Maharashtra

Nanded

CC/08/147

Mo. Alimoddin Kaji Alimoddin - Complainant(s)

Versus

Br Manager, United India Insurance Co Ltd - Opp.Party(s)

15 Jul 2008

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/147
1. Mo. Alimoddin Kaji Alimoddin Labour Colony, NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Br Manager, United India Insurance Co Ltd Guru Complex, G G Road, NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 15 Jul 2008
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्र. 147/2008.
 
              प्रकरण दाखल तारीख. 10/04/2008.
               प्रकरण निकाल तारीख. 15/07/2008.
    समक्ष    मा.श्री.सतीश सामते.            - अध्‍यक्ष (प्र.)
            श्रीमती सुजाता पाटणकर,         - सदस्‍या
 
मो.अलीमोद्यीन काजी मो.अलीयोद्यीन                  अर्जदार.
वय 28 वर्षे धंदा व्‍यापार
रा. लेबर कॉलनी नांदेड
जि.नांदेड.
 
विरुध्‍द.
 
म.शाखाधिकारी
युनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी लि.               गैरअर्जदार
गुरु कॉम्‍ल्‍पेक्‍स जी. जी. रोड नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील     अड.मो.जाकेर
गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.जी.एस. औढेंकर
 
                            निकालपत्र
                  (द्वारा - मा.श्री.सतीश सामते,अध्‍यक्ष(प्र.)
 
              गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी यांच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल अर्जदार यांची तक्रार आहे.
              अर्जदार आपल्‍या तक्रारीत म्‍हणतात की, ते वाहन क्रंमाक एम.एच.-19-जे-1263 या वाहनाचे मालक असून त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे पॉलिसी नंबर 230600/312/07/01/00003775  या पॉलिसी द्वारे वाहनाचा विमा उतरविला आहे. विमा अ‍स्‍तीत्‍वात  असताना सदरील वाहन अर्जदाराने शब्‍बीर अहेमद अब्‍दूल सत्‍तार  यांच्‍याकडून विकत घेतले. व त्‍यांची रितसर नोंद आर.टी. ओ. कार्यालयात करुन  ते वाहन त्‍यांच्‍या नांवावर केले. विमा पॉलिसीचे नांव हे अर्जदाराच्‍या नांवाने करण्‍यासाठी म्‍हणून अर्जदाराने दि.11.12.2007 रोजी गैरअर्जदार यांच्‍याकडे रितसर अर्ज दाखल केला. त्‍यानंतर सदरील वाहनाचा अपघात हा दि.11.12.2007 रोजी त्‍यांचदिवशी राञी 8.30 वाजता भोकर रोडवर दूस-या वाहनाची जोरात धडक बसून झाला.  या अपघाताची नोंद पोलिस स्‍टेशन भोकर येथे केली असून त्‍यांचा गून्‍हा क्र.52/2007 नुसार करण्‍यात आली. अपघातात वाहनाचे खूप नूकसान झाले. बॉडी रिपेरिंगचे बिल रु.78,000/- व रिपेंरिंग सेटंरचे रु.66,650/- यांचे असेसंमेट अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नूकसान भरपाई मिळणे बाबत दिले आहे. अर्जदारास रु.69,000/- मंजूर झाले. अशी त्‍यांनी कल्‍पना दिली होती पण अचानक दि.07.02.2008 रोजी  अपघाताचे वेळी विमा आपल्‍या नांवे नव्‍हता असे म्‍हणत क्‍लेम नाकारला. सदरील  काळात विमा वाहनाचा होता विमा हा मालकाचा नसून वाहनावरच असतो. अर्जदाराच्‍या वाहनाचे भरपूर नूकसान झालेले आहे. विमा असून सूध्‍दा गैरअर्जदाराने त्‍यांना क्‍लेम देण्‍यास नकार दिलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज मंजूर करुन त्‍यांना वाहनाच्‍या नूकसानी संबंधी रु.2,00,000/- गैरअर्जदाराने देण्‍याचे आदेश व्‍हावेत अशी मागणी केली आहे.
 
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍याचा सर्व प्रथम आक्षेप आहे की, अपघाताच्‍या दिवशी अर्जदार हे वाहनाचे मालक नव्‍हते किंवा त्‍यांच्‍या नांवावर इन्‍शूरन्‍स नव्‍हता. वादग्रस्‍त वाहन हे शब्‍बीर अहेमद यांच्‍या नांवे असून त्‍यांनाच दि.7.11.2007 ते 6.11.2008 या कालावधीसाठी काही शर्थी व अटीवर विमा पॉलिसी दिलेली होती. त्‍यामुळे अर्जदार व विमा कंपनी यांच्‍यात कोणताही करार नव्‍हता व अर्जदार यांना इन्‍शूअर्ड इन्‍ट्रेस राहत नाही.  अर्जदारांनी काही वैयक्‍तीक व्‍यवहार केला असला तर तो त्‍यांना माहीत नाही. अपघाताचे दिवशीच अर्जदार व शब्‍बीर अहेमद यांनी गैरअर्जदार यांचे कार्यालयात अर्ज दिला की, वाहन अर्जदाराचे नांवाने ट्रान्‍सफर करावे. नियमाप्रमाणे सेक्‍शन 157 II , एम.व्‍ही. अक्‍ट याप्रमाणे त्‍यांच्‍या नांवावर वाहन हस्‍तांतरीत करण्‍यात आले आहे. त्‍या बददलची सूचना 14 दिवसाचे आंत गैरअर्जदार यांना दिली पाहिजे व रितसर हस्‍तांतरणाची फिस भरल्‍यानंतर वाहनाचा विमा त्‍यांच्‍या नांवाने केला जातो. अर्जदार व विमादार हे संगनमताने गैरअर्जदार यांना फसवीत आहेत. त्‍यामुळे त्‍यांचा दावा खारीज करावा. गैरअर्जदारयांनी अपघाताची सूचना मिळाल्‍या बरोबर त्‍यांनी त्‍यांचे सर्व्‍हेअर श्री. नलबलवार  यांना पाठवून घटनास्‍थळ पंचनामा केला व रु.49,150/- ची नूकसान भरपाई मंजूर केली. अपघात हा दि.11.12.2007 रोजी घडला व त्‍याच दिवशी अपघाताची सूचना दिली ही सूचना मिळाल्‍यावर दि.12.12.2007 रोजी वाहन हे अर्जदार मो. अलीमोद्यीन यांच्‍या नांवावर हस्‍तांतरीत झाले. अपघात हा दि.11.12.2007 रोजी झाल्‍यामुळे दि.07.02.2008 रोजी गैरअर्जदार यांनी पञ नंबर 230600/MOD/6789/ 07-08 या क्रंमाकाचे पञ पाठवून अपघाताचे दिवशी पॉलिसी अर्जदाराच्‍या  नांवावर नव्‍हती त्‍यामुळे अर्जदार यांना insurable interest  असू शकत नाही. त्‍यामुळे त्‍यांचा क्‍लेम देय नाही असे पञ पाठविल्‍याने गैरअर्जदाराकडून कोणतीही सेवेतील ञूटी झालेली नाही. म्‍हणून अर्जदार यांचा अर्ज दावा खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी मागणी केली आहे.
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच पॉलिसी, असेंसमेंट इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांनी देखील पूरावा म्‍हणून आपली साक्ष श्री. भगवान रामजी कोठाळे  वीभागीय व्‍यवस्‍थापक यांच्‍या साक्षीद्वारे नोंदविली आहे. गैरअर्जदार यांनी या सोबत सर्व्‍हे रिपोर्ट, व दि.7.2.2008 रोजीचे पञ तसेच विमा पॉलिसी हस्‍तांतरीत झाल्‍या बददल पॉलिसी व रु.56/- फी भरल्‍याची पावती तसेच आर. सी. बूक इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत.
 
              दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेला दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व दोन्‍ही पक्षकारानी वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
1.                                         गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द
करतात काय ?                              होय.
2.         काय आदेश ?                                     अंतिम आदेशाप्रमाणे
 
                                 कारणे
मूददा क्र.1 ः-
              पॉलिसी नंबर 230600/31/07/01//00003775  या पॉलिसी बददल वाद नाही.  फक्‍त वाद आहे तो अपघात वाहन नंबर एम.एच.-19-जे-1263  या वाहनाचा ज्‍या दिवशी अपघात झाला त्‍यादिवशी पॉलिसी ही अर्जदार यांच्‍या नांवावर नव्‍हती. असा आक्षेप गैरअर्जदार यांनी आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यात  घेतला आहे. एफ.आय. आर. पंचनामा पाहिला असता अपघात हा दि.12.12.2007  रोजी झालेला आहे. अर्जदाराने व आधी ज्‍याच्‍या नांवाने वाहन  आहे व पॉलिसी होती ते शब्‍बीर अहेमद या दोघानीही दि.11.12.2007 रोजी शब्‍बीर अहेमद यांने अर्जदार अलीमोद्यीन यांना वाहन एम.एच.-19-जे-1263  विकले आहे. त्‍यामुळे पॉलिसी अर्जदाराच्‍या नांवाने हस्‍तांतरीत करावी असा दोघाचाही दि.11.12.2007 रोजीचा अर्ज गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात दिला आहे. गैरअर्जदार कार्यालयाने दि.11.12.2007 रोजीचे पोहच पावती ही त्‍यांना दिलेली आहे. अर्जदार यांनी दि.12.12.2007 रोजी रु.56/- शूल्‍क स्विकारुन पॉलिसी अर्जदार यांच्‍या नांवावर हस्‍तांतरीत केलेली आहे. त्‍यामुळे आता वाहन हस्‍तांतरांना बाबतचा वाद संपूष्‍टात आला आहे. वाहनाचा अपघात हा अर्जदाराच्‍या तक्रारीनुसार दि.11.12.2007 रोजी राञाी 8.30 वाजता झाला म्‍हणजे त्‍याच दिवशी सकाळी हा हस्‍तांतरणा बाबतचा अर्ज गैरअर्जदार यांच्‍याकडे देण्‍यात आलेला होता. एफ.आय. आर. व पंचनामा हा दि.12.12.2007 रोजी करण्‍यात आलेला आहे. गैरअर्जदार यांच्‍या पॉलिसीतील अटी व नियमानुसार अपघाताची सूचना ही अपघात झालेल्‍या दिवशीपासून 14 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांना दयावयास हवी येथे अर्जदार यांनी अपघाताची सूचना त्‍याच दिवशी म्‍हणजे दि..12.12.2007 रोजी गैरअर्जदार यांना दिलेली आहे.त्‍यामुळे गैरअर्जदार यांच्‍या नियमाप्रमाणे अर्जदार यांनी सर्व सोपस्‍कार केलेले आहेत आणि गेरअर्जदार यांनी आर.टी. ओ. कार्यालयाकडून वाहना संबंधीची पूर्ण माहीती घेतली आहे.याप्रमाणे  एम.एच.-19-जे-1263 हे वाहन मो. अलीओद्यीन काझी यांच्‍या नांवावर दि.4.11.2007 रोजी पासून हस्‍तांतरीत झाले आहे. परंतु मधील काळाचा गॅप लक्षात घेऊनच गैरअर्जदार यांनी दि.11.12.2007 रोजीचा अर्जदार यांचा अर्ज स्विकारला व लगेच दि.12.12.2007 रोजी शूल्‍क स्विकारुन अर्जदाराचे नांवाने विमा पॉलिसी हस्‍तांतरीत केली. त्‍यामुळे  हा वाद आता परत काढता येणार नाही व अर्जदाराने नियमाप्रमाणे अपघाताची सूचना दिलेली आहे त्‍यामुळे तोही वाद उरत नाही. दि.11.12.2007 रोजीच्‍या दिवशी अपघात झाला त्‍या दिवशी विमा पॉलिसी अर्जदारांच्‍या नांवे नव्‍हती त्‍यामुळे त्‍याच एक मूददयावर  दि.07.02.2008 रोजी गैरअर्जदारांनी पञ पाठवून क्‍लेम नाकारला. यासाठी आम्‍ही मा. राष्‍ट्रीय आयोग NCDRC –71 oriental insurance company vs Ajaisingh yadav reported in CPJ vol.2 June 2008  या केस लॉ प्रमाणे विमाधारकाने त्‍यांचे वाहन विकले आहे त्‍यामुळे पॉलिसी वाहन घेणा-याच्‍या नांवाने हस्‍तांतरीत करावा  असा गैरअर्जदाराकडे अर्ज दिला होता परंतु पॉलिसी हस्‍तांतरीत होण्‍याच्‍या आधी वाहनाचा अपघात झाला,  पॉलिसी त्‍या दिवशी जरी अर्जदाराच्‍या नांवे नसेल तरी गैरअर्जदार यांच्‍यावरील जबाबदारी टळणार नाही. यावर अजून एक मा. राष्‍ट्रीय आयोगाचा केस लॉ घेऊन यांचा आधार घेता येईल. याप्रमाणे  NCDRC 289 Narayansingh vs. new India Insurance company reported in CPJ   21 vol.4 December 2007   याप्रमाणे मूळ मालकाच्‍या नांवाने पॉलिसी होती व त्‍यांनी ते वाहन विकले त्‍यामुळे विमा पॉलिसी हस्‍तांतरीत जरी झाली नसली तरी मूळ पॉलिसीचे फायदे हे आपोआप नवीन मालकांना मिळू शकतील म्‍हणून वाहनाचा अपघात झाल्‍यास गैरअर्जदार हे जबाबदार ठरतील असे म्‍हटले आहे. यावर अजून एक केस लॉ मा. राष्‍ट्रीय आयोगाचा आहे, याप्रमाणे  Policy runs with vehicle and not with owner   कारण विमा पॉलिसी ही वाहनाच्‍या सूरक्षीतेसाठी घेतलेली आहे व वाहनाचा अपघात झालयास गैरअर्जदार यांनी नूकसान भरपाई भरलेली आहे. विमा हा वाहनाचा असतो मालकाचा नसतो. मालकाला जर काही झाले तर विम्‍याचा नियम व अटीप्रमणे त्‍यांना रक्‍कम मिळणार नाही.फक्‍त वाहनाचे नूकसान झालयास त्‍याची भरपाई गैरअर्जदार करुन देतील. म्‍हणून विमा पॉलिसी अपघाताच्‍या दिवशी अर्जदाराच्‍या नांने जरी नसली तरी गैरअर्जदार यांची जबाबदारी टळू शकत नाही. प्रस्‍तूत प्रकरणात तर विमा पॉलिसी ही अर्जदाराच्‍या नांवाने हस्‍तांतरीत झालेली आहे. त्‍यामुळे आता तो वाद शिल्‍लक नाही. वरील सर्व बाबीवरुन सर्व्‍हेअरने घटनास्‍थळाचा पंचनामा करुन व वाहनाचा पंचनामा करुन जे असेंसमेंट केलेले आहे ती रक्‍कम गैरअर्जदारांनी अर्जदारास न देऊन सेवेत ञूटी केलेली आहे.
              सर्व्‍हे रिपोर्टप्रमणे व अर्जदाराने आपल्‍या लेखी म्‍हणण्‍याप्रमाणे रु.49,150/- चा लॉस असेस केलेले आहे. सर्व्‍हे रिपोर्ट मध्‍ये सर्व्‍हेअर यांनी टोटल लॉस असेंस रु.82,708/- नूकसान भरपाई ठरवलेली आहे. परंतु आपल्‍या शपथपञात त्‍यांनी सर्व्‍हेअरने रु.49,150/- येथे नूकसान भरपाई झालेली आहे असे म्‍हटले आहे. येथे विसंगती दिसून येते. रु.49,150/- ची जबाबदारी गैरअर्जदार यांच्‍यावर येते. ती रक्‍कम मिळण्‍यास अर्जदार पाञ आहे.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
                              आदेश
1.                                         अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येतो.
2.                                          गैरअर्जदारांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत  अर्जदार यांना वाहनाच्‍या नूकसान भरपाईची रक्‍कम
         रु.49,150/- व यावर क्‍लेम नाकारल्‍याचा दि.07.02.2008
         पासून 9 % व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह
         अर्जदारास दयावेत.
3.        मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्‍हणून
          रु.1000/- मंजूर करण्‍यात येतात.
 4.       पक्षकारांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 (श्रीमती सुजाता पाटणकर )                      (श्री.सतीश सामते)               
          सदस्‍या                                              अध्‍यक्ष (प्र.)