( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 11 जानेवारी 2012 )
यातील तक्रारदार ग्लोबल कम्युनिकेशने गैरअर्जदार कंपनीविरुध्द ही तक्रार दाखल केली जी मध्ये नमूद केले की, त्यांनी गैरअर्जदाराकडे पार्सल दिले होते त्यातील मालाची किंमत रुपये 90,268/- होती. मात्र सदरचे पार्सल शेवटपर्यत संबंधीत व्यक्तिला प्राप्त झाले नाही. गैरअर्जदारास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी शेवट पर्यत समाधानकारण उत्तर दिले नाही. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन रुपये 90,268/- 18टक्के व्याजासह गैरअर्जदाराने परत करावे. मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 20,000/-, नोटीसचा खर्च रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 ते 3 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले नाही म्हणुन त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 20/10/2011 पारित करण्यात आला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार एकुण 4 कागदपत्रे दाखल केलीत. त्यात वस्तुचा तपशील, डाक विभागची पावती,ई-मेलचा तपशील, नोटीसची प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केली. गैरअर्जदार क्रं.3 चे वकीलांनी युक्तिवाद केला. मात्र गैरअर्जदार क्रं.1 ते 3 गैरहजर. युक्तिवादाचे वेळी दोन्ही पक्ष गैरहजर. त्यामुळे त्यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला नाही.
###- का र ण मि मां सा -###
सदर प्रकरणात तक्रारदाराचे नाव ग्लोबल कम्युनिकेशन कंपनी असे आहे. त्यांनी पाठविलेल्या मालाबाबत जे दस्तऐवज दाखल केले आहे त्यावर संबंधीत वस्तु या सलोरा इंटरनॅशनल लि. कडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यावरुन एक स्पष्ट होते की, तक्रारदार हे एक व्यापारी प्रतिष्ठान आहे व त्यांनी त्यांचे व्यवसाया संबंधातील जो माल पाठविलेला आहे तो माल गहाळ झालेला आहे. थोडक्यात तक्रारदाराने गैरअर्जदाराची जी सेवा घेतलेली आहे ती व्यवसाईक उपयोगाकरिता घेतलेली आहे हे स्पष्ट आहे आणि ग्राहक सरंक्षण कायद्यातील तरतुदी प्रमाणे अशी सेवा घेणारा हा ग्राहक ठरत नाही आणि म्हणुन ही तक्रार विचारात घेण्याजोगी नाही म्हणुन ती निकाली काढण्यात येते. तक्रारदार योग्य त्या न्यायालयात आपली तक्रार उपस्थित कर शकतील. सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते
2. खर्च ज्याचा त्याने सोसावा.