(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 29 नोव्हेंबर 2011)
1. अर्जदार यांनी, वातानुकुलीत यंञ (एसी) बदलवून मिळणे व भरपाई मिळण्याकरीता दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
2. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून ब्ल्यु स्टार कंपनीचा थ्री स्टार एसी मॉडेल क्र.3 एचडब्ल्यु- 181 वायसी, 105 टन वॉरंटी कार्डवर सिरियल क्र.10ए05635 असून, बिलामध्ये सिरियल क्र.ए 299400 (ओ) 1022790 (आय) लिहीलेला आहे. अर्जदाराचा दि.26.3.2011 ला जुना एसी रुपये 2500/- मध्ये देऊन ब्ल्यु स्टार कंपनीचा
... 2 ... (ग्रा.त.क्र.13/2011)
थ्री स्टार नविन एसी रुपये 27,400/- मध्ये खरेदी केला. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.2 चे सांगीतल्यानुसार एसी करीता वेगळी नवीन वायरींग गैरअर्जदाराने पाठविलेल्या टेक्नीशियन श्री मंगेश काळबांधे यांचेकडून करुन घेतली. सदर एसी राञी सुरु झाला नाही, म्हणून अर्जदाराने दि.27.3.2011 ला मौखीक व प्रत्यक्ष भेटून एसी बंद असल्याबाबत सांगीतले.
3. दि.21.3.2011 ला टेक्नीशियन येऊन सदर एसी सुरु करुन गेला. दि.1.4.2011 ला पुन्हा एसी बंद पडला, म्हणून दि.2.4.2011 ला दूरध्वनी व प्रत्यक्ष भेटून एसी बंद असल्याबाबत सांगीतले. तसेच, दि.9.4.2011 ला पुन्हा एसी बंद झाल्याने गैरअर्जदार क्र.2 कडे तक्रार करण्यांत आली. तेंव्हा, गैरअर्जदार क्र.2 कडून उडवाउडवीचे उत्तर मिळत होते. अर्जदाराने, लोड तपासला असता, 240 होल्ट असल्याचे बरोबर आढळून आले. उलट, गैरअर्जदार क्र.2 यांनी पुरविलेल्या एसीमुळे माझे विद्युत मिटर जळाले. गैरअर्जदार क्र.1 चा टेक्नीशियन दि.15.4.2011 ला येऊन एसी ची तपासणी केली व बाह्य युनिटमध्ये बिघाड असल्याचे सांगून निघून गेला. त्यामुळे, अर्जदाराचे परिवाराला वाढत्या तापमानात नाहक ञास सहन करावा लागला. तसेच, दि.21.4.2011 पर्यंत एसीचा उपभोग घेता आला नाही व हालअपेष्टा सोसावा लागला. गैरअर्जदाराने, दि.21.4.2011 ला एसी बदलवून न देता त्याच एसीमध्ये बिघाड दुरुस्त करुन एसी सुरु करुन दिला. दोन्ही गैरअर्जदाराचे कृत्यामुळे अर्जदारास शारीरीक, आर्थिक व मानसिक ञास सहन करावा लागला. त्यामुळे, गैरअर्जदारांनी ब्ल्यु स्टार कंपनीचा एसी तात्काळ बदलवून नविन एसी फिटींग करुन द्यावा किंवा अर्जदाराने दिलेली रक्कम 18 टक्के व्याजासह परत करावी व जुना एसी सुध्दा परत करावा. गैरअर्जदाराकडून शारीरीक, आर्थिक व मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- नुकसान भरपाई व झालेला खर्च गैरअर्जदाराकडून वसूल करण्यात यावा, अशी प्रार्थना केली आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.3 नुसार 6 दस्ताऐवज दाखल केला आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.6 नुसार लेखी उत्तर व सोबत वॉरंटी कार्डची प्रत पोष्टामार्फत पाठविले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.7 नुसार लेखी उत्तर व सोबत वॉरंटी कार्डची प्रत दाखल केली.
5. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदार हा ब्लु स्टर लि.कंपनी नसून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा आथोराईज डिलर आहे. श्री मुकूंद नारायण जोशी यांनी 3 star split AC गडचिरोली Venus Automotive यांचेकडून विकत घेतला, जे माझे सब डिलर आहेत. Venus Automotive यांनी दि.20.3.2011 ला AC मध्ये प्रॉब्लेम आहे असे कळविल्यानंतर टेक्नीशियन पाठवून AC सुरु केले. टेक्नीशियन यांनी श्री मुकूंद जोशी यांना सांगीतले की, आपल्याकडे व्होल्टेज प्रॉब्लेम असल्याने AC ला स्टैब्लायझर लावणे गरजेचे आहे व एम.एस.ई.बी. कडून येणारा सर्व्हीस वाय कमजोर असल्याने 10 mm (Ten) टाकण्यास सांगीतले. तरी, अर्जदार यांनी स्टैब्लायझर लावले
... 3 ... (ग्रा.त.क्र.13/2011)
नाही व सर्व्हीस वायर बदलविले नाही, त्यामुळे वारंवार प्रॉब्लेम येणे सुरु झाले. ज्यावेळी AC ला व्होल्टेज मिळाला की, AC सुरु होतो किंवा AC ला व्होल्टेज मिळाला नाही तर AC बंद पडतो. AC मध्ये कसलाही प्रॉब्लेम नसून, AC ची कंडीशन व्यवस्थित आहे, त्यात कसलाही बिघाड नाही. तसेच, श्री मुकूंद जोशी यांनी चंद्रपूर ते गडचिरोली टेक्नीशियनचा जाणे व येण्याचा पाच वेळचा खर्च दिलेला नाही. वॉरंटी कार्ड मध्ये नमूद केले आहे की, सर्व्हीस सेंटर पासून आऊट ऑफ स्टेशन जात असेल तर कस्टमरला त्याचा खर्च द्यावा असे लिहिले आहे.
6. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदार क्र.2 हे गडचिरोली येथील ‘’ब्लु स्टर’’ AC चे सब डिलर आहे. श्री मुकूंद नारायन जोशी यांनी आमचेकडून 3 star split AC खरेदी केला. अर्जदाराने दि.20.3.2011 ला AC बंद पडलेला आहे, असे सांगीतले. तेंव्हा, आंम्ही दि.21.3.11 ला चंद्रपूर वरुन टेक्नीशियन मागवला व AC सुरु करुन दिला आणि अर्जदारास टेक्नीशियनने सांगीतले की, आपल्याकडे व्होल्टेज प्रॉब्लेम असल्याने AC ला स्टैब्लायझर लावणे गरजेचे आहे व एम.एस.ई.बी. कडून येणारा सर्व्हीस वाय 2.5 mm चा असल्याने आपणांस 10 mm चा सर्व्हीस वायर लावणे आवश्यक आहे, असे सांगितले. तरी, अर्जदार यांनी स्टैब्लायझर लावले नाही व सर्व्हीस वायर बदलविले नाही, त्यामुळे वारंवार प्रॉब्लेम येणे सुरु झाले. घरी गेल्यावर AC बघण्याची काही गरज नाही, AC व्यवस्थित चालू आहे असे जोशी मॅडम सांगत होत्या. आंम्ही श्री जोशी यांच्या तक्रारीवरुन टेक्नीशियन पाठवून AC काढून परत घेत होतो व त्यांची जी रक्कम आहे, ती परत देण्यास समर्थ होते. पण, श्री जोशी यांनी AC काढू दिला नाही, तक्रार निवारण मंचामधील रिझल्ट आल्याशिवाय AC काढायचा नाही असे सांगीतले. गैरअर्जदाराच्या ‘’ब्लु स्टार’’ कंपनीच्या AC मध्ये कसलाही प्रॉब्लेम नाही, AC व्यवस्थित आहे, परंतु श्री जोशी यांच्या चुकीमुळे AC मध्ये प्रॉब्लेम येत राहिला. तसेच, कंपनीच्या वॉरंटी कार्डमध्ये असे नमूद आहे की, टेक्नीशियन आऊट ऑफ स्टेशन जात असेल तर त्यांचा पूर्ण प्रवास खर्च, मजुरी खर्च व जेवणाचा खर्च ग्राहकाला द्यावा लागेल, असे नमूद असून सुध्दा श्री मुकूंद जोशी यांनी टेक्नीशियनचा जाणे व येण्याचा पाच वेळचा खर्च दिलेला नाही. तसेच, नवीन कॉन्ट्रॅक्टर लावून दिला होता त्याचासुध्दा खर्च श्री जोशी यांनी दिलेला नाही. आता AC व्यवस्थित व चांगला सुरु आहे, त्यामुळे आमचे विरुध्द केलेल्या तक्रारीमध्ये काहीही वास्तविकता नसून, केवळ आमच्या फर्मला बदनाम करण्याचे षडयंञ आहे.
7. अर्जदाराने नि.क्र.8 नुसार प्रतिउत्तर दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, लेखी उत्तर, व अर्जदार यांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
... 4 ... (ग्रा.त.क्र.13/2011)
// कारणे व निष्कर्ष //
8. अर्जदाराने गै.अ.क्र.2 कडून ब्लु स्टार कंपनीचा एसी विकत घेतला. अर्जदाराने एसी विकत घेण्याची पूर्वी आपले कडील जुना एसी परत केला आणि त्याऐवजी, नवीन एसी रुपये 28,400/- मध्ये खरेदी केला. अर्जदाराने जुना दिलेल्या एसी ची किंमत रुपये 2500/- कमी करण्यांत आली. अर्जदाराने, एसी घेतला व त्यात बिघाड आला याबद्दल वाद नाही, परंतु एसी गै.अ.क्र. 2 ने लावून दिल्यानंतर त्याच्यात वारंवार बिघाड आला व तो बिघाड अर्जदाराने वॉरंटी कालावधीत तक्रार करुन सुध्दा समाधानकारक उत्तर दिले नाही आणि उलट, इलेक्ट्रीक सप्लायचा वायर बदलावा लागेल, तसेच होल्टेज स्टैब्लायझर लावावा लागेल असे सांगीतले. गै.अ.क्र.1 यांनी नि.क्र.6 नुसार लेखी उत्तर पोष्टा मार्फत पाठविला. गै.अ.क्र.2 ने नि.क्र.7 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गै.अ.ना पुरावा शपथपञ दाखल करण्यास पुरेपूर संधी देण्यात आली, परंतु पुरावा शपथपञ दाखल केला नाही. तसेच, युक्तीवाद करण्याची ही संधी देवूनही युक्तीवाद केला नाही व सतत गैरअर्जदार गैरहजर, त्यामुळे उपलब्ध पुराव्यावरुन तक्रार गुणदोषावर निकाली काढण्यात यावे असा आदेश नि.क्र.1 वर पारीत करण्यांत आला.
9. अर्जदार यांनी, तक्रारीसोबत दाखल केलेले दस्ताऐवज, तसेच नि.क्र.8 वर सादर केलेल्या पुरावा शपथपञानुसार एक बाब दिसून येतो की, दि.21.4.2011 पासून अर्जदाराकडे ब्लु स्टार कंपनी एसीचा कोणतेही होल्टेज स्टैब्लायझर न लावता, तसेच सर्व्हीस वायर न बदलविता चालू आहे, असे अर्जदाराने आपल्या शपथपञातील प्यारा 5 मध्ये मान्य केले आहे. अर्जदाराने गै.अ.स दि.20.3.2011 ला एसी मध्ये बिघाड आला होता, तेंव्हा मेकॅनिकल पाठवून होल्टेज प्राब्लेम असल्याचे दि.21.3.2011 ला अर्जदारास सांगण्यात आले. तसेच, सर्व्हीस वायर 2.5 mm. चा सर्व्हीस वायर असल्याने 10 mm. चा सर्व्हीस वायर लावणे आवश्यक आहे असे सांगीतले. गै.अ.क्र.2 ने नि.क्र.7 नुसार शपथेवर लेखी उत्तर दाखल केले आहे. परंतु, गै.अ.क्र.1 यांनी पोष्टामार्फत पाठविलेला लेखी उत्तर हा शपथपञावर नाही. परंतु, दोन्ही गै.अ.च्या लेखी बयानातील आशय हा समान आहे. गै.अ.क्र.2 यांनी लेखी उत्तरात चवथ्यावेळी प्रॉब्लेम आला, तेंव्हा गै.अ.नी चंद्रपूर वरुन मेकॅनिक बोलविला. त्यावेळी, त्यांनी स्टैब्लायझर लावल्याशिवाय आणि सर्व्हीस वायर बदलविल्याशिवाय प्रॉब्लेम निघणार नाही असे सांगितले. परंतु, अर्जदाराच्या तक्रारीनुसार असे दिसून येते की, दि.21.4.2011 ला एसी दुरुस्त करुन दिल्यानंतर आजही बिना स्टैब्लायझर आणि सर्व्हीस वायर न बदलविता एसी सुरु आहे. परंतु, गै.अ.यांनी खोटे कारण सांगून एसी मधील बिघाड दुरुस्त करुन देण्यास विलंब केला, ही गै.अ.च्या सेवेतील न्युनता असल्याची बाब दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो. अर्जदार यांनी एसी विकत घेतल्यानंतर अत्यंत अल्पावधीत बिघाड निर्माण झाला. अर्जदाराने वारंवार गै.अ.क्र.1 व 2
... 5 ... (ग्रा.त.क्र.13/2011)
कडे तक्रारी केल्या, परंतु चुकीचे कारण सांगून एसी दुरुस्त करुन दिला नाही. आणि शेवटी एसी दुरुस्त करुन दिला तो आजही चालु आहे, हे अर्जदाराने मान्य केले आहे.
10. अर्जदाराने तक्रारीत नवीन एसी बदलवून देण्याची मागणी केली किंवा रक्कम 18 % व्याजाने परत करण्याची मागणी केली आहे. परंतु, अर्जदाराकडील एसी हा तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दि.21.4.11 ला गै.अ.ने एसी बदलवून न देता, त्याच एसी मधील बिघाड दुरुस्त करुन, एसी सुरु करुन दिला, हे मान्य केले आहे, त्यामुळे नवीन एसी बदवलवून देण्याची अर्जदाराची मागणी किंवा पैसे परत करण्याची मागणी मंजूर करण्यास पाञ नाही. तसेच, अर्जदारांनी उत्पादन कंपनीला तक्रारीत पक्ष केले नाही, त्यामुळे अर्जदाराची नवीन एसी बदलवून देण्याची मागणी संयुक्तीक नाही. परंतु, गै.अ.क्र.1 व 2 च्या न्युनतापूर्ण सेवेमुळे अर्जदारास व त्याचे कुंटूंबास दि.20.3.2011 पासून दि.21.4.2011 पर्यंत उन्हाळ्यात गैरसोय झाली. तसेच, मानसिक, शारीरीक ञास सहन करावा लागला. त्यामुळे, अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे.
11. गै.अ.क्र.1 हा मुख्य डिलर असून, गै.अ.क्र.2 हा त्याचा गडचिरोली येथील सब डिलर आहे. अर्जदार यांनी एसी घेतेवेळी कंपनीशी संबंध स्थापीत केला नाही तर डिलर मार्फत करार अस्तित्वात आला, त्यामुळे सेवा देण्याची पूर्ण जबाबदारी ही गै.अ.क्र.2 ची असून गै.अ.क्र.1 चा सब डिलर असल्यामुळे वॉरंटी कालावधीत कोणतेही शुल्क/चार्ज न आकारता, योग्य तत्पर सेवा देण्याची जबाबदारी ही दोन्ही गै.अ.ची होती. गै.अ.क्र.1 यांनी चंद्रपूर वरुन मेकॅनिकल पाठविला, परंतु त्यांनी खोटे कारण सांगीतले. जेंव्हा की, आजही अर्जदाराचे म्हणणे नुसार सर्व्हीस वायर न बदलविता एसी चालु आहे. त्याचप्रमाणे, स्टैब्लायझर न लावता एसी सुरु आहे. उलट, अर्जदाराचे घराचे बाजुला असलेल्या शेजा-यांचे येथे कोणतेही स्टैब्लायझर व कोणतेही सर्व्हीस वायर न लावता एसी सुरु आहे, ही बाब अर्जदाराने आपले शपथपञ नि.8 मध्ये मान्य केले आहे. गै.अ.यांनी अर्जदाराचे नि.8 वरील शपथपञाचे प्रतीउत्तरा दाखल, शपथपञ दाखल केले नाही. त्यामुळे, अर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
12. अर्जदाराच्या शपथपञावरुन आणि तक्रारीवरुन प्रार्थना 1 मध्ये केलेली मागणी मंजूर करण्यास पाञ नाही. परंतु, प्रार्थना क्र.2 व 3 मध्ये मानसिक, शारीरीक व आर्थिक ञासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी केलेली मागणी मंजूर करण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. गै.अ.क्र.1 व 2 च्या मेकॅनिकलने चुकीचा निष्कर्ष काढून एसी दुरुस्त करण्यास विलंब लावला. तसेच, एसी ला 240 होल्टेज मिळत होते हे गै.अ.चे मेकॅनिकल शिबू यांनी लोड तपासला असता, 240 होल्ट मिळत असल्याचे सांगीतले, तरी सर्व्हीस वायर बदलविण्याची बाब सांगून दुरुस्त करण्यास विलंब केला. त्यामुळे, अर्जदारास दि.21.4.2011 पर्यंत ञास सहन करावा लागला असल्याने, मानसिक,
... 6 ... (ग्रा.त.क्र.13/2011)
शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
13. एकंदरीत, अर्जदाराच्या शपथपञावरुन आणि गै.अ.क्र.2 च्या लेखी उत्तरावरुन 3 Star Split AC मध्ये बिघाड आल्यानंतर गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केले असल्याचे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होत असल्याने तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने अर्जदारास प्रत्येकी रुपये 1000/- मानसिक, शारीरीक ञासापोटी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी, अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 29/11/2011.