जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.83/2008. प्रकरण दाखल दिनांक – 25/04/2008. प्रकरण निकाल दिनांक –19/06/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. 1. श्रीमती.चंदा भ्र.विजयकुमार गोंधळेकर, अर्जदार. वय वर्षे 30, व्यवसाय घरकाम, 2. जिवन पि. विजयकुमार गोंधळेकर, वय वर्षे 14, व्यवसाय शिक्षण. 3. जयश्री पि.विजयकुमार गोंधळेकर, वय वर्षे 10, व्यवसाय शिक्षण, अर्जदार क्र. 2 व 3 अ.पा.क सख्खी आई अर्जदार क्र. 1 सर्व रा. एस.व्ही.एन.कॉलनी, किनवट सध्या रा. हर्षवर्धन सोसायटी, पोलीस मित्र सोसायटीच्या बाजुला, लोहारा रोड. यवतमाळ. विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. दि.न्यु.इंडिया इन्शोरन्स कंपनी लि, शाखा कार्यालय, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.ए.व्ही.पाटील. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.एस.व्ही.राहेरकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार न्यु.इंडिया इंन्शोरन्स कंपनी यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात, त्यांनी गैरअर्जदार कंपनीकडे पर्सनल इंन्शोरन्स पॉलिसी योग्य रक्कम भरुन घेतली होती. अर्जदार क्र. 1 हे मयताची पत्नी असुन अर्जदार क्र.2 व 3 हे त्यांची मुले आहेत. मयत हे किनवट येथे नौकरीस होते त्यांनी दि.06/08/2007 रोजी एम.एच-22/सी-4804 ही हिरो होंडा मोटर सायकल विकत घेतली व त्या वाहनासाठी गैरअर्जदार यांच्याकडुन विमा पॉलिसी क्र.610603/31/07/00000597 घेतली जीचा कालावधी दि.06/08/2007 ते 05/08/2008 पर्यंत होता. पॉलिसी घेते वेळेस गैरअर्जदार यांनीरु.50/- एक रक्कमी हप्ता स्विकारुन त्यांना ही वैयक्तिक विमा पॉलिसी दिली होती. यात अपघाती मृत्यु झाल्यास त्यांना रु.1,00,000/- देण्यास कंपनी बांधील आहे असे म्हटले होते. यानंतर दि.02/09/2007 रोजी मयत विजयकुमार यांना आपल्या राहत्या घरी किनवट येथे रात्री सापाने चावा घेतला व त्यांना ताबडतोब गोकुंदा येथील रुग्णांलयात नेण्यात आले तेथे शासकीय वैद्यकिय अधिका-यांनी त्यांना तपासुन त्यंचा सर्प दंशाने मृत्यु झाल्याचा अहवाल दिला. अर्जदार क्र. 1 ते 3 मयत विजयकुमार यांचे कायदेशिर वारस आहेत. सर्प दंशाने झालेला मृत्यु हा अपघातील मृत्यु म्हणुन समावेश होत असल्यामुळे अर्जदार यांना गैरअर्जदाराकडुन पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास ते पात्र आहेत. दि.02/09/2007 रोजी पोलिस स्टेशन किनवट येथे अर्ज देऊन आकस्मीक मृत्यु क्र.41/07 नोंद घेऊन घटना स्थळाचा पंचना व मयताचा शवविच्छेदन करुन सर्प दंशाने मृत्यु झाला असा अहवाल दिला. विमा पॉलिसीचे नांव हे पर्सनल इंशुरन्स असुन गैरअर्जदार विमा कंपनी या सबबीखाली विम्याचा करार केला. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता गैरअर्जदार कंपनीने पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह अर्जदारास देण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे गैरअर्जदार यांनी अपघातासाठी मालक/चालक म्हणुन रु.50/- प्रिमीअमही घेतले होते. सदरील गाडीला दिलेली पॉलिसी ही केवळ आणि निव्वळ मोटर सायकल चालवित असताना जर अपघात झाला तर पॉलिसीचे अटी व नियमाप्रमाणे कंपनी पॉलिसीची रक्कम देईल. मयत विजयकुमार यांचा मृत्यु सर्प दंशाने झालेला आहे म्हणजे सदरील मृत्युचा आणि मोटर सायकलचा अपघाताचा कुठेही काहीही संबंध येत नाही. थोडक्यात मयत विजयकुमार यांच्या मोटर सायकलला दिलेली पॉलिसी ही मोटर सायकल वापरतांना झालेल्या अपघाता पासुन संरक्षणासाठी आहे इतर कोणतीही जोखीम स्विकारलेली नाही तेंव्हा अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच गैरअर्जदारांनी डॉ.भास्कर लेकुरवाळे यांची साक्ष शपथपत्राद्वारे नोंदविली आहे. अर्जदाराने एफ.आय.आर., पंचनामा,शवविच्छेदन अहवाल, विमा पॉलिसी व मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र पुरावा खातर दाखल केलेली आहे. गैरअर्जदारांनी पॉलिसी नियम व अटी दाखल केलेले आहे हे कागदपत्र बारकाईने तपासुन व दोन्ही पक्षकारांनी वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात सुरुवातीसच मयत विजयकुमार यांचा मृत्यु सर्प दंशाने झाला हे नमुद केले आहे त्यामुळे त्यांनी जे पुराव्या कामी कागदपत्र दाखल केले आहे त्यावरुन त्यांच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. मयत विजयकुमार यांनी त्यांचा एम.एच-22/सी-4804 या मोटर सायकलसाठी गाडीला होणा-या नुकसानीसाठी सुरक्षा म्हणुन ही पॉलिसी घेतलेली आहे व यासाठी रु.689/- प्रिमीअम भरले आहे. यामध्ये गैरअर्जदार यांनी रु.50/- प्रिमीअम हे Compulsory p A to owner come driver याच्या सुरक्षीततेसाठी घेतलेली आहे व मोटर सायकल चालवीत असतांना जर मालक किंवा चालक यांना अपघात झाला तर यात त्यांचा मृत्यु झाल्यास त्यालारु.1,00,000/- देण्याची हमी घेतलेली आहे. मयत विजयकुमार यांचा मृत्यु सर्प दंशाने झाला हे अतीशय स्पष्ट आहे तेंव्हा मोटर सायकलसाठी घेतलेली पॉलिसीमधील प्रीमीअम हे फक्त मोटर सायकल चालवित असताना जर मालक किंवा चालक यांना अपघात झाला तरच ही रक्कम त्यांना मिळू शकते याबाबत गैरअर्जदार यांनी नियम व शर्ती दाखल केलेले आहे. SECTION III PERSONAL ACCIDENT COVER FOR OWNER – DRIVER. Subject otherwise to the terms exceptions conditions and limitations of this policy, the Company undertakes to pay compensation as per the following scale for bodily injury/death sustained by the Owner- Driver of the vehicle indirect connection with the vehicle with the vehicle insured of whilst mounting into/dismounting from or traveling in the insured vehicle as a co-driver, caused by violent accidental, external and visible means which independent of any other cause shall within six calendar months of such injury result in. A) Compensation shall be payable under only one of the items (i) to (iv) above in respect of the owner-driver arising out of any one occurrence and the total liability of the insurer shall not in the aggregate exceed the sum of Rs. 1 lakhs during any one period of insurance. B) no compensation shall be payable in respect of death or bodily injury directly or indirectly wholly or in part arising or resulting from or traceable to (a) intentional self injury suicide or attempted suicide physical defect or infirmity or (b) an accident happening whilst such person is under the influence of intoxicating liquor or drugs. C) Such compensation shall be payable directly to the insured or to his/her legal representatives whose receipt shall be the full discharge in this cover is subject to. (a) the Owner-Driver is the registered owner of the vehicle insured herein. (b) the Owner-Driver is the insured named in this policy. (c) the Owner-Driver holds an effective driving license, in accordance with the provisions of Rule 3 of the Central Motor vehicle Rules,1989,at the time of the accident. वरील सेक्शनप्रमाणे मोटर सायकलवरुन झालेला अपघातानेच ती विम्याची रक्कम मिळु शकते व प्रस्तुत प्रकरणात मयत विजयकुमार यांचा मृत्यु सर्प दंशाने झाल्या कारणाने विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यांनी ही रक्कम मिळणार नाही. गैरअर्जदार कंपनीची यांनी मोटर सायकलसाठी दिलेली ही पॉलिसी आहे व वाहन चालवितांना चालक किंवा मालक यांना संरक्षण दिलेले आहे. दुस-या कुठल्याही वेगळया अपघातात ही रक्कम देय नाही. अर्जदार म्हणतात या प्रमाणे हि वैयक्तिक अपघात पॉलिसी नाही. गैरअर्जदार यांनी 2008 (1) सी.पी.आर. 217 (एन.सी) मा.राष्ट्रीय आयोगाची केस लॉ दाखल केलेला आहे. यात श्रीमती आर.टी.लता आलीयास जे. विरुध्द एल.आय.सी. याप्रमाणे जिल्हा मंचाने दिलेला निकाल फिरवुन यात अपघाताचा लाभ त्यांना दिला होता व मृत्युचे कारण हे आत्महत्या असे सिध्द झाले होते तेंव्हा मा.राज्य आयोगाने हा निकाल फिरवला होता व त्यात मा.राष्ट्रीय आयोगाचा दुजोरा देउन रिव्हीजन पिटीशन खारीज केलेला आहे याचा आधार या प्रकरणास देता येईल. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघुलेखक. |