Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/09/807

MRS RANJANA MAHADEV PHATAK - Complainant(s)

Versus

BR. MANAGER, ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD, - Opp.Party(s)

ABHAY JADHAV

29 Jan 2014

ORDER

ग्राहक तक्रार निवारण मंच,
मुंबई उपनगर जिल्‍हा, मुंबई.
प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400051.
महाराष्‍ट्र राज्‍य
 
Complaint Case No. cc/09/798
 
1. SHOBHA D.DHOLE
R/O-PAWARWADI,TAL-INDAPUR.DIST-PUNE
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE LTD.
ICICI BANK TOWER,BKC.BANDRA EAST.MUM-051
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/799
 
1. MRS SUVARNA MADHUKAR KIRAT
R/O. PIT KESHWAR, TAL-INDAPUR, DIST-PUNE
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BNAK TOWER, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/800
 
1. MRS MUKTABAI GANGARAM KONDBHAR
R/O. SHILATANE, TAL-MAWAL, DIST-PUNE
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANBK TOWER, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/801
 
1. MRS SHARDA DATTATRAYA HULAVALE
R/O. KARLA, TAL-MAVAL, DIST-PUNE
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BANDRA KURAL COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/802
 
1. MRS SEEMADEVI SOMNATH GORE
R/O. SANSAR, TAL-INDAPUR, DIST-PUNE
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BKC, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/803
 
1. MRS KUSUM TATYASO JAMDAR
R/O. BELAVADI, TAL-INDAPUR, DIST-PUNE
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BKC, BANDRA-EAST, MUMBAI-51.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/806
 
1. MRS TARABA BHAUSAHEB BHOITE
R/O. BABHULGAON, TAK-PATHARDI, DIST- AHMEDNAGAR
...........Complainant(s)
Versus
1. BRA MANAGER ICICI LOMBARD GENERAL INSURANCE
ICICI BANK TOWER, BKC, BANDRA-EAST, MUMBAI.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/807
 
1. MRS RANJANA MAHADEV PHATAK
R/O. GHATSIRAS, TAL- PATHARDI, DIST- AHMEDNAGAR
...........Complainant(s)
Versus
1. BR. MANAGER, ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI TOWER, BKC, BANDRA-EAST, MUMBAI.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/808
 
1. MRS LATA PRAKASH LOHAKARE
R/O. SONAI, TAL-NEWASA, DIST- AHMEDNAGAR
...........Complainant(s)
Versus
1. BR. MANAGER, ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BKC, BANDRA-EAST, MUMBAI.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/809
 
1. MRS VAISHALI YASHWANT PHADTARE
R/O. BELWADI, TAL- KARAD, DIST- SATARA
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BKC, BANDRA-EAST, MUMBAI.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/829
 
1. ASHWINI S.SHINDE
GUNJALWADI TAL-JUNNER.DIST-PUNE
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE LTD.
ICICI BANK TOWER.BKC.BANDRA EAST MUM
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/830
 
1. MRS DROPADA BALU GARDE
R/O. KHALAD, TAL-PURANDAR, DIST-PUNE
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO.
ICICI BANK TOWER, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/831
 
1. MRS RADHA DILIP GADE
R/O BHILAWADE, TAL-PATHARDI, DIST-AHAMADNAGAR
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI TTOWER, BANDRA KURAL COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/832
 
1. MRA VANDANA ANKUSH BHANDAVALE
R/O. MASUR, TAL- KARAD, DIST-SATARA
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICCI BANK TOWER, BANDRA KURAL COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/09/833
 
1. MRS SHANTABAI ANADRAO DESHMUKH
R/O WARUNJI, TAL-KARAD, DIST- SATARA
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD,
ICICI BANK TOWER, BANDRA KURAL COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. JUSTICE Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
PRESENT:
तक्रारदार गैरहजर.
......for the Complainant
 
सा.वालेचे वकील श्री. अंकुश नवघरे हजर.
......for the Opp. Party
ORDER

      तक्रारदारांतर्फे         :  वकील श्री. अभय जाधव

         सामनेवालेंतर्फे      :  वकील श्री. अंकुश नवघरे             

*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* 

निकालपत्रः- मा. श्री. शां. रा. सानप, सदस्‍य                      ठिकाणः बांद्रा

*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

 

    

एकत्रित न्‍यायनिर्णय

 

 

1.  महाराष्‍ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, यांचे शासन निर्णय क्रं. एनअेआयएस 1204/प्र.क्र.166/11अे. दिनांक 05/01/2005 व एनअेआयएस 1204/प्र.क्र.166/11अे. दिनांक 31/03/2005 च्‍या आदेशान्‍वये   शेतकरीत व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना सुरु करण्‍यात आला आहे. शासन निर्णयानुसार महाराष्‍ट्र राज्‍यातील एक कोटी शेतकरीत यांचे वतीने शासनाने एकत्रितरित्‍या आया.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. मुंबई यांचेकडे शेतक-यांच्‍या वतीने विम्‍याचे हप्ते भरुन, विमा पॉलीसी उतरविलेली आहे. शेतक-याचा अनैसर्गिक मृत्‍यू झाल्‍यास सदर विमा पॉलीसीन्‍वये रुपये 1,00,000/- व अपंगत्‍व आल्‍यास रुपये 50,000/- नुकसानभरपाई प्राप्‍त होणार आहे. उपरोक्‍त महाराष्‍ट्र शासन निर्णयासोबत आवश्‍यक ते नियम, तरतुदी, अटी व शर्ती, योजनेचे स्‍वरुप, लाभार्थी, पात्रता, प्रपत्रे, विवरणपत्रे व जबाबदारी निश्चिती सदर निर्णयात स्‍पष्‍टपणे नमूद केलेल्‍या आहेत. सदर योजनेचा कार्यकाळ संपूर्ण दिवसाच्‍या 24 तासासाठी लागू असून तो दिनांक 10/01/2005 ते 09/04/2006 असा परिपत्रकामध्‍ये नमूद आहे.

 

           तक्रार अर्जांचे संक्षिप्‍त स्‍वरूप खालीलप्रमाणेः-

 

तक्रार क्रमांक 798/2009

 

2.  तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. दादासो शंकर ढोले, वय 35 वर्षे, रा. मु.पो. पवारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथील 7/12 उता-यावर सर्व्‍हे क्रमांक 511 त्‍यांचे नांवे ही शेतजमीन असून ते शेतकरी कुंटुंबातील होते, त्‍याबाबत 7/12 उता-यामध्‍ये त्‍यांच्‍या व वारसांच्‍या नांवाची नोंद आहे.

3.  तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 30/03/2005 रोजी सकाळी तक्रारदार हिचे पती श्री. दादासो शंकर ढोले हे त्‍यांच्‍या शेतीसाठी लागणारे खत खरेदी करण्‍यासाठी गेले असता रस्‍त्‍यात त्‍यांच्‍या मोटारसायकल क्रमांक एमएच-एस-8876 ला एका कार क्रमांक एमएच-01-एबी-3100 ने धडक दिली व त्‍यात ते जबर जखमी झाल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला.

 

4.  तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, व पोलीसांनी घेतलेला व दाखल केलेला खबरी जबाब, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा दाखल नमूद आहे (पी.एम. रिपोर्ट सिरीयल नंबर 5), सातारा येथील डॉक्‍टरांनी दिलेला मृत्‍यूबाबतचे कारण/निदान प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचे कागदपत्रे व वकीलांमार्फत सामनेवाले यांना पाठविलेले पत्र इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

5.    तक्रारदार व तिचे कुंटुंब संपूर्णपणे तिच्‍या पतीवर अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍युने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तहसिलदार कचेरीत गावच्‍या तलाठी यांचेतर्फे सर्व आवश्‍यकत्‍या कागदपत्रांनुसार अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 04/02/2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले त्‍याबाबतची पोचपावती दाखल आहे, परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

6.    शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन सदर विम्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 30/03/2005 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत व्‍याजासह द्यावेत. तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही, म्‍हणून दंडात्‍मक रुपये 20,000/- द्यावेत, व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.

 

तक्रार क्रमांक 799/2009

 

 

7.    तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचे पती श्री. मधुकर सर्जेराव किरकत, वय 40 वर्षे, हे शेतकरी कुंटूंबातील होते, व त्‍यांच्या नावे मु.पो. पिटकेश्‍वर, ता. इंदापूर,  जि. पुणे येथे सर्व्‍हे क्रमांक 453 शेतजमीन असून, 7/12 मध्‍ये त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 उतारा, 8-अ खाते पुस्तिका यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

8.  तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 27/11/2005 रोजी तक्रारदार हिचे पती श्री. मधुकर सर्जेराव किरकत हे त्‍यांच्‍या घरी येत असतांना रस्‍त्‍यात निमगांव गावाशेजारी सायंकाळी 7 च्‍या सुमारास एक पिसाळलेला कुत्रा त्‍यांच्‍या अंगावर धाऊन आल्‍यामुळे ते घाबरले व त्‍यांचा मोटरसायकलवरुन तोल जाऊन ते पडले, व त्‍यात ते जबर जखमी झाल्‍यामुळे त्‍यांना रुबी हॉस्‍पीटल पुणे येथे बेशुध्‍द अवस्‍थेत नेण्‍यात आले, व तेथे त्‍यांचा दिनांक 30/11/2005 रोजी मृत्‍यू झाला.

 

9.    तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, गावचा नमुना नं.8 (खातेउतारा), गा.न.नं.6(हक्‍काचे पत्रक), पोलीस एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, फिर्याद, खबरी जबाब, पोलीस पंचनामा, पुणे कॉर्पोरेशन यांनी दिलेला मृत्‍यूबाबतचा दाखला/प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचे कागदपत्रे, वाहन परवाना व वकीलांमार्फत दिनांक 4/2/2009 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत, तसेच संचिकेतील पृ.क्रं. 1 नुसार तक्रारदारांनी तलाठी यांचेकडे मयताचा दाखला, वारसाचे शपथपत्र दाखल केल्‍याचे दिसते, इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

10.   तक्रारदार व त्यांचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरीदेखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 04/02/2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

11.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 30/11/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. 

 

तक्रार क्रमांक 800/2009

 

12.   तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचे पती श्री. गंगाराम कोंडा कोंडभर, वय 60 वर्षे, हे शेतकरी कुंटूंबातील होते, व त्‍यांच्या नावे मु.पो. शिलाटणे, ता. मावळ,  जि. पुणे येथे सर्व्‍हे क्रमांक 446 शेतजमीन असून, 7/12 उतारा व 8अ खातेपुस्तिकेमध्‍ये त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

13.  तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 05/12/2005 रोजी तक्रारदार हिचे पती श्री. गंगाराम कोंडा कोंडभर हे लोणावळा येथे रस्‍त्‍याने चालत असतांना इंडिका नंबर एमएच-12-सीडी/8359 ही मुंबईकडे जात असतांना तक्रारदार हिच्‍या पतीला जोराने धडक दिली व त्‍यांचा जागेवरच दिनांक 05/12/2005 रोजी मृत्‍यू झाला.

 

14.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, फेरफार उतारा, पोलीस खबरी जबाब, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, प्रायमरी हेल्‍थ युनिट खंडाळा यांनी दिलेला मृत्‍यूबाबतचा दाखला/प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, विमा पॉलीसीचे कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 12/3/2009 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

15.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 04/02/2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

16.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 05/12/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. 

 

 

तक्रार क्रमांक 801/2009

 

 

17.   तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचे पती श्री. दत्‍तात्रेय चिंधू हुलावले, वय 44 वर्षे, हे शेतकरी कुंटूंबातील होते, व त्‍यांच्या नावे मु.पो. कार्ला, ता. मावळ,  जि. पुणे येथे सर्व्‍हे क्रमांक 495 शेतजमीन असून, 7/12 उता-या मध्‍ये व 8अ खातेपुस्तिकेत त्‍यांचे नांवे शेतजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

18.  तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 01/03/2005 रोजी तक्रारदार हिचे पती श्री. दत्‍तात्रेय चिंधू हुलावले हे उंचावर काम करीत असतांना त्यांना विजेचा शॉक लागून ते उंचावरुन खाली पडले व त्‍यांचा जागेवरच दिनांक 01/03/2005 रोजी मृत्‍यू झाला.

 

19.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, गाव नमुना क्रं. 6 हक्‍काचे पत्रक, फेरफार उतारा, पोलीस पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शाळा सोडल्‍याचा दाखला प्रायमरी हेल्‍थ युनिट खंडाळा यांनी दिलेला मृत्‍यूबाबतचा दाखला/प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचे कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 4/2/2009 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

20.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 04/02/2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

21.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 01/03/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. 

 

तक्रार क्रमांक 802/2009

 

22.   तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचे पती श्री. सोमनाथ सखाराम गोरे, वय 44 वर्षे, हे शेतकरी कुंटूंबातील होते, व त्‍यांच्या नावे मु.पो. सणसर, ता. इंदापूर,  जि. पुणे येथे सर्व्‍हे क्रमांक 937 शेतजमीन असून, 7/12 मध्‍ये त्‍यांचे नांवे शेतजमीनबाबतची त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

23.  तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 25/07/2005 रोजी तक्रारदार हिचे पती श्री. सोमनाथ सखाराम गोरे हे उसाला पाणी देण्‍यासाठी शेतात गेले असतांना ते इलेक्‍ट्रीक वॉटर मोटर चालू करीत असतांना अति उच्‍च दाबाने विजेचा शॉक/झटका लागून त्‍यांचा जागेवरच दिनांक 25/07/2005 रोजी मृत्‍यू झाला.

 

24.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, पोलीस खबरी जबाब, शवविच्‍छेदन अहवाल, घटनास्‍थळ पंचनामा, विमा पॉलीसीचे कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 4/2/2009 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

25.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 04/02/2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

26.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 25/07/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. 

 

तक्रार क्रमांक 803/2009

 

 

27.  तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचे पती श्री. तात्‍यासो अर्जुन जामदार, वय 43 वर्षे, हे शेतकरी कुंटूंबातील होते, व त्‍यांच्या नावे मु.पो. बेलवाडी, ता. इंदापूर,  जि. पुणे येथे सर्व्‍हे क्रमांक 346 व 304, खाता नंबर 706 व 742 प्रत्‍येकी ही शेतजमीन असून, 7/12 मध्‍ये त्‍यांचे नांवे शेतजमीनीबाबतची व 8-अ खाते पुस्तिका यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

28.  तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 12/01/2006 रोजी तक्रारदार हिचे पती श्री. तात्‍यासो अर्जुन जामदार हे भाजीमार्केटमधून पुणे सासवड रोडवरुन स्‍वतःच्‍या मोटार सायकल क्रमांक एमएच-12-एमए-7910 ने घरी परत येत असतांना मोटर सायकल एमएच-19-एच-1082 वेगात येऊन तक्रारदार हिच्‍या पतीला जोरात धडक दिल्‍यामुळे ते गंभीर जखमी झाल्‍याने त्‍यांना जवळच्‍या ग्रामिण रुग्‍णालय सासवड येथे नेण्‍यात आले. परंतु त्‍यांच्‍या प्रकृतीने औषधोपचारांना प्रतिसाद न दिल्‍यामुळे त्‍यांचा दिनांक 12/01/2006 रोजी मृत्‍यू झाला.

 

29.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, फेरफार उतारा, गावनमुना 6 क, शाळा सोडल्‍याचा दाखला, पोलीस एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा (जो सासवड पोलीसांकडे दाखल आहे), मृत्‍यूबाबतचा दाखला/प्रमाणपत्र, पोलीस पंचनामा, विमा पॉलीसीचे कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 12/03/2009 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

30.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 04/02/2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

31.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 12/01/2006 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. 

 

तक्रार क्रमांक 804/2009

 

 

32.      तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचे पती श्री. राजाराम निवृत्‍ती भोसले, वय 40 वर्षे, हे शेतकरी कुंटूंबातील होते, व त्‍यांच्या नावे मु.पो. डाळज, ता. इंदापूर,  जि. पुणे येथे सर्व्‍हे क्रमांक 523, खाता नंबर 37 शेतजमीन असून, 7/12 मध्‍ये त्‍यांचे नांवे शेतजमीनबाबतचा 7/12 चा उतारा, 8-अ खाते पुस्तिका यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

33.  तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 22/03/2005 रोजी सकाळी 8-30 वाजता तक्रारदार हिचे पती श्री. राजाराम निवृत्‍ती भोसले, हे शेतात काम करण्‍यासाठी जात असतांना, पुणे सोलापूर रोड ओलांडत असतांना मारुती कार नंबर एमएच-45-ए.ओ.-348 या गाडीने धडक दिली व त्‍यांच्‍या डोक्याला जबर दुखापत झाली व त्‍यांना औषधोपचारासाठी बारामती येथे हॉस्‍पीटलमध्‍ये नेत असतांना वाटतेच/रस्‍त्‍यातच त्‍यांचा दिनांक 22/03/2005 रोजी मृत्‍यू झाला. म्‍हणून भिगवण येथील सरकारी दवाखान्‍यात दाखल केलेल असता डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषीत केले.

 

34.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, गावनमुना 6क, पोलीस एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यूबाबतचे कारण शवविच्‍छेदन अहवालात नमूद आहे (दाखला/प्रमाणपत्र), शाळा सोडल्‍याचा दाखला, विमा पॉलीसीचे कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 5/12/2008 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

35.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वारंवार मुंबई येथे भेटून व फोन करुन दावा मंजूर करणेबाबत विनंती केली. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 04/02/2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

36.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 22/03/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. 

 

तक्रार क्रमांक 806/2009

 

 

37.  तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचे पती श्री. भाऊसाहेब रामभाऊ भोईटे, वय 48 वर्षे, हे शेतकरी कुंटूंबातील होते, व त्‍यांच्या नावे मु.पो. बाभुळगांव, ता. पाथर्डी,  जि. अहमदनगर येथे सर्व्‍हे क्रमांक 729, खाता नंबर 143 ही शेतजमीन असून, 7/12 मध्‍ये त्‍यांचे नांवे शेतजमीन व 8-अ खाते पुस्तिका यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

38.  तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 05/06/2005 रोजी दुपारनंतर   3-45 वाजता तक्रारदार हिचे पती श्री. भाऊसाहेब रामभाऊ भोईटे हे भाजीमार्केटमधून घरी येत असतांना त्‍यांच्या मारुती कारचे देवळाली प्रवरा येथे स्‍टेअरींग व्‍हील लॉक होऊन कारचे टायर फुटले व मारुती व्‍हॅन चिंचेच्‍या झाडावर आदळल्यामुळे डोक्‍याला जबर मार लागून त्‍यांचा जागेवरच दिनांक 05/06/2005 रोजी मृत्‍यू झाला.

 

39.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, फेरफार उतारा, पोलीस एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, पोलीस पंचनामा, जबाब, फिर्याद, मृत्‍यूबाबतचे कारण शवविच्‍छेदन अहवालात नमूद आहे, वाहन चालविण्‍याचा परवाना, विमा पॉलीसी संबंधातील कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 5/12/2008 रोजी सामनेवाले यांना पाठविलेल्या पत्राची प्रत, शासन निर्णयाची प्रत इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

40.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 04/02/2009 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

41.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 05/06/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. 

 

तक्रार क्रमांक 807/2009

 

 

42.   तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचे पती श्री. महादेव विठ्ठल पाठक, वय 38 वर्षे, हे शेतकरी कुंटूंबातील होते, व त्‍यांच्या नावे मु.पो. घाटशिरस, ता. पाथर्डी,  जि. अहमदनगर येथे सर्व्‍हे क्रमांक 169, खाता नंबर 162 ही शेतजमीन असून, 7/12 मध्‍ये त्‍यांचे नांवे शेतजमीन व 8-अ खाते पुस्तिका यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

43.  तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 01/04/2006 रोजी तक्रारदार हिचे पती श्री. महादेव विठ्ठल पाठक, हे शेतातून घरी सायकलवरुन येत असतांना कंरजी ते तिसगावकडे जाणा-या रोडवर, देवराई शिवारात, स्‍वराज्‍य दुध डेअरीजवळ बजाज सीटी-100 क्र. एमएच-16-एक्‍स-8597 या मोटरसायकलने त्‍यांना जोरात धडक दिल्‍यामुळे ते गंभीर जखमी झाले व त्‍यांना ससुन हॉस्‍पीटल पूणे येथे औषधोपचारासाठी नेण्‍यात आले. परंतु त्‍यांच्‍या प्रकृतीने प्रतिसाद न दिल्‍याने त्‍यांचा दिनांक 01/04/2006 रोजी मृत्‍यू झाला.

 

44.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, पोलीस एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, पोलीस पंचनामा, मृत्‍यूबाबतचा दाखला/प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचे संबंधातील कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 4/2/2009 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत, शासन विमा योजना प्रत इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

45.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 05/12/2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

46.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 01/04/2006 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे. 

 

तक्रार क्रमांक 808/2009

 

 

47.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. प्रकाश जगन्‍नाथ लोहकरे, वय 40 वर्षे हे शेतकरी कुटूंबातील होते. त्‍यांचे नांवे मु.पो सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर येथे सर्व्‍हे क्र. 1496 खाते क्रमांक 1045 ही शेतजमीन  असून त्‍याबाबत 7/12 उतारा व यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

48.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. प्रकाश जगन्‍नाथ लोहकरे हे दिनांक 05/09/2005 रोजी शुगर फॅक्‍टरी मुळा येथे प्‍लॅटफॉर्मवर पाय घसरुन पडले व त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर मार लागला. तातडीने त्‍यांना सोनई प्रा‍थमिक केंद्रात नेले असता त्‍या दरम्‍यान त्‍यांचा दिनांक 05/09/200 रोजी मृत्‍यू झाला.

 

49.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, पोलीस खबर, पोलीस पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यूबाबतचे कारण दाखला/प्रमाणपत्र (शवविच्‍छेदनअहवालाप्रमाणे), विमा पॉलीसीचे कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 4/2/2009 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत , गाव नमुना 6 हक्‍काचे पत्रक, शाळा सोडल्‍याचा दाखला इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

50.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 05/12/2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

51.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 05/09/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.

 

तक्रार क्रमांक 809/2009

 

 

52.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. यशवंत हरिबा फडतरे, वय 40 वर्षे हे शेतकरी कुटूंबातील होते. त्‍यांचे नांवे मु.पो बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा येथे सर्व्‍हे क्र. 14 ही शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 उतारा यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

53.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. यशवंत हरिबा फडतरे हे दिनांक 17/02/2006 रोजी भाजीमार्केट मधून त्‍यांची मोटर सायकल बजाज कावासाकी एमएच-11-1404 ने घरी येत असतांना उस वाहतून करणारा ट्रॅक्‍टर क्रमांक एमएच-16/एफ 2978 व ट्रॉली क्रमांक एमएच-11/8283 ट्रॉली व क्रमांक एमएच-11/8308 येणा-या ट्रॅक्‍टरने तक्रारदारांच्‍या मोटार सायकलला जोरात धडक दिल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या डोक्‍याला गंभीर मार लागून त्‍यांचा दिनांक 17/02/2006 रोजी जागीच मृत्‍यू झाला.

 

54.   तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, खबरी जबाब, पोलीस पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यूबाबतचे कारण शवविच्‍छेदन अहवालाप्रमाणे दाखला/प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचे आवश्‍यक कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 05/12/2008 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत, आर.टी.ओ. यांचे वया संबंधातील प्रमाणपत्र इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

55.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 05/12/2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

56.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 17/02/2006 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.

 

तक्रार क्रमांक 829/2009

 

 

57.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. संतोष रघुनाथ शिंदे, वय 30 वर्षे हे शेतकरी कुटूंबातील होते. त्‍यांचे नांवे मु.पो गुजाळवाडी, ता. जुन्‍नर, जि. पुणे येथे सर्व्‍हे क्र. 1242 खाते क्रमांक 487 ही शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 उतारा यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

58.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. संतोष रघुनाथ शिंदे हे दिनांक 25/10/2005 रोजी रात्री 8-00 वाजता ऑटो/रिक्‍शामधुन घरी येत असतांना पैठण ते औरंगाबद हमरस्‍त्‍यावर जायकवाडी (उत्‍तर) फाटयाजवळ, मयुरगॅरेजसमोर रोडवर कातपूर शिवारात ऑटो/रिक्‍शा क्रमांक एमएच-20-टी-368 या रिक्षेला वाळूने भरुन येणा-या ट्रक क्रमांक एमएच-09-ए-9845 ने जोरात धडक‍ दिली. त्‍या ऑटोमध्‍ये तक्रारदार हिच्‍या पतीला गंभीर मार लागून त्‍यांचा जागीच दिनांक 25/10/2005 रोजी मृत्‍यू झाला.

 

59.  तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, घटनास्‍थळ पंचनामा, पोलीस एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यूबाबतच्या कारणाबाबत शवविच्‍छेदनअहवाल/दाखला/प्रमाणपत्र यात नमूद आहे, विमा पॉलीसीचे आवश्‍यक कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 5/12/2008 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

60.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 05/12/2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

61.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 25/10/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे

 

तक्रार क्रमांक 830/2009

 

 

62.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. बाळु दामु गदरे, वय 55 वर्षे हे शेतकरी कुटूंबातील होते. त्‍यांचे नांवे मु.पो खळद, ता. पुरंदर, जि. पुणे येथे सर्व्‍हे क्र. 1356 खाते क्रमांक 20 ही शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 उतारा यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

63.   तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. बाळु दामु गदरे हे दिनांक 21/02/2006 रोजी सायंकाळी 7-00 वाजता गव्‍हाच्‍या पिकाला पाणी देण्‍यासाठी गेला असतांना, व पाणी दिल्‍यानंतर घरी परत येत असतांना रस्‍त्‍यात निसरडया वाटेवरुन येत असतांना लगतच्‍या विहीरीत निसरडया जागेवरुन पाय घसरुन विहीरीत पडले. रात्रीची वेळ असल्‍याने व विहीरीच्‍या चारही कडा ढासळल्‍या असल्‍याने व रस्‍त्‍यावरील पाण्‍यामुळे जागा निसरी झाल्यामुळे ते विहीरीत पडल्यामुळे पाण्‍यात बुडून त्‍यांचा दिनांक 21/02/2006 रोजी मृत्‍यू झाला.

 

64.  तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, पोलीस जबाब, घटनास्‍थळ पंचनामा, पोलीस एफ.आय.आर., शवविच्‍छेदन अहवाल, मरणोत्‍तर पंचनामा, गाव न. न. 6 उतारा, मृत्‍यूबाबतचे शवविच्‍छेदन अहवालात कारण नमूद/दाखला/प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचे आवश्‍यक कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 5/12/2008 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत व तक्रारदारांचा पोलसांकडे समरी अहवालाचा अर्ज इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

65.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 05/12/2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

66.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 21/02/2006 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.

तक्रार क्रमांक 831/2009

 

 

67.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. दिलीप विक्रम बडे, वय 30 वर्षे हे शेतकरी कुटूंबातील होते. त्‍यांचे नांवे मु.पो भिलवडे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथे सर्व्‍हे क्र. 392 व 402 खाते क्रमांक 139 ही शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 उतारा व फेरफार उतारा यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

68.   तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. दिलीप विक्रम बडे हे दिनांक 18/10/2005 रोजी सकाळी 10-00 वाजता बाजरीची कापणी करण्‍यासाठी गेले असतांना, त्‍यांना तहान लागली म्‍हणून पाय-यांच्‍या विहीरीत पायरीवरुन उतरत असतांना सदर विहीरीच्‍या पाय-या या ओल्‍या व निसरडया असल्‍यामुळे त्‍यांचा पाय घसरुन ते विहीरीत पडल्यामुळे पाण्‍यात बुडून त्‍यांचा मृत्‍यू झाला, व सदर मयत हे दिनांक 20/10/2005 रोजी तपासाअंती सकाळी 9-00 वाजता सापडले.

 

69.  तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, फेरफार उतारा, पोलीस खबर, शवविच्‍छेदन अहवाल, मरणोत्‍तर पंचनामा, घटनास्‍थळ पंचनामा मृत्‍यूबाबतच्या कारणाबाबत शवविच्‍छेदन अहवाल/दाखला/प्रमाणपत्राप्रमाणे नमूद, विमा पॉलीसीचे आवश्‍यक कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 5/12/2008 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत व शाळा सोडल्‍याचा दाखला इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

70.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 05/12/2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

71.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 20/10/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे

 

तक्रार क्रमांक 832/2009

 

 

72.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. अंकुश रामचंद्र भांडवले, वय 38 वर्षे हे शेतकरी कुटूंबातील होते. त्‍यांचे नांवे मु.पो मसुर, ता. कराड, जि. सातारा येथे सर्व्‍हे क्र. 1335 खाते क्रमांक 582, व सर्व्‍हे क्र. 1437 खाते क्रमांक 349, ही शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 उतारा व फेरफार उतारा यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

73.   तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. अंकुश रामचंद्र भांडवले हे दिनांक 17/03/2006 रोजी स्‍वतःच्‍या हिरोहोंडा मोटार सायकल क्रमांक एमएच-11-क्‍यू-4328 वरुन घरी येत असतांना मसुर ते उंब्रज रोडवर मसुरकडून उंब्रजकडे जात असतांना समोरुन येणारा टेम्‍पो क्रमांक एमएच-11-टी-4068 या टेम्‍पोने कवठे फाटा ये‍थे सदर मोटर सायकलला जोराची धडक दिल्यामुळे त्‍यांच्‍या डोक्‍याला जबर मार लागून त्‍यात त्‍यांचा जागीच दिनांक 17/03/2006 रोजी मृत्‍यू झाला.

 

74.  तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, 8अ चा खातेउतारा, खबरी जबाब, फेरफार उतारा, गाव न.न. 6 उतारा, पोलीस खबर, शवविच्‍छेदन अहवाल, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍यूबाबतचे कारण शवविच्‍छेदन अहवालाप्रमाणे/ दाखला/प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचे आवश्‍यक कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 5/12/2008 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची प्रत, वयासंबंधात शाळेचे शिफारसपत्र, अंतिम अहवाल व चार्जशिट इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

75.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 05/12/2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

76.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 17/03/2006 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे

 

 

तक्रार क्रमांक 833/2009

 

 

77.   तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. आनंदराव भाऊ देशमुख, वय 63 वर्षे हे शेतकरी कुटूंबातील होते. त्‍यांचे नांवे मु.पो वारुंजी, ता. कराड, जि. सातारा येथे सर्व्‍हे क्र. 295 खाते क्रमांक 139 ही शेतजमीन असून त्‍याबाबत 7/12 उतारा व फेरफार उतारा यामध्‍ये त्‍यांच्‍या नांवाची नोंद आहे.

 

78.   तक्रारदार हिच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हिचे पती श्री. आनंदराव भाऊ देशमुख हे दिनांक 11/09/2005 रोजी सकाळी 11-30 वाजता त्‍यांच्‍या नातेवाईकाचा अंत्‍यविधी आटोपून ट्रॅक्‍टर क्रमांक एमएच-11-ई-2690 ट्रॉली क्रमांक एमएच-11/एल-969 व 970 हया ट्रॉलीत बसून घरी येत असतांना रस्‍ता दलदल, व चिखलाचा निसरडा असल्‍यामुळे सकाळी 11-30 वाजता सदर ट्रॅक्‍टर जनाईची मळी  शिवारातून वळण घेत असतांना त्‍यात बसलेले आनंदराव भाऊ देशमुख हे खाली पडून ट्रॉलीच्‍या चाकाखाली सापडून जागीच त्‍यांचा दिनांक 11/09/2005 रोजी मृत्‍यू झाला.

 

79.  तक्रार अर्जासोबत 7/12 उतारा, फेरफार उतारा, खबरी जबाब पोलीस पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल (त्‍यात वय नमूद आहे), इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, खातेउतारा, निवडणूक ओळखपत्र, मृत्‍यूबाबतचे कारण शवविच्‍छेदनात नमूद/ दाखला/प्रमाणपत्र, विमा पॉलीसीचे आवश्‍यक कागदपत्रे व वकीलांमार्फत दिनांक 5/12/2008 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्राची व मृत्‍यू दाखला (त्‍यात वय नमूद आहे) इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती अभिलेखात दाखल केलल्‍या आहेत.

 

80.   तक्रारदार व तिचे कुटूंब संपूर्णपणे त्‍यांच्‍यावर अवलंबून असल्‍याने तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूने त्‍यांच्‍या कुंटुंबावर आर्थिक संकट कोसळले. तक्रारदार हिने लगेचच मुदतीत शेतकरी व्‍यक्तिगत विमा योजनेखाली मिळणा-या आर्थिक लाभासाठी तलाठी यांचेतर्फे तहसिलदार कचेरीत, सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही किंवा त्‍याबाबत काहीही कळविले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी दिनांक 05/12/2008 रोजी वकीलातर्फे सामनेवाले यांना पत्र पाठविले परंतु सामनेवाले यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

81.    शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत अर्ज दाखल करुन विम्‍याची रक्कम रुपये 1,00,000/- ही 12% व्‍याज दराने तक्रारदार हिच्‍या पतीच्‍या निधनाच्‍या तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 11/09/2005 पासून ते पैसे देईपर्यंत व्‍याजासह द्यावेत, तसेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास सहकार्य केले नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- द्यावेत व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी केली आहे.

 

82.     सर्व तक्रारदारांनी तक्रार अर्जांसोबत आवश्‍यक ती अनुषंगीक कागदपत्रे दाखल केलेले आहेत, कि जे महाराष्‍ट्र शासन शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात‍ विमा योजना निर्णय/परिपत्रक दिनांक 05/01/2005 व नविन पत्रक दिनांक 07/07/2006 नुसार सादर केलेले आहे असे नमूद केले आहे.

 

83.  सर्व तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारींमध्‍ये, तसेच लेखी युक्‍तीवादामध्‍ये नमूद केले आहे की, त्‍यांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात‍ विमा योजनेखाली घटनेचे कारण घडल्‍यापासून एक आठवडयाच्‍या आत मुदतीत अर्ज व त्‍यासोबतची अनुषंगीक कागदपत्रे गावच्‍या तलाठी यांचेकडे मुदतीत सादर केलेली आहेत.

84. सर्व तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये, तसेच लेखी युक्‍तीवादामध्‍ये असेही निवेदन केले आहे की, शासन निर्णय दिनांक 05/01/2005 चे सहपत्र मधील प्रपत्र-ड प्रमाणे अपघाताचे स्‍वरुप व आवश्‍यक कागदपत्रे प्रमाणे, सर्व कागदपत्रे अर्जासोबत मुदतीत दाखल केलेले आहेत.

 

85.   सर्व तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत असेही नमूद केले आहे की, सामनेवाले यांनी सदर विमा रकमेच्‍या दाव्‍याबाबत काहीही कळविलेले नाही व कोणताच पत्रव्‍यवहार त्‍यांना प्राप्‍त झाला नाही. दिनांक 05/01/2005 व 07/07/2006 च्‍या पत्रकांस आधिन राहून सदर दावा लवकर मंजूर करण्‍याबाबत व आवश्‍यक कार्यवाही करण्‍याबाबत विनंती केली असता, परंतु विमा कंपनीने विम्‍याचे दावे मंजूर केले नाही.

 

86..   सर्व तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत असेही नमूद केले आहे की,   तक्रार अर्जास कारण सततचे आहे. कारण सर्व तक्रारदारांनी विम्‍याचा दावा मंजूर करण्‍याबाबत तक्रारीत विनंती केली आहे. तरीही विम्‍याची रक्‍कम तक्रारदार यांना देण्‍यात आलेली नाही. म्‍हणून सदर बाब ही Continuing cause of action हया सदरात मोडते, व सतत सामनेवाले यांनी Breach of Contract केलेले आहे त्‍यामुळे सर्व तक्रारदारांचे अर्ज मुदतीत आहेत. शिवाय तक्रारीत असेही नमूद केले आहे की, सर्व तक्रारदार हे अशिक्षित, ग‍रीब आहेत.

 

87.   सर्व तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत असेही नमूद केले आहे की,  

According to natural justice this Opposite Party has not given any opportunity to this Complainant or Tahasildar to provides some remaining documents. Therefore, this Opposite party has made mistake to provide service and accepted unfair trade practice म्‍हणून सामनेवाले यांनी विमा कराराचे शासन निर्णय/परिपत्रकांचे (दिनांक 05/01/2005 व 07/07/2006) चे  उल्‍ल्‍ंघन केलेले आहे असे तक्रारदारांचे कथन आहे.

 

88. तक्रारदारांनी सर्व तक्रारीसोबत महाराष्‍ट्र शासन निर्णय एनअेआयएस/1204/प्र.क्र.-166/11अे दिनांक 05/01/2011 दिनांक 31/03/2005 व दिनांक 07/07/2006 परिपत्रके जोडलेली आहेत. 

 

89.   सामनेवाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्‍तर द्यावे अशी नोटीस सामनेवाले यांना पाठविण्‍यात आली. नोटीसीस अनुसरुन सामनेवाले यांनी हजर होऊन प्रत्‍येक तक्रार अर्जात वेगवेगळया कैफियती दाखल केल्‍या आहेत. परंतु प्रत्‍येक कैफियतीमध्‍ये सामनेवाले यांचे एकसारखेच म्‍हणणे आहे.

 

90.   तक्रारदार यांच्‍या वेगवेगळया तक्रारींच्‍या बाबतीत, सामनेवाले हयांनी वेगवेगळया दाखल केलेल्‍या कैफीयतीतील म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हे ग्राहक   नाहीत तसेच तक्रारदारांनी तक्रार अर्ज विलंबाने दाखल केलेला आहे. तसेच तक्रारदारांनी विमा कराराच्‍या अटी व शर्तींचे पालन केले नाही. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार यांनी फेरफार उतारा, 6-सी चा फॉर्म व वयाचा दाखला, एफ.आय.आर.ची प्रत, पोलीस तपासाचे कागदपत्र, ड्रायव्‍हींग लायसन्‍सची प्रत इत्‍यादीचे जरुरीचे आवश्‍यक कागदपत्रे दाखल केले नाहीत. तसेच तक्रारदार हे त्‍यांच्‍या नांवे जमीन जरी असली तरी व्‍यवसायाने शेती काम करीत होते हे दाखविणारे कागदपत्रे दाखल केले नाहीत, त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली.

 

91.   सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)(डी) प्रमाणे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. त्‍यामुळे सदर तक्रार अर्ज चालू शकत नाही. तसेच विमा कराराच्‍या अटी व शर्ती पाळल्‍या नाहीत.

 

92.  सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले यांनी मा. राष्‍ट्रीय आयोगाकडे एकूण 2232 प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्‍यापैकी तक्रारदारांची मागणी ही पण एक त्‍या प्रकरणांचा भाग आहे, व त्‍या प्रकरणा सारखेच आहे. म्‍हणून हया प्रकरणांना Res Judicata Stay of Suit हे तत्‍व लागू होते व सदर सर्व प्रकरणात मंचाने हस्‍तक्षेप न करता ज्‍यावेळेस मा. राष्‍ट़ीय आयोगापुढे सुनावणीसाठी येतील ज्‍यावेळेस सदर प्रकरणे स्‍थगित करावे अशी मागणी केली आहे.  

 

93.   सर्व तक्रार अर्ज, सर्व कैफियती व उभय पक्षकारांनी दाखल केलेले अनुषांगिक कागदपत्रे व पुराव्‍यांचे शपथपत्रे व लेखी युक्‍तीवाद यांची पडताळणी व वाचन केले. तसेच उभय पक्षकारांचा तोंडी युक्‍तीवाद एैकला असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. 

    

 

क्र.

 

 

मुद्दे

 

उत्‍तरे

 

1

 

सामनेवाले यांनी सर्व तक्रार अर्जातील तक्रारदारांच्‍या मागण्‍यां नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केली हे सर्व तक्रारदारांनी सिध्‍द केले आहे काय ?

 

 

होय. 

2

 

सर्व तक्रारदार, तक्रार अर्जातील मागणी मागण्‍यांस पात्र आहेत काय ?

 

 

होय, अंशतः

 

3

 

अंतिम आदेश ?

 

सर्व तक्रारी अंशतः मंजूर करण्‍यात येतात.

 

 

 

                   - कारणमिमांसा -     

 

 

94.   सर्व तक्रारदारांनी तक्रार अर्जास कारण सततचे असल्‍याने तक्रार अर्ज मुदतीत आहे असे नमूद करुन सदर अर्ज महाराष्‍ट्र शासनाच्‍या महसूल विभागाच्‍या योग्‍य त्‍या कर्मचारी/अधिकारी व प्राधिका-यांकडे मुदतीत दाखल करुन पुढील कार्यवाही करण्‍यासाठी विनंती केलेली आहे. म्‍हणून अर्जास विलंब झाला नसल्‍याचे तक्रारदाराने त्‍यांच्‍या लेखी व तोंडी युक्‍तीवादातही स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे.   

 

95.    प्रपत्र ई नुसार घटणा घडल्‍यापासून संबंधित शेतकरी अथवा त्‍यांचे कुटूंबीय क्‍लेमफार्म इतर कागदपत्रांसह एक आठवडयामध्‍ये संबंधित तलाठयाकडे सादर करावयाची आहेत. तशी ती सर्व कार्यवाही तक्रारदारांनी मुदतीत पार पाडल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे व दाखलही केलेले आहेत.

96.  त्‍यानंतर सदर तलाठी हे तक्रारदारांनी एखादया किंवा काही कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्‍यास स्‍वतः शासन निर्णयासोबत विहीत केलेल्‍या सर्व कागदपत्रांची आवश्‍यकतेनुसार पूर्तता करुन प्रस्‍ताव तहसिलदार कचेरीकडे/तहसिलदारांकडे सादर करतील. त्‍यानंतर सदर क्‍लेम फॉर्म व सोबतचे कागदपत्र तहसिलदार, विमा कंपनीस सादर करतील म्‍हणजेच तक्रारदारांचा विमा क्‍लेम, कागदपत्रे हे सर्व दस्‍तऐवज विमा कंपनीकडे पाठविण्‍याची जबाबदारी ही तलाठी व तहसिलदार यांची आहे. तक्रारदारांची नाही म्‍हणजेच तक्रारदारांनी सदर क्‍लेम व इतर अनुषंगिक कागदपत्रे हे मुदतीतच सादर केले आहेत हे त्‍यांच्या तक्रारीत व लेखी युक्‍तीवादात नमूद केले आहे. त्‍यामुळे विलंबमाफीचा अर्ज सादर करण्‍याची आवश्‍यकता नसल्‍याने तो दाखलही केलेला नाही व त्‍याबाबत सामनेवाले यांनी कुठेही स्‍पष्‍टपणे आक्षेप घेतल्‍याचे दिसत नाही. अतएव सामनेवाले यांचे विलंबाबतचे आक्षेप मान्‍य करण्‍यात येत नाहीत, कारण मा. राज्‍य आयोग महाराष्‍ट्र मुंबई हयांचा एकत्रित न्‍यायनिर्णय श्रीमती शांताबाई दत्‍तात्रय पाटील व आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स क.लि. अपिल क्रमांक ए/12/661 ते ए/12/665 अनु. क्रं. 10, 11 व 12 चा उल्‍लेख केलेला आहे, ते खालीलप्रमाणे आहे

“ 10. During the course of arguments Ld.Counsel for the Appellants has placed reliance on ruling of the Hon’ble  National Commission in the case of Lakshmi Bai & Ors. V/s. ICICI Lombard General Insurance Co. Ltd. Reported in  III CPJ 507 (NC), in which it is observed while discussing the insurance claim for protection of a person below poverty line that. “Until payment of sum assured, it remains a case of continuous cause of action. Remedy under Act cannot be barred on the ground that jurisdiction of For a was not invoked within two years from date of death in capacitation.  Case remanded to District For a for reconsideration”.

 

11. Ld.Counsel for the Complainant/Appellant urged that non-settlement of insurance claim without any tangible reason constitutes gross deficiency in service on the part of the Insurance Company.  The Consumer/Complainant, who is a farmer should not suffer due to act of the Opponent Insurance Company.  Therefore, due to abundant precaution delay condonation application is filed which is wrongly dismissed by Ld.District Forum.  To avoid injustice the appeal may be allowed.

 

12.  Observation of the Hon’ble National Commission in case cited, supra, is squarely applicable to the case in hand because there is a continuous cause of action. Sufficient ground are led down by the complainant to condone the delay.  Delay, if any, is here condoned.  The complainants are required to be entertained and dealt with as per law.  As a result the appeals deserve to be allowed.”

 

97.  त्‍यानंतर, तहसिलदार सदर प्रस्तावाची छाननी/तपासणी करुन सदर प्रस्‍ताव आवश्‍यक त्‍या प्रमाणपत्रासह सरळ आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी यांचेकडे पाठवितात.

98.  यावरुन क्‍लेमफॉर्म भरल्‍यानंतर आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड यांचेकडे प्रस्‍ताव/कागदपत्रे मुदतीत पाठविण्‍याची जबाबदारी शेतक-यांची किंवा त्‍यांच्‍या कुटूंबीयांची नसते. त्‍यामुळे तलाठयाच्‍या/तहसिलदाराच्‍या दिरंगाईमुळे/चुकीमुळे शेतक-यास किंवा त्‍यांच्‍या कुटूंबियास जबाबदार धरता येत नाही.

99.  सामनेवाले यांनी प्रत्‍येक कैफीयतीमध्‍ये सदर क्‍लेम हे विमा अटी व शर्तीनुसार नाहीत असे कथन केले आहे परंतु स्‍पष्‍टपणे मुदतीचा मुद्दा कोठेही उपस्थित केलेला नाही. नुसते मोघम विधान केलेले आहे. त्‍यामुळे मंच, सदर मुद्दा फेटाळून लावत आहे. कारण त्‍याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदारांना आक्षेपाच्‍या पुष्‍टयर्थ कोणताही पुरावा मंचास सादर केलेला नाही व त्‍याबाबत काहीही कळविलेले नाही.

 

100. तसेच तक्रारदारांच्‍या लेखी युक्‍तीवादामध्‍ये असे नमूद आहे की, “I say that G.R. dated 7/7/2006 of Govt. commented or dissatisfaction on Opp.Parties policy for granting the Claim” मंच येथे हेही नमूद करीत आहे की, सामनेवाले यांनी शासन निर्णय दिनांक 5/1/2005 व 7/7/2006 यांचे अमंलबजावणी, वाचन व अवलोकन केलेले दिसत नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते व ते पूर्णतः स्‍वयंस्‍प्‍ष्‍ट आहे.

 

101.  तसेच मंच येथे स्‍पष्‍टपणे नमूद करीत आहे की, सदर योजना ही सामाजिक हित लक्षात घेऊन महाराष्‍ट्र शासनाने राबविलेली आहे. सबब, त्‍याबाबतीत तांत्रिक मुद्दा उपस्थित करणे, तांत्रिक मुद्याचा अवलंब करणे व क्‍लेम नाकारणे योग्‍य होणार नाही म्‍हणून लवचिक धोरण स्विकारुन सामनेवाले यांचा विलंबाचा आक्षेप फेटाळण्‍यात येतो. याबाबत शासन निर्णय दिनांक 5/1/2005 व 7/7/2006 मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे व स्‍वयंस्‍पष्‍ट आहे.

102.  तसेच शासन परिपत्रकातील प्रपत्र ब नुसार लाभार्थी पात्रतेच्‍या अटी व त्‍यासाठी   आवश्‍यक कागदपत्रे  हया सदराखाली 1 ते 4 अटी नमूद आहेत. त्‍या सर्व बाबींची तक्रारदारांनी पूर्तता केलेली दिसून येते. काही प्रकरणामध्‍ये वयाबाबतचा प्रश्‍न सामनेवाले यांनी उपस्थित केला आहे परंतु  सर्वसाधारणपणे वयाच्‍या निश्चितीबाबत प्रपत्र    अट क्रमांक 4 नुसार वय निश्चिती होत नसेल तर सर्वसाधारण परिस्थितीमध्‍ये व प्रथप्रमाणे (General practice in vogue) पर्यायी  कागदपत्रे स्विकारण्‍यात येते जसे वय हे Post Mortem Report, Inquest Panchanama, F.I.R. अथवा जसे सर्वसाधारण परिस्थितीमध्‍ये डॉ. हे जिवंत वा मृत व्‍यक्‍तीचे वय हे वैद्यकिय तपासणी/चाचण्‍या/प्रयोगशाळा अहवाल यांचे आधारे वय निश्चित करतात व ते डॉक्‍टरांनी निश्चित केलेले वय मान्य करण्‍यात येते. त्‍यामुळे वयाबाबत सामनेवाले यांनी उपस्थित केलेला आक्षेप फेटाळण्‍यात येतो. 

 

103.   शासन परिपत्रकातील प्रपत्र  मध्‍ये शेतकरी व्‍यक्‍तीगत विमा योजनेखाली पुराव्‍यासाठी सादर करावयाची कागदपत्रे ही फक्त              अनुक्रमांकानुसार अपघाताचे स्‍वरुप त्‍यानुसार दाखल करावयाची           आवश्‍यक कागदपत्रे तक्रारदारांनी फक्त सादर करावयाची आहेत त्‍या व्‍यतिरिक्‍त, म्‍हणजेच अतिरिक्‍त कागदपत्रांची आवश्‍यकता नाही. म्‍हणजेच प्रपत्र  व प्रपत्र  येथे दर्शविलेली कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे अतएव, सदर सर्व प्रकरणामध्‍ये तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

104.    तरीही सामनेवाले यांनी काही प्रकरणांमध्‍ये ड्रायव्‍हींग लायसन्‍स सादर केलेले नाही म्‍हणून आक्षेप नोंदवून मागणी केली आहे. परंतु शासन परिपत्रकात स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की, या शासन निर्णयासोबत विहित केलेली प्रपत्रे/कागदपत्रे वगळता अन्‍य कोणतीही कागदपत्रे शेतक-यांनी/तक्रारदारांनी सादर करण्‍याची आवश्‍यकता नाही किंवा विमा योजना अंतर्गत लाभासाठी विमा कंपनीकडे स्‍वतंत्रपणे अर्ज/कागदपत्रे सादर करण्‍याची आवश्‍यकता नाही. अनवधानामुळे काही कागदपत्रे मिळविण्‍याचे राहिल्‍यास मृत शेतक-यावर अंतिम संस्‍कार झालेमुळे ती मिळू शकत नसल्‍यास पर्यायी कागदपत्रे/चौकशीच्‍या आधारे प्रस्‍तावाचा निर्णय घेण्‍यात यावा यासाठी शासन व विमा कंपनी यांनी संयुक्‍तपणे निर्णय घ्‍यावा अतएव, ड्रायव्‍हींग लायसन्‍सबाबतची सामनेवाले यांची मागणी फेटाळण्‍यात येते. तक्रारदारांनी याबाबत मा. राज्‍य आयोग महाराष्‍ट्र यांनी एका अन्‍य प्रकरणामध्‍ये दिलेल्‍या न्‍यायनिर्णयाचा संदर्भ दिला. First Appeal No. A/10/947 ICICI Lombard General Insurance Co. Vs 1) Rangrao Keshav Patil  2) Vaijanta Rangrao Patil, dated 30/01/2013 त्‍या प्रकरणामध्‍ये  न्‍यायनिर्णयातील अनु.क्रं. 4 मधील पुढील परिच्‍छेदात पुढीलप्रमाणे नमूद केले आहे “ Moreover, possession of license while driving the motor cycle in Group Insurance policy like the one under which claim has arisen does not specify such a condition. Moreover, this Commission has already taken a view that in such Group Insurance Policies which extend cover to large number of insured, license is not at all a necessary condition to settle the insurance claim.”   जो स्‍वयंस्‍पष्‍ट असून हया प्रकरणांना लागू पडतो अतएव सामनेवाले यांचे आक्षेप फेटाळण्‍यात येत आहेत.  

 

105.   शासन परिपत्रकाप्रमाणे काही वाद निर्माण झाल्‍यास अथवा कागदपत्रांची परिपूर्ततेबाबत विमा कंपनीने, कृषि आयुक्‍त अथवा जिल्‍हाधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखालील गठित समिती पुढे तक्रारी संबंधीची माहिती मागितल्‍याचे व निवेदन केल्‍याचे दिसत नाही. त्‍यामुळे सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीमध्‍ये, लेखी युक्‍तीवादामध्‍ये उपस्थित केलेल्‍या तांत्रिक मुद्यांना कोणताही कायदेशीर आधार, पुरावा नाही त्‍यामुळे मंचास सदर दावा मंजूर करण्‍यावाचून पर्याय दिसत नाही. म्‍हणून इतर किरकोळ आक्षेपही फेटाळण्‍यात येत आहे.

106.   जर तक्रार अर्जास कारण हे मागणी नाकारल्‍यापासून गृहती धरले तर सामनेवाले यांनी किंवा तक्रारदारांची मागणी कधी नाकारली याचा कोठेच उल्लेख केलेला नाही किंवा त्‍याबाबत कागदपत्रही सामनेवाले यांनी दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे तक्रार अर्ज दाखल करण्‍याचा कालावधी कधीपासून सुरु होतो हे स्‍पष्‍ट होत नाही. जर तक्रारीस कारण हे घटना घडल्‍यापासून गृहीत धरले तर  प्रत्‍येक तक्रार अर्जामध्‍ये विलंब हा झालेलाच आहे. परंतु विलंब झाल्‍यास प्रस्‍ताव नाकारण्‍यात येईल अशी अट विमा करारामध्‍ये कोठेही नमूद केलेली नाही. तसेच तक्रारदारांनी प्रस्‍ताव दाखल केल्‍यानंतर तहसिल कार्यालयातून प्रस्‍ताव पुढे पाठविण्‍यास उशिर झाला तर यात तक्रारदारांची कोठेही चूक दिसून येत नाही. शेतकरी वर्ग हा अशिक्षित वर्ग आहे. त्‍यामुळे त्‍यांना योजनेबद्दलची संपूर्ण माहिती असणे किंवा त्‍यातील कालावधीबद्दल माहिती असणे किंवा त्‍याचे महत्‍व माहिती असणे हे त्‍यांचेकडून अपेक्षित नाही, तसेच जरी त्‍यांना मुदतीबद्दल कल्‍पना होती असे गृहीत धरले तरीही आवश्‍यक ती कागदपत्रे मुदतीत गोळा करणे हे त्‍यांच्‍या दृष्‍टीने जिकरीचे काम आहे. तसेच घरातील कर्ता माणूस गेलेला असतांना असाहय परिस्थितीत प्रस्‍ताव अर्ज मुदतीत दाखल होणे/करणे शक्‍य होईलच असेही नाही. त्‍यामुळे, वरील परिस्थितीत जर विलंब झालेला असेल तर तो जरी तक्रारदारांनी विलंबाचा अर्ज दाखल केलेला नसल्‍यास, परंतु तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे प्रस्‍ताव मुदतीत तलाठयातर्फे तहसिलदार यांना मुदतीत दाखल केला आहे, म्‍हणून विलंब असल्‍यास त्‍यास, ही एक शासनाची लोकोपयोगी पुरोगामी योजना आहे. म्‍हणून विलंब असल्यास त्‍यास मान्‍यता देण्‍याखेरीज मंचास पर्याय नाही, म्‍हणून विलंब असल्‍यास मान्‍य करण्‍यात येतो. अतएव सामनेवाले यांच्‍या अटी व शर्ती बाबतचा मोघम आक्षेप फेटाळण्‍यात येतो.  

 

107.  सामनेवाले यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रार हे ग्राहक नाहीत.

108.       राज्‍यामध्‍ये सुमारे एक कोटी शेतकरी आहेत. शेती व्‍यवसाय करताना होणारे विविध अपघात, तसेच विज पडणे, पूर, सर्पदंश, वाहन अपघात, कोणत्‍याही नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अथवा अन्‍य कोणतेही अपघात यामुळे ब-याच शेतक-यांना मृत्‍यु ओढवतो, किंवा काहींना अपंगत्‍व येते. घरातील कर्त्‍या व्‍यक्‍तीस झालेल्‍या सदर अपघातामुळे कुंटूंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अडचणीची परि‍स्थिती निर्माण होऊ शकते. अशा अपघातग्रस्‍त शेतक-यांस/त्‍यांच्‍या कुंटूंबास लाभ देण्‍याकरिता कोणतीही स्‍वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविली. या योजनेनुसार शासनाने सर्व नोंदणीकृत शेतकरी यांच्‍या वतीने शासनाने    शेतक-यांच्‍या व्‍यक्तिगत अपघात व अपंगत्‍व यासाठी विमा पॉलीसी उतरविली. या योजनेअंतर्गत विमा हप्‍त्‍याची एकत्रित रक्‍कम शेतक-यांच्‍या वतीने शासनाने अगाऊ अदा केली आहे, त्‍यामुळे शेतक-यांने किंवा अन्‍य कोणत्‍याही संस्‍थेने त्‍यांच्‍या वतीने या योजनेअंतर्गत स्‍वतंत्ररित्‍या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम भरण्‍याची गरज नाही. 

 

109. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)(डी) प्रमाणे ग्राहकाची व्‍याख्‍या नमूद केलेली आहे ती खालीलप्रमाणे,

 

Clause-2(1)(d) :-   “Consumer” means any person who-

 

(i)                buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose ;  or

 

 

(ii)     [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose].

 

    या व्‍याख्‍येनुसार, जरी शेतक-यांनी प्रत्‍यक्ष सामनेवाले यांना कोणताही मोबदला दिलेला नसला तरीही ते शेतकरी व्‍यक्तिगत अपघात योजनेचे लाभार्थी आहेत व त्‍यांच्‍या वतीने शासन विमा हप्‍ता भरते म्‍हणून वरील तक्रार अर्जातील सर्व तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत.

 

110. सामनेवाले यांनी प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारदारांची मागणी जर कागदपत्रे पूर्ण नाही. या बाबींवरुन अमान्य करणे किंवा त्‍यावर निर्णय न घेणे ही सामनेवाले यांच्‍या सेवेतील कमतरता ठरते. महसूल यंत्रणेच्‍या चुकीमुळे किंवा त्‍यांनी केलेल्‍या दिरंगाईमुळे अर्जदाराची मागणी नाकारणे योग्‍य नाही. अर्जदाराच्‍या प्रस्‍तावावर निर्णय न घेतल्‍याने शासनाने काढलेल्‍या शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेचे उद्दिष्‍ट साध्‍य होणार नाही. या योजनेचे मुख्‍य उद्दिष्‍ट म्‍हणजे आर्थिक संकटात सापडलेल्‍या गरिब शेतक-यांना मदत करणे हे आहे. परंतु त्‍यांच्‍या प्रस्‍तावावर किरकोळ तांत्रिक कारणावरुन निर्णय न घेणे किंवा ती नाकारली तर शासनाकडून गरी‍ब शेतक-यांना या योजनेद्वारे मदत करण्‍याचा हेतू साध्‍य होणार नाही. हयाबाबत शासन निर्णय दिनांक 5/1/2005 व दिनांक 7/7/2006 हे हया बाबतीत संपूर्णतः स्‍वयंस्‍पष्‍ट आहेत. म्हणून अपूर्ण कागदपत्रांच्‍या बाबतचा सामनेवाले यांचा आक्षेप फेटाळण्‍यात येत आहे.

 

111.  सामनेवाले यांनी लेखी युक्‍तीवादात असे म्‍हटले आहे की, राष्‍ट्रीय आयोगापुढे शासनाने सामनेवाले यांचे विरुध्‍द एकूण 2232 मागणी नाकारण्‍यासंबंधी तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत. त्‍या 2232 मागणी अर्जांपैकी हा एक मागणी अर्ज आहे. म्‍हणून या तक्रारीला “Res Judicata” ची बाधा येते. म्‍हणून सदर मंचास सदर तक्रारीत हस्‍तक्षेप करण्‍याचा अधिकार नाही. सामनेवाले यांच्‍या या म्‍हणण्‍यास मंच सहमत नाही. कारण सामनेवाले यांनी त्‍याबाबतीत काही लेखी पुरावे दाखल केलेले नाही. तसेच पुढे असेही कथन केले आहे की,  “ Since the principal of stay suit applies accordingly”.  सामनेवाले यांचे या म्‍हणण्‍यास मंच सहमत नाही. कारण सामनेवाले यांनी त्‍याबाबतीत काहीही लेखी पुरावे दाखल केले नाहीत.

 

112.  शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेची प्रत तक्रारदारांनी अभिलेखात दाखल केलेली आहे. त्‍यामध्‍ये प्रपत्र मध्‍ये महसूल यंत्रणेमध्‍ये करावयाची कार्यवाही दिली आहे. आहे. त्‍या खालील प्रमाणेः-

(1)   अपघाती घटना घडल्‍यानंतर संबधीत शेतकरी

अथवा त्‍यांचे कुटुंबियाचा क्‍लेमफॉर्म व इतर कागदपत्रे एक आठवडयाचे आत संबधीत तलाठयास सादर करतील.

(2)   पुढील एक आठवडयामध्‍ये, सदर तलाठी शेतक-

याने एखादे अथवा काही कागदपत्राची पूर्तता केलेली नसल्‍यास स्‍वतः शासन, निर्णयासोबत विहीत केलेल्‍या सर्व कागदपत्रांची आवश्‍यक त्‍या 7/12, 8 नुसार तो खातेदार असल्‍याच्‍या प्रमाणपत्रासह विम्‍या दाव्‍याचा प्रस्‍ताव तहसिलदारास सादर करतील.

                 (3)   प्राप्‍त प्रस्‍तावाची तपासणी करून सदर प्रस्‍ताव

तहसिलदार यांच्‍या प्रमाणपत्रासह सरळ आय.सी.आय.सी.आय जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमीटेड यांचेकडे एक आठवडयाचे आत पाठवतील व त्‍याची एक प्रत जिल्‍हयाधिका-यांना सादर करतील.

               (4)   संबधीत शेतक-याचे अथवा कुटुंबियाचे बँकेत खाते

नसल्‍यास नवीन खाते शक्‍यतो जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या नजिकच्‍या शाखेत उघडून त्‍याचा तपशिल आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीस कळविण्‍याची जबाबदारी संबंधित तहसीलदाराची राहील.

 

113.   यावरून प्रपत्र -2 नुसार सर्व आवश्‍यक कागदपत्रं पाठविण्‍याची जबाबदारी महसुल यंत्रणेची आहे. एकदा क्‍लेमफॉर्म भरून दिल्‍यानंतर पुढील सर्व कार्यवाही करण्‍याची जबाबदारी महसुल यंत्रणेची आहे. त्‍यानतंर प्रपत्र नुसार प्रस्‍ताव तहसिलदाराकडुन प्राप्‍त झाल्‍यानंतर विमा कंपनीने एक महिन्‍याचे आत नुकसान भरपाईचा धनादेश संबधीत कुंटुंबीयाचा, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक अथवा राष्‍ट्रीयकृत शाखा व्‍यवस्‍थपनाकडे जमा करावयाचा असते व त्‍यानंतर संबधीत शाखा व्‍यवस्‍थापकांनी शेतक-यांच्‍या कुटुंबियाच्‍या खात्‍यामध्‍ये जमा करावयाची अस‍ते.

 

114.  याप्रमाणे सामनेवाले यांनी प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर  तक्रारदारांची मागणी जर कागदपत्रे पुर्ण नाही, या बाबींवरून तक्रारदाराची मागणी अमान्‍य करणे किंवा त्‍यावर निर्णय न घेणे हे सामनेवाले यांचे सेवेतील कमतरता ठरते. महसुल यंत्रणेच्‍या चुकीबद्दल किंवा त्‍यांनी केलेल्‍या दिरंगाईबद्दल अर्जदारांचे मागणी नाकारणे योग्‍य नाही. अर्जदारांच्‍या प्रस्‍तावावर निर्णय न घेतल्‍याने शासनाने काढलेल्‍या शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेचे उदिष्‍ट साध्‍य होणार नाही. या योजनेचे मुख्‍य  उदिष्‍टे म्‍हणजे आर्थिक संकटात सापडलेल्‍या गरीब शेतक-यांना मदत करणे हे आहे. परंतु त्‍यांच्‍या प्रस्‍तावावर किरकोळ कारणावरून निर्णय न घेणे किंवा ती नाकारली तर शासनाकडून गरीब शेतक-यांना या योजनेद्वारे मदत करण्‍याचा हेतू साध्‍य होणार नाही. अतएव कागदपत्रांची कमतरता हया सबबीखाली तक्रारदारांचा दावा नाकारणे हे योग्‍य नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून त्‍यांचा हाही आक्षेप फेटाळण्‍यात येत आहे.

 

115.  यावरुन सामनेवाले हे तक्रार क्रमांक 798/2009, 799/2009, 800/2009, 801/2009, 802/2009, 803/2009, 804/2009, 806/2009, 807/2009, 808/2009, 809/2009, 829/2009, 830/2009, 831/2009, 832/2009 व 833/2009 या सर्व तक्रार अर्जातील प्रत्‍येक तक्रारदारांना शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली मिळणारी नुकसानभरपाई प्रत्‍येकी रुपये 1,00,000/- सामनेवाले हे देण्‍यास जबाबदार आहेत. सामनेवाले यांना प्रस्‍ताव कधी प्राप्‍त झाला किंवा सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी लेखी पत्र पाठवून कधी नाकारली हे तक्रार अर्जात किंवा कैफीयतीमध्‍ये नमूद केलेले नसल्‍याकारणाने त्‍यांची तारीख स्‍पष्‍ट होत नाही म्‍हणून वरील रकमेवर अर्ज दाखल दिनांकापासून ते पैर्स देईपर्यंत 12 टक्‍के व्‍याज दराने व्‍याज देण्‍यास सामनेवाले जबाबदार राहतील उपरोक्‍त तक्रारी अ.क्रं. 1 ते 16 हयातील तक्रार क्रं. 1 ते 11 हया पुढील तारखांना दाखल झालेल्‍या आहेत म्‍हणजेच दिनांक 31/10/2009 रोजी झालेल्‍या आहेत तर तक्रार अनु क्रमांक 12 ते 16  या दिनांक 05/11/2009 रोजी दाखल झाल्या आहेत, ही नुकसानभरपाई तक्रारदारांच्‍या एकत्रित कुटूंबियांसाठी आहे त्‍यामुळे यानंतर तक्रारदारांच्‍या कुटूंबियांतील इतर वारसांनी पुन्‍हा या योजनेखाली तक्रार अर्ज दाखल करु नये.

 

116.   तक्रारदार यांच्‍या वकिांनी तोंडी युक्‍तीवादा दरम्‍यान मंचाच्‍या निदर्शनास आणले की, तक्रारदारांनी वारंवार सामनेवाले यांच्‍या मुंबई येथील कार्यालयास प्रत्‍यक्ष जाऊंन संबंधित अधिका-यांच्‍या भेटी घेऊन व फोन करुन दावा मंजूर करणेची विनंती केली. जी. आर. 5 जानेवारी, 2005 प्रमाणे सामनेवाले मा. कृषि आयुक्‍त हयाचेबरोबर तक्रारदार व विमा कंपनीच्‍या अधिका-यांची बैठक घेण्‍याबाबत विनंती केली व संबंधीत सामनेवाले यांच्‍या अधिका-यांनी होकारही दिला परंतु दावे मंजूर केले नाहीत म्‍हणजेच सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास तक्रारदार, तहसिलदार, शेती आयुक्‍त यांच्‍या बैठका बो‍लविल्‍या नाहीत व सहकार्यही केले नाही. तसेच शासन परिपत्रक दिनांक 05/01/2005 अ.क्रं. 11, 12, 13 व 14, तसेच परिपत्रक दिनांक 7/7/2006 व 5/1/2005 अनु. क्रं. 7, 11, 13 व 17 प्रमाणे सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही, सहकार्य दावा मंजूर करण्‍यासाठी केले नाही. म्‍हणून सामनेवाले यांनी विम्‍याची रक्‍कम मंजूर करण्‍यास हया ना त्‍या कारणाने टाळाटाळ केलेली दिसते व सहकार्यही केलेले दिसून येत नाही म्‍हणून दंडात्‍मक रक्‍कम रुपये 20,000/- व रुपये 5,000/- तक्रारीचा खर्च देण्‍यास जबाबदार राहतील असे तोंडी निवेदन केले आहे.  

    

118. वरील विवेचनावरून पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.

 

 

 

 

आदेश

 

1    तक्रार क्रमांक 798/2009, 799/2009, 800/2009, 801/2009, 802/2009, 803/2009, 804/2009, 806/2009, 807/2009, 808/2009, 809/2009, 829/2009, 830/2009, 831/2009, 832/2009 व 833/2009 या अंशतः मंजूर करण्‍यात येतात.

 

2    सामनेवाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील  सर्व तक्रारदारांची मागणी नाकारुन सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केली असे जाहीर करण्‍यात येते. 

 

4    सामनेवाले यांनी तक्रार क्रमांक 798/2009, 799/2009, 800/2009, 801/2009, 802/2009, 803/2009, 804/2009, 806/2009, 807/2009, 808/2009, 809/2009, 829/2009, 830/2009, 831/2009, 832/2009 व 833/2009 आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांना प्रत्‍येकी रक्‍कम रुपये 1,00,000/- तक्रार अर्ज दाखल दिनांक म्‍हणजे उपरोक्‍त तक्रारी अ.क्रं. 1 ते 16 पैकी तक्रार अनु. क्रं. 1 ते 11 हयातील तक्रारदारांना दिनांक 31/10/2009 रोजीपासून व अनु.क्रं. 12 ते 16 मधील तक्रारदारांना दिनांक 05/11/2009 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत 12 टक्‍के व्‍याजदराने उपरोक्‍त सर्व तक्रारदारांना व्‍याजासह द्यावेत.

 

5.   सामनेवाले यांनी आदेशामधील कलम-1 मधील सर्व तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 5,000/- निकाल जाहिर झाल्‍यापासून दोन महिन्‍याच्‍या आत अदा करावेत असा आदेश देण्‍यात येतो.

 

     ठिकाण मुंबई.

दिनांक 29/01/2014

 

 
 
[HON'ABLE MR. JUSTICE Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.