तक्रार दाखल ता.21/04/2015
तक्रार निकाल ता.29/07/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पु्ढीलप्रमाणे आहे.
तक्रारदार हे बहिरेवाडी, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत तर वि.प.ही विमा कंपनी आहे. तक्रारदाराने त्यांचे मालकीच्या टाटा–1109 टेंम्पो एम.एच.-09-सी.ए.–2027 चा विमा वि.प.कडे उतरविला होता. त्याचा पॉलीसी नं.215036/31/15/002742 असा आहे व कालावधी दि.18.09.2014 ते दि.17.09.2015 असा होता. तक्रारदार हे नमूद टेपोंच्या उत्पन्नावर त्यांचा व त्यांचे कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदाराचा टेंम्पो मुंबई ते बेंगलोर या महामार्गावर वाहतूक करत होता. सदरचा टेंम्पो कोगनोळी गावचे हद्दीतील आर.टी.ओ.चेकपोस्ट येथे आल्यावर ऑल इंडिया परमीटची मुदत संपलेने व परमीट काढणेसाठी संबंधीत अधिका-याने सांगितलेने सदर टेंम्पो कोगनोळी गावचे आर.टी.ओ.चेकपोस्ट येथेच लावला. सदर टेंम्पो या ठिकाणी तीन दिवस होता. त्यानंतर तक्रारदाराने परमीट काढणेसाठी आवश्यक ती फी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा-कागल, येथे दि.20.09.2014 रोजी भरली व सदर टेंम्पोचे परमीटचे नूतनीकरण करुन घेतले. त्यानंतर मुंबई-बेंगलोर हायवेवर तडस, कर्नाटक स्टेट येथे आल्यावर दि.29.09.2014 रोजी प्रस्तुत तक्रारदाराचा टेंम्पो पंक्चर झाला म्हणून बाजूला थांबाविला होता. टायर पंक्चर झालेले काढणेसाठी तक्रारदार जवळच आले दुकानात गेले असता, प्रस्तुत टेंम्पोमध्ये शॉर्टसकीर्ट होऊन प्रस्तुत टेंम्पो पूर्णपणे जळून खाक झाला व टेम्पोचे नुकसान झाले. त्यानंतर तक्रारदाराने वि.प.कंपनीस कळविलेनंतर वि.प.कंपनीने सर्व्हेअर-श्री.रेळेकर विनयकुमार यांचेकडून प्रस्तुत टेम्पोचा सर्व्हे. करुन घेतला व सदरचे सर्व आवश्यक ते कागदपत्रे जोडून वि.प.कंपनीकडे विमा क्लेमची मागणी केली. वि.प. कंपनीने तक्रारदाराने आर.टी.ओ.चेकपोस्टचे रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज व गाडीचे कागदपत्रे दिली नसलेचे कारण देऊन तक्रारदाराचा न्यायोचीत विमा क्लेम दि.16.03.2015 रोजी नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदाराने वि.प.यांना सेवेत त्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मे.मंचात दाखल केला आहे. तक्रारदाराने सदर टेंम्पोसाठी टाटा मोटर्स फायनान्स यांचेकडून कर्ज घेतले होते व तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. सबब, तक्रारदाराने आहे त्या स्थितीत टेंम्पो दि.30.03.2015 रोजी श्री.जयसिंग रामचंद्र पाटील, रा.कोडोली यांना रक्कम रु.10,0000/- या किंमतीत विकला आहे.
प्रस्तुत कामी तक्रारदाराने वि.प.यांचे मागणीप्रमाणे सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतू तक्रारदाराने वि.प.कडे आर.टी.ओ.चेकपोस्ट रिपोर्ट तीन महिन्यापर्यंतचे मेंटेंनन्स डिटेल्स, लॉग बुक नसलेने दाखल केले नाहीत. सदरची बाब, तक्रारदाराने वि.प. यांना सांगितली होती. तरीही तक्रारदाराचा विमा क्लेम वि.प.यांनी नाकारलेला आहे. त्यामुळे वि.प.ने तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली आहे. प्रस्तुत टेंम्पो एम.एच.-09-सी.ए.-2027 ची आय.डी.व्ही.रक्कम रु.12,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये बारा लाख मात्र) होती. प्रस्तुत टेंम्पो तक्रारदाराने रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख मात्र) या रकमेस विकला असलेने तक्रारदार यांना प्रस्तुत आय.डी.व्ही.च्या रकमेतून रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख मात्र) वजा करुन उर्वरीत रक्कम रु.11,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये अकरा लाख मात्र) वि.प.यांचेकडून वसूल होऊन मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मे.मंचात दाखल केला आहे.
तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प.विमा कंपनीकडून टेंम्पोची विमा क्लेम नुकसानीची रक्कम रु.11,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये अकरा लाख मात्र) वसूल होऊन मिळावी. प्रस्तुत रकमेवर द.सा.द.शे.12 टक्केप्रमाणे व्याज दि.22.12.2014 पासून रक्कम फिटेपर्यंत मिळावे, मानसिक त्रासापोटी वि.प.यांचेकडून तक्रारदाराला रक्कम रु.20,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- वि.प.कडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.1 अ कडे अॅफीडेव्हीट, नि.3 चे कागद यादीसोबत नि.3/1 ते 3/3 कडे अनुक्रमे विमा क्लेम नाकरलेचे पत्र, विमा पॉलीसी, आर.सी.बुक, नि.5 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.6 चे कागद यादीसोबत विमा पॉलीसी प्रमाणपत्र, आर.सी.टी.सी., एस.बी.आय.ला रक्कम भरलेचे चलन, विशेष बातमी तडस पोलीस स्टेशन टेंम्पोचे जळून नुकसान झालेबाबत वर्दी, पंचनामा, अग्नीशामक दलाचा अहवाल, टेंम्पो दुरुस्तीस येणा-या खर्चास इस्टीमेंट, टेंम्पो विक्रीचे करारपत्र, कन्नड भाषेतील कागदपत्रे, प्रस्तुत कन्नड भाषेतील कागदपत्रांचे मराठी अनुवाद केलेबाबत अनुवादक यांचे अॅफीडेव्हीट, नि.7 कडे पुरावा संपलेची पुरशिस नि.8 कडे लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केले आहेत.
4. प्रस्तुत कामी वि.प.यांना नोटीस लागू होऊनही वि.प.हे मे.मंचात गैरहजर राहीलेने प्रस्तुत वि.प.यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. वि.प. यांनी दि.18.07.2016 रोजी प्रस्तुत एकतर्फा आदेश रद्द होणेसाठी विनंती अर्ज, या कामी दाखल केला होता परंतू प्रस्तुत एकतर्फा आदेश रद्द करणेचे अधिकार या मे.मंचास नसलेमुळे सदरचा अर्ज नामंजूर झालेला आहे. त्यामुळे वि.प.यांनी कोणतेही म्हणणे/ कैफियत दाखल केलेली नाही. तसेच प्रस्तुत तक्रार अर्जातील कोणतेही कथन वि.प.यांनी खोडून काढलेले नाही. सबब, वि.प.विरुध्द सदर तक्रार अर्ज एकतर्फा चालवणेत आला आहे.
5. वर नमूद तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.यांचे दरम्यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते आहे काय ? | होय |
2 | वि.प.ने तक्रारदाराला सदोषसेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
विवेचन
6. मुद्दा क्र.1 ते 3:- वर नमूद मुद्दे क्र.1, 2 व 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने त्यांचे मालकीचा टेंम्पो रजि.नं.एम.एच.09-सी.ए.2017 चा विमा वि.प.विमा कंपनीकडे उतरविला असून त्याचा पॉलीसी क्र.215036/31/15/ 002742 असा असून कालावधी दि.18.09.2014 ते दि.17.09.2015 असा होता. प्रस्तुत विमा पॉलीसी व टेंम्पोचे आर.सी.टी.सी.कागद यादी, नि.6 सोबत अ.नं.1 व 2 ला हजर केले आहे. तसेच तक्रारदाराचा सदर टेंम्पो मुंबई ते बेंगलोर महामार्गावर कोगनोळी या गावच्या हद्दीत आर.टी.ओ.चेकपोस्ट येथे आल्यावर सदर टेंम्पोचा ऑल इंडिया परमीट संपलेमुळे संबंधीत अधिकारी यांनी सदर परमीट काढणेस सांगितले असता, दि.20.09.2014 रोजी मुंबई-बेंगलोर महामार्गावर तडस कर्नाटक राज्य या गावच्या हद्दीत तक्रारदाराचे प्रस्तुत टेम्पोस पंक्चर झालेने पंक्चर काढणेसाठी तक्रारदार टायर काढून घेऊन गेलेनंतर सदर टेम्पोमध्ये शॉर्टसर्कीट होऊन आग लागली व टेम्पो पूर्णपणे जळाला. याबाबत स्टेट बॅकेत भरलेले चलन तसेच टेम्पो जळालेनंतर पोलीस स्टेशन तडस येथे दि.22.09.2014 रोजी 969/2014 ला विशेष बातमी म्हणून नोंद झाली आहे. या नोंदीची प्रत तसेच जळीत टेम्पोचा पंचनामा, कर्नाटक राज्य अग्नीशामक दल यांचा रिपोर्ट या कामी दाखल केले आहेत. तसेच टेम्पो जळीत झालेली बाब तक्रारदाराने वि.प.विमा कंपनीत कळविलेवर वि.प.विमा कंपनीने विजयकुमार रेळेकर यांचेकडून स्पॉट सर्व्हे.करुन घेतला व प्रस्तुत जळीत टेम्पोस दुरुस्तीसाठी किती खर्च येईल याचे इस्टीमेंट घेतले व त्या इस्टीमेंटप्रमाणे सदर टेम्पो दुरुस्तीसाठी रक्कम रु.12,47,000/- एवढा खर्च टेम्पोची आय.डी.व्ही. रक्कम रु.12,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये बारा लाख मात्र) दर्शविली आहे. किंमतीपेक्षा दुरुस्तीस जास्त खर्च येणार असलेने तक्रारदाराने प्रस्तुत टेम्पो रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख मात्र) चा किंमतीस विक्री केला आहे. सदर टेम्पोचा विमा क्लेम मिळणेसाठी तक्रारदाराने वि.प.कंपनीकडे सर्व कागदपत्रांसह विमा क्लेम सादर केला होता. वास्तविक प्रस्तुत विमा कंपनीने तक्रारदाराचा टेम्पो विक्री केलेची रक्कम रु.1,00,000/- आय.डी.व्ही.रकमेतून वजा करुन तसेच रक्कम रु.2,00,000/- घसारा वजा जाता उर्वरित रक्कम तक्रारदाराला देणे गरजेचे होते. परंतू वि.प.ने प्रस्तुत रक्कम तक्रारदाराला देणे नाकारले व दि.16.03.2015 रोजी तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारला आहे ही बाब दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते म्हणजेच वि.प.विमा कंपनीने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट सिध्द होते. कारण वि.प.यांना या कामी नोटीस लागू होऊनही वि.प. मे.मंचात हजर झालेले नाहीत अथवा कैफीयत/म्हणणे दिलेले नाही. सबब, वि.प.यांचे विरुध्द एकतर्फा आदेश या कामी नि.1 वर पारीत झालेला आहे. सबब, वि.प.विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालवणेत आले. त्यामुळे वि.प.ने या कामी बचावसाठी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तसेच कोणतेही म्हणणे सादर केलेले नाही. सबब, तक्ररदाराचे तक्रार अर्जातील कथने ही कागदपत्रांनिशी तक्रारदाराने शाबीत केलेली आहेत व सदर तक्रार अर्ज तक्रारदाराने भारतीय पुराव्याच्या कायद्याप्रमाणे शाबीत केलेला आहे. सबब, तक्रार अर्जातील कथनांवर विश्वासार्हता ठेवणे योग्य व न्यायोचीत होणार आहे असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हे नमूद टेम्पोचा विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत व प्रस्तुत विमा क्लेम वि.प. यांनी तक्रारदार यांना देणे योग्य व न्यायोचीत होणार आहे असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, आम्हीं मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे होकारार्थी दिलेली आहेत.
7. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 तक्रारदारांना वि.प.विमा कंपनीने टेम्पोचे विमा क्लेमची रक्कम रु.9,00,000/- (रक्कम रुपये नऊ लाख मात्र) अदा करावी. प्रस्तुत रकमेवर विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम तक्रारदाराच्या हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज तक्रारदाराला वि.प.ने अदा करावे.
3 तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी वि.प.ने रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी वि.प.ने तक्रारदाराला रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.
4 वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.ने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.