Maharashtra

Kolhapur

CC/10/217

Arun Ganapati Mahadik - Complainant(s)

Versus

Bonanaza Fortfello Ltd. - Opp.Party(s)

Pramod Devkar

14 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/217
1. Arun Ganapati MahadikA/p Pedid -Shirgaon Tal. Shahuwadi Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Bonanaza Fortfello Ltd. kama Industrial Estate Goregaon (E)Mumbai2. Bonanza Portfolio Ltd.Kolhapur Branch, through Branch Manager, Shri Jadhav, Shri Chavan, Ground Floor, Gems Stone, Near CBS, Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Pramod Devkar, Advocate for Complainant

Dated : 14 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.14.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीसीची बजावणी झालेली आहे. त्‍याबाबत पोचपावती प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचे सांगणेवरुन सामनेवाला कंपनीकडे डिमॅट खाते चालू केले आहे.  सामनेवाला कंपनी ही शेअर्स खरेदी-विक्री चा व्‍यवसाय सेबीच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वावर करते. तक्रारदारांचे डिमॅट खाते दि.17.11.2007 रोजी सुरु केले आहे. त्‍याचा खाते नं.1203350000236583 असा आहे. तक्रारदारांनी सदर डिमॅट खात्‍यामध्‍ये विविध शेअर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करणेकरिता रुपये 28,000/- इतकी गुंतवणुक केली होती. सेबीच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार खातेदाराच्‍या लेखी पूर्वकल्‍पनेशिवाय सामनेवाला कंपनीस शेअर्सची खरेदी-विक्री व्‍यवसाय करता येत नाही. असे असतानाही, तक्रारदारांना कोणतीही पूर्व लेखी कल्‍पना न देता सामनेवाला कंपनीने शेअर्सची खरेदी केली आहे व त्‍याची रक्‍कम डिमॅट खात्‍यातून अदा केली आहे. तसेच, सदर खरेदी केलेले शेअर्स तक्रारदारांना पूर्वसुचना न देता परस्‍पर विक्री केलेले आहेत. सदर व्‍यवहार हा अधिकारबाहय आहे. जानेवारी 2009 मध्‍ये याबाबत तक्रारदारांनी खात्‍याची माहिती मागितली असता ती देणेस टाळाटाळ केली. तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीच्‍या सांगली येथील शाखेत संपर्क साधून सप्‍टेंबर 2009 मध्‍ये खाते उतारा मिळविला. त्‍यावेळेस सामनेवाला कंपनीने केलेली फसवणुक तक्रारदारांना कळून आली. याबाबत सामनेवाला यांचेकडे खुलासा मागितला असता त्‍यांनी दमदाटीची भाषा केली. याबाबत वकिलामार्फत नोटीसही पाठविली. परंतु, त्‍याचे उत्‍तर आले नाही. सबब, तक्रारदारांची रक्‍कम रुपये 28,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजदराप्रमाणे नोव्‍हेंबर 2007 पासून देणेचा आदेश व्‍हावा. मानसिक त्रासापोटी रुपये 45,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत सामेनवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेली नोटीस व पोचपावत्‍या, सामनेवाला कंपनीकडील खातेउतारा तसेच शपथपत्र दाखल केले आहे.     
 
(4)        या मंचाने तक्रारदारांच्‍या वकिलांचे युक्तिवाद ऐकले आहेत. उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीकडे तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे डिमॅट खाते सुरु केले होते व सदर खात्‍यावरती रक्‍कम रुपये 28,000/- डिपॉझिट केली होती. सामनेवाला कंपनी ही सेबीच्‍या नियंत्रणाखाली ब्रोकरचे काम करीत असलेचे दिसून येते. शेअर्स खरेदी-विक्री करणेकरिता तक्रारदारांनी डिमॅट खाते सुरु केले आहे. पंरतु, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(डी) यातील तरतुदीचा विचार करता शेअर्स खरेदी-विक्री करणेबाबतचा व्‍यवहार हा वाणिज्यिक प्रयोजन याखाली येत आहे. वाणिज्यिक प्रयोजनासाठी घेतलेली सेवा सदर तरतुदीचा विचार करता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्‍या कक्षेत येत नाही. सबब, प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार खालीलप्रमाणे :-
 
2010 CTJ 1194 (CP)(SCDRC) - Anand Rathi Securities Ltd. and others Vs. Smt. Rajshri Verma and another.
 
Consumer - Commerical purpose - Consumer Protection Act, 1986 - Section 2 (1)(d) - Complainant claiming herself to be a housewife wanted to avail of tax benefit on the income derived by her from the capital she had - She got in touch with the appellants providing portfolio management services - She then deposited Rs.3 lakhs for trading in share market and also opened a trading account for that purpose - When she made a request for refund of the amount with such profit as earned on it, she was told to pay Rs.1,49,824/- - District Forum allowed the complaint as preferred by the complainant - Appeal by the opposite parties - Share trading is a commercial activity - She only invested money without there being any ‘self-employment’ element involved in it - Services availed for commercial activity are obviously to be considered to have been availed for commecial purpose - Hence, the complainant could not be said to be a ‘consumer’ - Impunged order not sustained - Set aside - Appeal allowed. 
 
 
(5)        उपरोक्‍त पूर्वाधार व विवेचन विचारात घेता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
आदेश

1.    तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते. 

2.    खर्चाबाबत आदेश नाहीत. 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT