Maharashtra

Kolhapur

CC/14/184

M/s. Yash Metal Pvt.Ltd., through Authorised Officer Shri Kallappa Annappa Chougule - Complainant(s)

Versus

Br. Manager, Bank of Maharashtra - Opp.Party(s)

S.S.Kambale

31 Mar 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/184
 
1. M/s. Yash Metal Pvt.Ltd., through Authorised Officer Shri Kallappa Annappa Chougule
Plot 35/36 MIDC Shiroli, Tal.Hatkanangale
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Br. Manager, Bank of Maharashtra
Laxmipuri Branch, Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:S.S.Kambale, Advocate
For the Opp. Party:
Adv. Naik,Adv.Chavan
 
ORDER

नि का ल प त्र:-   (व्‍दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्‍यक्ष) (दि. 31-03-2016)           

1)   वि. प. बँक ऑफ महाराष्‍ट्र यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.  

2)   तक्रारदार ही कंपनी कायदा, 1956 अन्‍वये नोंदणीकृत खाजगी कंपनी असून तिचे कार्यालय भुखंड क्र. 35/36 एमआयडीसी शिरोजी, ता. हातकणंगले, जि. कोल्‍हापूर येथे आहे. वि.प. ही राष्‍ट्रीयकृत बँक असून लक्ष्‍मीपुरी कोल्‍हापूर येथे शाखा आहे.             

3)      तक्रारदार यांचे शिरोली  एमआयडीसी  मधील  नवीन कारखाना इमारत बांधकाम कंत्राटदार मे. अतुल पवार इंजिनिअर्स व कॉंन्‍ट्रक्‍टर्स व  तक्रारदार यांचे सामुहिक (joint) नावावर एक वर्ष मुदतीने वि.प.  यांचे लक्ष्‍मीपुरी शाखेत रक्‍कम रु. 12,50,000/- ची मुदत ठेव दि. 2-03-2012 रोजी ठेवली होती. सदर ठेव पावतीचा नं. AN 2010-939603 असून ठेवीचे खाते नं. 60092886480  व ठेव रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9.30 % व्‍याज होते.  दि. 2-03-2013 रोजी व्‍याजासहीत होणारी रक्‍कम रु. 13,70,367/- देणेचे वि.प. नी कबूल केले.                                   

4)    सदरची ठेव प्रथमत: मे. अतुल पवार इंजिनियर्स व कौंन्‍ट्रक्‍टर्स यांचे एकटयाचे नावे चुकी ठेवली होती परंतु तक्रारदारांचे लक्षात आलेनंतर सदरची ठेव मे. अतुल पवार इंजिनियर्स व कौंन्‍ट्रक्‍टर्स यांचे विनंतीनुसार तक्रारदार व मे. अतुल पवार इंजिनियर्स व कौंन्‍ट्रक्‍टर्स यांचे सामुहीक नावावर वि.प. यांनी करुन दिली.  मुळ ठेव पावतीमध्‍ये वि.प.  यांचे अधिकृत अधिकारी श्री. जयंत नारायण वाघ यांनी तक्रारदाराचे नाव नं. 2 म्‍हणून हाताने घालुन दिले.   वि.प. यांचे अधिकारी  याने पावतीवर देय रक्‍कम नं. 1. यांना देण्‍याबाबत मजकूर पांढरी शाई लावून खोडला व स्‍वत:ची स्‍वाक्षरी सदर ठेव पावतीमध्‍ये ज्‍या ठिकाणी बदल दुरुस्‍त्‍या केल्‍या आहेत व मुळ पावती तक्रारदारास परत दिली.  सदरची ठेव पावती तक्रारदार व मे. अतुल पवार इंजिनियर्स व कौंन्‍ट्रक्‍टर्स यांचे सामुहीक नावावर ठेवली ती तक्रारदाराचे ताब्‍यात आहे.                               

5)    तक्रारदाराची सदरची ठेव दि. 2-03-2013 रोजी नुतनीकरण करणेसाठी पत्र देऊन विनंती केली. व मुळ ठेव पावतीही हजर केली.  त्‍यांनतर तक्रारदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करुनही वि.प. यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्‍यामुळे तक्रारदारांना जानेवारी 2014 चा खातेउतारा घेऊन पाहिला असता त्‍यामध्‍ये सामुहीक ठेवीची देय रक्‍कम वि.प. यांनी बेकायदेशीररित्‍या मे. अतुल पवार इंजिनियर्स व कौंन्‍ट्रक्‍टर्स यांना दि. 2-03-2013 रोजी दिल्‍याचे समजले.  मुळ ठेव पावती तक्रारदाराकडे असताना ठेव पावती दोन्‍ही मालकांनी सही करुन डिसचार्ज करुन वि.प. कडे जमा न करताच ठेव पावती रक्‍कम मे . अतुल पवार इंजिनियर्स व कौंन्‍ट्रक्‍टर्स वि.प. यांनी बेकायदेशीररित्‍या अदा केली.                

6)   तक्रारदारांनी दि. 22-01-2014 रोजी पत्राने वि.प. यांना खुलासा करणेविषयी कळविले. वि.प. यांनी दि. 22-03-2014 रोजी पत्राने उत्‍तर देऊन कळविले की, ठेव पावतीची देय रक्‍कम मे. अतुल पवार इंजिनियर्स व कौंन्‍ट्रक्‍टर्स यांना कायदेशीर बाबींची पुर्तता करुन दिली असल्‍याचे सांगितले.  याउलट वि.प. यांनी तक्रारदारांना कळविले की, सदरची ठेव पावती एकटयाचे नावे होती.  सदरची ठेव तक्रारदार  व  कंत्राटदार यांचे सामुहिक नावे असताना तक्रारदारांचे लेखी संमतीशिवाय व मुळ ठेव पावती तक्रारदारांकडे असताना वि.प. यांनी मे. अतुल पवार इंजिनियर्स व कौंन्‍ट्रक्‍टर्स यांना ठेव व्‍याजासह रक्‍कम संगनमताने बेकायदेशीररित्‍या दिली.  वि.प. यांनी रिझर्व्‍ह बँकेचे सामुहिक ठेव रक्‍कमेचे वितरण करण्‍याचे घालून दिलेल्‍या नियमांचा भंग केला आहे.  वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे.      

7)   तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 11-04-2014 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून दिली.   सदरच्‍या नोटीसीस वि.प. यांनी खोटे उत्‍तर दिले.

8)    तक्रारदारांनी परि. 11 मध्‍ये नमूद केले की,  सदर ठेव पावती मुद्दल रक्‍कम व होणा-या व्‍याजासह नुतनीकरण करण्‍याचा आदेश व वि.प. यांना होऊन सदर  रक्‍कम तक्रारदार व मे. अतुल पवार इंजिनिअर्स व कॉन्‍ट्रक्‍टर्स यांचे सामुही नावे ठेवण्‍यात यावी. व तक्रारदारास मानसिक त्रासापोटी त्‍याची नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु. 25,000/- वि.प. कडून देणेत यावी अशी विनंती तक्रार अर्जात केली आहे.

9)     तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत तक्रार अर्ज चालविणेचा अधिकाराचा ठराव, ठेव पावती, तक्रारदारांनी दि. 2-03-2013 व 5-03-2013 रोजी दिलेल्‍या पत्राच्‍या प्रती, मुदत ठेवीचा खतो उतारा, व तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेल्‍या पत्राच्‍या प्रती, वि.प.यांचे उत्‍तर, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, वि.प. यांचे नोटीसीस पाठविलेले उत्‍तर इत्‍यादी कागदपत्रे तसेच तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे.     

10)   वि.प. यांनी तक्रारीस म्‍हणणे दाखल करुन तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज चुकीचा, लबाडीचा असून कबुल नाही.  तक्रारदार कंपनीचे वि.प. बँकेमध्‍ये कोणतेही खाते नसून ते ग्राहक नाहीत.   दि. 2-03-2012 रोजी वि.प. बँकेकडे मे. अतुल पवार इंजिनिअर्स कॉन्‍ट्रक्‍टर्स यांनी रक्‍कम रु. 12,50,000/- ठेव  क्र. 60092886480 अन्‍वये ठेवली असून व्‍याज दर 9.30 टक्‍के 1 वर्ष मुदतीनंतर रु. 13,70,367/- रक्‍कम देणेचे मान्‍य केले होते.          

11)   वि.प. यांनी परि. 4 मध्‍ये म्‍हटले की,  सदरच्‍या ठेव पावतीवर मे. अतुल पवार इंजिनिअर्स कॉन्‍ट्रक्‍टर्स यांचे विनंतीनुसार तक्रारदाराचे नाव घातले गेले Payable to या शब्‍दानंतर to No.1  हे लिहून संबंधित कर्मचारी याने स्‍वाक्षरी करुन ठेव पावती परत दिली.

12)    वि.प. परि. 5 मध्‍ये नमूद म्‍हणतात की, मुळ ठेव पावती हरवली आहे, आढळून येत नसलेने डुप्‍लीकेट ठेव पावती मिळावी अशी विनंती मे. अतुल पवार इंजिनिअर्स कॉन्‍ट्रक्‍टर्स यांनी दि. 25-02-2013 रोजी केली.  वि.प. यांनी त्‍यांचेकडून योग्‍य ती कागदपत्रे लिहून घेऊन डुप्‍लीकेट ठेव  पावती दिली.  नियमानुसार ठेवीच्‍या मुदतीनंतर Payable to या शब्‍दानंतर to No.1  मे. अतुल पवार इंजिनिअर्स कॉन्‍ट्रक्‍टर्स ठेव रक्‍कम अदा केली याची माहिती तक्रारदारांना असूनही वि.प. यांना त्रास देणेचे उद्देशाने तक्रार अर्ज दाखल केला आहे.  तक्रारदाराची तक्रार मुदती नाही. तक्रारदार हे ग्राहक नाहीत. तक्रार अर्जास नॉन जॉंईंडर ऑफ  नेसेसरी पार्टीचा तत्‍वाचा बाधा येतो. तक्रार अर्ज फेटाणेत यावा.  तक्रारदाराकडून वि.प. बँकेस नुकसानीदाखल रु. 25,000/- द्यावेत.                        

13)    तक्रारदार लेखी युक्‍तीवाद व रिझर्व्‍ह बॅकेची नियमावली दाखल केली. वि.प. यांनी लेखी युक्‍तीवाद व सरतपासाचे शपथपत्र दाखल केले.   

 14)   तक्रारदाराची तक्रार व सर्व कागदपत्रे यांचे अवलोकन करता, उभय वकिलांचा युक्‍तीवाद यांचा विचार करता, खालील मुद्दे विचारात घेता येतात.

                 मुद्दे                                                                उत्‍तरे                 

  1.   वि.प. यांनी तक्रारदार यांना देण्‍यात

      येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ?                         होय

  2.   काय आदेश ?                                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

 

का र ण मि मां सा

 

15)     तक्रारदार  यांचे मते मे. यश मेटल्‍स प्रा. लि, यांचे शिरोली, एमआयडीसी मधील नवीन कारखाना इमारत बांधकाम कंत्राटदार मे. अतुल पवार इंजिनिअर्स व तक्रारदार यांचे सामुहिक नावांवर बँक ऑफ महाराष्‍ट्र यांचे लक्ष्‍मीपुरी शाखेत रक्‍कम रु. 12,50,000/- ची मुदत ठेव ठेवली होती.  सदर मुदत ठेव पावतीचा नंबर AN 2010- 939603 असा असून ठेवीचे खाते नं. 60092886480 असून मुदत दि. 2-03-2012 ते 2-03-2013 अशी आहे.  सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे. 8 टक्‍के व्‍याज असुन मुदीतनंतर एकूण रक्‍कम रु. 13,70,367/- होते.          ‍   

16)   वि.प. यांनी परि. 3 मध्‍ये म्‍हटले आहे की, मे. अतुल पवार इंजिनिअर्स कॉन्‍ट्रक्‍टर यांनी वरील रक्‍कम ठेवली असल्‍याचे म्‍हटले व परि. 4 मध्‍ये म्‍हटले की,  “मुदत ठेव पावतीवर मे. अतुल पवार यांचे विनंतीनुसार तक्रारदाराचे नाव हाताने घातले गेले आणि Payable to या शब्‍दानंतर to no. 1 हे लिहून संबंधित कर्मचारी यांने स्‍वाक्षरी करुन ठेव पावती परत दिली”.        

17)   वरील संदर्भात तक्रारदार व वि.प. यांचे म्‍हणण्‍यानुसार, सदर रक्‍कमेवरील ठेव पावतीवर अतुल पवार यांच्‍या  विनंतीनुसार अर्जदाराचे नाव जाईंट ठेवीवर नमूद केले. प्रस्‍तुत प्रकरणी  तक्रारदार  व अतुल पवार यांची नावे ठेव पावतीवर असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  वि.प. बँकेने मान्‍यच केले आहे की, तक्रारदार व अतुल पवार यांचे नावे सदर रक्‍कम बँकेत जमा होती.         

18)   कायदयातील तरतुदीनुसार सदर रक्‍कमेवर तक्रारदार व अतुल पवार या दोघांचा समान हक्‍क आहे.  सदर रक्‍कमेसंबंधी कोणताही निर्णय घेताना, दोघांचाही समान विचार केला पाहिजे असे असताना वि.प. बँकेने  केवळ  अतुल  पवार यांचे दि. 25-02-2013 रोजीचे अर्जावरुन त्‍यांना डुप्‍लीकेट ठेव पावती दिली व दि. 2-03-2013 रोजी ठेव पावतीवरील रक्‍कम अतुल पवार यांना दिली हे मान्‍य केले.         

19)    बँक ऑफ महाराष्‍ट्रच्‍या कर्मचा-यांनी अतुल पवार यांचा डुप्‍लीकेट ठेव पावतीचा अर्ज सादर केलेवर त्‍यावर तक्रारदारांचे म्‍हणणे ऐकून घेणे नैसर्गिक न्‍यायतत्‍वाप्रमाणे आवश्‍यक आहे.  तक्रारदार यांचे नाव हे अतुल पवार यांच्‍या विनंतीनुसार नमूद केले होते.  वि.प. यांनी परि. 5 मध्‍ये  स्‍पष्‍ट नमूद केले की, तक्रारदार यांचेकडे  अस्‍सल ठेव पावती आहे.      

20)   वि.प.यांनी आपले लेखी युक्‍तीवादासोबत अतुल पवार यांनी दि. 25-02-2013 रोजी दाखल केलेला अर्ज दाखल केला आहे.  सदर अर्जामध्‍ये अतुल पवार यांनी सत्‍यप्रत गहाळ झाली असल्‍याने दुबार प्रत मिळण्‍याची विनंती केली आहे. अतुल पवार यांनी दि. 2 मार्च, 2013 रोजी वि.प. बँकेला (Indeminty bond for lost deposit) दिला असून त्‍याची प्रत दाखल केली आहे.  वि.प. यांनी duplicate ठेव पावतीची प्रत दाखल  केली आहे.  सदर डुप्‍लीकेट ठेव पावतीवर तक्रारदाराचे नाव दिसून येत नाही. अतुल पवार यांच्‍या विनंतीवरुन व अर्जावरुन वि.प. यांनी सदर रक्‍कम अतुल पवार यांना दिल्‍याचे दिसून येते.                

21)  वि. प. यांनी आपला लेखी युक्‍तीवाद सादर करुन परि. 9 मध्‍ये म्‍हटले आहे की, तक्रारदाराने कुटील हेतुने अस्‍सल ठेव पावतीवरील Payable  to No.1  हा शब्‍द पांढरी शाई लावून  खोडला आहे व सदर कृत्‍य गुन्‍हयास पात्र आहे.  सदर मजकूर पांढरी शाई लावून खोडला हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी वि.प. वर आहे, तथापि, तसा तज्ञ पुरावा दाखल नाही.           

22)  वि.प. बँकेने अतुल पवार इंजिनिअर यांचे विनंतीनुसार, तक्रारदाराचे नाव Joint नावावर घेतल्‍याचे वि.प. नी मान्‍य केले आहे, व सदर मुदत ठेवीची मुळ पावती तक्रारदार यांचेजवळ असताना, केवळ अतुल पवार यांच्‍या विनंतीवरुन रक्‍कम एकटयाना देणे ही अनुचित व्‍यापारी प्रथा असल्‍याचे उदाहरण आहे.  

23)  वि.प. यांनी स्‍वत: चे हित जतन करण्‍यासाठी, अतुल पवार यांचेकडून बॉंन्‍ड लिहून घेतला पण तक्रारदार यांच्‍या विश्‍वासाला तडा जाईल असे वर्तन केले असून, तक्रारदाराच्‍या संमतीविना रक्‍कम डुप्‍लीकेट पावतीच्‍या आधारे अतुल पवार यांना दिली आहे.

24)     The Hon’ble Supreme Court in a landmark case –

   Annumai Vs Punjab National Bank

   AIR 2005 SC 29

    Laid down the law that issuance of unilateral instruction to  a bank, not to honour cheques signed by the others, issue duplicate receipt, premature repayment of loan against fixed deposit, within the meaning of Section 5(6) of the Act of 1949, in respect of joint account holders, cannot be permitted.      

25)  मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्णयानुसार दिलेल्‍या तत्‍वाचा विचार करता वि.प. बँकेची सदरची कृती ही सेवेतील त्रुटी या सदरात मोडते.

26)  तक्रारदार यांनी आपल्‍या विनंती अर्जात नमूद केले आहे की, सदर ठेव पावतीवरील मुद्दल व व्‍याजाच्‍या रक्‍कमेसह नुतनीकरण वि.प. यांनी करावे व सदर रक्‍कम तक्रारदार व अतुल पवार यांचे सामुहिक नावे ठेवणेत यावी.

27)  वि.प. बँकेने सदर रक्‍कम पवार यांना डुप्‍लीकेट ठेव पावती देऊन अदा केलेने, तक्रारदार यांची विनंती मान्‍य करणे अशक्‍य आहे.  सदर रक्‍कमेसंबंधी तक्रारदार व अतुल पवार यांचे कराराप्रमाणे काय ते योग्‍य निर्णय घेतील.

28)  प्रस्‍तुत प्रकरणी वि.प. यांनी अवलंबिलेल्‍या अनुचित व्‍यापारी प्रथेमुळे व सेवेत केलेल्‍या त्रुटीमुळे, तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 20,000/- देणेस जबाबदार आहेत व  रक्‍कम मुदतीत न दिल्‍यास सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9 % प्रमाणे दि. 3-03-2013 रोजीपासून व्‍याज द्यावे. सदर वि.प. बँक यांनी संबंधित कर्मचा-याची पूर्ण चौकशी करुन योग्‍य निर्णय घ्‍यावा.  कारण सदर रक्‍कम सामान्‍य जनतेच्‍या करामधुन उभी केलेली आहे.                                         

29)    न्‍यायाचे दृष्‍टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.  सबब, आदेश.

                                                 आ दे श

1)   तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

2)  वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु. 20,000/- (रुपये वीस हजार फक्‍त) मानसिक त्रासापोटी 30 दिवसांत द्यावेत.  सदर रक्‍कम मुदतीत न दिल्‍यास सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9 % प्रमाणे दि. 3-03-2013 रोजीपासून व्‍याज द्यावे.  

3)   खर्चासंबंधी कोणतेही आदेश नाहीत.

4)   सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.  

 

 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.