1. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष बँके कडून गृहकर्ज खात्याचा दि.26.05.2007 ते 31.05.2012 पर्यंतचे कालावधीचा उतारा मिळावा तसेच पिक कर्ज खात्याचा दि.09.06.2009 ते 17.07.2011 पर्यंतचे कालावधीचा चुकीचा खाते उतारा दुरुस्त करुन मिळावा व इतर अनुषंगीक मागण्यांसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे- तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष बँक ऑफ इंडीया, शाखा पारशिवनी या बँकेचा दि.01.06.2006 पासून खातेदार असून, व्यवसायाने शेतकरी आहे व त्याचे खात्याचा क्रमांक-6314 असा आहे. तक्रारकर्त्याचे नावे मौजा साहोली, पटवारी हलका क्रमांक-12, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर येथे सर्व्हे नं.20, आराजी 1.12 हेक्टर आर, तसेच सर्व्हे नं.24, आराजी 0.64 हेक्टर आर आणि सर्व्हे नं.29, आराजी 0.35 हेक्टर आर अशी शेती आहे. सदर शेतीवर विरुध्दपक्ष बँके कडून तक्रारकर्त्याने दि.09.06.2009 या वर्षात पिक कर्ज (Crop Loan) रुपये-20,000/- घेतले होते आणि सदर कर्जावरील व्याजाचा दर हा 7% असा होता. तक्रारकर्ता सन-2009-10 या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे पिक कर्जाची व्याजासह रक्कम परतफेड करु शकला नाही. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने दि.09.07.2011 रोजी विरुध्दपक्ष बँकेकडे पिक कर्ज खाते क्रं.-87377630001230 चा खाते उतारा मागितला असता, विरुध्दपक्ष बँकेने पिक कर्ज खात्याचा चुकीचा खाते उतारा पुरविला व त्यामध्ये रुपये-3405/- एवढी जास्तीची रक्कम आकारण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरुन दि.09.06.2009 ते 17.07.2011 कालावधीचा पिक कर्जाचा चुकीचा खाते उतारा, दुरुस्त करुन मिळावा यासाठी मागणी करुन सुध्दा तो वि.प.बँकेने दुरुस्त करुन दिला नाही. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने दि.04.09.2010 रोजी विरुध्दपक्ष बँकेत पिक कर्जाची व्याजा सहीत संपूर्ण रक्कम रुपये-24,460/- चा भरणा केला परंतु सदर जमा रकमेची नोंद पिक कर्ज खात्यात झालेली नाही. तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, त्याने दि.26.05.2007 रोजी विरुध्दपक्ष बँके कडून गृहकर्ज (Housing loan) रुपये-2,00,000/- घेतले असून त्याचा कर्ज खात्याचा क्रं-873775100001733 असा आहे. सदर गृहकर्ज खात्याचा दि.26.05.2007 ते 31.05.2012 या कालावधीचा खाते उतारा आज पर्यंत तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष बँकेने पुरविलेला नाही. दि.26.05.2007 तारखेस गृहकर्ज घेते वेळी, विरुध्दपक्ष बँकेने तक्रारकर्त्याच्या कोरे स्टॅम्प पेपर्स, कोरे विवरणपत्र व कोरे धनादेश इत्यादी दस्तऐवजावर सहया घेतलेल्या आहेत आणि सदर दस्तऐवजाचा दुरुपयोग विरुध्दपक्ष बँक करण्याची दाट शक्यता तक्रारकर्त्यास वाटत आहे. तक्रारकर्त्याने दि.20.02.2012 रोजी विरुध्दपक्ष बँकेस रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली. सदर नोटीस वि.प.बँकेस दि.21.02.2012 रोजी मिळाली परंतु सदर नोटीसला आज पर्यंत वि.प.बँकेने उत्तर दिले नाही.
म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष बँकेच्या विरुध्द मंचात तक्रार दाखल केली आणि त्याव्दारे विरुध्दपक्ष बँकने तक्रारकर्त्यास दि.26.05.2007 ते 31.05.2012 पर्यंत या कालावधीचा गृहकर्ज खात्याचा उतारा पुरविण्याचे आदेशित व्हावे. पिक कर्ज खाते क्रं-873776300001230 चा दि.09.06.2009 ते 17.07.2011 या कालावधीचा चुकीचा खाते उतारा दुरुस्त करुन योग्य खाते उतारा तक्रारकर्त्यास पुरविण्याचे आदेशित व्हावे. वि.प.बँकेने, तक्रारकर्त्यास चुकीचा खाते उतारा पुरविल्यामुळे झालेला मनःस्ताप, आर्थिक व शारीरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-90,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे अशा मागण्या केल्यात. 3. प्रस्तुत तक्रारीमध्ये या न्यायमंचाचे मार्फतीने यामधील विरुध्दपक्ष बँकेस नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली असता, विरुध्दपक्ष बँकेने मंचा समक्ष उपस्थित होऊन निशाणी क्रं 9 अनुसार पान क्रं 27 ते 30 वर आपले लेखी उत्तर सादर केले. वि.प.बँकेने आपले लेखी उत्तरामध्ये नमुद केले की, तक्रारकर्त्याचे तक्रारअर्जातील परिच्छेद क्रं 3 मधील कथन अमान्य आहे. तक्रारकर्त्याने तक्रारअर्जा सोबत जोडलेल्या यादीतील दस्तऐवज अक्रं-3 बँक खाते उता-याची प्रत खरी आहे. तक्रारकर्त्याने स्वतःचे अक्कल हुषारीने तयार केलेला बॅलन्सचा गोषवारा व तयार केलेली रुपये-3405/- ची बेरीज वि.प.बँकेस मान्य नाही. वि.प.बँकेने, तक्रारकर्त्याचे, पिक कर्ज खाते क्रं-873776300001230 चा दिलेला खाते उतारा चुकीचा आहे, हे कथन खरे नाही व त्यामुळे सदर खाते उतारा दुरुस्त करण्याची गरज नाही, म्हणून, ग्राहक संरक्षण कायदा कलम-2 (ग) नुसार वि.प.बँकेच्या सेवेत त्रृटी ठरु शकत नाही. तक्रारकर्त्याने पिक कर्ज खाते क्रं-873776300001230 या खात्यात दि.04.09.2010 रोजी पिक कर्जाची व्याजासह रक्कम रुपये-24,460/- भरली हे म्हणणे खरे नाही परंतु त्या संदर्भात रकमेची नोंद असलेली दस्तऐवज यादीतील अक्रं 4 वर जोडलेली दि.04.09.2010 ची पावती खरी आहे, त्यानुसार तक्रारकर्त्याने रुपये-24,460/- विरुध्दपक्ष बँकेत भरलेत. पैसे भरल्या नंतर तक्रारकर्त्याने, वि.प.बँकेच्या व्यवस्थापकानां भेटून ती रक्कम थकीत झालेल्या गृहकर्ज खात्यामध्ये (Housing loan A/c) जमा करण्याची विनंती केली व त्यानुसार त्याच दिवशी तेवढी रक्कम गृहकर्ज खात्यामध्ये (Housing loan A/c) जमा करण्यात आली. या बाबतच्या कर्ज खाते उता-याची प्रत (Statement of loan account)
तक्रारकर्त्याचे माहिती करीता जोडली आहे. तक्रारकर्त्याचा गृहकर्ज खात्याचा क्रमांक-873775100001733 असा आहे हे म्हणणे खरे आहे परंतु दि.26.05.2007 ते 31.05.2012 पर्यंतचे कालावधीचा गृहकर्ज खात्याचा नोंद असलेला उतारा व व्याज दर तक्रारकर्त्यास पुरविला नाही हे तक्रारकर्त्याचे म्हणणे विरुध्दपक्ष बँकेस मान्य नाही. त्याच बरोबर दि.26.05.2007 रोजी गृह कर्ज घेते वेळी कोरे स्टॅम्प पेपर्स व को-या धनादेशावर तक्रारकर्त्याच्या सहया घेतल्या व त्याचा बँक दुरुपयोग करुन तक्रारकर्त्याची फसवणूक करण्याची दाट शक्यता आहे हे तक्रारकर्त्याचे कथन खोटे व चुकीचे असून ते वि.प.बँकेस मूळात मान्य नाही. प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तरी सुध्दा तक्रारकर्त्याने वि.प.बँके विरुध्द खोटी व चुकीची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने मंचा समक्ष आलेला नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, तक्रारकर्त्याने, वि.प.बँकेस त्रास देण्याचे हेतुने दि.01.02.2012 ला गृहकर्ज भरण्या करीता नागपूर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँक, शाखा पारशिवनीचा रुपये-15,100/- चा धनादेश वि.प.बँकेत दिला. परंतु सदरचा धनादेश हा खात्यात अप्रर्याप्त रक्कम या सदरा खाली वि.प.बँकेस परत आला. त्यामुळे वि.प.बँकेने अधिवक्ता यांचे मार्फतीने तक्रारकर्त्यास नोटीस देऊन त.क.ने दिलेल्या चेकची रक्कम वटविल्या न गेल्याने, तक्रारकर्त्या विरुध्द भारतीय पराक्रम्य विलेख (Negotiable Instruments Act) कायदा कलम 138 प्रमाणे पारशिवनी न्यायालयात फौजदारी कारवाई करणे भाग पडेल असे कळविले. म्हणून तक्रारकर्त्याने बदला घेण्याचे उद्देश्याने प्रस्तुत खोटी तक्रार मंचा समक्ष दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार वि.प.बँके विरुध्द दाखल केली असल्याने ती खर्चासह खारीज व्हावी, अशी विनंती वि.प. बँके तर्फे करण्यात आली. 4. तक्रारकर्त्याने नि.क्रं 3 वरील यादी नुसार एकूण 07 दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्या असून त्यामध्ये बँकेच्या पासबुकाची प्रत, 7/12 उतारा प्रती, बँकेचा खाते उतारा प्रत व रक्कम रुपये-24,460/- व रुपये-25,017/- विरुध्दपक्ष बँकेत जमा केल्याच्या पावत्यांच्या प्रती, 7/12 वरील बोझा कमी करण्याचे प्रमाणपत्र प्रत व तक्रारकर्त्याचे वकीलानीं, विरुध्दपक्ष बँकेस पाठविलेल्या नोटीसची प्रत अशा दस्तऐवजांचा समावेश आहे.
5. विरुध्दपक्ष बँकेने नि.क्रं 10 वरील यादी नुसार एकूण 03 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये पिक कर्ज खाते उतारा प्रत, गृहकर्ज खाते उतारा प्रत आणि त.क.ने, वि.प.बँकेस दिलेला धनादेश न वटल्यामुळे, वि.प.बँकेने भारतीय पराक्रम्य विलेख कायदा कलम 138 खाली कारवाई करण्या बाबत अधिवक्ता श्री पुरोहीत यांचे मार्फतीने त.क.ला पाठविलेल्या नोटीसची प्रत अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. 6. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, वि.प.बँकेचे प्रतिज्ञालेखावरील उत्तर, उभय पक्षानीं दाखल केलेले दस्तऐवज तसेच मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयांच्या प्रती तसेच उभय पक्षांचे अधिवक्त्यांचा युक्तीवाद यावरुन मंचा समक्ष खालील मुद्दे निर्णयार्थ उपस्थित होतात- मुद्दा उत्तर
(1) वि.प.बँकेने, त.क.ला, पुरविलेला कर्ज खात्याचा उतारा हा चुकीचा आहे काय? ............................................................. नाही.
(2) वि.प.बँकेने, त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?.........................................................नाही.
(3) काय आदेश?...................................................अंतिम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्दा क्रं-1 ते 3- 7. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार त्याने विरुध्दपक्ष बँके कडून दि.09.06.2009 रोजी रक्कम रुपये-20,000/- चे पिक कर्ज घेतले असून त्याचा कर्ज खाते क्रमांक-873776300001230 असा आहे. तर तक्रारकर्त्याने या व्यतिरिक्त वि.प.बँके कडून दि.26.05.2007 रोजी रुपये-2,00,000/- एवढया रकमेचे गृहकर्ज घेतले असून त्याचा कर्ज खाते क्रं-873775100001733 असा आहे.
8. तक्रारकर्त्याने आपले तक्रारी सोबत पान क्रं 15 वर वि.प. बँके मध्ये कर्जाचे परतफेडीपोटी रक्कमा जमा केल्याबाबत 02 पावत्यांच्या प्रती
अभिलेखावर दाखल केल्यात, त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे-
अक्रं | रक्कम जमा केल्याचा दिनांक | कोणत्या कर्जखाते सदरा खाली रक्कम जमा केली ते कर्ज खाते | जमा केलेली रक्कम रुपयामध्ये | 1 | 04.09.2010 | पिक कर्ज | 24,460/- | 2 | 14.07.2011 | पिक कर्ज | 25,017/- |
9. तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार अशी आहे की, त्याने दि.04.09.2010 रोजी पिक कर्ज खाते या सदराखाली वि.प.बँकेत रुपये-24,460/- रक्कम भरलेली असताना, वि.प.बँकेने त्यास पिक कर्ज खाते क्रं-873776300001230 चा दि.08.02.2008 ते 09.07.2011 या कालावधीचा जो खाते उतारा पुरविल्या त्यामध्ये दि.04.09.2010 रोजी पिक कर्ज खाते या सदरा खाली भरलेली रक्कम रुपये-24,460/-ची नोंद दर्शविलेली नाही.
10. या संदर्भात वि.प.बँकेने आपले उत्तरात असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने दि.04.09.2010 रोजी वि.प.बँकेचे व्यवस्थापकां कडे त्याने पिक कर्ज खात्यात भरलेली रक्कम रुपये-24,460/- त्याचे गृहकर्ज खात्यामध्ये वळती करण्यात यावी अशी मौखीक विनंती केल्या वरुन त्यांची सदरची रक्कम रुपये-24,460/- त्याच दिवशी तक्रारकर्त्याचे गृहकर्ज खात्यात वळती केली.
11. वि.प.बँकेने आपले उपरोक्त म्हणण्याचे पुष्टयर्थ्य तक्रारकर्त्याचे पिक कर्ज खात्याचा उतारा आणि गृह कर्ज खात्याचा उतारा नि.क्रं 10 वरील यादी नुसार अभिलेखावर दाखल केला असून त्यावरुन खालील प्रमाणे दिसून येते. पिक कर्ज खाते क्रं-873776300001230 या मधील नोंदी नुसार, तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेली पावती दि.14.07.2011 रोजी पिक कर्ज या सदरा खाली रुपये-25,017/- रक्कम भरल्याची नोंद पिक कर्ज खात्यामध्ये दर्शविलेली आहे. तसेच गृहकर्ज खाते क्रं-873775100001733 मधील खाते उता-या मध्ये तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेली पावती दि.04.09.2010 ( जी रक्कम तक्रारकर्त्याने, वि.प.बँकेमध्ये पिक कर्जा पोटी जमा केलेली आहे) रक्कम रुपये-24,460/- भरल्याची नोंद दि.04.09.2010 रोजी गृहकर्ज खात्यात दर्शविलेली आहे. 12. तक्रारकर्त्याचे तक्रारी वरुन, त.क.चे असे म्हणणे आहे की, त्यास पिक कर्ज खात्याचा चुकीचा हिशोब वि.प.बँकेने दिला हे विधान उपरोक्त खुलाश्या वरुन योग्य नाही, असे दिसून येते.
13. तक्रारकर्त्याने आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ खालील मा.वरीष्ठ न्यायालयांचे निकालपत्रांवर आपली भिस्त ठेवली.
I (1996) CPJ 250 (NC) State Bank of India -V/s- M/s.Agarwal Karogency ***** I (1996) CPJ 252 (NC) Federal Bank Ltd. -V/s- Gajanan S. Alva ***** II(1996) CPJ 252 (NC) Panjab National Bank -V/s- Tej Rajinder Singh ***** II (1996) CPJ 254 (NC) Raghbir Singh & Anr. -V/s- Zimidara Engg.Co.Ltd.& Anr. ***** AIR 2002 Tilendra Nath Mahanta V/s United Bank of India & others. ***** आम्ही, सदर मा.वरीष्ठ न्यायालयाचे निकालपत्रांचे वाचन केले असता, वरील सर्व प्रकरणांमध्ये संबधित ग्राहकाच्या एका खात्यात जमा असलेल्या रकमा, त्याच्या पूर्व परवानगी शिवाय कर्ज खात्यात परस्पर वळत्या करुन,बँकने कर्जाची वसुली केलेली आहे. परंतु आमचे समोरील प्रकरणातील तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष बँकेत दि.04.09.2010 रोजी जमा केलेली रक्कम रुपये-24,460/- त्याच दिवशी तक्रारकर्त्याचे गृहकर्ज खाते क्रमांक-873775100001733 मध्ये जमा दर्शवून तशी नोंद तक्रारकर्त्याचे गृहकर्ज खात्यामध्ये दर्शविल्याचे गृहकर्ज खाते उता-याच्या प्रतीवरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष बँकेत, दि.14.07.2011 रोजी पिक कर्ज खात्यात जमा केलेली रक्कम रुपये-25,017/- त्याच दिवशी वि.प.बँकेने, तक्रारकर्त्याचे पिक कर्ज खाते क्रमांक-873776300001230 मध्ये जमा दर्शवून तशी नोंद तक्रारकर्त्याचे पिक कर्ज खात्यामध्ये दर्शविल्याचे पिक कर्ज खाते उता-याच्या प्रती वरुन दिसून येते. थोडक्यात तक्रारकर्त्याच्या एका खात्यात जमा असलेली रक्कम, दुस-या कर्ज खात्यात वळती करुन विरुध्दपक्ष बँकेने कर्जाची वसुली केलेली नाही, असे दिसून येते. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या उपरोक्त नमुद मा.वरीष्ठ न्यायालयांचे निकालपत्रातील वस्तुस्थिती आणि आमचे समोरील प्रस्तुत तक्रारीमधील वस्तुस्थिती भिन्न असल्यामुळे या निर्णयाचा लाभ तक्रारकर्त्यास होऊ शकत नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 14 वि.प.बँकेचे असे म्हणणे आहे की, कर्जा संबधाने, उभय पक्षांमध्ये झालेला करार दि.22 मे, 2007 अनुसार, तक्रारकर्त्याने बँकेत भरलेली रक्कम, तक्रारकर्त्याचे गृहकर्ज खात्यात जमा केली व असे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. 15. विरुध्दपक्ष बँकेने आपले या म्हणण्याचे पुष्टयर्थ्य मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी, पुर्नयाचीका क्रं (Revision Petition) 2880/2006 “ इंडीयन ओव्हरसिज बँक-विरुध्द- एन.देवीदास पक्कल ” मध्ये दि.06.08.2012 रोजी पारीत केलेला आदेश, जो-2012-NCJ 694 (NC) या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे, यावर आपली भिस्त ठेवली. सदर आदेशात मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले आहे की, कर्जदार हा त्याचे कर्जाचे दायीत्वा पासून सुटू शकत नाही कारण कर्ज घेताना, कर्जदाराने तसे हमीपत्र (Undertaking) संबधित बँकेस लिहून दिलेले असते.
16. मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा सदरचा न्यायनिवाडा हा आमचे समोरील प्रकरणातील वस्तुस्थितीशी तंतोतंत लागू पडतो, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
17. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, त्यास मागणी करुनही, विरुध्दपक्षाने त्याचे गृहकर्ज खात्याचा उतारा पुरविलेली नाही. परंतु या संदर्भात तक्रारकर्त्याने वि.प. बँकेकडे गृहकर्ज खात्याचा उतारा पुरविण्या बाबत लेखी मागणी केल्या बाबतचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही त्यामुळे त.क.चे या म्हणण्यात कोणतेही तथ्य दिसून येत नाही. 18. उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करुन, वि.प.बँकेने, तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही खारीज होण्यास पात्र आहे. त्यावरुन आम्ही प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष बँके विरुध्द खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |