Maharashtra

Kolhapur

CC/13/310

Viyanand Mani Tripathi - Complainant(s)

Versus

Br.Manager, ICICI Prudential Life Insurance Co. - Opp.Party(s)

P.B.Patil

06 Jun 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/13/310
 
1. Viyanand Mani Tripathi
Amritnagar, Post-Warananagar, Tal.Panhala
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Br.Manager, ICICI Prudential Life Insurance Co.
Shivaji Park, Kavala Naka, Kolhapur.
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 
For the Complainant:P.B.Patil, Advocate
For the Opp. Party:
Adv.A.S. Ruikar
 
ORDER

नि का ल प त्र:- (व्‍दारा:- श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष) (दि. 6-06-2015) 

(1)   प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे वि. प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे. 

(2)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला.  वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले.  तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

(3)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

        तक्रारदार हे वारणानगर, ता.पन्‍हाळा, जि.कोल्‍हापूर येथील रहिवाशी असून कै. सुधीरकुमार विजयानंद त्रिपाटी हा तक्रारदार यांचा मुलगा होता.  तक्रारदार यांना वि.प. विमा कंपनी यांनी रक्‍कम रु. 40,000/- एकदाच भरा व रक्‍कम रु. दोन लाख मिळतील असे सांगितलेमुळे तक्रारदार व त्‍यांचा मुलगा यांचेमध्‍ये चर्चा होऊन सुधीरकुमार विजयानंद त्रिपाटी यांनी वि.प. कडे लाईफ इन्‍शुरन्‍स पॉलिसी नं. 16174022 रु. 40,000/- चा एकवेळ हप्‍ता भरुन रक्‍कम रु. 2,00,000/- चा विमा घेतलेला असून त्‍यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे दि. 24-08-2011 रोजी दिलेली आहेत.  तदनंतर वि. प. यांनी दि. 5-12-2011 रोजी पॉलिसी दिलेली आहे.  पॉलिसीधारक कै. सुधीरकुमार विजयानंद त्रिपाटी हे लेप्‍टोस्‍पायरॉसिस या आजाराने दि. 22-11-2012 रोजी मुंबई येथे दवाखान्‍यात मयत झाले त्‍यानंतर तक्रारदारांनी वि.प. कडे हेलपाटे मारलेनंतर भरलेली रक्‍कम रु. 40,000/- परत दिलेत.  त्‍यानंतर उर्वरीत रक्‍कम मिळावी म्‍हणून तकारदारांनी बरेच प्रयत्‍न करुनही वि.प. यांनी दाद दिली नसलेमुळे दि. 11-07-2013 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून उर्वरीत रक्‍कम रु. 1,60,000/-  द.सा.द.शे. 12 % व्‍याजासह  ची मागणी करुनही वि. प. यांनी रक्‍कम दिलेली नाही.   तक्रारदाराचे मुलास कोणत्‍याही प्रकारचे व्‍यसन नव्‍हते. वि. प. तर्फे इसमानी संगनमत करुन खोटी कागदपत्रे तक्रारदाराचा क्‍लेम डावलणेसाठी तयार केलेली आहेत.  वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे.  सबब, तक्रारदारांनी उर्वरीत विमा रक्‍कम रु. 1,60,000/- व  12 % व्‍याजासह रु. 22,200/-, नोटीस फी रु. 5,000/- व  तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासाचे रक्‍कम रु. 30,000/- द.सा.द.शे. 12 टक्‍के प्रमाणे व्‍याजासह मिळावेत अशी विनंती तक्रारदारांनी तक्रार अर्जात केली आहे.                        

(4)     तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे वि.प. कंपनीकडून आलेले पत्र द. 12-02-2013, अ.क्र. 2 कडे गॅलेक्‍सी हॉस्‍पीटलचा दाखला दि. 6-07-2013, अ.क्र. 3 कडे शाहू ब्‍लड बँकेचा दाखला दि.5-07-2013 इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केलेले आहे.  तसेच तक्रारदार यांनी दि. 5-02-2015 रोजी शपथपत्र दाखल केलेले आहे.  तसेच दि. 18-11-2013 रोजी तक्रारदार तर्फे एकूण 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. अ.क्र. 1 कडे कंपनीकडून आलेले पत्र दि. 12-12-2013, अ.क्र. 2 कडे गॅलेक्‍सी हॉस्‍पीटलचा दाखला, अ.क्र. 3 कडे शाहू ब्‍लड बँकेचा दाखला दि. 5-07-2013  इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.        

(5)    वि.प. यांनी तक्रारदारांचे तक्रारीस म्‍हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  तक्रारदारांचा तक्रार अर्ज चुकीचा, सत्‍यस्थितीशी, कायद्यास विसंगत असल्‍याने अर्जाच्‍या शाबितची संपूर्ण जबाबदारी तक्रारदार यांचेवर आहे.  तक्रार अर्जातील कलम 1 मधील मजकुराची तक्रार अर्जाचा काहीही संबंध नाही.  तक्रारदार हे मागणी करतात त्‍याप्रमाणे कोणतेही कायदेशीर देणे लागत नाहीत. तक्रारदार यांचे मुलाला झालेला रोग हा व्‍यसनामुळे झाला होता.  वि.प. यांनी कधीही कोणत्‍याही प्रकारचे डॉक्‍टरांशी संगनमत केलेले नाही. तक्रारदारांनी दि. 21-02-2013 रोजी यातील वि.प. कंपनीशी केलेल्‍या पत्रव्‍यवहारात सदर पॉलिसीहोल्‍डरला दारुचे व्‍यसन असल्‍याची बाब मान्‍य केली होती.  तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून बेकायदेशीर मोबदला मिळवण्‍याचे हेतूने तक्रार दाखल केलेली आहे.  तक्रारदार यांच्‍या मयत मुलाने वि.प. कंपनीकडे अर्ज क्र. 42244374 ने पॉलिसी मिळणेकरिता दि. 24-08-2011 रोजी अर्ज केला होता.  सदर अर्जानुसार कागदपत्रांची पुर्तता झालेनंतर वि.प. यांनी पॉलिसीबद्दल अटी व शर्ती सांगून त्‍याप्रमाणे करार केला आहे.  वि.प. कंपनीने  Insurance Regulatory and Development Authority (Protection of Policyholders Interests) Regulations, 2002 अंतर्गत संबंधित पॉलिसीबद्दलची माहिती, अटी व शर्ती बाबतचे कागदपत्रे पाहणीकरिता  सदर पॉलिसीहोल्‍डर मयत सुधीर विजयानंद त्रिपाटी यांना पाठवण्‍यात आले होते.  अटी व शर्तीमध्‍ये मयत पॉलिसीहोल्‍डरने कुठल्‍याही प्रकारचे व्‍यसन नसल्‍याचे नमूद केले आहे.   सदर पॉलिसीकरिता स्‍वत:ची माहिती भरताना पॉलिसीहोल्‍डर मयत सुधीर त्रिपाटीने अशा प्रकारचे कोणतेही व्‍यसन नसलेचे नमूद केले होते. त्‍यामुळे सदर पॉलिसी संबंधित अधिका-यांकडून दि. 5-12-2011 रोजी देण्‍यात आलेली होती.  परंतु सदर पॉलिसी दिल्‍यानंतर साधारणपणे 11 महिन्‍यातच पॉलिसीहोल्‍डर सुधीर त्रिपाठीचा दि. 22-11-201 रोजी Leptospirosis या आजाराने मुंबईमधील दवाखान्‍यात मृत्‍यू झाला.  सदर मृत्‍यूचे प्रमाणपत्र देताना ग्रेटर मुंबई महानगरपालिकेव्‍दारा फॉर्म क्र. 4 मध्‍ये मृत्‍यूचे कारण या सदराखाली खालील मजकूर नमूद करण्‍यात आला आहे. CAUSE OF DEATH : Immediate Cause (a) LEPTOSPIROSIS  Antecedent Cause : (b) ALCOHOLIC LIVER DISEASE WITH CIRRHOSIS  सदर प्रमाणपत्रावरुन पॉलिसीहोल्‍डरने पॉलिसीकरिता माहिती देताना यातील वि.प. कंपनीला चुकीची व खोटी माहिती दिलेली आहे. चुकीच्‍या व खोटया माहितीच्‍या आधारे वि.प.  कंपनीची  फसवणूक करणेत आलेली आहे.    चुकीच्‍या कारणास्‍तव व खोटया माहितीच्‍या आधारे मिळविलेल्‍या पॉलिसीबद्दल सदर पॉलिसीहोल्‍डरच्‍या वारसदारांना पॉलिसीची रक्‍कम मागण्‍याचा अधिकार नाही.  वि.प. कंपनीने तक्रारदार यांना पॉलिसीहोल्‍डरने पॉलिसीकरिता म्‍हणून दिलेली रक्‍कम रु. 40,000/- दि. 25-06-2013 रोजी बँक ऑफ इंडिया  खाते क्र. 092512110000089 वर दिलली आहे. याव्‍यतिरिक्‍त वि.प. कंपनी तक्रारदार यांना कोणतेही कायदेशीर देणे लागत नाही.  पॉलिसीकरिता दिलेल्‍या माहितीच्‍या आधारेच पॉलिसी दिलेली असून पॉलिसी हा एक प्रकारचा करार असल्‍याने त्‍यात सत्‍य माहितीच देणे गरजेचे असते.   वि.प. कंपनी पॉलिसीहोल्‍डर यांनी दिलेल्‍या माहितीवर विश्‍वास ठेवून त्‍यांना पॉलिसी देत असते.  प्राथमिक माहिती देताना सर्व माहिती सत्‍य व बरोबर देणे आवश्‍यक असते.  लाईफ इन्‍शुरन्‍स बाबतीत करारातील पक्षकारांनी खरी व बरोबर माहिती देणेचे असते.   Principle of “uberrima Fides” (utmost good faith)  चा पॉलिसीहोल्‍डर कडून जाणीवपूर्वक भंग झालेला आहे. पॉलिसीहोल्‍डरकडून खोटी माहिती दिलेस ती फसवणूक होते.  याकारणास्‍तव दि. 01-04-2013 रोजी वि.प. कंपनी यांनी क्‍लेम नाकारणेत आलेला आहे.  सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.                          

(6)    वि.प. यांनी म्‍हणणेसाबत एकूण 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  अ.क्र. 1 व 2  कडे मेडिकल सर्टीफिकेट – मयताचे कारणासह दि. 22-11-2012, अ.क्र. 3 कडे विजयानंद त्रिपाटी यांचा जबाब दि. 21-02-2013, अ.क्र. 4 कडे तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली रजि. नोटीस दि. 14-07-2013, अ.क्र. 5 कडे वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेले नोटीस दि. 29-08-2013, अ.क्र. 6 कडे मेडीकलचा अहवाल इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच पॉलिसी संदर्भातील कागदपत्रे एकूण 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 

 7)          तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा युक्‍तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्‍कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.

                           मुद्दे                                                                        उत्‍तर

 1.  वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी

ठेवेली आहे काय ?                                                                             नाही.

2.    काय आदेश ?                                                                             तक्रार अर्ज नामंजूर. 

             

                                             वि वे

 मुद्दा क्र. 1:   

            तक्रारदाराने त्‍यांचा मुलगा कै. सुधीरकुमार विजयानंद त्रिपाटी  याचा विमा वि.प. कंपनीकडे रक्‍कम रु. 2,00,000/-  इतक्‍या रक्‍कमेचा उतरविलेला होता.  सदर विम्‍याचा पॉलिसी क्र. 161740022  असा आहे.  विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही तथापि विमा उतरविलेनंतर तक्रारदाराचा मुलगा मुंबई येथील दवाखान्‍यात लेप्‍टोस्‍पाययरॉसीस या आजाराने दि. 22-11-2012 रोजी  निधन झाले आहे.  तदनंतर तक्रारदाराने विमा कंपनी यांचेकडे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी क्‍लेम फॉर्म दाखल केला. वि.प. यांनी तक्रारदारांना विम्‍याची संपूर्ण रक्‍कम अदा केलेली नाही.   वि.प. यांनी तक्रारदारांनी भरलेली रक्‍कम रु. 40,000/- फक्‍त अदा केले आहेत व उर्वरीत रक्‍कम रु. 1,60,000/- तक्रारदारांना व्‍याजासह अदा केले नाहीत अशी तक्रारदारांची तक्रार आहे.  वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांना विमा क्‍लेम  संपूर्ण रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे काय हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  त्‍याअनुषंगाने तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमा कंपनी यांनी दि. 29-08-2013 रोजी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन खालील कारणे दिलेली आहेत. 

       The Company sent the Policy documents stating the terms and conditions  and a letter stating the freelook provision along with a copy of the proposal form to the Life Assured on December 8, 2011 through Speed Post.  As the Life Assured never approached the Company with any discrepancy or complaints in the proposal forms, within the mandated Freelook period of 15 days, the subject policy bearing number 16174022 continued. 

Further, we state that in the proposal for insurance received by the Company on January, 20,2011, relevant questions were answered by the Life Assured as follows:

Q No. III Personal details of the Life to be Assured.                                Answer

2-c) Do you consume or have consumed any of the following

Substance    Yes/No.  Consumed  Quantity   No. Of

Consumed             as                      Years

Tobacoo      No       NA          NA         NA                                                       NO

Alcohol       No       NA          NA         NA                                                       NO.

Narcotics     No       NA          NA         NA                                                       NO

 

5. Healh details of the  Life to be Assured                                                                                                

   c)Have you undergone or been advised to undergo any tests or

       investigations in last 5 years?

  f) Have you ever suffered or been diagnosed or been treated for

      any of the following?

    iii) Gastrointestinal or Liver disorder like gastritis, ulcer,

    hernia, jaundice, thyroid disorders or genitourinary

     disorders related to kidney, prostrate, urinary system 

         असे कारण देऊन तक्रारदाराचा  क्‍लेम नाकारला आहे.  वि.प. यांनी दि. 20-03-2014 रोजी एकूण सहा कागद दाखल केलेली आहेत.  वि.प. यांनी दाखल केलेले  तक्रारदाराचे मुलाचे मयत सुधीर विजयानंद त्रिपाटी हा ग्रेटर मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म नं. 4 मध्‍ये मृत्‍यूचे कारण Cause of Death- (a) Leptospirosis(A-27)  (b)  ALCOHOLIC LIVER DISEASE WITH CIRRHOSIS (K 70.3) असे नमूद केले आहे.  तक्रारदाराचे   Medical Certificate या  कागदपत्रांचे अवलोकन केले असताना असे दिसून येते की,  Medical Certificate of Cause of Death मध्‍ये असे नमूद आहे की, Cause of Death- (a) Leptospirosis(A-27)  (b)  ALCOHOLIC LIVER DISEASE WITH CIRRHOSIS (K 70.3). युक्‍तीवादाचे वेळेस वि.प. यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष वेधले की, ALCOHOLIC LIVER DISEASE WITH CIRRHOSIS (K 70.3) सदरचे तक्रारदारांचे मुलगा सुधीर त्रिपाटी हा या आजाराने पुर्वीच ग्रस्‍त होता.  सदरची बाब ही प्रपोजल फॉर्ममध्‍ये तक्रारदारांनी जाणूनबूजून नमूद केलेली नाही.  प्रस्‍तुत  प्रकरणातील वि.प. यांनी Medical Certificate of Cause of Death हे ग्रेटर मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म नं. 4   व त्‍यासोबत इतर कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते तक्रारदाराचा मुलगा मयत सुधीर विजयानंद त्रिपाटी हा Cause of Death- (a) Leptospirosis (A-27)  (b)  ALCOHOLIC LIVER DISEASE WITH CIRRHOSIS (K 70.3)  मुंबई  येथे मयत झाला होतेप्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदार विजयानंद मणी त्रिपाटी यांनी सदरचा विमा मुलाकरिता उतरविलेला आहे व सदरची पॉलिसी उतरवितेवेळेस मयत मुलाला दारु, सिगारेट व इतर अपायकारक पदार्थाचे व्‍यसन होते काय ?  त्‍याबाबत उत्‍तर “नाही” असे दिलेले  आहे.  सदरची महत्‍वाची बाब तक्रारदार श्री. विजयानंद मनी त्रिपाटी यांनी मुलाचा विमा उतरविणेसाठी जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती ही बाब सिध्‍द होते, तसेच तक्रारदारांनी विमा कराराचा भंग केलेला आहे विमा कंपनी यांनी दि. 29-08-2013 रोजी पत्र देऊन तक्रारदाराचे विमा क्‍लेम नाकारुन विमा कंपनीने कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही,   विमा कंपनीने तक्रारदाराचा क्‍लेम नाकारण्‍यास दिलेली कारणे योग्‍य आहेत या निष्‍कर्षाप्रत  हे मंच येत आहे.   सबब,  म्‍हणून मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर  हे मंच नकारार्थी देत आहे.   

मुद्दा क्र.  2 :     वर नमूद मुद्दा क्र. 1 चा विवेचनाचा विचार करता हे मंच या प्रकरणी खालील आदेश पारीत करीत आहेत.

                                                  दे

1.    तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो.

2.    खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत. 

3.    सदर निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात. 

  

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.