आदेश (पारीत दिनांक :25 जानेवारी, 2012) सौ.सुषमा प्र.जोशी, मा.सदस्या हयांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. त.क.यांचे तक्रारी नुसार त्यांची मौजा मजरा (चाका) येथे शेती असून सन 2011 खरीप हंगामा करीता सोयाबिन बियाण्याची खरेदी वि.प.क्रं 1 स्थानिक विक्रेता भूतडा फर्टीलायझर मजरा येथून दिनांक 19 जून, 2011 व दिनांक 22 जून, 2011 रोजी केलेली आहे आणि त्यामुळे त.क.हे वि.प.चे ग्राहक आहे.
CC/86/2011 2. तक्रारकर्ते यांनी, वि.प.क्रं-1 विक्रेता यांचे कडून वि.प.क्रं-2 निर्मित विकत घेतलेल्या बियाण्याचा तपशिल उपलब्ध पावत्या वरुन खालील प्रमाणे
विकत घेतलेले बियाणे | बॅच क्रमांक | प्रतीबॅग वजन 27 किलो प्रमाणे विकत घेतलेल्या बॅग व प्रती बॅग किंमत | बिल क्रमांक व दिनांक | बिलावर विकत घेणा-याचे नाव | बिलाची एकूण रक्कम | शेरा | संकल्प के.एस. सोयाबिन | 16096 | एकूण-03 बॅग, प्रती बॅग किंमत रुपये-1250/- | बिल क्रं-2330 दि.19/06/2011 | हनुमंतराव वासुदेववराव फाळके, रा.चाका मजरा | 3750/- बाकी घेणे | | सोया संकल्प के.एस. | 9096 | एकूण-01 बॅग, प्रती बॅग किंमत रुपये-1250/- | बिल क्रं-2382 दि.22/06/2011 | हनुमंतराव वासुदेववराव फाळके, रा.चाका मजरा | 1250/- नगदी | |
3. तक्रारकर्ते यांचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी वादातील वि.प.क्रं 2 निर्मित संकल्प के.एस.335 हे बियाणे दिनांक 22.06.2011 रोजी पेरल्या नंतर पाच दिवसा नंतरही 40 टक्के पेक्षा जास्त उगवले नाही आणि त्यामुळे सदर दिवशी तक्रारीस कारण घडलेले आहे. त.क.यांनी या बाबत वि.प.क्रं 1 विक्रेता यांचेकडे तक्रार केली असता, त्यांनी वि.प.क्रं 2 चे प्रतिनिधी श्री नितीन देशमुख यांचेशी संपर्क साधावा असे सांगितल्या वरुन, वि.प.क्रं 2 कंपनीचे प्रतिनिधी श्री नितीन देशमुख यांचेशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधून तक्रार केली असता त्यांनी दुसरे दिवशी प्रत्यक्ष्य पिकाची पाहणी केली आणि दोन ते तीन दिवस वाट पाहण्यास सांगितले परंतु तीन दिवसा नंतरही परिस्थितीत कोणताही फरक पडला नाही. 4. त.क.यांनी पुढे असेही नमुद केले की, सदर प्रकारामध्ये काही दिवस निघून गेल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आणि त्यामुळे परत पेरणीसाठी खर्च करणे कठीण झाल्याने पुन्हा श्री नितीन देशमुख प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधला असता, कंपनीशी बोलून कळवितो असे उत्तर दिले व समाधानकारक उत्तर दिले
CC/86/2011 नाही त्यामुळे त.क.ची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे वि.प.नीं त.क.ला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त्यानंतर त.क.यांनी अखील भारतीय ग्राहक संरक्षण समिती वर्धा यांचे माध्यमातून तडजोड करण्याचा प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही.
5. म्हणून शेवटी त.क.यांनी दिनांक 29.06.2011 रोजी कृषी अधिकारी, पंचायत समिती वर्धा यांचेकडे तक्रार नोंदविली व तक्रारीची प्रत मा.जिल्हाधिकारी, वर्धा, मा.अध्यक्ष, जि.प.वर्धा, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.वर्धा यांचेकडे सादर केली. सदर तक्रारी वरुन दिनांक 30.06.2011 रोजी कृषी अधिकारी, पंचायत समिती वर्धा, कृषी सहायक आंजी मोठी व मंडळ कृषी अधिकारी, वर्धा यांनी त.क.च्या शेतातील सोयाबिन पिकाची पाहणी केली आणि शेतक-यांचे बयाण घेतले आणि दिलेल्या अहवालात उगवलेल्या बियाण्यांची टक्केवारी नमुद केलेली आहे. 6. त.क.यांनी पुढे असे नमद केले की, प्रतीबॅग सोयाबिन बियाण्या पासून 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळू शकते. त.क.यांचे शेतात केवळ 40 टक्के झाडे उगवल्यामुळे प्रतीबॅग 60 टक्के सोयाबिन उत्पादनाचे नुकसान झालेले आहे. 7. म्हणून शेवटी तक्रारकर्ता यांनी वि.जिल्हा न्यायमंचा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन उभय वि.प.विरुध्द खालील प्रकारे मागण्या केल्यात 1) वि.प.क्रं 1 व 2 यांनी, त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे. 2) उभय वि.प.कडून वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.यांना बियाण्याची किंमत व पेरणीचा खर्च म्हणून रुपये-7880/- आणि दोषपूर्ण बियाण्याचे पेरणीमुळे झालेले अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसान म्हणून रुपये-52,800/- देण्याचे आदेशित व्हावे. 3) त.क.यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-20,000/-आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- वि.प.कडून देण्याचे आदेशित व्हावे. 4) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्ता यांचे बाजूने मिळावी. इत्यादी स्वरुपाच्या मागण्या तक्रारअर्जात केल्यात. CC/86/2011 8. प्रस्तुत प्रकरणात उभय विरुध्दपक्षांना जिल्हा न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीसेस पाठविण्यात आल्यात.
9. विरुध्दपक्ष क्रं 1 स्थानिक बियाणे विक्रेता यांनी न्यायमंचा समक्ष लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर सादर केला. त्यांनी आपले लेखी जबाबामध्ये त.क.यांना गैरअर्जदार क्रं 2 निर्मित बियाणे हे पॅकबंद जसे आहे तसे दिनांक 19.06.2011 रोजी विक्री केल्याची बाब मान्य केली. परंतु सदर बियाणे हे उधारीने विकले असल्याचे नमुद केले. त.क.यांचे मागणी नुसार संकल्प लॉट क्रं 16096 सोयाबिन वाणाचे बियाणे विकत दिले होते. 10. सोयाबिन बियाणे हे पाऊस व पेरणीचे दृष्टीने योग्य असेल तर साधारणतः 5 ते 10 दिवसात पेरलेले बियाणे उगवते. त.क.यांचे म्हणण्या नुसार सोयाबिन बियाण्याची उगवण क्षमता 3 ते 5 दिवसांची असते त्यामुळे सदर म्हणणे बरोबर नाही. त.क. यांनी के.एस.335 या वाणाचे बियाणे वि.प.क्रं 1 कडून विकत घेतलेले नाही, त्यामुळे त.क.यांची तक्रार सर्वस्वी खोटी आहे.त.क.यांनी केलेली अन्य संपूर्ण विपरीत विधाने नाकबुल केलीत. त.क.यांनी बियाणे दोषा संबधाने त्यांचेकडे कधीही तक्रार केली नाही. तसेच वि.प.क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी श्री नितीन देशमुख यांचेकडे त.क.ने तक्रार केल्याची त्यांना कल्पना नाही, त.क.यांनी श्री देशमुख यांचेशी परस्पर संपर्क साधलेला आहे. तसेच कागदपत्रा वरुन असे निदर्शनास येते की, त.क.ने कृषी अधिका-यांकडे दिनांक 01.07.2011 रोजी तक्रार केली व कृषी अधिका-यांनी दिनांक 02.07.2011 रोजी पाहणी केली असे कथीत अहवाला वरुन दिसून येते. त्या अगोदर किंवा नंतर त.क.यांनी कोणतीही तक्रार वि.प.क्रं 1 कडे केलेली नाही. त.क.यांचे म्हणणे की, त्यांनी दिनांक 29.06.2011 रोजी कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली व त्यांनी दिनांक 30.06.2011 रोजी पाहणी केली हे खरे नाही. त्यांनी त.क.यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही. 11. बियाणे दोषपूर्ण असल्याचा दिलेला अहवाल महाराष्ट्र शासनाचे मार्गदर्शक तत्वा नुसार तयार केलेला नसल्यामुळे तो विश्वासार्ह नाही तसेच सदर अहवालात अनेक त्रृटया आहेत. नियमा नुसार एकत्र क्षेत्र विचारात घेऊन त्याचे पाच समान भाग करुन प्रत्येक भागात गणती घ्यावयास पाहिजे. पंचनामा सुध्दा नियमा नुसार तयार केलेला नाही, तथाकथीत पंचनाम्यात फक्त 1/1 चा प्लॉट गणती घेऊन पंचनामा तयार केलेला आहे, त्यामुळे पंचनामा विचारात घेऊ नये. त्यांनी वि.प.क्रं 2 निर्मित संकल्प लॉट क्रं 016096 क्रमांकाचे बियाणे सिलबंद थैल्याद्वारे CC/86/2011 विकत घेतले होते . त.क.यांचे म्हणण्या नुसार प्रतीबॅग 60 टक्के प्रमाणे नुकसान झाल्याची बाब सर्वस्वी खोटी आहे.त.क.यांचे नुकसानीसाठी वि.प.क्रं 1 जबाबदार नाही कारण ते उत्पादक नाहीत. त्यांनी सदर्हू बियाण्याची चांगली साठवणूक केली होती. सदर लॉटचे बियाण्या बद्यल काहीच कास्तकारांच्या तक्रारी आहेत. सदर बियाणे लॉट बद्यल ब-याच कास्तकारांच्या तक्रारी नाहीत. सदर लॉटच्या बियाण्या पासून अन्य शेतक-यांना चांगले उत्पादन आल्या बाबत त्यांनी कळविलेले आहे. 12. जिल्हास्तरीय चौकशी समितीने दिलेल्या अहवाला वरुन असे दिसून येते की, त.क.यांनी त्यांचे शेतीत 3 बॅग संकल्प सोयाबिन लॉट क्रं 016096 या वाणाची पेरणी केलेली आहे. त.क.यांनी बियाणे सदोष असल्या बाबतचा तज्ञाचा अहवाल सादर केलेला नाही त्यामुळे त.क.यांचे म्हणणे आणि जिल्हा स्तरीय चौकशी समितीचा सदर निष्कर्ष हा चुकीचा आहे,त्यास कोणताही वैज्ञानिक आधार नाही. बियाणे न पाहता वा प्रयोग शाळेमधून तपासणी न करता बियाणे आवश्यक दर्जाचे नव्हते असा अहवाल देणे हे गैरकायदेशीर आहे. त.क.यांनी विकत घेतलेल्या 03 बॅग पैकी फक्त एका बॅग मधील बियाण्याची उगवण बरोबर नाही असा तथाकथीत अहवाल दिलेला आहे. तसेच अहवाला वरुन असेही दिसून येते की, त.क.यांनी परत एक बॅग दुस-या वाणाची पेरणी केलेली आहे, त्यावरुन कोणत्या बियाण्याची उगवण बरोबर झाला नाही असा निष्कर्ष तज्ञ अहवाला वरुनच निघू शकतो. . सन 2010 मधे जास्त पाऊस पडल्यामुळे पेरलेले बियाणे योग्य जमीनीचे अभावी खराब होण्याची वा वाहून जाण्याची शक्यता असू शकते. 13. सदर वाद हा न्यायमंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात निकाली काढल्या जाऊ शकत नाही त्यासाठी व्यापक साक्षी पुराव्याची गरज आहे. बियाणे कायदा 1966 व बियाणे नियम 1968 मध्ये बियाण्याचे जेनेटीक प्युरीटी बाबत तक्रार न्यायमंचा समक्ष चालू शकत नाही. त.क.यांनी त्यांचे बियाणे खराब असल्यामुळे उगवले नाही ही बाब सिध्द केलेली नाही. 14. बियाण्याची उगवण ही शेत जमीन, पेरणीची पध्दत, मशागत, पाऊस, तापमान, औषधांचा वापर, खतांचा वापर इत्यादी घटकांवर अवलंबून असते व या बाबी न्यायमंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात सिध्द होऊ शकत नाही. अहवालामध्ये त.क.यांनी परत एक बॅग दुस-या वाणाची पेरणी केल्याचे नमुद आहे, त्यावरुन कोणत्या बियाण्याची उगवण बरोबर झाली नाही या संबधाने तज्ञाचा अहवाल दाखल नाही. पिकाचे पाहणीचे वेळी , वि.प.क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी हजर
CC/86/2011 होते, त्यांनी कृषी विकास अधिका-यांना सदर लॉटचे बियाणे अन्य शेतक-यांनी पेरलेले असल्यामुळे त्यांचे शेताची पाहणी करण्याची विनंती केली व तसे अर्ज सुध्दा दिले होते. कृषी अधिका-यांनी त्या अनुषंगाने पाहणी केली होती व त्यानुसार सदरहू लॉटचे बियाण्याची उगवण चांगली झाल्याचे त्यांना दिसून आल्याची बाब या वि.प.ला समजलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त.क.यांची तक्रार तथ्यहिन असल्याने खारीज व्हावी, असा आक्षेप वि.प.क्रं 1 बियाणे विक्रेता यांनी घेतला. 15. वि.प.क्रं-2 बियाणे निर्माता यांनी लेखी जबाब दाखल केला. त्यांनी त्यांचे लेखी जबाबामध्ये त.क.यांनी त्यांचे विरुध्द केलेली संपूर्ण विपरीत विधाने नाकबुल केलीत. त्यांनी पुढे नमुद केले की, संकल्प बियाणे आणि जे.एस. 335 हे वेगवेगळे बियाणे असल्याने त्यांची एकत्र पेरणी केल्याचे त.क.चे म्हणणे चुकीचे आहे. त.क.ने त्यांचेकडे कधीही तक्रार केली नाही वा त्यांचे प्रतिनिधी श्री नितीन देशमुख यांचेशी संपर्क साधलेला नाही. त.क.ने दुबार पेरणी किती क्षेत्रात केली? ही बाब लपविलेली आहे. त.क. यांचे असे म्हणणे की, त्यांनी यांनी दिनांक 29.06.2011 रोजी कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली व त्यांनी दिनांक 30.06.2011 रोजी पाहणी केली. 16. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाचे मार्गदर्शक तत्वानुसार तयार केलेला नाही. जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला वरुन असे निदर्शनास येते की, सदर अहवालावर वि.प.कंपनी निर्माता प्रतिनिधी किंवा विक्रेता यांची स्वाक्षरी नाही. सदर अहवाला प्रमाणे 4 बॅगची , 4 एकरातील पेरणीत बियाण्याची उगवणशक्ती 31 टक्के पर्यंत (रॅन्डम पध्दतीने घेतलेल्या मोजणी प्रमाणे ) दर्शविली आहे. त.क.नेच पिशवीतील बियाणे निट हाताळलेले नसावे. सदर मार्गदर्शक पुस्तीकेतील कलम 4 नुसार एकत्र क्षेत्र विचारात घेऊन त्याचे पाच समान भाग घेऊन, प्रत्येक भागातील गणती विचारात घ्यावयास हवी होती परंतु प्रत्यक्षात अहवाला नुसार फक्त 1/1 चा प्लॉट गणती घेऊन पंचनामा केलेला आहे तसेच दुबार पेरणीची झाडे मोजलेली नाहीत. 17. संचालक, (नि.गु.नी.) पुणे यांचे परिपत्रक दिनांक 26.10.1998 नुसार नियम 10(घ) प्रमाणे त्याच लॉटची पेरणी करणा-या अन्य शेतक-यांचे शेताची पाहणी करुन अहवाल तयार करावयास पाहिजे परंतु तसे केलेले नाही. महाराष्ट्र शासनाचे उपरोक्त नमुद परिपत्रकातील 7(घ) प्रमाणे उगवण कमी झाल्यास त्याचे कारण नमुद करणे आवश्यक आहे व ज्या मजूरांनी पेरणी केली त्यांचे बयाण घेणे
CC/86/2011 आवश्यक आहे परंतु जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने बियाणे कमी उगविल्या बाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. 18. बियाण्याच्या रिकाम्या पिशव्या व टॅग घ्यावयास पाहिजे. तसेच अहवालात गट नंबर, शेतीच्या चतुःसिमा, अन्य शेतकरी साक्षीदारांच्या सहया आवश्यक आहे परंतु ते देखील अहवालात नमुद नाही. सदर अहवाल हा महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वा नुसार तयार केलेला नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. त.क.यांचे म्हणण्या नुसार एक बॅग बियाण्या पासून 10 ते 12 क्विंटल सोयाबिन उत्पादन होते हे म्हणणे चुकीचे आहे. 19. त.क.यांचे असे म्हणणे आहे की, उगवण फक्त 40 टक्के झाल्यामुळे 60 टक्के प्रतीबॅग मागे नुकसान झाले हे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे. सदर लॉटचे बियाण्याची उगवणशक्ती महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणेने 74 टक्के दर्शविलेली आहे तसेच प्रमाणित बियाणे टॅग व सिल असलेल्या पिशवी सह विक्रत्याने विक्री केल्यामुळे विक्रेता जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही. या लॉटच्या 394 बॅग्स अन्य शेतक-यांना विक्री केल्यात व या वि.प.ला याच लॉटची पेरणी करणा-या शेतक-यांची उत्पादन चांगले असल्या बाबत पत्र प्राप्त झालेली आहेत. सबब तक्रार खारीज व्हावी असा उजर वि.प.क्रं 2 बियाणे निर्माता यांचे वतीने घेण्यात आला. 20. त.क.यांनी तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रं-5 वरील यादी नुसार एकूण 05 दस्तऐवज दाखल केलेत, ज्यामध्ये प्रामुख्याने बियाणे खरेदी बिलाची प्रत, कृषी अधिका-यांना दिलेला अर्ज, कृषी विभागातील अधिका-यांनी घेतलेले बयाण, जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल, बियाणे पेरणी केलेल्या शेतातील क्षेत्राचे छायाचित्र अशा दस्तऐवजांचा समावेश आहे. 21. त.क.ने शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. 22. वि.प.क्रं-1 बियाणे विक्रेता यांनी लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला. सोबत पान क्रं-32 वरील यादी नुसार वि.प.क्रं 2 यांचा बियाण्या बाबतचा मुक्तता अहवाल तसेच श्री प्रकाश गिरडकर, श्री अनिल ठाकरे, श्री पुरुषोत्तम कठाणे व श्री भास्कर ह.पचारे या कास्तकारांनी बियाण्याची उगवण चांगली झाल्या बाबत कृषी विकास अधिकारी, पंचायत समिती वर्धा यांना लिहिलेल्या पत्रांच्या प्रती
CC/86/2011 दाखल केल्यात. तसेच मा.वरीष्ठ न्यायालयाच्या निकालपत्राच्या प्रती दाखल केल्यात. 23. वि.प.क्रं-2 बियाणे निर्माता यांचे तर्फे लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल करण्यात आला. सोबत पान क्रं- वरील यादी नुसार 8 दस्तऐवज दाखल केले असून, त्यामध्ये प्रामुख्याने मुक्तता अहवाल, बियाणे चांगले असल्या बाबत शेतक-यांनी दिलेली लेखी पत्रे, महाराष्ट्र शासनाचे बियाणे उगवण दोषा संबधीचे परिपत्रक, वि.प.क्रं 2 कंपनीचा ठराव, मुखत्यारपत्र इत्यादीचा समावेश आहे. वि.प.क्रं 2 यांनी लेखी युक्तीवाद तसेच मा.वरीष्ठ न्यायालयाच्या निकालपत्राच्या प्रती दाखल केल्यात. 24. प्रस्तुत प्रकरणात उभय पक्षांचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. प्रकरणातील दाखल शपथपत्रा वरील लेखी कथन आणि दस्तऐवजाचे सुक्ष्म वाचन व अवलोकन केल्या नंतर मंचा समक्ष निर्णयान्वित करण्या करीता खालील मुद्ये काढण्यात आले :- अक्रं मुद्या उत्तर (1) प्रस्तुत तक्रार न्यायमंचास निकाली काढण्याचा अधिकार आहे काय? होय. (2) त.क.,वि.प.चां ग्राहक आहे काय? होय. (3) वि.प.नीं त.क.ला निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवून दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ? व त्यामुळे त.क.चे पिकाचे नुकसान झाले आहे काय ? होय. (4) जर होय तर, नुकसान भरपाईसाठी कोण वि.प. उभय वि.प. जबाबदार आहेत? .. .. .. .. .. (5) काय आदेश? अंतीम आदेशा नुसार : कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 व 2 25. तक्रारकर्त्याने मंचा समक्ष दाखल केलेल्या तक्रारी वरुन स्पष्ट व सिध्द होते की, त.क.ने , वि.प.क्रं 2 निर्मित सोयाबिन बियाणे हे वि.प.क्रं 1 कडून रितसर बिल घेऊन खरेदी केलेले आहे. त.क.ने सदर बियाणे स्वतःचे शेतामध्ये त्याचे व
CC/86/2011 कुटूंबियाचे उपजिविकेसाठी पेरलेले आहे असे दस्तऐवजा वरुन सिध्द होते कारण त.क. हा शेतकरी आहे आणि म्हणून त.क. हा "ग्राहक " या सज्ञेमध्ये मोडतो. तसेच वि.प.वादातील सोयाबिन बियाण्याचे निर्माते व विक्रेते आहेत आणि पुरविलेल्या मालाच्या (बियाण्याच्या) उगवणशक्ती बद्यल / उत्पादन क्षमते बद्यल व झालेल्या उत्पन्नाचे नुकसानी बद्यल प्रस्तुत वाद असल्याने सदर वाद हा "ग्राहक वाद" होतो आणि म्हणून प्रस्तुत प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे तरतुदी अंतर्गत या मंचाद्वारे निकाली काढल्या जाऊ शकते. मुद्या क्रं-3 26. उभय पक्षांमध्ये वादातील सोयाबिन बियाणे , निर्मिती, विक्री-खरेदी, पेरणी, मोक्यावर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीद्वारे पाहणी, पाहणी बद्यलचा समितीचा अहवाल आणि बियाणे गुणवत्ते बद्यल शासकीय यंत्रणेने दिलेले अहवाल या बद्यल कुठेही वाद नाही. फक्त बियाण्याचे लॉट संबधी झालेल्या टंकलेखन चुकीमुळे व त्यानंतर वि.प.द्वारे त्याच अहवालाची दुसरी प्रत दाखल केली गेलेली आहे. 27. त.क.यांनी वि.प.क्रं 2 निर्मित सोयाबिन बियाणे, वि.प.क्रं 1 कडून लॉट क्रं 16096 बिल क्रं 2330, दि.19.06.2011 रोजी 03 बॅग खरेदी केले होते आणि बिली क्रं 2382, दिनांक 22.06.2011 नुसार 01 बॅग बियाणे खरेदी केलेले आहे. त.क.ने जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती समोर दिलेल्या बयानात नमुद केले की, त्याने 04 एकर शेता मध्ये 04 बॅग सोयाबिनची पेरणी केलेली आहे, त.क.ने पेरणी पूर्वी मशागत केली. थायरमची बिज प्रक्रिया केली. पेरणी करताना रासायनिक खताची मात्रा दिली नाही, आंतरमशागत सुध्दा केली नाही. 28. त.क.ने 27.06.2011 रोजी पूर्वी पेरणी केलेल्या बियाण्यांच्या मधल्या तासामध्ये इतर कंपनीचे सोयाबिन बियाण्यांची पेरणी केलेली आहे. वि.प.कडून घेतलेल्या सोयाबिन बियाण्यांची उगवण योग्य झाली नाही असे सुध्दा नमुद केले. 29. जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने पाहणी करुन आपला अहवाल सादर केलेला आहे. त्यामध्ये प्रचलीत व विधीमान्य पध्दती नुसार मोका पाहणीचे वेळी 1 मीटर X 1 मीटर मधील झाडांची संख्या रॅन्डम पध्दतीने मोजणी करण्यात आल्यावर पाच ठिकाणचे नमुने घेण्यात आले, पैकी, एका ठिकाणी 09 झाड तर एका ठिकाणी 16 झाड असे एकूण पाच ठिकाणी
CC/86/2011 सरासरी 14 झाडे म्हणजेच एकूण शिफारसी नुसार 1 मीटर X 1 मीटर मधील 44 झाडे ऐवजी सरासरी 14 झाडे उगवलेली दिसून आलीत आणि सदर प्रमाण हे आवश्यक सरासरी पेक्षा कमी असल्याने त्याची उगवण फक्त 31 टक्के इतकी झालेली आहे असे समितीने आपले अहवालात नमुद केलेले आहे. 30. उभय वि.प.नीं ठाम युक्तीवाद केला की, त.क.ने प्रकरणात 7/12 उतारा दाखल केलेला आहे तसेच त.क.ने स्वतः नमुद केले की, त्याने दुस-या सोयाबिन बियाण्याची बॅग वापरलेली आहे आणि म्हणून कोणते बियाणे योग्य नव्हते सांगता येत नाही. तसेच जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण चौकशी समितीने योग्य त-हेने पाहणी केलेली नाही आणि दिलेला अहवाल योग्य नाही. तसेच शेतीच्या मशागती मध्ये त.क.ने काळजी घेतलेली नाही आणि वातावरणातील बदल, पाऊसाचे प्रमाण व इतर बाबींचा विचार केलेला नाही आणि अयोग्य अहवाल दिलेला आहे आणि म्हणून तो ग्राहय धरण्यात येऊ नये असा युक्तीवाद केला. 31. वि.प.नीं पुढे युक्तीवाद केला की, त.क.ला पुरविण्यात आलेले बियाणे प्रमाणित होते, त्याची योग्य हाताळणी केलेली होती व योग्य व पोषक वातारणात बियाण्याची उगवण योग्य होणेच होते परंतु त.क.च्या चुकीच्या पिक नियोजनामुळे हा प्रकार झालेला आहे त्या करीता वि.प.जबाबदार नाहीत. वि.प.क्रं 1 तर्फे प्रकरणात खालील मा.वरीष्ठ न्यायालयाचे निकालपत्र दाखल करुन त्यावर आपली भिस्त ठेवली. 2010 (1) CPR 50 Hon’ble Andhra Pradesh State Consumer Disputes Redressal Commission, Hyderabad Chenna Rayudu-V/s- Prabhat Agri.Bio-Tech Ltd & Anr. ***** 2010 (3) CPR 340 Hon’ble Madhya Pradesh State Consumer Disputes Redressal Commission, Bhopal National Seeds Corporation Ltd.-V/s- Mohanlal & Ors. ***** CC/86/2011 2011 (2) CPR 8 (N.C) Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi Gujarat State Co-op. Mktg. Federation Ltd.-V/s- Ghanshyambhai Patel ***** 2011 (2) CPR 35 Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi Mahyco Seeds Pvt.Ltd.-V/s- G.Venkata Subba Reddy & Ors. ***** 2010 (1) CPR 167 Hon’ble Madhya Pradesh State Consumer Disputes Redressal Commission, Bhopal Ramesh Gujar-V/s- Suresh Kumar Chhajed & Anr. ***** वि.प.क्रं 2 तर्फे प्रकरणात खालील मा.वरीष्ठ न्यायालयाचे निकालपत्र दाखल करुन त्यावर आपली भिस्त ठेवली. II (2005)CPJ 94 (N.C.) Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi Sonekaran Gladioli Growers-V/s- Baburam ***** 2010 (1) CPR 167 Hon’ble Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai Khamgaon Taluka Bagayatdar Shetakari & Fhale (Froots) Vikri Sahakari Sanstha Khamgaon -V/s- Babu Kutti Daniel ***** CC/86/2011 उपरोक्त मा.वरीष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणात काही अंशी लागू पडतात. 32. तसेच वि.प.नीं युक्तीवाद करीत आपली भिस्त वर नमुद मा.वरीष्ठ न्यायालयाचे निवाडयां वर ठेवलेली आहे आणि नमुद केले की, बियाण्यातील निर्मिती दोष , उगवणशक्ती मधील दोष किंवा इतर कोणतेही आक्षेपित दोष सिध्द करण्याची प्राथमिक जबाबदारी ही तक्रारकर्त्याची होती व आहे. तक्रारकर्त्याने असा कोणताही सबळ पुरावा मंचा समक्ष दाखल केलेला नाही, उलट, वि.प.द्वारे याच लॉट मधील इतर शेतक-यांना पुरविलेल्या बियाण्याची उगवण चांगली व सुस्थितीत झालेली आहे आणि पिक चांगले आलेले आहे असे कृषी विकास अधिका-यांना संबधित शेतक-यांनी दिलेल्या बयानाच्या प्रती प्रकरणात दाखल केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दाखल केलेले आहे. सदर परिपत्रका नुसार बियाणे तक्रार निवारण समितीने बियाण्याची उगवण कमी झाल्यास, बियाण्यातील दोषामुळे झाली कि पेरणीच्या पध्दतीमुळे, जमीनीच्या परिस्थितीमुळे ही कारणे नमुद करावीत असे परिपत्रकातील कलम-7 भ मध्ये स्पष्ट आहे, असे असताना बियाणे तक्रार निवारण समितीने योग्य अहवाल दिलेला नाही आणि म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करावी. 33. उभय पक्षाचे शपथे वरील लेखी कथन, दाखल कागदोपत्री पुरावे, केलेले तोंडी युक्तीवाद व दाखल लेखी युक्तीवाद याचे मंचाद्वारे सुक्ष्म वाचन करण्यात आले आणि मंचा समक्ष असे स्पष्ट होते की, जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने केलेली पाहणी आणि दिलेला अहवाल पूर्णतः परिपत्रका नुसार नसला तरी ठळक मुद्ये त्यात अंर्तभूत केलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे नमुद केले की, वादातील सोयाबिन बियाणे आवश्यक दर्जाचे नव्हते आणि त्यांनी पेरणी बद्यल किंवा मशागती बद्यल कोणताही दोष काढलेला नाही आणि म्हणून मंचाचे मते बियाणे पूर्णतः दोषरहित नव्हते म्हणजेच बियाण्याचे उगवण शक्ती मध्ये कमतरता होती आणि म्हणूनच आवश्यक त्या प्रमाणा पेक्षा जवळ जवळ निम्म्या बियाण्याची उगवण झालेली आहे. CC/86/2011 34. वि.प.ने युक्तीवाद केला की, बियाण्यातील दोष सिध्द करण्याची जबाबदारी त.क.ची आहे आणि त्यांनी ती जबाबदारी पार पाडलेली नाही. मंचाचे मते शेतक-याकडून पुरावे गोळा करण्या संबधी खूप जास्त अपेक्षीत नाही आणि विनाकारण कोणीही प्रकरण कोर्टात खर्च लावून दाखल करणार नाही तसेच त्याचा पाठपुरावा करणार नाही. परंतु तक्रार केली म्हणजेच ती खरी आहे आणि ती यथास्थितीत मंजूर करावी असे सुध्दा कायद्यात अभिप्रेत नाही. 35. मंचाचे मते, त.क.ने त्याला झालेल्या नुकसानी बद्यल जिल्हा स्तरीय समितीकडे तक्रार केलेली आहे आणि त्यांनी बियाण्याचे उगवणी बद्यल आपला अहवाल दिलेला आहे आणि जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला प्रमाणे त.क.ला 04 बॅग मधील बियाण्या पासून कमी उगवण म्हणजे 31 टक्के पर्यंतच उगवण झालेली आहे. परंतु पुरविलेले बियाणे मधील नमुने शासकीय बिज प्रयोग शाळेमधून प्रमाणित/पास असल्याचे अहवाल प्रकरणात दाखल आहेत. सदर अहवालामधील लॉटमधील टंकलेखन दोष फारसे महत्वाचे नाहीत परंतु कोणीही व्यक्ती कोर्टात पैसा व वेळ खर्च करुन इतरा विरुध्द दाद मागणार नाही किंवा पाठपुरावा करणार नाही. जिल्हास्तरीय बियाणे पाहणी समितीचा अहवाल या वि षयी स्वयंस्पष्ट आहे आणि ही सुध्दा शासकीय यंत्रणा आहे व हा अहवाल सहज फेटाळल्या जाऊ शकत नाही आणि म्हणून त.क.चे अपेक्षीत उत्पन्नाचे काही अंशी आर्थिक नुकसान झालेले आहे असे मंचाचे स्पष्ट मत झालेले आहे. 36. वि.प.क्रं 2 चे प्रतिनिधीने मोक्यावर पाहणी केल्याचे त.क. प्रतिज्ञालेखात नमुद करतात. वि.प.च्या प्रतिनिधीचे कोणतेही प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल नाही, असे जरी असले तरी, त.क.ला झालेली नुकसान भरपाई ही त.क.ने केलेल्या मागणी नुसार मंजूर करणे यथोचित व कायदेशिर राहणार नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 37. नुकसान भरपाईचे आकलन करताना, मंचा समक्ष त.क.ने फक्त बियाणे खरेदीचे बिल एवढाच पुरावा दाखल केलेला आहे. मागील वर्षाचे खर्च व उत्पन्नाचा हिशोब किंवा प्रकरण प्रलंबित असताना व विवादीत बियाण्या वरुन झालेल्या उत्पन्नाची माहितीवजा नोंद त.क.ने प्रकरणात दिलेली नाही, जेणेकरुन मंचास नुकसान भरपाईचे आकलन योग्य प्रकारे होऊ शकले असते. CC/86/2011 38. मंचाचे मते, बियाण्याचे किंमतीचे अनुरुप तसेच उगवण मध्ये झालेल्या हानी/क्षतीचे/कमीचे रुपांतर पिक उत्पन्नामध्ये झालेले नुकसान याचा अंदाजच लावावा लागेल. अंदाज हे पुराव्याचे स्थान घेऊ शकत नाही. त.क.ला जरी नुकसान झाले असेल तरी त्याने त्याचे आकलनाचे सबळ पुरावे प्रकरणात दाखल केलेले नाही. शेतीची मशागत व पेरणी बद्यल आलेल्या खर्चाचा पुरावा सुध्दा प्रकरणात दाखल नाही परंतु पेरणी पूर्वी मशागत व पेरणीसाठी साधनाचा उपयोग करावा लागतो व त्यासाठी खर्च करावा लागतो याची मंच कायदेशीर नोंद घेत आहे. 39. मंचाचे मते, त.क.ला 04 बॅग बियाण्याची किंमत, शेतीमशागत व पेरणी पोटी खर्च रुपये-8000/- तसेच उत्पन्नातील नुकसान व झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल नुकसान भरपाई रुपये-3000/-व प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-1000/- मंजूर करणे कायदेशीर व न्यायोचित राहिल. 40. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) तक्रारकर्त्याची तक्रार, उभय वि.प.विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात अंशतः मंजूर करण्यात येते. 2) उभय वि.प.नीं त.क.ला निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवून दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते. 3) उभय वि.प.वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.ला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. 4) उभय वि.प.नीं वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.ला नुकसान भरपाई व शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल एकूण रुपये-11,000/- (अक्षरी रुपये अकरा हजार फक्त ) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त ) द्यावेत. 5) सदर आदेशाचे अनुपालन, उभय वि.प.नीं वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात सदर निकालपत्र प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत करावे, अन्यथा अक्रं 4 मधील नुकसान भरपाईची रक्कम रु- 11,000/- आणि तीवर तक्रार दाखल दिनांक पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज यासह त.क.ला रक्कम देण्यास उभय वि.प. जबाबदार राहतील.
CC/86/2011 6) बियाणे किंमतीपोटी त.क.ला रक्कम देणे असल्यास ती त.क.ने वि.प.कडे चुकती करावी. 7) उभय पक्षांना या आदेशाची सही शिक्क्याची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 8) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ.सोमाणी) | (सौ.सुषमा प्र. जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |