद करतात त्‍याप्रमाणे किंमती होत्‍या याबाबतचा कुठलाही कागदोपत्री पुरावा त्‍यांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर जाबदारांनी दाखल केलेले त्‍यांचे म्‍हणणे व त्‍यासोबत दाखल केलेली कागदपत्रे मंचास महत्‍वाची वाटतात. जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये शॉपकिपर्स इन्‍शुरन्‍स पॉलिसी या विमा पॉलिसी अंतर्गत तक्रारदारांनी अ वर्ग बांधीव इमारतीमध्‍ये असलेल्‍या मालाचा विमा उतरविला होता त्‍यामुळे या इमारतीमध्‍ये असलेल्‍या मालाची जबाबदारी विमा कंपनीवर येते. इतरत्र ठेवण्‍यात आलेल्‍या कोणत्‍याही मालाची जबाबदारी या विमा कंपनीवर येत नाही असे वारंवार नमूद केलेले आहे व त्‍यांच्‍या या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ त्‍यांनी नि.११/१ अन्‍वये तक्रारदारांची विमा पॉलिसी तसेच नि.११/२ अन्‍वये सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. या विमा पॉलिसीचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये Description of covers/perils या सदराखाली A. Fire and Allied Perils : Building of Class A construction only असे नमूद करण्‍यात आलेले आहे. त्‍याचप्रमाणे सर्व्‍हे रिपोर्टचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये देखील D) CAUSE OF LOSS या मथळयाखाली But the said loss is taken place in the raw material store room and not into the insured property i.e. in the spare parts shop. So the claim is not admissible. 
तर F) CLASS OF CONSTRUCTION या मथळयाखाली The said spare part shop is RCC type construction. The door is of shutter type. This is an “A” type class of construction. But where the mishap is occurred, that means raw material store room is of simple type construction and this is not “A” class construction. असे नमूद करण्‍यात आले आहे. तसेच सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये E Location Construction and Occupation या कॉलममध्‍ये ज्‍याठिकाणी आग लागली, ती वर्कशॉप शेडही तक्रारदारांच्‍या दुकान गाळयापासून काही फुटांच्‍या अंतरावर असल्‍याचे नमूद करण्‍यात आलेले आहे.   सर्व्‍हे रिपोर्ट हा ज्‍या व्‍यक्‍तीमार्फत करणेत आलेला आहे ती व्‍यक्‍ती सरकारमान्‍य सर्व्‍हेअर असून मोटारइंजिनिअरिंग मध्‍ये तज्ञ असल्‍याचे सर्व्‍हे रिपोर्ट वरील हेडिंग वरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे या रिपोर्टवर अविश्‍वास दाखविण्‍याचे कोणतेच कारण मंचास दिसून येत नाही. याची दखल घेवून मंचास प्रस्‍तुत प्रकरणी एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्‍हणजे तक्रारदारांनी ज्‍या इमारतीमधील मालाचा विमा जाबदार कंपनीकडे उतरविला होता, मुळात त्‍या इमारतीमध्‍ये आग लागलीच नव्‍हती. त्‍या इमारतीपासून काही अंतरावर असलेल्‍या कच्‍च्‍या शेडमध्‍ये आग लागली व त्‍यामध्‍ये दुरुस्‍तीनंतर टाकणेत आलेला खराब (raw material) माल जळून खाक झाला. तक्रारदारांमार्फत नि.५/२ अन्‍वये दाखल करण्‍यात आलेल्‍या इस्‍लामपूर पोलिस ठाण्‍यातील आकस्‍मात जळीत अहवालमध्‍ये देखील कलम ४ व १० मध्‍ये फिर्यादीच्‍या गॅरेजच्‍या पाठीमागे असलेल्‍या गोडाऊनमध्‍ये आग लागल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. या सर्व बाबींचा एकत्रितपणे विचार करता जाबदारांचे ए वर्ग इमारतीमध्‍ये असलेल्‍या विमाकृत मालास आग लागली नसल्‍याने अन्‍य ठिकाणी आग लागून जे काही नुकसान झाले, त्‍यास सदरहू विमा कंपनी जबाबदार नसल्‍याचे जे कंपनीचे म्‍हणणे आहे, ते योग्‍य असल्‍याचा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. मंचाच्‍या या निष्‍कर्षास जाबदारांमार्फत दाखल करण्‍यात आलेल्‍या (2005) 9 Supreme Court cases 174 Civil Appeal No. 4366/1999 POLYMAT INDIA (P) LTD. AND ANR. VS. NATIONAL INSURANCE COMPANY LTD. AND OTHER. with Civil Appeal No. 6063/1999 NATIONAL INSURANCE COMPANY LTD. VS. POLYMAT INDIA (P) AND ANR. decided on December 1, 2004 या सन्‍मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या न्‍यायनिवाडयाचा आधार मिळतो. व यावरुन तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्‍कम अदा न करुन जाबदारांनी तक्रारदारांना कोणत्‍याही प्रकारची दूषित सेवा पुरविलेली नाही हे प्रस्‍तुत प्रकरणी शाबीत होते असाही मंचाचा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष निघतो व त्‍यानुसार मुद्दा क्र.१ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
 
      मुद्दा क्र.२
     
      मुद्दा क्र.१ मधील विवेचन व निष्‍कर्षावरुन तक्रारदारांचा तक्रारअर्ज नामंजूर करणे योग्‍य व न्‍याय्य ठरेल असे मंचाचे मत पडते. सबब प्रस्‍तुत प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतात.
सबब मंचाचा आदेश की,
 
आ दे श
 
१. तक्रारदारांचा तक्रारअर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.
 
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
 
सांगली
दि. ७/३/२०१२
 
 
 (सुरेखा बिचकर)                (गीता सु.घाटगे)                        (अनिल य.गोडसे÷)
       सदस्‍या                       सदस्‍या                                 अध्‍यक्ष           
जिल्‍हा मंच, सांगली.             जिल्‍हा मंच, सांगली                 जिल्‍हा मंच, सांगली.  
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.