Maharashtra

Kolhapur

CC/18/60

Bipin Omkarmal Parmar - Complainant(s)

Versus

Blue Dart Express Ltd. - Opp.Party(s)

B.S.Patil

31 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/18/60
( Date of Filing : 16 Feb 2018 )
 
1. Bipin Omkarmal Parmar
Plot No.18,Mahaveer Coloney Nagar, E Ward, Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Blue Dart Express Ltd.
Opp. Mahadik Bunglow, Shiroli,Tal.Hatkanangale, Dist.Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 31 Jan 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्‍या

 

1.    तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 द 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रारदार यांनी दिपावलीकरिता अमृतसर येथून चांदीच्‍या मालाची मागणी आलेने दि. 26/9/2017 रोजी 3 बॉक्‍स पॅकींगमध्‍ये 30001 ग्रॅमचे चांदीचे दागिने रक्‍कम रु. 27,300/- याप्रमाणे 8,19,027/- इतक्‍या किंमतीचे व त्‍यावरील जी.एस.टी. व्‍हॅटची किंमत रु. 24,571/- म्‍हणजेच एकूण किंमत रक्‍कम रु. 8,43,598/- चा माल वि.प. कंपनीच्‍या ट्रान्‍स्‍पोर्टने पाठविला होता.  परंतु सदरचा माल डिलीव्‍हरी न झालेबाबत दि. 29/9/2017 रोजी तक्रारदार यांना सिल्‍व्‍हर ऑर्नामेंट हाऊस अमृतसर यांचेकडून समजले.  वि.प. यांनी मालाची डिलीव्‍हरी आज देतो, उद्या देतो अशी कारणे सांगून वेळ निभावून नेली व मालाची डिलीव्‍हरी केली नाही.  सबब, तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.

 

2.    क्रारदाराची तक्रार थोडक्‍यात पुढीलप्रमाणे

      

      तक्रारदार हे चरितार्थाकरिता चांदीच्‍या वस्‍तू बनवून त्‍या विक्री करणेचा व्‍यवसाय करतात.  तक्रारदार यांनी दिपावलीकरिता अमृतसर येथून चांदीच्‍या मालाची मागणी आलेने दि. 26/9/2017 रोजी 3 बॉक्‍स पॅकींगमध्‍ये 30001 ग्रॅमचे चांदीचे दागिने रक्‍कम रु. 27,300/- याप्रमाणे 8,19,027/- इतक्‍या किंमतीचे व त्‍यावरील जी.एस.टी. व्‍हॅटची किंमत रु. 24,571/- म्‍हणजेच एकूण किंमत रक्‍कम रु. 8,43,598/- चा माल वि.प. कंपनीच्‍या ट्रान्‍स्‍पोर्टने पाठविला होता.  त्‍याचा पावती कोड नं.E00011 असा असून डॉकेट नं. 58606179553 ने माल पाठविला होता.  परंतु सदरचा माल डिलीव्‍हरी न झालेबाबत दि. 29/9/2017 रोजी तक्रारदार यांना “सिल्‍व्‍हर ऑर्नामेंट हाऊस” अमृतसर यांचेकडून समजले.  तक्रारदार यांनी याबाबत वि.प. यांचेकडे चौकशी केली असता वि.प. यांनी दि. 30/9/2017 रोजी सदरचा माल अमृतसर येथे पोहोच केल्‍याचे सांगितले.  सदर मालाच्‍या डिलीव्‍हरी नंतर सिल्‍वर ऑर्नामेंट यांनी पुन्‍हा रक्‍कम रु. 5 लाख इतक्‍या मालाची ऑर्डर देणार असल्‍याचे सांगितले होते.  वि.प. यांनी मालाची डिलीव्‍हरी आज देतो, उद्या देतो अशी कारणे सांगून वेळ निभावून नेली व मालाची डिलीव्‍हरी केली नाही.  सिल्‍वर ऑर्नामेंट यांना वेळेवर मालाची डिलीव्‍हरी न मिळाल्‍यामुळे तक्रारदार यांची पुढील ऑर्डर रद्द झाली.  म्‍हणून तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत नोटीस पाठवली. परंतु सदर नोटीसीस वि.प यांनी खोटया मजकूराचे उत्‍तर पाठविले.  अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी दिली आहे.  सबब, तक्रारदारास पाठविलेल्‍या मालाची रक्‍कम रु.8,43,598/-, तक्रारदाराचे व्‍यवसायातील झालेल्‍या नुकसानीची रक्‍कम रु. 5,00,000/-, तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- देणेबाबत वि.प. यांना आदेश व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

 

3.    तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. यांनी दिलेले माल पाठविलेचे डॉकेट, तक्रारदार यांच्‍या मालाचे बिल, तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, सदर नोटीसीस वि.प. यांनी दिलेले उत्‍तर, डिलीव्‍हरी बाबतचा स्‍टेटस रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 

 

4.    वि.प. यांना नोटीस लागू झालेनंतर वि.प. हे आयोगासमोर हजर झाले परंतु त्‍यांनी विहीत मुदतीत आपले म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, वि.प. यांचेविरुध्‍द “नो से” आदेश करण्‍यात आला.  तदनंतर वि.प. यांनी याकामी हजर होवून सदरचा आदेश रद्द करवून घेतला व आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. वि.प. यांनी आपले लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदारांनी वि.प. कंपनीला वादातील माल अमृतसर येथे पाठविणेसाठी दिलेलाच नव्‍हता.  तक्रारदारांनी वि.प. कंपनीकडे दिलेला माल वि.प. कंपनीचे अमृतसर येथील गोदामात पाठविलेला होता.  तथापि सदरचा माल सदर गोदामामधून गहाळ झालेला होता.  सबब, वि.प. कंपनीने अमृतसर पोलिस स्‍टेशनला तक्रार दाखल करुन गुन्‍हा नोंद केला होता.  सदर गुन्‍हयाचे तपासाबाबतचा तपशील तक्रारदरांना वि.प. यांनी वेळोवेळी कळविला होता.  वि.प. कंपनी सदर गहाळ झालला माल शोधणेकरिता अथक परिश्रम करीत आहेत.  तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये दि. 8/5/2015 रोजी झालेल्‍या करारानुसार वि.प. कंपनीची माल पोहचवणेबाबतची जबाबदारी मर्यादित हाती.  सदरचे करारातील कलम 13 प्रमाणे -

Limitation of Liability/Claims and Liabilities – The liability of BDE for any loss or damage to the shipment (the term shall include all documents or parcels consigned through BDE) shall be lowest of a) Rs.5000/- or b) The amount of loss or damage to the document or parcel actually sustained (c) The actual value of the document or parcel is determined without regard to the commercial utility or special value of the shipper.  I) The actual value of the document or parcel shall be ascertained by reference to the cost of preparation r replacement/reconstruction value at the time and place of shipment but under no circumstances shall exceed Rs.5,000/- (ii) The actual value of a parcel (which is transported hereunder) shall be ascertained by reference to its cost by repair or replacement/resale or fair market value not exceeding the original cost of the article actually paid by the shipper subject to and within overall limit of Rs.5,000/-  9. “BDE SHALL NOT BE LIABLE IN ANY EVENT FOR ANY CONSEQUENTIAL OR SPECIAL DAMAGES OR OTHER DIRECT OR INDIRECT LOSS, HOWSOEVER, ARISING whether or not BDE has knowledge that such damage might be incurred, including but not limited to loss, income, profits, interest, utility or loss of market.”

 

      सदर करारातील तरतुदीचा विचार करता मौल्‍यवान वस्‍तू पाठवणेचे झालेस सदर वस्‍तूचा विमा उतरविणेची जबाबदारी सदर ग्राहकाची असते.  अशा परिस्थितीत वि.प. कंपनीचे कायदेशीर दायित्‍व हे रु.5,000/- अगर सदर वस्‍तूची किंमतीची भरपाई यापैकी जे कमी असेल, तेवढीच जबाबदारी वि.प. कंपनीवर असेल अशी स्‍पष्‍ट तरतूद आहे.  तक्रारदारांना दिलेल्‍या छापील कनसाईनमेंट नोटमध्‍ये सदर अटी व शर्ती नमूद केलेल्‍या आहेत.  सबब, वि.प. यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी न दिलेने तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी केली आहे.  

 

5.    वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत तक्रारदार व वि.प. यांचेमधील करारपत्र, कुरियर पावती, ऑनलाईन ट्रॅकींग फॉर्म, बिल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

6.    तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच वि.प. यांचे म्‍हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.   

 

­अ.क्र.

                मुद्दा

      उत्‍तरे

1

तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे  काय ?     

होय.

3

तक्रारदारांनी केलेल्‍या मागण्‍या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ?     

होय, अंशतः.

4

अंतिम आदेश काय ?

खालीलप्रमाणे

 

 

विवेचन

 

मुद्दा क्र.1

     

7.    तक्रारदार यांचा “ओंकार ज्‍वेलर्स” या नावांने कोल्‍हापूर येथे चांदीच्‍या वस्‍तू बनवून त्‍या विक्री करण्‍याचा चांदीचा व्‍यापार आहे व तक्रारदार हे वि.प. कंपनीतर्फे त्‍यांचा माल पाठवित असतात.  तक्रारदार यांनी अमृतसर येथून चांदीच्‍या मालाची मागणी आलेने दि. 26/9/2017 रोजी दु. 2.00 वाजता वि.प. कंपनीने 3 बॉक्‍स पॅकींगमध्‍ये रक्‍कम रु. 8,43,598/- इतक्‍या किंमतीचा माल 30001 ग्रॅमचे चांदीचे दागिने रक्‍कम रु. 27,300/- याप्रमाणे 8,19,027/- इतक्‍या किंमतीचे व त्‍यावरील जी.एस.टी. व्‍हॅटची किंमत रु. 24,571/- म्‍हणजेच एकूण किंमत रक्‍कम रु. 8,43,598/- चा माल वि.प. कंपनीच्‍या ट्रान्‍स्‍पोर्टने अमृतसर येथे पाठविला होता.  त्‍याचा पावती कोड नं.E00011 असा असून डॉकेट नं. 58606179553 ने माल पाठविला होता व आहे व या संदर्भातील बिलही तक्रारदाराने दाखल केले आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्‍ये ग्राहकाचे नाते निर्माण झालेने  ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2 ते 4

 

8.    तक्रारदार यांनी दिपावलीकरिता अमृतसर येथून चांदीच्‍या मालाची मागणी आलेने दि. 26/9/2017 रोजी 3 बॉक्‍स पॅकींगमध्‍ये 30001 ग्रॅमचे चांदीचे दागिने रक्‍कम रु. 27,300/- याप्रमाणे 8,19,027/- इतक्‍या किंमतीचे व त्‍यावरील जी.एस.टी. व्‍हॅटची किंमत रु. 24,571/- म्‍हणजेच एकूण किंमत रक्‍कम रु. 8,43,598/- चा माल वि.प. कंपनीच्‍या ट्रान्‍स्‍पोर्टने पाठविला होता.  परंतु सदरचा माल डिलीव्‍हरी न झालेबाबत दि. 29/9/2017 रोजी तक्रारदार यांना सिल्‍व्‍हर ऑर्नामेंट हाऊस अमृतसर यांचेकडून समजले.  वि.प. यांनी मालाची डिलीव्‍हरी आज देतो, उद्या देतो अशी कारणे सांगून वेळ निभावून नेली व मालाची डिलीव्‍हरी केली नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे.

 

9.    वि.प. यांनी कथन केले आहे की, तक्रारदार यांनी नमूद केलेला माल, त्‍याचे वजन, त्‍याची किंमत ही सदरची माहिती माल अमृतसरला पाठवितेवेळी दिलेली नाही.  मात्र तक्रारदार व वि.प. यांना दाखल केले मालाचे बिलाचे अवलोकन करता “ Deed Value Rs. 8,43,598/- ” असे स्‍पष्‍ट नमूद आहे.  सदरचे बिलावर Silver Article असलेचेही नमूद आहे.  सबब, वि.प. यांनी घेतलेला सदरचा आक्षेप हे आयोग फेटाळून लावत आहे. 

 

10.   वि.प. कंपनीने यापुढे हेही कथन केले आहे की, तक्रारदार यांनी दि. 30/9/2017 रोजी सदरचा माल अमृतसर येथे पोहोचला असलेबाबत केलेले कथन दिशाभूल व फसवणूक करणारे आहे.  तथापि, वि.प. यांनी आपल्‍या युक्तिवादाचे कलम 6 मध्‍ये “ तक्रारदारांनी वि.प. कंपनीकडे डिलीव्‍हरी करीता दिलेला माल वि.प. कंपनीचे अमृतसर येथील गोदामात पाठवलेला होता. तथापि सदरचा माल सदर गोदामामधून गहाळ झालेला होता.  सबब, वि.प. कंपनीने सदर माल गहाळ झालेबाबत ताबडतोब अमृतसर पोलिसांकडे तक्रार दाखल करुन गुन्‍हा नोंद केलेला होता.  सदर गुन्‍हा पोलिसांकडे नोंद झालेनंतर गुन्‍हयाचे तपासाबाबतचा तपशील वेळोवेळी तक्रारदारांना कळविला होता व आहे.  सबब, वि.प. कंपनीने त्‍यांची कायदेशीर जबाबदारी पूर्ण केलेली होती व आहे.” असे स्‍पष्‍ट कथन केले आहे. सबब, यावरुन तक्रारदार यांचा माल वि.प. कंपनीचे अमृतसर येथील गोदामात पोहोच झालेचे स्‍वयंस्‍पष्‍टच आहे.  सबब, वि.प. यांनी घेतलेला वर नमूद आक्षेपही हे आयोग फेटाळून लावत आहे. 

 

11.   वि.प. व तक्रारदार यांचे दरम्‍यान दि. 8/5/2015 रोजी विशेष करार झाला होता व सदर करारातील अटी व शर्तीनुसार आपली जबाबदारी मर्यादित असून सदरचे कराराचे कलम 13 तसेच एअरवे बिलामधील कलम 8 मधील तरतुदीनुसार एखाद्या ग्राहकास किंमती अगर मौल्‍यवान वस्‍तू पाठवणेचे झालेस सदर वस्‍तूचा अगर मालाचा विमा उतरविणेची जबाबदारी सदर ग्राहकाची असते.  सबब, अशा परिस्थितीमध्‍ये वि.प कंपनीचे कायदेशीर दायित्‍व अगर जबाबदारी रक्‍कम रु.5,000/- अगर सदर वस्‍तू अगर मालाची किंमतीची भरपाई यापैकी जे कमी असेल, त्‍याची जबाबदारी वि.प. कंपनीवर असेल अशी स्‍पष्‍ट तरतूद आहे.  सबब, तक्रारदारांनी वर नमूद करारातील अटींचे उल्‍लंघन व भंग केलेला आहे.  सबब, अशा परिस्थितीत तक्रारदार मागणी करतात, त्‍याप्रमाणे नुकसान भरपाई व इतर दाद तक्रारदारांना मागता येणार नाही अगर कायद्याने देवविता येणार नाही असे कथन केले आहे.  तथापि वर उल्‍लेखिलेल्‍या विशेष करारामधील कलम 13 व एअरवे बिलामधील कलम 8 यामधील तरतुदी वि.प. कंपनीने दाखल केलेचे दिसून येत नाही.  तक्रारदार व वि.प. यांचे मधील करार दाखल असला तरी त्‍यामधील अटी व शर्ती वि.प. यांनी दाखल केलल्‍या नसलेने सदरची बाब वि.प. यांनी पुरावा दाखल करुन शाबीत केली नसलेने हे आयोग तक्रारदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेचे निष्‍कर्षाप्रत येत आहे.  तक्रारदार यांचे बिलावर रक्‍कम रु. 8,43,598/- इतकी नमूद आहे.  तसेच वि.प. यांचेच अमृतसर येथील गोदामातून सदरचा माल गहाळ झाला आहे व त्‍या संदर्भात एफआयआरही दाखल केला असलेचे मान्‍य करुनही तक्रारदार यांनी मागितलेली मागणी न देवून वि.प. कंपनीने निश्चितच सेवात्रुटी केली आहे.  सबब, तक्रारदार यांनी मागितलेली व बिलावर नमूद असणारी रक्‍कम रु.8,43,598/- तक्रारदार यांना अदा करणेचे आदेश वि.प. कंपनीस करणेत येतात.

 

12.   तथापि तक्रारदार यांना झालेल्‍या नुकसानीची घट रु.5,00,000/- या संदर्भात कोणताही पुरावा या आयोगासमोर नसलेने याबाबत हे आयोग कोणतेही भाष्‍य करीत नाही.  मात्र तक्रारदारास निश्चितच याचा मानसिक व शारिरिक त्रास झालेला असला पाहिजे.  सबब, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.

 

आदेश

 

1.    तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2.    वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रु. 8,43,598/- देणेचे आदेश करणेत येतात. 

 

3.    तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात.

 

4.    वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी. 

 

5.    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6.    जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्‍कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्‍याची वजावट करण्‍याची जाबदार यांना मुभा राहील.

 

7.    सदर आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.