Maharashtra

Chandrapur

CC/13/90

Laltidevi Jitendralal Shrivastav - Complainant(s)

Versus

Birla Sun Life insurance Company limited - Opp.Party(s)

Adv.S.N.Singh

31 Mar 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/13/90
 
1. Laltidevi Jitendralal Shrivastav
New Majri Colory Vinayak Nagar post Shivaji nagar Tah-Bhadravati
Chandrapur
maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Birla Sun Life insurance Company limited
claim department District Carp Tech Park th Floar Ghodbandar Road Thane 400601
mumbai
maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, कल्‍पना जांगडे (कुटे) मा.सदस्‍य)

(पारीत दिनांक :- ३१/०३/२०१६ )

 

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.

अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे.

 

१.          अर्जदाराने आपल्‍या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार ही मय्यत जितेंद्रलाल श्रीवास्‍तव यांची कायदेशिर पत्‍नी आहे. मय्यत जितेंद्रलाल हे माजरी येथे श्रीमहाविर हिंदी हायस्‍कूल येथे शिक्षक म्‍हणून कार्यरत होते. मय्यत जितेंद्रलाल यांनी दि.१३ जानेवारी २०१२ रोजी गैरअर्जदार यांचे चंद्रपूर येथे असलेल्‍या अधिकृत कार्यालयामधून पॉलिसी क्रं. ००५३२४७९७ काढली होती. सदरची विमा पॉलिसीचा प्रिमियम मय्यत जितेंद्रलाल यांनी यांचे मृत्‍यु पर्यंत नियमित भरला होता व सदर पॉलिसीमध्‍ये अर्जदार ही नॉमिनी आहे. दि. ०३.११.२०१२ च्‍या राञी मय्यत जितेंद्रलाल यांची प्रकृती खूप बिघडल्‍यामुळे ते दि. ०४.११.२०१२ रोजी व्‍हायरल फिवर या कारणामुळे मरण पावलें. अर्जदाराने तक्रारीत असे नमुद केले कि,  मयत जितेंद्रलाल यांनी सदरहु विमा पॉलिसी घेतांना गैरअर्जदार यांना खरी व बरोबर माहीती देवून विमा पॉलिसी घेतली होती व सदरहु विमा पॉलिसी घेते वेळेस गैरअर्जदार यांचे विमा अॅडव्‍हाझर यांनी पूर्ण खाञी व चौकशी करुन विमा पॉलिसी दिली.

 

२.          अर्जदाराचे मयत पतीच्‍या मृत्‍युचे कारण व्‍हायरल फिवर होते म्‍हणून दि. १४.१२.२०१२ रोजी प्राथमिक आरोग्‍य केंद्र माजरी येथिल डॉ. रिजवाना परविन यांनी तक्रारकर्तीच्‍या मय्यत पतीचे मृत्‍युचे कारण व्‍हायरल फिवर सांगितले होते तसे प्रमाणपञ सुध्‍दा दिलेले आहें. अर्जदार हिचे मयत पती शल्‍यक्रिया (सर्जरी), अधिक रक्‍तचाप, हार्ट अॅटक, शुगर, कॅन्‍सर व अन्‍य आजारापासून ग्रसीत नव्‍हते व या आजारामूळे त्‍यांचा मृत्‍यु झाला नव्‍हता गैरअर्जदार यांनी मेडीकल चेकअप करुन व मेडीकल रिपोर्ट बघीतल्‍यानंतरच सदरची विमा पॉलिसी दिली होती. अर्जदार हिने दि. १७.१२.२०१२ रोजी गैरअर्जदार यांचेकडे तिच्‍या मय्यत पतीच्‍या विमा पॉलीसीची रक्‍कम मिळण्‍यासाठी आवश्‍यक सर्व कागदपञांसह अर्ज केला. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे मय्यत पतीला बिकट आजार होता, तसेच अर्जदाराच्‍या पतीने विमा काढतांना खोटी माहिती दिली असे खोटे व बनावटी कारण सांगून अर्जदाराचा विमा दावा दि. १७.०१.२०१३ रोजी नामंजूर केला. त्‍यावर अर्जदार यांनी दि. ०७.०३.२०१३ रोजी त्‍यांचा लेखी आक्षेप रजि.पोष्‍टाने गैरअर्जदाराला पा‍ठविला. परंतु गैरअर्जदार यांनी त्‍यावर कोणताही निर्णय घेतला नाही व विमा रक्‍कम ही दिली नाही म्‍हणून अर्जदाराने दि. ०४.०४.२०१३ रोजी वकीलामार्फत गैरअर्जदाराला नोटीसपाठविला परंतु गैरअर्जदार यांनी सदर नोटीस प्राप्‍त झाल्‍यावरही नोटीसची पुर्तता केली नाही तसेच उत्‍तर देखील दिले नाही गैरअर्जदार यांचे हे कृत्‍य अनुचित व्‍यवहार पध्‍दती  व सेवेत न्‍युनता दर्शविते म्‍हणून अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्‍द सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली.

 

३.          अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने दिलेली सेवा ञुटीपूर्ण आहे व अनुचित व्‍यवहार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे घोषीत करावे व गैरअर्जदाराने विमा पॉलिसीची रक्‍कम रु. ५ लाख व त्‍या रकमेवर दि. १७.०१.२०१३ पासून २४ टक्‍के व्‍याज तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी रु. १,५०,०००/- नुकसान भरपाई व मुलाच्‍या शिक्षणाच्‍या नुकसानापोटी रु. १,००,०००/- व तक्रारीचा खर्च २५,०००/- गैरअर्जदाराकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावे.

 

 

 

४.          अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्‍यांनी निशाणी क्रं.८  वर आपले लेखीउत्‍तर दाखल केले. अर्जदाराने तक्रारीत केलेले आरोप हे खोटे, आधारहीन व चुकीचे असल्‍याने गैरअर्जदाराने नाकबूल केले आहे व पुढे कथन केले की गैरअर्जदाराविरुध्‍द तक्रार दाखल करण्‍याकरीता कोणतेही कारण घडलेले नाही असा प्राथमिक आक्षेप घेतला व या कारणावरुन अर्जदाराची तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे. 

 

५.          अर्जदार हा स्‍वच्‍छ हाताने विद्यमान मंचासमक्ष आलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा हा मय्यत जितेंद्रलाल यांनी विमा प्रस्‍ताव भरतांना महत्‍वाच्‍या गोष्‍टी चुकीच्‍या सांगितल्‍या Misrepresentation of material facts या कारणावरुन नामंजूर केला.  गैरअर्जदाराने पुढे नमूद केले की, मय्यत जितेंद्रलाल यांनी विमा पॉलिसीच्‍या संपूर्ण अटी व शर्ती समजून घेतल्‍यानंतरच स्‍वतःहून दिनांक १३.१.२०१२ रोजी विमा पॉलिसी प्रस्‍ताव दिला त्‍यामध्‍ये अर्जदार बाई हि नॉमिनी आहे.  सदरहू विमा हा रुपये ५,००,०००/- चा असून त्‍याचा १० वर्षाकरीता रुपये ३,७६६.१९ वार्षिक प्रिमियम होता.  मय्यत जितेंद्रलाल यांना संपूर्ण शर्ती व अटी समजवून सांगितल्‍या होत्‍या व नंतरच त्‍यांनी वैद्यकीय माहिती Medical History   संबंधीत प्रश्‍न क्र.११ (c)(iii), (E) , १४ (i) (c), (ii) (a) (c), (f) ला नकारार्थी उत्‍तरे दिलीत.  सदरहू माहितीवर विश्‍वास ठेवूनच गैरअर्जदार यांनी दिनांक १४.१२.२०१२ रोजी ००५३२४७९७ क्रमांकाची विमा पॉलिसी मय्यत यांना जारी केली. गैरअर्जदाराने पुढे नमूद केले की, अर्जदाराने दिनांक १७.१२.२०१२ रोजी गैरअर्जदार यांना मय्यत जितेंद्रलाल यांचा दिनांक ४.११.२०१२ रोजी व्‍हायरल फिवरने मृत्‍यु झाल्‍याचे तसेच विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरीता विमा दावा प्राप्‍त झाला.  अर्जदाराचा विमा दावा प्राप्‍त झाल्‍यानंतर गैरअर्जदाराने चौकशी केली असता, चौकशीमध्‍ये निष्‍पन्‍न झाले की, मय्यत जितेंद्रलाल यांना पॉलिसी घेण्‍यापूर्वीच कॅन्‍सर, डायबीटीस, हायपरटेंशन हे आजार होते व त्‍याकरीता ते दिनांक १८.३.२०११ ते २१.३.२०११ पर्यंत गेटवेल हॉस्पिटल अॅण्‍ड रिसर्च इन्‍स्‍टीट्युट नागपूर येथे उपचाराकरीता भरती होते हे डिस्‍चार्ज कार्ड व इतर वैद्यकीय कागदपञांवरुन स्‍पष्‍ट होते. विमा करार करतांना अचुक व सत्‍य माहिती विमा कंपनीस पुरविणे बंधनकारक आहे.  परंतु, अर्जदार बाईचे मय्यत पतीने पॉलिसी काढतेवेळी महत्‍वाच्‍या गोष्‍टी लपवून, चुकीची व खोटी माहिती दिल्‍याने गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नामंजूर केला ही गैरअर्जदाराचे सेवेतील ञुटी नाही.  त्‍यामुळे सदर तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब अर्जदाराची तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे.

 

६.          अर्जदाराने तक्रार अर्ज, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी युक्‍तीवाद तसेच गैरअर्जदाराने लेखीउत्‍तर, दस्‍ताऐवज, शपथपञ दाखल केले. गैरअर्जदार यांनी सदर प्रकरणात लेखी युक्‍तीवाद दाखल केलेला नाही म्‍हणून दिनांक १२.३.२०१५ रोजी गैरअर्जदार यांचे विरुध्‍द निशाणी क्र.१ वर लेखी युक्‍तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्‍याचाआदेश पारीत, तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी तोंडी युक्‍तीवाद केलेला नाही म्‍हणून दिनांक १२.१.२०१६ रोजी दोन्‍ही पक्षांना तोंडी युक्‍तीवादाकरीता शेवटची संधी देऊन सुध्‍दा गैरहजर राहिले म्‍हणून प्रकरण हे अंतिम आदेशाकरीता ठेवण्‍यात आले असे रोजनाम्‍यामध्‍ये नमूद केले.  अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.

 

      मुद्दे                                             :  निष्‍कर्ष

 

(१)   अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?               :  होय

 

(२)   सदर तक्रार दाखल करण्‍यास कारण घडले आहे काय ?    :  होय

               

(३)    गैरअर्जदाराने अर्जदारास न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे      :  होय

काय ?

 

(४)    गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा     :  होय

अवलंब केला आहे काय ? 

                                               

(५)    आदेश काय ?                                 :   अंतिम आदेशाप्रमाणे

 

                         कारण मिमांसा

मुद्दा क्रं. १ बाबत ः-

 

७.          अर्जदार बाईचे पती मय्यत जितेंद्रलाल यांनी दिनांक १३ जानेवारी २०१२ रोजी गैरअर्जदार यांचे कडून पॉलिसी क्र.००५३२४७९७ काढली होती.  विमा पॉलिसीचा प्रिमियम मय्यत जितेंद्रलाल यांनी त्‍यांचे मृत्‍युपर्यंत भरला होता. सदर पॉलिसीमध्‍ये अर्जदारबाई ही नॉमिनी आहे.  अभिलेखावर सदर पॉलिसी व पावती अनुक्रमांक निशाणी क्र.४ वरील दस्‍त क्र.१ व २ वर दाखल आहे.  दिनांक ४.११.२०१२ रोजी अर्जदाराचे पतीचा मृत्‍यु झाला व अर्जदार ही मय्यत जितेंद्रलाल यांची पत्‍नी असल्‍याने पतीचे मृत्‍युनंतर अर्जदार सदरहू विमा पॉलिसीची लाभार्थी आहे, तसेच विमा पॉलिसीमध्‍ये नॉमिनी आहे ही बाब उभय पक्षांना मान्‍य असल्‍याने अर्जदार ही गैरअर्जदार यांची ग्राहक आहे हे सिध्‍द होत आहे.  सबब, मुद्दा क्रं. १ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

     

मुद्दा क्रं. २ बाबत ः- 

 

८.          निशाणी क्र.४ वरील दस्‍त क्र.१३ ची पडताळणी करतांना असे निदर्शनास आले की, अर्जदार बाईचे पती मय्यत जितेंद्रलाल यांचा दिनांक ४.११.२०१२ रोजी मृत्‍यु झाल्‍याने अर्जदारबाईने आवश्‍यक कागदपञांसह विमा पॉलिसी क्र. ००५३२४७९७ ची विमा रक्‍कम मिळण्‍याकरीता विमा दावा अर्ज केला.  परंतु, गैरअर्जदार यांनी दिनांक १७.१.२०१३ चे पञ पाठवून अर्जदार बाईचा दावा नामंजूर केल्‍याने अर्जदारबाईस दाव्‍याची रक्‍कम मिळाली नाही म्‍हणून अर्जदार बाईस गैरअर्जदार विरुध्‍द तक्रार दाखल करण्‍यास सदर कारण घडले हे वरील दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होत आहे त्‍यामुळे गैरअर्जदाराने घेतलेला आक्षेप की, अर्जदारास तक्रार दाखल करण्‍यास कारण घडले नाही हि बाब ग्राह्य धरण्‍यासारखी नाही असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. २ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. ३ व ४ बाबत ः- 

 

९.          अर्जदाराचे पती मय्यत जितेंद्रलाल यांनी गैरअर्जदाराकडून विमा पॉलिसी काढली होती व त्‍यांचा दिनांक ४.११.२०१२ रोजी मृत्‍यु झाला.  त्‍यानंतर अर्जदारबाईने गैरअर्जदार यांचेकडे सदर विमा पॉलिसीची रक्‍कम मिळण्‍याकरीता आवश्‍यक कागदपञांसह अर्ज केला. याबाबत उभय पक्षांमध्‍ये वाद नाही.  मय्यत जितेंद्रलाल यांचा मृत्‍यु दिनांक ४.११.२०१२ रोजी व्‍हाईरल फिवरने झाला असे प्राथमीक आरोग्‍य केंद्र माझरी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.रिजवाना परवीन यांनी प्रमाणपञ दिले, सदर प्रमाणपञ निशाणी क्र.४ वर दस्‍त क्र.१२ वर दाखल आहे.  यावरुन मय्यत जितेंद्रलाल यांचा मृत्‍यु व्‍हाईरल फिवरने झाला हे सिध्‍द होत आहे.  विमा पॉलिसी देतांना मय्यत जितेंद्रलाल यांची  वैद्यकीय तपासणी केली होती किंवा नाही, तसेच विमा पॉलिसी काढतांना वैद्यकीय तपासणीची आवश्‍यकता होती किंवा नाही हे गैरअर्जदारांनी पुरावा देवून सिध्‍द केले नाही.  त्‍यामुळे अर्जदाराचे कथन की, मय्यत जितेंद्रलाल यांनी विमा पॉलिसी घेतांना गैरअर्जदारांना आरोग्‍यासंबंधी व मेडिकल हिस्‍ट्री बद्दल बरोबर माहिती दिली, तसेच गैरअर्जदारांनी मय्यत जितेंद्रलाल यांची वैद्यकीय तपासणी करुन व खाञी केल्‍यानंतरच विमा पॉलिसी दिली हे अर्जदाराचे कथन ग्राह्य धरण्‍यासारखे आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा अर्ज दिनांक १७.१.२०१३ चे पञाव्‍दारे मय्यत जितेंद्रलाल हे विमा प्रस्‍ताव देण्‍यापूर्वीच आजारी होते या कारणावरुन नामंजूर केल्‍याचे अर्जदारास कळवीले. अर्जदाराने सदर कारणाविरुध्‍द लेखी आक्षेप दिनांक ७.३.२०१३ रोजी गैरअर्जदारास रजिस्‍टर्ड पोष्‍टाव्‍दारे पाठविला.  गैरअर्जदारास सदर लेखी आक्षेप प्राप्‍त झाल्‍यावरही गैरअर्जदाराने त्‍यावर कोणताही निर्णय घेतला नाही.  अर्जदाराने सदर गैरअर्जदाराचे पञ, अर्जदाराने पाठविलेला लेखी आक्षेप, पोष्‍टाची पावती, पोचपावती निशाणी क्र.4 वर दस्‍त क्र.१३ ते १६ वर दाखल केलेले आहेत.   गैरअर्जदार यांनी मय्यत जितेंद्रलाल यांचे मृत्‍युनंतर चौकशी केली असता मृतकाला विमा प्रस्‍ताव देण्‍यापूर्वीच कॅन्‍सर, डायबिटीस आजार (Preexisting disease) होते व मय्यत यांनी गेटवेल हॉस्‍पीटल अॅण्‍ड रिसर्च इन्‍स्‍टीट्युट, नागपूर येथे दिनांक १८.३.२०११ ते २१.३.२०११ पर्यंत कॅन्‍सर डायबिटीस इत्‍यादी आजाराकरीता वैद्यकीय उपचार घेतले हे वैद्यकीय पुरावा देवून सिध्‍द केलेले नाही, तसेच चौकशी अहवाल सुध्‍दा पुरावा दाखल करुन सिध्‍द केलेला नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांची पडताळणी करतांना असे निदर्शनास आले की, सदर दस्‍तऐवज हे छायांकित (झेरॉक्‍स) प्रतीत दाखल करण्‍यात आलेले आहेत व गैरअर्जदाराच्‍या कोणत्‍याही अधिका-यांनी सत्‍यप्रत म्‍हणून साक्षांकित केलेले दिसून येत नाही म्‍हणून सदर दस्‍ताऐवज ग्राह्य धरण्‍यासारखे नाहीत. मंचाच्‍या मतानुसार तक्रारकर्त्‍याच्‍या पतीला पॉलिसी काढण्‍यापूर्वीच आजार होते व त्‍यांनी पॉलिसी घेतांना महत्‍वाची माहिती जाणून-बुजून लपवून खोटी माहिती दिली हे म्‍हणणे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदाराची आहे. 

 

१०.         मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांनी दिलेल्‍या न्‍यायनिवाड्यानुसार.

 

NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION

NEW DELHI

 

REVISION PETITION NO. 1304 OF 2014

 (Against the Order dated 03/02/2014 in Appeal No. 634/2013 of the State Commission Haryana)

1. M/S. ICICI PRUDENTIAL LIFE INFUIRANCE

COMPANY LTD.

 

Versus

 

1. VEENA SHARMA & ANR.

2. ABHISHEK SHARMA

 

ORDER

Dated : 05 Nov 2014

 

“The onus to prove that the deceased had obtained policy by suppressing facts relating to

his illness was on the Corporation, but no tangible evidence was produced on its behalf to

prove that the deceased was suffering from serious liver ailment at the time of taking

policy and he deliberately suppressed this fact. Undisputedly, the policy was issued on

29.3.1998. The deceased must have filled the proforma some time prior to that date.

Therefore, the Corporation ought to have produced evidence to prove that as on the date

of filing the proforma, the deceased was suffering from any identified ailment and he had

intentionally written ‘no’ against item Nos. (a) to (d) of clause 11. This the Corporation

had failed to do.”

 

            मंचाच्‍या मताप्रमाणे वरील न्‍यायनिवाड्याचे तत्‍व सदर प्रकरणात लागु पडते.  गैरअर्जदार यांनी सदर प्रकरणात त्‍यांचा बचाव दस्‍ताऐवज व पुराव्‍याव्‍दारे सिध्‍द केलेले नाही. त्‍यामुळे गैरअर्जदाराचे कथन मय्यत जितेंद्रलाल यानी विमा पॉलिसी घेतांना आरोग्‍यासंबंधी मेडीकल हिस्‍ट्रीबाबत प्रश्‍न क्र.११ (c)(iii), (E), १४ (i) (c), (i) (a), (c) (f) ची माहिती लपवून चुकीची व खोटी माहिती दिली हे ग्राह्य धरण्‍यासारखे नाही. सबब, मंचाच्‍या मताप्रमाणे गैरअर्जदार यांनी अर्जदाराला विमा दाव्‍याची रक्‍कम न देवून किंवा विमा दावा नामंजूर करुन अर्जदारासोबत अनुचित व्‍यवहार पध्‍दतीचा अवलंब केला तसेच सेवेत ञुटी दिली हे सिध्‍द होत आहे.  सबब मुद्दा क्रं. ३ व ४ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. ५ बाबत ः- 

 

११.   मुद्दा क्रं. १ ते ४ च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

अंतीम आदेश

(१)    अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

(२)    गैरअर्जदार यांनी अर्जदाराला विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये ५,००,०००/- (रुपये पाच लाख फक्‍त) आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आत दयावी.

(३)    गैरअर्जदाराने, अर्जदाराला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये ५०००/- व तक्रार खर्च रुपये ३०००/- आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आत दयावी.

(४)    उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 

चंद्रपूर

दिनांक -   ३१/०३/२०१६

                             

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.