निकालपत्र
तक्रार क्र.125/2015.
तक्रार दाखल दिनांक - 01/02/2015. तक्रार नोंदणी दिनांक - 2711/09/2015
तक्रार निकाल दिनांक - 17/05/2016
कालावधी 01 वर्ष 03 महिने 16 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
परवीनबेगम भ्र.रउफखान पठाण, अर्जदार
वय २१ वर्ष धंदा मजुरी, अॅड.सी.व्ही.राजुरे.
रा.काद्राबाद प्लॉट, परभणी.
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार
न्यु. इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि, अॅड.ए.डी.गिरगांवकर.
यशोदीप बिल्डींग,शिवाजी रोड,परभणी,
कोरम – श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
निकालपत्र
(निकालपत्र पारित व्दारा - श्रीमती.ए.जी.सातपुते,अध्यक्षा )
अर्जदार ही काद्राबाद प्लॉट परभणी येथील रहीवाशी असून अर्जदाराच्या पतीकडे वाहन क्र. टाटा अॅश वाहन क्र.एम.एच.22 एए 763 हे वाहन होते त्यांचा उदरनिर्वाह सदरील वाहनावरच होता सदर वाहनावर अर्जदाराच्या पतीच्या कमाईवर संपुर्ण कुटुंब हे अवलंबुन होते. सदरचे वाहन हे गैरअर्जदार यांचेकडे दि.21/08/2013 ते 20/08/2014 पर्यंत विमाकृत होता. सदर विम्याचा क्र.16090231130100002303 असा होता. घटनेच्या दिवशी म्हणजे दि.26/03/2014 रोजी अर्जदाराचे पती स्वतः परभणी येथून ताडबोरगांव येथे रात्री 10.00 वाजता येत असताना परभणी- पाथरी रोडवर भोगांव शिवारात पोहचले असता अचानक समोरुन ट्रक क्र.एच.एच.26 एडी 8588 हा भरधाव वेगात ला व सदर ट्रक चालकाने त्याचे वाहन हलगर्जीपणाने व निष्काळजीपणे चालवून त्याची बाजु सोडून विरुध्द बाजुला जाऊन अर्जदाराचे वाहनास जोराची धडक दिली. सदरची धडक इतकी जोरात होती की अर्जदारचे वाहन पुर्णपणे चेंदामेंदा झाले व त्यामध्ये वाहन चालवित जात असलेले अर्जदार व त्यांची आई शमीमबी हे दोघंही जागेवरच मयत झाले व अर्जदार जबर जखमी झाले सदर अपघातामध्ये अर्जदाराचे वाहन पुर्णतः क्षतीग्रस्त झाले. त्यानंतर पोलिस स्टेशन परभणी ग्रामीण येथे सदर घटनेची देण्यात आली. त्यानंतर गैरअर्जदार यांनी सदर वाहनाची सर्व्हेअर मो.रझेक शेख यांची नेमणु करुन घटनास्थळ तपासणी केली. अर्जदार यांनी सदरचे वाहन दुरुस्ती करण्यासाठी गैरअर्जदार यांचे सांगण्यानुसार ओम साई मोटर्स, परभणी येथे लावले त्यानंतर गैरअर्जदार यांनी डी.एस.नलबलवार यांना वाहनाचे नुकसानीचे अंतीम सर्व्हे करण्यास सांगितले. व गैरअर्जदारांनी सदर वाहनाची तपासणी व पाहणी करता सदरचे वाहन हे पुर्णतः क्षतीग्रस्त झाल्याचा अहवाल गैरअर्जदार विमा कंपनीस दिला. त्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे वाहन दुरुस्तीबाबत चौकशी केली असता लवकरच दुरुस्तीबददल सांगण्यात येईल असे सांगीतले परंतु दि.24/08/2015 रोजी अचानक गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पत्र पाठवून कळविले की, सदर वाहनात फुकटे प्रवसी बसवले व वाहन क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवून जात होत व रऊफखान यांचे मुळ वाहन परवाना दाखविला नाही. त्यामुळे विमा पॉलिसीचा अटींचा भंग केल्याने आपला विमा क्लेम नाकारण्यात येत आहे. अर्जदार यांचे सदरचे वाहन क्लेम न देवून अर्जदाराच्या सेवेत गैरअर्जदार यांनी त्रुटी केली म्हणुन गैरअर्जदार यांनी वाहनची नुकसानी भरपाईची रक्कम रु.3,06,000/- त्यावर द.सा.द.शे.9 टक्के व्याज देण्यात यावे व अर्जदार झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- देण्यात यावे तसेच दाव्याचा खर्च रु.10,000/- देण्यात यावी अशी मंचासमोर विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाली त्यांनी दि.22/03/2016 रोजी वकीलामार्फत लेखी कथन दाखल केले. सदरच्या लेखी कथनात अर्जदारांनी गाडी ही माल वाहतुकीची गाडी आहे व ती गाडी अर्जदाराचे पती चालवित होते व अर्जदाराच्या पतीने त्या गाडी दोन फुकटे प्रवाशी बसवले होते म्हणुन अर्जदार पॉलिसीच्या अटींचा भंग केला आहे. अर्जदाराचे वाहन क्र.एम.एच.22 एए 763 चा परवाना माल वाहतुकीचा आहे. म्हणुन सदरचे प्रकरण हे फेटाळण्यात यावे. अर्जदार हा मंचासमोर स्वच्छ हाताने आला नसल्यामुळे सदरचे प्रकरण हे मंजुर करणे क्रमप्राप्त नाही.
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, साक्षीचे शपथपत्र, युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी कथन, साक्षीचे शपथपत्र्, युक्तीवाद याचा बारकाईने अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालिल मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर.
1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. आदेश काय? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 - चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब गैरअर्जदाराने मान्य केलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे त्यांचा वाहन क्र.एम.एच.22 एए 763 या वाहनाचा विमा उतरविला होता त्याचा कालावधी दि.21/08/2013 ते 20/08/2014 असा आहे.
मुद्दा क्र.2 - चे उत्तर नाही असुन अर्जदार हा दि.26/03/2014 रोजी अर्जदार हीचे पोट दुखत असल्यामुळे ती व तीची सासु शमीमबी अर्जदाराचे पती रऊफखान असे मिळुन ताडबोरगांव येथून आमच्या मालकीची टाटा एस.क्र.एम.एच.22 एए 763 मध्ये बसून परभणी येथे इलाही हॉस्पीटल धाररोड येथे आणले होते अर्जदाराचा उपचार करुन परत अंदाजे रात्री साडे नऊ ते दहा च्या दरम्यान ताडबोरगांवकडे परत निघाले असता रात्री दहा ते साडेदहा वाजले असतेल तेवढयात समोरुन किन्होव्हा पाटीचे अलीकडे भोगाव शिवारात भरधाव वेगात जोरात एक ट्रक क्र.एम.एच.२६ एडी ८५८८ हा आला व आपली बाजु सोडून आमच्या गाडीवर जोराने आदळला जोराची धडक दिल्याने अर्जदाराचे पती हे जागीच मयत व सासू शमीमबी व अर्जदार जास्त गंभीर जखमी झाल्याने लोकांच्या मदतीने सरकारी दवाखाना परभणी येथे शेरीक करण्यात आले. अर्जदाराची सासू शमीमबी या डॉक्टरांनी तपासणीत मयत झालेबाबत कळविले. अपघातग्रत वाहन हे अर्जदाराच्या पतीचे मालकीचे होते. सदर गाडीमध्ये फुकटाचे प्रवाशी बसवून अर्जदाराची पतीचे आई व अर्जदार बसलेले होते. सदरचे वाहनावर कुठेही मालची वाहतुक न करता केवळ गर्भवती पत्नीला उपचाराकरीता ताडबोरगांवीभ् पासुन पभरणी येथे प्रवास केलेला आहे. गाडीचे मालक हे अर्जदाराचे पती आहे. अपघात झाला त्यावेळी स्वतःचे वाहन वापरले यास अर्जदाराच्या पतीने कोणतीही विमा कंपनीच्या अटींचा भंग केलेला नाही. सदरचे वाहन त्यावेळी माल घेऊन जात आहे व अशा परिस्थीतीत अर्जदाराची पत्नी व सासू हे दवाखान्यात इलाजासाठी नेत होते पैसे कमविण्यासाठी त्या गाडीचा उपयोग केले असते तर अर्जदाराच्या पतीने विमा पॉलिसीचा अटी व शर्तीचा भंग केला असता. सदरील वाहन अर्जदाराच्या पतीने स्वतःच्या पत्नीसाठी वाहन वापरले. गैरअर्जदाराने अर्जदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुट ि ि निष्पन्न होते. म्हणुन सर्व्हेअर श्री.नलबलवार यांनी केलेल्या सर्व्हे रिपोर्टवरुन अर्जदार हा सदर गाडीचे नुकसान भरपाईची रक्कम रु.2,45,927/- तसेच अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,०००/- व दाव्याचा खर्च रक्कम रु.२,०००/- मिळण्यास पात्र आहे. यास्तव मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत आहोत.
आदेश.
1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना वाहनाच्या विमा पॉलिसीची रक्कम रु.2,45,927/- निकाल
कळाल्यापासून ३० दिवसांत द्यावी. तसेच अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,०००/- व दाव्याचा खर्च रक्कम रु.२,०००/- निकाल कळाल्यापासून ३० दिवसांत द्यावी
3. उभयपक्षकार यांना निकालाची प्रत विनाशुल्क देण्यात यावी.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा