द्वारा- श्री. एस. के. कापसे , मा. सदस्य यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 25 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी सरल जिवन पॉलिसी खरेदी करण्यासाठी जाबदेणार यांना रुपये 13000/- चा दिनांक 21/1/2009 चा चेक अर्ज क्र. ए 16683722 दिला होता. सदरहू रक्कम तक्रारदारांच्या खात्यातून वजा झाली होती. काही वैद्यकीय कारणास्तव तक्रारदारांच्या एजंटनी तक्रारदारांचा अर्ज परत केला व चेक जाबदेणारांकडून परत येईल असे तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदारांनी वारंवार मागणी करुनही जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम परत केली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये एक लाख नुकसान भरपाई पोटी मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत, जाबदेणार यांनी तक्रारदारांनी कोणतीही सेवा दिलेली नाही, प्रस्तूत वाद ग्राहक वाद नाही म्हणून तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून जो दिनांक 19/08/2009 रोजी अर्ज प्राप्त झाला होता त्याचा क्र.ए 16683722 होता, तक्रारदारांनी तक्रारी सोबत दाखल केलेला अर्ज क्र.ए 15111717 आहे. दोन्ही अर्ज वेगवेगळे आहेत. अर्ज क्र.ए 15111717 वर लाईफ अॅश्युअर्ड या कॉलम मध्ये तक्रारदारांची सही नसून सुषमा यांची सही आहे. तक्रारीसोबत जोडण्यात आलेला अर्ज क्र.ए 15111717 वर दिनांक 20/09/2008 नमूद करण्यात आलेला आहे, तक्रारीमध्ये तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या सरल जिवन पॉलिसीसाठी दिनांक 21/01/2009 रोजी पेमेंट केल्याचे नमूद केलेले आहे. तक्रारीसोबत दाखल करण्यात आलेल्या बँकेच्या स्टेटमेंट दिनांक 18/07/2009 वरुन सदरहू स्टेटमेंट आत्मा ठाकूर, पत्ता – वानवडी, पुणे नमूद करण्यात आलेला आहे. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये नमूद केलेला पत्ता हा वेगळा आहे. म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे पॉलिसी संदर्भात अर्ज क्र. 16683722 केला होता, त्याच अर्जासंदर्भात जाबदेणार यांच्याकडे दिनांक 19/08/2009 रोजीच्या पत्रान्वये पत्रव्यवहार केला होता, परंतु तक्रारीसोबत मात्र तक्रारदारांनी अर्ज क्र.ए 15111717 ची प्रत दाखल केलेली आहे. त्यावर दिनांक 20/09/2008 नमूद करण्यात आलेला असून, लाईफ इन्श्युअर्ड म्हणून सुषमा म्हणून सही करण्यात आलेली आहे, ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या स्टेटमेंटचे मंचाने अवलोकन केले असता सदरहू स्टेटमेंटवर तक्रारदारांचे नाव त्यावर नमूद करण्यात आलेले नसून श्री. आत्मा ठाकूर यांच्या नावाचे आहे, पत्ता – स्टेशन वर्कशॉप, इ एम इ, वानवडी, पुणे असा नमूद करण्यात आलेला असून तक्रारदारांची तक्रारीमध्ये स्वत:चा पत्ता बी-9, ज्योती गार्डन, त्रिशुल सोसायटी जवळ, सासवड, पुणे 411 301 नमूद केलेला आहे. यावरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांना सरल जिवन पॉलिसीसंदर्भात रुपये 13000/- भरले होते, परंतु त्यासंदर्भात कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही, जाबदेणार यांना उपरोक्त रक्कम प्राप्त झाल्याचे, तक्रारदारांनी सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत, जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी तक्रारदारांनी सिध्द केलेली नाही, त्यामुळे तक्रारदारांची तक्रार मंच नामंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.