(घोषित दि. 26.08.2011 व्दारा सौ.माधूरी विश्वरुपे, सदस्या) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदारांचे पती श्री. त्र्यंबक घायवट यांनी गैरअर्जदार यांचेकडे टेबल क्रमांक 14/10 योजना लाभ सहीत दुर्घटना योजने अंतर्गत पॉलीसी क्रमांक 983740255 दिनांक 05.12.2008 रोजी रक्कम रुपये 50,000/- ची घेतली होती व सदर पॉलीसीचा पहिला प्रिमीयम 490/- रुपये गैरअर्जदार यांचेकडे जमा केला आहे. तक्रारदारांच्या पतीचा उष्माघाताने दिनांक 24.05.2010 रोजी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती जाफ्राबाद पोलीस स्टेशन यांचेकडे दिली. पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, मयताचा मरणोत्तर पंचनामा करुन तक्रारदारांच्या पतीचे प्रेत पोष्टमार्टमसाठी संबंधित वैद्यकीय अधिका-यांकडे पाठविले. पोलीस पेपर्स व वैद्यकीय अधिका-यांचा अहवाल तक्रारी सोबत दाखल केला आहे. तक्रारदारांच्या पतीच्या मृत्यूनंतर गैरअर्जदार यांचेकडे वरील पॉलीसीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केला. सदर पॉलीसी अंतर्गत मुळ रक्कम रुपये 50,000/- व अक्सीडंट बेनीफीटची रक्कम रुपये 50,000/- तक्रारदारांना देणे आवश्यक असूनही गैरअर्जदार यांनी अद्याप पर्यंत दिली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे पोलीस स्टेशनची कागदपत्रे तसेच वैद्यकीय कागदपत्रे शवविच्छेदन अहवाल वगैरे दिनांक 02.01.2011 रोजी दाखल केली आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झालेले असून त्यांचे म्हणणे न्याय मंचात दिनांक 24.08.2011 रोजी दाखल केला आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू (Sun Stroke) उष्माघाताने झालेला असून उष्माघात या सदराखाली (Double Accident Benefit) ची रक्कम देय होत नाही. तक्रारदारांची तक्रार दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार यांचे वकील श्री. एस.बी.किनगावकर यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार यांना तक्रारदारांची पॉलीसी मान्य आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर पॉलीसी अंतर्गत विमा लाभ मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना मूळ पॉलीसी रक्कम (Sum assured) रुपये 50,000/- दिले आहेत. सदरची बाब तक्रारदारांना मान्य आहे. तक्रारदारांची वकील श्री.आर.व्ही.जाधव तसेच गैरअर्जदार यांचे वकील श्री. एस.बी.किनगावकर यांनी युक्तीवादात सदरची बाब मान्य केली आहे. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू उष्माघाताने झाला. गैरअर्जदार यांचे म्हणण्यानुसार सदर पॉलीसी अंतर्गत (Double Accident Benefit) अक्सीडंट बेनीफीटची रक्कम “उष्माघात” या सदराखाली देय नाही. “उष्माघात” हे मृत्यूचे कारणामुळे पॉलीसीतील अटी व शर्ती नुसार Double Accident Benefitरक्कम देय नाही. तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे वैद्यकीय कागदपत्रावरुन दिसून येत नाही. शवविच्छेदन अहवालाचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या पतीच्या मृत्यूचे कारण “Respiratory arrest resulting of acute Myocardial”असल्याचे दिसून येते. सदर वैद्यकीय कागदपत्रावरुन तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारदारांना सदर पॉलीसी अंतर्गत Double Accident Benefitची रक्कम रुपये 50,000/- देय होत नाही. गैरअर्जदार यांनी सदर पॉलीसी अंतर्गत देय असलेली विमा लाभ रक्कम रुपये 50,000/- तक्रारदारांना दिलेली आहे. अक्सीडंट बेनीफीटची रक्कम तक्रारदारांना देय नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येत नाही. सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश - तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाही.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |